सामूहिक विवाह सोहळ्यातून पैशाची बचत करून कर्जमुक्त रहा- आ. नाना पटोल आनंद धाम व्यसनमुक्ती अभियान तर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात १० वधू-वरांच्या शुभमंगल साकोली साकोली येथील नागझिरा रोडवरील जमनापूर येथील भारत सभागृहात 'आनंदधाम व्यसनमुक्ती अभियान' परसोडी/सौंदड शाखेच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध समाजातील १० जोडप्यांनी आपली नवीन जीवनप्रवास सुरू केला. याप्रसंगी साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकनेते आ. नाना पटोले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. व्यसनमुक्ती अभियानाचे प्रमुख आयोजक व मार्गदर्शक, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप सांदेकर आणि राज्यस्तरीय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्राप्त लक्ष्मणराव मेहर (बाबूजी) यांच्या नेतृत्वाखाली हा आदर्श सामूहिक सर्वजातीय विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमात 'सर्वधर्म समभाव सोशल अॅक्टिव्ह ग्रुप' जमनापूर कॉलनीचाही मोलाचा सहभाग लाभला. या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती आ. नाना पटोले यांच्यासह खा. डॉ. प्रशांत पडोळे, सभापती शितल राऊत, माजी सभापती रेखा भाजीपाले, पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे, सेवानिवृत्त उपपोलीस निरीक्षक दिलीप सांदेकर, मार्गदर्शक,सुकलाल रामटेके, सेवानिवृत्त प्राचार्य प्रफुल्ल सूर्यवंशी, खेमू मोटघरे, दूधराम भुरे, दिलीप मासुरकर, माजी सरपंच आशा शेंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून उपक्रमाचे कौतुक केले. 'आजकाल लग्नसमारंभांवर होणारा वारेमाप खर्च गरिबांच्या आवाक्याबाहेर जात आहे. अशा सामूहिक विवाह सोहळ्यांमुळे पैशांची बचत होते आणि सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ येत नाही. ही काळाची गरज असून जास्तीत जास्त नागरिकांनी याकडे वळावे,' असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिलीप सांदेकर यांनी केले असून, परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे मोठे कौतुक केले आहे.
सामूहिक विवाह सोहळ्यातून पैशाची बचत करून कर्जमुक्त रहा- आ. नाना पटोल आनंद धाम व्यसनमुक्ती अभियान तर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात १० वधू-वरांच्या शुभमंगल साकोली साकोली येथील नागझिरा रोडवरील जमनापूर येथील भारत सभागृहात 'आनंदधाम व्यसनमुक्ती अभियान' परसोडी/सौंदड शाखेच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध समाजातील १० जोडप्यांनी आपली नवीन जीवनप्रवास सुरू केला. याप्रसंगी
साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकनेते आ. नाना पटोले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. व्यसनमुक्ती अभियानाचे प्रमुख आयोजक व मार्गदर्शक, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप सांदेकर आणि राज्यस्तरीय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्राप्त लक्ष्मणराव मेहर (बाबूजी) यांच्या नेतृत्वाखाली हा आदर्श सामूहिक सर्वजातीय विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमात 'सर्वधर्म समभाव सोशल अॅक्टिव्ह ग्रुप' जमनापूर कॉलनीचाही मोलाचा सहभाग लाभला. या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती
आ. नाना पटोले यांच्यासह खा. डॉ. प्रशांत पडोळे, सभापती शितल राऊत, माजी सभापती रेखा भाजीपाले, पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे, सेवानिवृत्त उपपोलीस निरीक्षक दिलीप सांदेकर, मार्गदर्शक,सुकलाल रामटेके, सेवानिवृत्त प्राचार्य प्रफुल्ल सूर्यवंशी, खेमू मोटघरे, दूधराम भुरे, दिलीप मासुरकर, माजी सरपंच आशा शेंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून उपक्रमाचे कौतुक केले. 'आजकाल लग्नसमारंभांवर
होणारा वारेमाप खर्च गरिबांच्या आवाक्याबाहेर जात आहे. अशा सामूहिक विवाह सोहळ्यांमुळे पैशांची बचत होते आणि सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ येत नाही. ही काळाची गरज असून जास्तीत जास्त नागरिकांनी याकडे वळावे,' असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिलीप सांदेकर यांनी केले असून, परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे मोठे कौतुक केले आहे.
