Shuru
Apke Nagar Ki App…
भिगवन मध्ये वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण व विजांचा लक-लाकाट...
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
भिगवन मध्ये वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण व विजांचा लक-लाकाट...
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- SALUTE TO AJITDADA : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.. तत्पूर्वी श्वान पथकाकडून स्मृतीस्थळाची तपासणी करण्यात आली.. या पथकातील वीरा श्वानानं सॅल्युट करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली..1
- बारामती मोरगाव रॊड ब-हाणपूर फाटा या ठिकाणी खडी कच सांडल्यामुळे छोटे मोठे अपघात झाले आहेत त्वरित बांधकाम विभाग यांनी त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी1
- Post by मन्सूर शेख1
- Post by हबीब पठान1
- करंजी घाटात पिकअप व कारची समोरासमोर धडक चार जण जखमी पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगरहून शेवगावकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपला समोरून येणाऱ्या कारणे जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये दोन्ही वाहनातील चार जण जखमी झाले आहेत. अपघातामध्ये भाजीपाला घेऊन जाणारी पिकअप रस्त्याच्या कडेला उलटल्याने या पिकप मधील भाजीपाल्याचा अक्षरशा रस्त्यावर सडा पडला होता. तर करंजीकडून नगरकडे जाणाऱ्या अपघातग्रस्त कारचे देखील मोठे नुकसान झाले असून एअरबॅग ओपन झाल्याने या अपघातामध्ये सुदैवाणे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या कार मधील सर्वजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे. पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे अपघात स्थळाजवळून पाथर्डीकडे जात असताना त्यांनी देखील ताबडतोब 108 ला संपर्क साधून जखमींच्या मदतीसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. त्यामुळे पिकअपचे चालक भागवत म्हस्के राहणार वरूर. तालुका शेवगाव यांना पुढील उपचारासाठी नगरला पाठवण्यात आले आहे.4
- अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून दादागिरी आणि गैरवर्तन होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. उपोषणकर्ते सागर शेळके यांच्या म्हणण्यानुसार, शेख नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने काल व आज सलग दोन दिवस उद्धट वर्तन करत उपोषणकर्त्यांशी हुज्जत घातली. आजच्या घटनेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने उपोषणकर्त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असून, यामुळे संपूर्ण प्रकार जनतेसमोर आला आहे. उपोषणकर्त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, सहकारी पोलिसांनी हस्तक्षेप करून मोबाईल परत दिल्याचेही सांगण्यात आले. उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की, संबंधित पोलीस कर्मचारी दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असून, आंदोलनकर्त्यांशी वारंवार गैरवर्तन करतात. आंदोलनकर्त्यांशी झटापट, उद्धट भाषा आणि दबाव टाकण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांना निलंबित करणे किंवा बदली करणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच, संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उपोषणकर्त्यांनी रेशन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दावा केला असून, त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.2
- Post by मन्सूर शेख1