logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आज, मंगळवार, २६ मे २०२६ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगाव येथील विलासबाग येथे सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशमुख कुटुंबाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले आणि त्यांना उजाळा देण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक हेमंत पेंडसे यांच्या भाव स्वरांजली कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत लोकप्रिय, सुसंस्कृत आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचा राजकीय प्रवास बाभळगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे दोनदा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा संघर्षमय व यशस्वी राहिला आहे. आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि हजरजवाबीपणाने त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर उद्योग, सहकार, क्रीडा, साहित्य, संगीत आणि कला अशा विविध क्षेत्रांतही त्यांचा सहज वावर होता. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे मोठे श्रेय त्यांना दिले जाते. विशेषतः लातूरच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या विलासरावजी देशमुख साहेब यांनी मांजरा नदीवर बॅरेजेसची साखळी निर्माण करून शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळवून दिले. आपल्या दिलदार आणि संवेदनशील स्वभावाने विरोधकांनाही आपलेसे करणारे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आजही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात.

2 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
2 hrs ago

आज, मंगळवार, २६ मे २०२६ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगाव येथील विलासबाग येथे सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशमुख कुटुंबाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले आणि त्यांना उजाळा देण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक हेमंत पेंडसे यांच्या भाव स्वरांजली कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत लोकप्रिय, सुसंस्कृत आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचा राजकीय प्रवास बाभळगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे दोनदा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा संघर्षमय व यशस्वी राहिला आहे. आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि हजरजवाबीपणाने त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर उद्योग, सहकार, क्रीडा, साहित्य, संगीत आणि कला अशा विविध क्षेत्रांतही त्यांचा सहज वावर होता. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे मोठे श्रेय त्यांना दिले जाते. विशेषतः लातूरच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या विलासरावजी देशमुख साहेब यांनी मांजरा नदीवर बॅरेजेसची साखळी निर्माण करून शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळवून दिले. आपल्या दिलदार आणि संवेदनशील स्वभावाने विरोधकांनाही आपलेसे करणारे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आजही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आज, मंगळवार, २६ मे २०२६ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगाव येथील विलासबाग येथे सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशमुख कुटुंबाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले आणि त्यांना उजाळा देण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक हेमंत पेंडसे यांच्या भाव स्वरांजली कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत लोकप्रिय, सुसंस्कृत आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचा राजकीय प्रवास बाभळगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे दोनदा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा संघर्षमय व यशस्वी राहिला आहे. आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि हजरजवाबीपणाने त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर उद्योग, सहकार, क्रीडा, साहित्य, संगीत आणि कला अशा विविध क्षेत्रांतही त्यांचा सहज वावर होता. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे मोठे श्रेय त्यांना दिले जाते. विशेषतः लातूरच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या विलासरावजी देशमुख साहेब यांनी मांजरा नदीवर बॅरेजेसची साखळी निर्माण करून शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळवून दिले. आपल्या दिलदार आणि संवेदनशील स्वभावाने विरोधकांनाही आपलेसे करणारे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आजही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात.
    1
    आज, मंगळवार, २६ मे २०२६ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त बाभळगाव येथील विलासबाग येथे सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशमुख कुटुंबाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले आणि त्यांना उजाळा देण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक हेमंत पेंडसे यांच्या भाव स्वरांजली कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत लोकप्रिय, सुसंस्कृत आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचा राजकीय प्रवास बाभळगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे दोनदा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा संघर्षमय व यशस्वी राहिला आहे. आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि हजरजवाबीपणाने त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले.

त्यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर उद्योग, सहकार, क्रीडा, साहित्य, संगीत आणि कला अशा विविध क्षेत्रांतही त्यांचा सहज वावर होता. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे मोठे श्रेय त्यांना दिले जाते. विशेषतः लातूरच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या विलासरावजी देशमुख साहेब यांनी मांजरा नदीवर बॅरेजेसची साखळी निर्माण करून शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळवून दिले. आपल्या दिलदार आणि संवेदनशील स्वभावाने विरोधकांनाही आपलेसे करणारे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आजही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • शहाद्याकडून धुळे जात असताना सावळदा गावाजवळ, नुराणी पेट्रोल पंपाजवळ एका चालत्या आयशर ट्रकला (क्र. एमएच १८ एए १८५०) वायरच्या स्पार्किंगमुळे आग लागल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत चालक व सहचालकाने तात्काळ गाडीतून सुरक्षित ठिकाणी धाव घेत आपले जीव वाचवले. हा ट्रक जुने टायर घेऊन जात होता. चालत्या ट्रकमधून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात येताच, काही कळण्याच्या आतच समोरील केबिनमध्ये आग लागली. यामुळे चालकाने गाडीचा वेग कमी करून खाली उडी घेतली. चालकाला पाहून सोबत असलेल्या सहचालकानेही गाडीतून उडी घेतली. मात्र, काही वेळातच आगीचा भडका अधिकच वाढला आणि पाहता पाहता संपूर्ण ट्रकला आग लागून तो पूर्णतः जळून खाक झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना दोन तासांचा कालावधी लागला. ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु आग विझवण्यासाठी तात्काळ कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. काही तासांनी अग्निशमन दलाची गाडी बोलवण्यात आली, मात्र तोपर्यंत ट्रक अर्धा जळून खाक झाला होता. अखेरीस, शहादा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले.
    1
    शहाद्याकडून धुळे जात असताना सावळदा गावाजवळ, नुराणी पेट्रोल पंपाजवळ एका चालत्या आयशर ट्रकला (क्र. एमएच १८ एए १८५०) वायरच्या स्पार्किंगमुळे आग लागल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत चालक व सहचालकाने तात्काळ गाडीतून सुरक्षित ठिकाणी धाव घेत आपले जीव वाचवले. हा ट्रक जुने टायर घेऊन जात होता.

