logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हा परिषदेत १६६ वा अभियंता दिन उत्साहात; रक्तदात्यांचा गौरव, नव्या-पदोन्नत अभियंत्यांचे स्वागत विकासकामांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको : सीईओ सत्यम गांधी जिल्हा परिषदेत १६६ वा अभियंता दिन उत्साहात; रक्तदात्यांचा गौरव, नव्या-पदोन्नत अभियंत्यांचे स्वागत -अमरावती : विकासाची पायाभरणी करणाऱ्या अभियंत्यांच्या तांत्रिक कौशल्याला आणि योगदानाला सलाम करत जिल्हा परिषद अमरावती येथे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १६६ वा अभियंता दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात रक्तदात्यांचा गौरव, नव्याने सेवेत दाखल झालेल्या तसेच पदोन्नती मिळालेल्या अभियंत्यांचे स्वागत आणि सेवानिवृत्त अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्यासह कार्यकारी अभियंता नीला वंजारी, स्नेहा धावडे, सुनील जाधव, अधीक्षक अभियंता यशवंत लवटे, कार्यकारी अभियंता श्रीकांत आवंदकर, प्रेम शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना सत्यम गांधी यांनी जिल्ह्याच्या विकासात अभियंत्यांची भूमिका निर्णायक असल्याचे नमूद केले. विकासकामे केवळ निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबरोबरच त्यांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि तांत्रिक दर्जा कायम राखणे ही अभियंत्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. कामांना गती देताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. अभियंता दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान करणाऱ्या दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सेवेत नव्याने रुजू झालेल्या व पदोन्नती मिळालेल्या अभियंत्यांचे स्वागत करण्यात आले. प्रदीर्घ काळ सेवा बजावून निवृत्त झालेल्या अभियंत्यांचाही सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपाच्या सत्रात श्री. यादव तरटे यांनी ‘ऐकण्याची कला’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देत प्रभावी संवादासाठी ऐकण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता मशीदकर यांनी केले, तर अतुल रामटेके यांनी आभार मानले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

10 hrs ago
user_Sachin Ingale
Sachin Ingale
Local News Reporter Chikhaldara, Amravati•
10 hrs ago
58695fdc-86cd-4e45-9253-f82c7fdce15e

जिल्हा परिषदेत १६६ वा अभियंता दिन उत्साहात; रक्तदात्यांचा गौरव, नव्या-पदोन्नत अभियंत्यांचे स्वागत विकासकामांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको : सीईओ सत्यम गांधी जिल्हा परिषदेत १६६ वा अभियंता दिन उत्साहात; रक्तदात्यांचा गौरव, नव्या-पदोन्नत अभियंत्यांचे स्वागत -अमरावती : विकासाची पायाभरणी करणाऱ्या अभियंत्यांच्या तांत्रिक कौशल्याला आणि योगदानाला सलाम करत जिल्हा परिषद अमरावती येथे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १६६ वा अभियंता दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात रक्तदात्यांचा गौरव, नव्याने सेवेत दाखल झालेल्या तसेच पदोन्नती मिळालेल्या अभियंत्यांचे स्वागत आणि सेवानिवृत्त अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्यासह कार्यकारी अभियंता नीला वंजारी, स्नेहा धावडे, सुनील जाधव, अधीक्षक अभियंता यशवंत लवटे, कार्यकारी अभियंता श्रीकांत आवंदकर, प्रेम शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना सत्यम गांधी यांनी जिल्ह्याच्या विकासात अभियंत्यांची भूमिका निर्णायक असल्याचे नमूद केले. विकासकामे केवळ निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबरोबरच त्यांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि तांत्रिक दर्जा कायम राखणे ही अभियंत्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. कामांना गती देताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. अभियंता दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान करणाऱ्या दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सेवेत नव्याने रुजू झालेल्या व पदोन्नती मिळालेल्या अभियंत्यांचे स्वागत करण्यात आले. प्रदीर्घ काळ सेवा बजावून निवृत्त झालेल्या अभियंत्यांचाही सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपाच्या सत्रात श्री. यादव तरटे यांनी ‘ऐकण्याची कला’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देत प्रभावी संवादासाठी ऐकण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता मशीदकर यांनी केले, तर अतुल रामटेके यांनी आभार मानले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अभियंते, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने आकोली जहांगीर शेतशिवारात एका कुत्र्याची शिकार केली असून, दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिविरात एका गायीचीही शिकार सुद्धा केल्याची घटना घडल्याचे येथील नागरीकांन कडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे व भिंतीचे वातावरण आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.
    2
    अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण
कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना!
अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण
कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना!
अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने आकोली जहांगीर शेतशिवारात एका कुत्र्याची शिकार केली असून, दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिविरात एका गायीचीही शिकार सुद्धा केल्याची घटना घडल्याचे  येथील नागरीकांन कडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे व भिंतीचे वातावरण आहे.
बिबट्याचा वावर वाढल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
    1
    माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट
मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे.
सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला
🚛 ट्रक: NL 01 AJ 4266
🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट
इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज
उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर
बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन; शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन;
    1
    शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन;
शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात दणक्यात आगमन;
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
    3
    आमच्या गावाची स्वच्छता 
आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
    user_विकास इंगळे
    विकास इंगळे
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; जळगाव जामोद(प्रतिनिधी): अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला असून, पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी निंभोरा बु. व खेर्डा खुर्द येथील शेतकऱ्यांनी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास २८ सप्टेंबर २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.त्यामुळे प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.यावेळी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.दुष्काळी सवलती व विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा.पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.सन २०२५-२६ चा पीक विमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशा मागण्या केल्या आहेत.या निवेदनाची प्रत बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी अमोल बहादरे, ज्ञानेश्वर खंडारे, पांडुरंग उगले, रमेश देशमुख, आनंद सुरळकर, आनंद बुंदे, नारायण खंडारे, विठ्ठल दिघडे, विलास डवंगे, अनंता कोंडे, प्रज्वल देशमुख, ज्ञानेश्वर अंभोरे, गजानन बुंदे, दशरथ उगले, भीमराव वानखडे, सागर सपकाळ यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
    1
    दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” 
जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा;
दुष्काळ जाहीर करा, नाहीतर २८ पासून आमरण उपोषण!” 
जळगाव जामोद च्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा;
जळगाव जामोद(प्रतिनिधी):
अल्प व अनियमित पावसामुळे खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला असून, पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी निंभोरा बु. व खेर्डा खुर्द येथील शेतकऱ्यांनी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास २८ सप्टेंबर २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.त्यामुळे प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.यावेळी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.दुष्काळी सवलती व विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा.पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.सन २०२५-२६ चा पीक विमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशा मागण्या केल्या आहेत.या निवेदनाची प्रत बुलढाणा जिल्हाधिकारी तसेच जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी अमोल बहादरे, ज्ञानेश्वर खंडारे, पांडुरंग उगले, रमेश देशमुख, आनंद सुरळकर, आनंद बुंदे, नारायण खंडारे, विठ्ठल दिघडे, विलास डवंगे, अनंता कोंडे, प्रज्वल देशमुख, ज्ञानेश्वर अंभोरे, गजानन बुंदे, दशरथ उगले, भीमराव वानखडे, सागर सपकाळ यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी जागो जागी रांगोळी काढून स्वागत. ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी शेगाव : ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर संत नगरी शेगाव आज श्री संत गजानन महाराजांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्री संत गजानन महाराजांनी दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीला ११६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर श्रींच्या पालखीची अश्वांसह व पताकाधारी वारकरी, पालखीचे भोई, सेवेकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भव्य प्रभातफेरी संत नगरीतून काढण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान सर्वत्र “गण गण गणात बोते” आणि “श्री संत गजानन महाराज की जय” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताका, अश्व आणि पालखीचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. श्रींच्या नामस्मरणाने संपूर्ण शेगाव नगरीत आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. श्री संत गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करून, श्री महाराज सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवोत, सर्वांना सुख, शांती, आरोग्य व समृद्धी लाभो, अशी भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली.
    4
    ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी जागो जागी रांगोळी काढून स्वागत.
ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी
शेगाव : ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर संत नगरी शेगाव आज श्री संत गजानन महाराजांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्री संत गजानन महाराजांनी दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीला ११६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर श्रींच्या पालखीची अश्वांसह व पताकाधारी वारकरी, पालखीचे भोई, सेवेकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भव्य प्रभातफेरी संत नगरीतून काढण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान सर्वत्र “गण गण गणात बोते” आणि “श्री संत गजानन महाराज की जय” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.
टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताका, अश्व आणि पालखीचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. श्रींच्या नामस्मरणाने संपूर्ण शेगाव नगरीत आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.
