गणेशपूर येथे भाड्याच्या पैशांवरून राडा; दोन्ही गटांविरुद्ध हिवरखेड पोलिसांत गुन्हे दाखल खामगाव : तालुक्यातील गणेशपूर येथे टाटा मॅजिक गाडीच्या भाड्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, यामध्ये अॅट्रॉसिटी कायद्यान्वयेही कारवाई करण्यात आली आहे. गणेशपूर येथील इंद्रजीत बाळकृष्ण वाघे वय 28 यांनी यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी फेब्रुवारी महिन्यात आरोपी शेषराव उर्फ विक्की गजानन झाटे याच्या नातेवाईकांना लग्नासाठी आपली टाटा मॅजिक गाडी (MH 28 R 3357) 3000 रुपये भाड्याने दिली होती. 9 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गावंडे यांच्या चक्कीजवळ त्यांनी भाड्याचे पैसे मागितले असता, आरोपी शेषराव झाटे, किशोर लठाड, नागेश ढोके आणि दीपक लठाड यांनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, शेषराव उर्फ विक्की गजानन झाटे (२४) यांनी प्रति-तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी इंद्रजीत वाघे आणि विवेक वाघे यांनी जुन्या पैशांच्या व्यवहारावरून त्यांच्या भावाला धमकावले. याबाबत विचारणा केली असता, "3000 रुपयांचे 17000 रुपये झाले आहेत" असे म्हणून आरोपींनी फिर्यादीच्या समाजातील महिलांबद्दल अत्यंत अश्लील व अपमानस्पद भाष्य केले. तसेच लाकडी काठीने व चापटांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी इंद्रजीत वाघे आणि विवेक वाघे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अॅट्रॉसिटी) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण जाधव करत आहेत, तर अॅट्रॉसिटी प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Post by Gajanan Dhandare2
- Post by Shivaji Bhosale1
- राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; 5 दिवसांत 40 लाखांची विक्री! बुलढाणा : जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित राजमाता महोत्सव 2026 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सोमवारी महोत्सवाची दिमाखदार सांगता झाली. महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळून अवघ्या पाच दिवसांत तब्बल 40 लाखांहून अधिक विक्री झाली. महिला उद्योजकांच्या स्टॉल्स, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सव रंगला. उत्कृष्ट उत्पादन गटांचा सन्मान करण्यात आला असून या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला मोठी चालना मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले. महिलांच्या कष्टाला बाजारपेठ — राजमाता महोत्सव ठरला यशस्वी!1
- युद्धाचं खरं कारण हे एपस्टीन फाईलच1
- बुलढाण्यात ठाकरे गटाला धक्का जयश्री शेळके यांचे दीर संदीप शेळके यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश1
- बुलढाण्यात उद्यापासून 'भारतीय समता संघटने'चे आमरण उपोषण; प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक.... बुलढाणा :-शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्काची सनद मिळावी आणि वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय समता संघटनेच्या वतीने उद्या, १२ मार्च २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संघटनेने हे आक्रमक पाऊल उचलले आहे. भारतीय समता संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सन १९९० पूर्वीपासून शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी नियमानुकूल करण्यासंदर्भात अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या चुकीच्या अहवालांमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. काय आहेत मुख्य मागण्या? निवेदनात एकूण ७ प्रमुख मागण्यांचा समावेश आहे, त्यापैकी महत्त्वाच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेतः जमीन नियमितीकरणः सन १९७८ ते १९९१ च्या शासन निर्णयानुसार जमिनी नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. ७/१२ वर नोंदः शासकीय जमिनीवर उपजीविका करणाऱ्या आदिवासी व इतर पारंपारिक रहिवाशांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देऊन ७/१२ वर नोंद घ्यावी. वनहक्क दावेः ७५ वर्षांचे पुरावे असूनही तांत्रिक कारणास्तव (जीपीएस सर्व्हेक्षण) नाकारलेले वनहक्क दावे मंजूर करावेत.निवासी सनदः अंढेरा येथील पारधी समाज बांधवांना त्यांच्या निवासी जागेची मालकी सनद देण्यात यावी. शिक्षणः मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील आदिवासी मुलांची शाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी. आम्ही २७ फेब्रुवारी रोजीच या संदर्भात निवेदन दिले होते, मात्र प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आता १२ मार्चपासून आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांसह आमरण उपोषणाला बसणार आहोत. उपोषणादरम्यान आंदोलकांच्या आरोग्यास किंवा जीवितास काही धोका निर्माण झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि शासनाची राहील," असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आम्रपालभाऊ वाघमारे व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.1
- छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली. मुघल बादशहा औरंगजेब याने धर्मांतराचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी तो ठामपणे नाकारला आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिले. म्हणूनच त्यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” म्हणून ओळखले जाते. या महान योद्ध्याला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.1
- तेल गॅस अशा गोष्टींची काळजी सरकार घेत आहे1