चालत्या ट्रकमधून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात येताच, काही कळण्याच्या आतच समोरील केबिनमध्ये आग लागली. यामुळे चालकाने गाडीचा वेग कमी करून खाली उडी घेतली. चालकाला पाहून सोबत असलेल्या सहचालकानेही गाडीतून उडी घेतली. मात्र, काही वेळातच आगीचा भडका अधिकच वाढला आणि पाहता पाहता संपूर्ण ट्रकला आग लागून तो पूर्णतः जळून खाक झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना दोन तासांचा कालावधी लागला. ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु आग विझवण्यासाठी तात्काळ कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. काही तासांनी अग्निशमन दलाची गाडी बोलवण्यात आली, मात्र तोपर्यंत ट्रक अर्धा जळून खाक झाला होता. अखेरीस, शहादा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले.
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • NEET पेपरफुटी प्रकरणावरून लातूर शहरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान उद्योग केंद्राच्या आदेशाची होळी करण्यात आली.
    1
    NEET पेपरफुटी प्रकरणावरून लातूर शहरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान उद्योग केंद्राच्या आदेशाची होळी करण्यात आली.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    23 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील देगलूर रोडवरील सोनवणे पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागांत इंधन पुरवठ्याबाबत चर्चा आणि अफवा पसरल्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून वाहनांच्या टाक्या पूर्ण भरण्यावर भर दिला आहे. यामुळे अनेक शहरांप्रमाणेच उदगीरमध्येही पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांना वाहतूक समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. इंधन संपण्याच्या भीतीने अनेक वाहनचालकांनी आगाऊ इंधन भरून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापनाने इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. राज्यातील इतर भागांतही अशाच अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी वाढल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
    1
    लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील देगलूर रोडवरील सोनवणे पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागांत इंधन पुरवठ्याबाबत चर्चा आणि अफवा पसरल्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून वाहनांच्या टाक्या पूर्ण भरण्यावर भर दिला आहे. यामुळे अनेक शहरांप्रमाणेच उदगीरमध्येही पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांना वाहतूक समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. इंधन संपण्याच्या भीतीने अनेक वाहनचालकांनी आगाऊ इंधन भरून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापनाने इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. राज्यातील इतर भागांतही अशाच अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी वाढल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
    user_संग्राम पवार विक्रांत न्युज
    संग्राम पवार विक्रांत न्युज
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे वेगात सुरू असताना, डिझेल मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मुखेड-लातूर महामार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सध्या पावसाळ्यापूर्वी शेतकरी मशागतीची कामे, पेरणीपूर्व तयारी आणि इतर शेती कामांमध्ये व्यस्त आहेत. ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेती अवजारे चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. मात्र, डिझेलचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना पेट्रोलपंपावर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. यामुळे शेतीच्या कामासाठी महत्त्वाचा वेळ वाया जात असून मशागतीची कामे खोळंबत असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
    1
    मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे वेगात सुरू असताना, डिझेल मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मुखेड-लातूर महामार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

