Shuru
Apke Nagar Ki App…
शिरूर कासार येथील पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त एका अनोख्या उपक्रमांतर्गत भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या दरम्यान ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषाने आणि गजराने संपूर्ण शिरूर कासार शहर दुमदुमून गेले.
Mahesh Mangrulkar
शिरूर कासार येथील पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त एका अनोख्या उपक्रमांतर्गत भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या दरम्यान ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषाने आणि गजराने संपूर्ण शिरूर कासार शहर दुमदुमून गेले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तानंतर बीड शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. बीड येथे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या कार्यालयासमोर जमलेल्या मोठ्या संख्येतील शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या आनंदोत्सवाच्या वेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनामुळे आणि त्यांच्या एकजुटीमुळेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. या वेळी बोलताना उल्हास गिराम यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. देशभरातील विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाचा हा विजय असून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचा सन्मान झाला आहे. तसेच पुढील काळातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडला.3
- अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बालदिंडी सोहळा संपन्न झाला आहे.1
- छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज औद्योगिक परिसरात राहणारे आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिपके यांच्या घरासमोर अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले असून संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. आंदोलनानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सध्या दिपके यांच्या घरासमोरील परिस्थिती पूर्णपणे शांत असून पोलिसांकडून परिसरात सातत्याने गस्त घातली जात आहे.1
- छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या आई-वडिलांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार अभिजीत यांना टायफॉइड झाला आहे. यापूर्वी त्यांना कधीही असा त्रास झाला नसल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंब चिंतेत आहे. अभिजीत हे सध्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आंदोलन मोडून काढण्यासाठी विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत पालकांनी दिल्ली पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. तसेच सरकारकडून अभिजीतच्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक चर्चा करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने सकारात्मक चर्चा केल्यास हे आंदोलन संपुष्टात येईल आणि विद्यार्थी आपल्या घरी परततील, असे अभिजीत यांच्या आई-वडिलांनी सांगितले.2
- खुलताबाद येथील A.F.K.G. इंग्लिश हायस्कूलच्या वतीने आषाढी एकादशीच्या औचित्याने शनिवारी भव्य नगर दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणातून सकाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या दिंडीला प्रारंभ झाला. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल"च्या अखंड नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिमय केला. दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग, भजन व हरिनाम संकीर्तन सादर केले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिंडी मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण करत दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. भद्रा मारुतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांनी सादर केलेले 'भक्त पुंडलिक' हे नाट्य सादरीकरण, भावपूर्ण आरती आणि नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व तसेच भक्ती, सेवा, समर्पण आणि संस्कार या मूल्यांची माहिती देण्यात आली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक मूल्यांविषयीची जाणीव अधिक दृढ होते, असे प्रतिपादन शाळेचे संस्थापक अध्यक्ष अजय चिमणे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री चिमणे, शिक्षिका माधुरी घोडके, ज्योती केरे, उज्वला केरे, संगीता नागे, निकिता बारगळ, हर्षदा ठेंगडे यांच्यासह शिक्षकवृंद, पालक आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. या नगर दिंडीमुळे संपूर्ण खुलताबाद शहर विठ्ठलमय झाले असून उपस्थितांनी शाळेच्या या संस्कारक्षम उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.1
- शिरूर कासार येथील पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त एका अनोख्या उपक्रमांतर्गत भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या दरम्यान ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषाने आणि गजराने संपूर्ण शिरूर कासार शहर दुमदुमून गेले.1