Shuru
Apke Nagar Ki App…
Dinesh kambli
More news from Bhandara and nearby areas
- Post by Dinesh kambli3
- खंडाळा घाटात अज्ञात इसमाची दगडाने ठेचून हत्या, पुसद वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा घाट परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून वसंत नगर पोलीस पुढील तपास करत आहेत3
- Post by मनिषा विजय काशीवार4
- बाप नावाच्या माणसाचा संघर्ष मुलांनी समजून घ्यावा शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील : धाबेटेकडी येथे जाहीर व्याख्यानमाला नवेगावबांध, विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नांची भूक आणि विज्ञानाची जिज्ञासा असेल, तरच उद्याचे न्यूटन या मातीत घडतील. शिक्षणासोबतच संस्कारांची जोड महत्त्वाची असून, आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या बाप नावाच्या माणसाचा संघर्ष मुलांनी समजून घेणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. पवनीधाबे येथील स्व. प्रा. शाम ठवरे युवा फाउंडेशनच्या वतीने धाबेटेकडी येथे स्व. प्रा. शाम ठवरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित जाहीर व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार बडोले होते. दीप प्रज्वलन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. दिलीप कातोरे, शिवसेनेचे (उद्भव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल, आध्यात्मिक गुरुदत्त मोझरीचे संचालक रवीदादा मानव, प्रा. किशोर शंभरकर, पर्यटन मित्र सुनील तरोणे, संत नानाजी कांबळे महाराज, पंचायत समिती सदस्य चंद्रकला ठवरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोझरीचे अभ्यासक ज्ञानेश्वरदादा रक्षक, हर्षद काकडे, विजय मिश्रा, प्रवीण पटले, मीना शहारे, छाया आमले, प्राचार्य ओ. बी. गायधने, प्रा. नूतन दहीवाले, गणेश ताराम, रवींद्र नाईक, ताराचंद भोगारे, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी उपस्थित तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर राहून ध्येयवादी बनण्याचे आवाहन केले. आईचे प्रेम सर्वांना दिसते, पण बापाचे रापलेले हात आणि फाटलेली विजार कुटुंबाचे भविष्य सावरत असते, या त्यांच्या वाक्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.1
- एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा ० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा ० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन ० लग्नपत्रिका अगदी साधी भिवापूर (राजेश जांभुळे ) शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.1
- Post by Ammar haider (ezaan)1
- *नगरपंचायत गोधणी* येथील फायरची गाडी तात्काळ दाखल होऊन आगीवर शेवटी नियंत्रण.2
- पुसद तालुक्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती; नियम न पाळल्यास ₹1000 दंड पुसद तालुक्यात रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून उद्यापासून (दि.२५ एप्रिल )मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. यापुढे कुठेही प्रवास करताना दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे बंधनकारक राहणार आहे. हेल्मेटशिवाय वाहन चालवताना आढळल्यास संबंधित चालकावर ₹1000 दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरी सर्व नागरिकांनी या नियमाची नोंद घेऊन काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.1