सध्या पावसाळ्यापूर्वी शेतकरी मशागतीची कामे, पेरणीपूर्व तयारी आणि इतर शेती कामांमध्ये व्यस्त आहेत. ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेती अवजारे चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. मात्र, डिझेलचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना पेट्रोलपंपावर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. यामुळे शेतीच्या कामासाठी महत्त्वाचा वेळ वाया जात असून मशागतीची कामे खोळंबत असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    14 min ago
  • परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात २३ मे २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
    1
    परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात २३ मे २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात, पत्रकार परिषदेदरम्यान काही अधिकारी हसत-खिदळत बोलताना दिसल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणामुळे आधीच जनतेत संतापाची लाट असताना, पोलिस अधिकाऱ्यांचे कथित हलकेफुलके वर्तन पाहून अनेकांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडियावरून 'एका निष्पाप मुलीचा जीव गेला आणि अधिकारी मात्र हसत आहेत का?' असा सवाल विचारला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अधिकारी पत्रकार परिषद सुरू असताना परस्परांशी हसत बोलताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) वर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटना व बालहक्क कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, पोलिस विभागाकडून या व्हिडिओबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसले तरी, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ स्तरावरून माहिती घेतली जात असल्याची चर्चा आहे. दहा वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्येने समाजमन आधीच हेलावले असताना, आता या व्हायरल व्हिडिओमुळे नागरिकांचा रोष आणखी वाढला असून संवेदनशील प्रकरणांमध्ये जबाबदारीने वागण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
    1
    राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या दहा वर्षीय चिमुकलीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात, पत्रकार परिषदेदरम्यान काही अधिकारी हसत-खिदळत बोलताना दिसल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणामुळे आधीच जनतेत संतापाची लाट असताना, पोलिस अधिकाऱ्यांचे कथित हलकेफुलके वर्तन पाहून अनेकांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडियावरून 'एका निष्पाप मुलीचा जीव गेला आणि अधिकारी मात्र हसत आहेत का?' असा सवाल विचारला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अधिकारी पत्रकार परिषद सुरू असताना परस्परांशी हसत बोलताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) वर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटना व बालहक्क कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, पोलिस विभागाकडून या व्हिडिओबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसले तरी, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ स्तरावरून माहिती घेतली जात असल्याची चर्चा आहे. दहा वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्येने समाजमन आधीच हेलावले असताना, आता या व्हायरल व्हिडिओमुळे नागरिकांचा रोष आणखी वाढला असून संवेदनशील प्रकरणांमध्ये जबाबदारीने वागण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
    user_VAIBHAV shinde
    VAIBHAV shinde
    Local News Reporter भूम, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लातूर शहरातून धाराशिवकडे शेतीसाठी बैल खरेदी करून पायी जाणाऱ्या एका शेतकऱ्यावर थेट पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या शेतकऱ्याला नाहक त्रास दिल्याचा आरोप आहे. ही घटना मंगळवार, दिनांक 26 मे 2026 रोजी घडली. धाराशिव जिल्ह्यातील अरजखेडा येथील भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी पाटोदा येथील बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी केली होती. त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचा अधिकृत जनावर खरेदी-विक्रीचा दाखला हातात असतानाही, खोपेगाव परिसरात बजरंग दलाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना अडवून “बैल कुठे नेताय?” “कशासाठी नेताय?” अशी चौकशी करत बराच वेळ रोखून धरले. शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे दाखवूनही त्यांना सोडण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. यानंतर राजीव गांधी चौकात पुन्हा त्यांना अडवण्यात आले. वाढता तणाव पाहून महेश सूर्यवंशी यांनी पोलीस हेल्पलाईनला फोन केला, त्यानंतर विवेकानंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कारवाई अडवणाऱ्यांवर न होता, पोलिसांनी बैलजोडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल केला आणि जनावरे गोरक्षणात पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे “शेतीसाठी बैल खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हेगार ठरवलं जात असेल, तर सामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिवसेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली की, जर शेतकऱ्यांवर नाहक गोरक्षकांकडून त्रास होत असेल, तर तो सहन केला जाणार नाही आणि या प्रकरणावर आवाज उठवला जाईल.
    1
    लातूर शहरातून धाराशिवकडे शेतीसाठी बैल खरेदी करून पायी जाणाऱ्या एका शेतकऱ्यावर थेट पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या शेतकऱ्याला नाहक त्रास दिल्याचा आरोप आहे. ही घटना मंगळवार, दिनांक 26 मे 2026 रोजी घडली.

धाराशिव जिल्ह्यातील अरजखेडा येथील भीमराव सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा महेश सूर्यवंशी यांनी पाटोदा येथील बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी केली होती. त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचा अधिकृत जनावर खरेदी-विक्रीचा दाखला हातात असतानाही, खोपेगाव परिसरात बजरंग दलाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना अडवून “बैल कुठे नेताय?” “कशासाठी नेताय?” अशी चौकशी करत बराच वेळ रोखून धरले. शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे दाखवूनही त्यांना सोडण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. यानंतर राजीव गांधी चौकात पुन्हा त्यांना अडवण्यात आले. वाढता तणाव पाहून महेश सूर्यवंशी यांनी पोलीस हेल्पलाईनला फोन केला, त्यानंतर विवेकानंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

मात्र, कारवाई अडवणाऱ्यांवर न होता, पोलिसांनी बैलजोडी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल केला आणि जनावरे गोरक्षणात पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे “शेतीसाठी बैल खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हेगार ठरवलं जात असेल, तर सामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिवसेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली की, जर शेतकऱ्यांवर नाहक गोरक्षकांकडून त्रास होत असेल, तर तो सहन केला जाणार नाही आणि या प्रकरणावर आवाज उठवला जाईल.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.