श्री संत गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करून, श्री महाराज सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवोत, सर्वांना सुख, शांती, आरोग्य व समृद्धी लाभो, अशी भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली.
    user_उमेश राजगुरे
    उमेश राजगुरे
    Fruit & Vegetable Wholesaler शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • *प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!* ----------- नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी -------------- *प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!* ----------- नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी -------------- ​अकोट तालुका प्रतिनिधी.... श्री संत वासुदेव महाराजांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या संत वासुदेव नगर परिसरासह संपुर्ण प्रभाग १० मध्ये पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प करीत वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण परिसर हिरवागार व पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने ट्री-गार्डसह वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, रोपलेल्या प्रत्येक वृक्षाचे जतन व संगोपन करण्याची जबाबदारी स्थानिक नगरवासीयांनी स्वतःहून स्वीकारली आहे. ​हा उपक्रम प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक दिलीप बोचे व सौ. विजयाताई बोचे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर, अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनगरे, वृक्षमित्र प्राचार्य गजानन चोपडे आणि मुकुंदराव गावंडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. *​'स्व. विश्वासराव चोपडे स्मृती वृक्ष' उपक्रम'* प्राचार्य गजाननराव चोपडे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय विश्वासराव चोपडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० पर्यावरणपूरक झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पांतर्गत त्यांनी स्वतः ट्री-गार्डसह मोठ्या वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सामाजिक व पर्यावरणीय योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. *​मान्यवरांची उपस्थिती* या प्रेरणादायी सोहळ्याला सुरेश कराळे, नंदकिशोर हिंगणकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राममूर्ती वालसिंगे,नारायणराव अनासाने, पत्रकार विजय शिंदे सहपत्नीक, विनायकराव सपकाळ, प्रदीप ओळंबे, विजय वानखडे, अमोल बोरकर, दीपक पाटील, मनोहर रेचे, विलासराव चोरे, डॉ. लाड,माधव अनासाने, ऍड विपुल भिसे, भिकू गटकळ, अजय मोरे, प्रफुल्ल थोरात,शुभम जाधव, विक्रम सावंत, नागोराव कुलट,राजकुमार सिकजी मंगेश हिंगणकर,ऍड राठी, चोपडे साहेब,ऍड वल्लभ जोत,रमेश तासतोडे,विलास जाधव, नारायण मंडले, संजय गाडगे, यांच्यासह प्रभाग क्र १० परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी दिलिप बोचे यांनी सर्वांचे आभार मानलेत.
    4
    *प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!*
-----------
नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी
--------------
*प्रभाग क्र १० हिरवेगार करण्याचा संकल्प!*
-----------
नगरसेवक दिलीप बोचे यांच्या पुढाकाराने ट्री-गार्डसह वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली संगोपनाची जबाबदारी
--------------
​अकोट तालुका प्रतिनिधी....
श्री संत वासुदेव महाराजांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या संत वासुदेव नगर परिसरासह संपुर्ण प्रभाग १० मध्ये पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प करीत वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 
संपूर्ण परिसर हिरवागार व पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने ट्री-गार्डसह वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, रोपलेल्या प्रत्येक वृक्षाचे जतन व संगोपन करण्याची जबाबदारी स्थानिक नगरवासीयांनी स्वतःहून स्वीकारली आहे.
​हा उपक्रम प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक दिलीप बोचे व सौ. विजयाताई बोचे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर, अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार  किशोर  जुनगरे, वृक्षमित्र प्राचार्य गजानन चोपडे आणि मुकुंदराव गावंडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
*​'स्व. विश्वासराव चोपडे स्मृती वृक्ष' उपक्रम'*
प्राचार्य गजाननराव चोपडे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय विश्वासराव चोपडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० पर्यावरणपूरक झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पांतर्गत त्यांनी स्वतः ट्री-गार्डसह मोठ्या वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सामाजिक व पर्यावरणीय योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*​मान्यवरांची उपस्थिती*
या प्रेरणादायी सोहळ्याला सुरेश कराळे, नंदकिशोर हिंगणकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राममूर्ती वालसिंगे,नारायणराव अनासाने, पत्रकार विजय शिंदे सहपत्नीक, विनायकराव सपकाळ, प्रदीप ओळंबे, विजय वानखडे, अमोल बोरकर, दीपक पाटील, मनोहर रेचे, विलासराव चोरे, डॉ. लाड,माधव अनासाने,  ऍड विपुल भिसे, भिकू गटकळ, अजय मोरे, प्रफुल्ल थोरात,शुभम जाधव, विक्रम सावंत, नागोराव कुलट,राजकुमार सिकजी मंगेश हिंगणकर,ऍड राठी, चोपडे साहेब,ऍड वल्लभ जोत,रमेश तासतोडे,विलास जाधव, नारायण मंडले, संजय गाडगे, यांच्यासह प्रभाग क्र १० परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी दिलिप बोचे यांनी सर्वांचे आभार मानलेत.
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन; गणेश मंडळाच्या बॅन्जोवर पोलिसांची कारवाई
    1
    ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन; गणेश मंडळाच्या बॅन्जोवर पोलिसांची कारवाई
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.