आज जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत “संपूर्णता अभियान 2.0” बाबत वडवणी तालुक्याच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला. ___ आज जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत “संपूर्णता अभियान 2.0” बाबत वडवणी तालुक्याच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला. या वेळी आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी आणि पायाभूत सुविधा या प्रमुख क्षेत्रांमध्ये वडवणी तालुक्याने केलेल्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यात आले. गाव पातळीवर योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या साठी आवश्यक सूचना व पुढील उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. आरोग्य विभागामार्फत गरोदर मातांनी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले. शिक्षण विभागात शाळा सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी करण्यासाठी CCTV कॅमेरे, शाळांमध्ये शौचालयांची उपलब्धता आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात यावा., कृषी क्षेत्रात रेशीम शेती, बचत गटांमार्फत उत्पादन-विक्री, तसेच “सौर ग्राम” संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला., अंगणवाडी केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, ITI इमारत, बचत भवन, उमेद मार्ट, निवासी वसतिगृह आणि विविध विकासकामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वडवणी तालुक्याला आदर्श तालुका म्हणून विकसित करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, सर्व विभागांच्या समन्वयातून विकासाची गती अधिक वाढविण्यात येणार आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत “संपूर्णता अभियान 2.0” बाबत वडवणी तालुक्याच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला. ___ आज जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत “संपूर्णता अभियान 2.0” बाबत वडवणी तालुक्याच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला. या वेळी आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी आणि पायाभूत सुविधा या प्रमुख क्षेत्रांमध्ये वडवणी तालुक्याने केलेल्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यात आले. गाव पातळीवर योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या साठी आवश्यक सूचना व पुढील उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. आरोग्य विभागामार्फत गरोदर मातांनी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीस प्राधान्य
द्यावे, असे आवाहन करण्यात आले. शिक्षण विभागात शाळा सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी करण्यासाठी CCTV कॅमेरे, शाळांमध्ये शौचालयांची उपलब्धता आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात यावा., कृषी क्षेत्रात रेशीम शेती, बचत गटांमार्फत उत्पादन-विक्री, तसेच “सौर ग्राम” संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला., अंगणवाडी केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, ITI इमारत, बचत भवन, उमेद मार्ट, निवासी वसतिगृह आणि विविध विकासकामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वडवणी तालुक्याला आदर्श तालुका म्हणून विकसित करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, सर्व विभागांच्या समन्वयातून विकासाची गती अधिक वाढविण्यात येणार आहे.
- ----- (प्रतिनिधी):- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ०१ एप्रिल बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी केले. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोखंडे, गर्जे, वीर, कदम, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. __-__ एचपीव्ही लस पूर्णतः सुरक्षित :- डॉ.क्रांती देशपांडे, डॉ.सुनिता बारकुल एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आतापर्यंत कोणते ही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पात्र मुलीने ही लस घेणे आवश्यक आहे. पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी केले. __-__ या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनजागृतीत मोठी वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.1
- Post by Balaji Vedpathak1
- जालना - सोलार कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा संताप; दोन वर्षांपासून तक्रारी प्रलंबित.. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथील शेतकरी उमेश ढेरे या शेतकऱ्यांनी जिके सोलार कंपनीविरोधात गंभीर तक्रारी केल्या असून, गेल्या दोन वर्षांपासून या तक्रारींकडे कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. कंपनीकडून बसविण्यात आलेल्या सोलार यंत्रणेत बिघाड असूनही दुरुस्ती होत नाही, तसेच कंपनीचे फोनही लागत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.1
- समृद्धी महा मार्गावर भीषण अपघातात जालना 6 मजूर महिलांचा मृत्यू, जालन्यातील कडवंची शिवारात घडली घटना1
- समृद्धी महामार्ग रस्त्यावर झालेल्या अपघातात बदनापूर तालुक्यातील केलीगव्हाण व खादगाव येथील कामगारांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती या वाहनस एका दुसऱ्या वाहनाने जोराची धडख दिल्याने सात जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.5
- मंठा शहरातील श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्ती मे वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती नगर येथील श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैजनाथ नाना बोराडे यांनी महापूजा व महाआरती केली.1
- जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली1
- जालना - समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ७ महिला मजूर ठार, ४ गंभीर जखमी !उभ्या असलेल्या पिकअपला ट्रॅकची धडक.. समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात बुधवारी सायंकाळी अत्यंत भीषण अपघात घडला. नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्याने ७ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, गवत काढण्याच्या कामासाठी आलेल्या महिला मजुरांना घेण्यासाठी पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला थांबले होते. याचवेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअपचा पूर्ण चक्काचूर झाला असून मृत महिलांचे मृतदेह रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले होते. रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला दिसत होता, तसेच महिलांचे जेवणाचे डबे, चपला व इतर साहित्य विखुरलेले आढळले. मृत महिलांची नावे पुढीलप्रमाणे : १) अल्काबाई दादाराव आदमाने (निधोना) २) लक्ष्मीबाई संतोष मदन (केळीगव्हाण) ३) मिना परमेश्वर आदमाने (निधोना) ४) कांचनबाई प्रकाश आदमाने (निधोना) ५) ताराबाई गहेनाजी चौधरी (केळीगव्हाण) ६) कडुबाई रामदास मदन (केळीगव्हाण) ७) सुमनबाई कचरू आदमाने (निधोना) मृत महिला या जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण व परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील जखमी महिलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.1