- Post by मनिषा विजय काशीवार4
- आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र- आ. राजकुमार बडोले गोंदियात उपवर्गीकरण विरोधात गर्जना । बदर समितीचा अहवालाची जाहीर होळी । तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या. बहुजन समाजाला एकत्र आणले. ते स्वप्न तोडण्याचा उपवर्गीकरणामार्फत सरकारी प्रयत्नाच्या विरोधात डाव हाणून पाडण्यासाठी आणि भावा-भावात भांडण लावण्याच्या निषेध करण्यासाठी आज भव्य आंदोलन गोंदिया येथे करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज २५ एप्रिल रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण निर्णया विरोधात दुपारी ११ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत विशाल धरणे आंदोलन व निदर्शनं करण्यात आली. ४४ अंश तापमानाची तमा न बाळगता हजारों महिला-पुरूष सहभागी झाले. वीस हजारावर लोकांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. आंदोलकांच्यावतीने न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाच्या प्रतींचे प्रतिकात्मक दहन करून सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.1
- खंडाळा घाटात अज्ञात इसमाची दगडाने ठेचून हत्या, पुसद वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा घाट परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून वसंत नगर पोलीस पुढील तपास करत आहेत3
- Post by Dinesh kambli3
- *सिविल अस्पताल मैहर का कलेक्टर विदिशा मुखर्जी ने किया औचक निरीक्षण* *मैहर:* कलेक्टर विदिशा मुखर्जी आज अचानक सिविल अस्पताल मैहर का औचक निरीक्षण करने पहुंचीं। इस दौरान उन्होंने अस्पताल की व्यवस्थाओं का बारीकी से जायजा लिया। कलेक्टर ने ओपीडी, इमरजेंसी वार्ड, प्रसूति वार्ड और दवा वितरण केंद्र का निरीक्षण किया। मरीजों से बात कर इलाज और सुविधाओं की जानकारी ली उन्होंने अस्पताल परिसर में साफ-सफाई बनाए रखने और मरीजों को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध कराने के निर्देश दिए। कलेक्टर ने दवाओं के स्टॉक रजिस्टर की जांच की और सुनिश्चित किया कि जरूरी दवाएं पर्याप्त मात्रा में उपलब्ध हों। निरीक्षण के दौरान अस्पताल प्रबंधन को समय पर ड्यूटी पर उपस्थित रहने और मरीजों के साथ संवेदनशील व्यवहार करने के निर्देश दिए गए। कलेक्टर ने कहा कि स्वास्थ्य सेवाओं में किसी भी तरह की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी।1
- एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा ० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा ० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन ० लग्नपत्रिका अगदी साधी भिवापूर (राजेश जांभुळे ) शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.1
- Post by Ammar haider (ezaan)1
- बाप नावाच्या माणसाचा संघर्ष मुलांनी समजून घ्यावा शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील : धाबेटेकडी येथे जाहीर व्याख्यानमाला नवेगावबांध, विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नांची भूक आणि विज्ञानाची जिज्ञासा असेल, तरच उद्याचे न्यूटन या मातीत घडतील. शिक्षणासोबतच संस्कारांची जोड महत्त्वाची असून, आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या बाप नावाच्या माणसाचा संघर्ष मुलांनी समजून घेणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. पवनीधाबे येथील स्व. प्रा. शाम ठवरे युवा फाउंडेशनच्या वतीने धाबेटेकडी येथे स्व. प्रा. शाम ठवरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित जाहीर व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार बडोले होते. दीप प्रज्वलन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. दिलीप कातोरे, शिवसेनेचे (उद्भव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल, आध्यात्मिक गुरुदत्त मोझरीचे संचालक रवीदादा मानव, प्रा. किशोर शंभरकर, पर्यटन मित्र सुनील तरोणे, संत नानाजी कांबळे महाराज, पंचायत समिती सदस्य चंद्रकला ठवरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोझरीचे अभ्यासक ज्ञानेश्वरदादा रक्षक, हर्षद काकडे, विजय मिश्रा, प्रवीण पटले, मीना शहारे, छाया आमले, प्राचार्य ओ. बी. गायधने, प्रा. नूतन दहीवाले, गणेश ताराम, रवींद्र नाईक, ताराचंद भोगारे, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी उपस्थित तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर राहून ध्येयवादी बनण्याचे आवाहन केले. आईचे प्रेम सर्वांना दिसते, पण बापाचे रापलेले हात आणि फाटलेली विजार कुटुंबाचे भविष्य सावरत असते, या त्यांच्या वाक्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.1