नळदुर्ग : येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु मधू मनेशसिंह हजारी हिने बलभिम महाविदयालय बीड आयोजीत १४ व्या विज्ञान प्रज्ञा शोध परिक्षेत १०० पैकी ९२ गूण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. बीड येथील बलभीम महाविद्यालयाच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या विभागांतील २८ महाविदयालयाने सहभाग नोंदविलेला होता. दि. २८फेब्रुवारी२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान डॉ ए पी जे अब्दुल कलाम लिखित अग्रिपंख पुस्तकाच्या लेखिका माधुरी शानबाग (बेळगाव) यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नळदुर्ग महाविद्यालयांमधून एकूण 71 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती त्यापैकी ५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी एकूण १८ विद्यार्थी प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले असून कु मधु हजारी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी वनस्पतीशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा डॉ उद्धव भाले यांनी समन्वयक म्हणून मोलाचे मार्गदर्शन करून संबंधित अभ्यास स्रोत उपलब्ध करून दिला त्यामुळेच हे यश महाविद्यालयाच्या पदरात पडले आहे. ही परीक्षा केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक क्षमतेला चालना देणारा आणि भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करणारा एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम आहे. डॉ. उद्धव भाले हे नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबतची जनजागृती करून त्यांना प्रेरणा देत असल्यामुळेच सदरिल विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सचिव उल्हास बोरगांवकर,कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे ,बाबुराव चव्हाण,यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ. अशोक कदम,वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ उद्धव भाले,नॅक समन्वयक डॉ शिवाजी घोडके कार्यालय अधिक्षक धनंजय पाटील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

- Post by Dilip Surwase5
- जेऊरवाडी गावाच्या शिवारात बिबट्या वावरताना दिसल्याची चर्चा पसरल्याने गावात भीतीचे वातावरणनिर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच गावातील सतर्क नागरिकांनी वनविभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. जमिनीवर आढळलेल्या पायांच्या ठशांची तपासणी करण्यात आली. प्रथमदर्शनी हे ठसे बिबट्याचे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असले, तरी बिबट्याच्या वावराची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.1
- *वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *पत्रकारांच्या अडचणींकडे विधानपरिषद सभागृहात लक्ष वेधले* मुंबई, दि. ९ मार्च २०२६ : महाराष्ट्र विधानपरिषदेत नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचनेअंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्याबाबतचा मुद्दा विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ अनेक पात्र पत्रकारांना मिळत नाही, कारण त्यांनी ज्या वर्तमानपत्रांमध्ये काम केले ते बंद पडलेले असते किंवा संबंधित संपादकांकडून प्रमाणपत्र मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत पात्र पत्रकार अपात्र ठरत असल्याचे अनेक प्रकरणे त्यांच्या निदर्शनास आली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, अशा प्रकरणांमध्ये सत्यता पडताळण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या कामात निकषांबाबत तांत्रिक अडचणीतुन मार्ग काढण्यास यंत्रणा स्थापन करण्याची गरज आहे, जेणेकरून पत्रकारांना आपली बाजू मांडण्यासाठी योग्य मंच उपलब्ध होईल. अनेक वृद्ध पत्रकार आजारी असूनही योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतात, मात्र विद्यमान यंत्रणेतील मर्यादांमुळे त्यांना अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हा स्तरावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला (DGIPR) या संदर्भात अधिक अधिकार देऊन एक सक्षम आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री कार्यालयाकडे खाते असले तरी संबंधित मंत्र्यांनी या विषयाकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले. यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या सूचनांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.1
- Post by अखंड भारत1
- अंबलटेक गावाचा विकास आणखीन नाही.चांगला रस्ता होता ते खंदून टाकला आहे. नवीन रस्ता करतो म्हणून आणखीन केला नाही जिथे रस्ता चांगला आहे तिथेच रस्ता करीत आहेत .दारासमोर गोट्यात सरपंचाच्या आणि सदस्याच्या गोट्यामध्ये काँक्रीट टाकून काम चालू आहे मंदिर पाशी आणि वरी आणखीन रस्ता नाही?2
- मोहोळ :- आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मोहोळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस शहराध्यक्ष किशोरराजे पवार आणि ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष किशोर पवार म्हणाले की, मोहोळ शहरातील महिलांचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि विविध क्षेत्रातील योगदान अत्यंत मोठे व प्रेरणादायी आहे. भविष्यात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी खंबीरपणे उभा राहील. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्राहक समिती जिल्हा महिला अध्यक्षा अंजली मोहिते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजना गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या राजवर्धिनी राजन घाडगे या विद्यार्थिनीने आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थित महिलांची मने जिंकली. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती घाडगे, रिल स्टार मोहिनी मस्के, नेत्र तंत्रज्ञ मंजिरी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या नंदा गोरे, शिवसेना शहर महिला काँग्रेस अध्यक्षा मुक्ता खंदारे, दिक्षा मोहिते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष केरप्पा गाढवे मोहोळ शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष शालन मोहन पवार, किसान सेल काँग्रेस तालुकाध्यक्ष दाजी साहेब कोकाटे, संभाजी ब्रिगेडच्या चव्हाण, प्रहार संघटनेच्या अध्यक्षा अनिता बळवंतकर, कोषागार विभागातील महिला अधिकारी छबुताई वाघमोडे, सामाजिक कार्यकर्त्या पूजा खिलारे, आशा वर्कर अर्चना सुतार, काँग्रेसच्या उपाध्यक्ष यशोदा कांबळे, तसेच करमुद्दीन पठाण, समरीन शेख, छाया पवार, कमळा माळी आदी मान्यवर महिला उपस्थित होते.2
- Post by Press Mukhed Bablu Mulla2
- Post by Dilip Surwase7