बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर धाड; शिवाजीनगर पोलिसांत दोन गुन्हे दाखल, ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त! खामगाव : शहरातील शौकत कॉलनी आणि दाल फैल परिसरात बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी आणि रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यांवर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या कारवायांत गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ६२,१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशनी बळीराम फुलझेले यांनी पंचांसह शौकत कॉलनी व दाल फैल भागात छापे टाकला असता आरोपी मोइन खान इलीयास खान (वय २३, रा. जुनाफैल मस्तान चौक) हा इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने घरगुती गॅस सिलेंडरचे बेकायदेशीर रिफिलिंग करताना आढळून आला. त्याच्याकडून १८ हजारांची 'मेट्रो सुपर' इलेक्ट्रिक मोटर, HP कंपनीचे भरलेले गॅस सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व रिफिलिंग नोझल असा एकूण ३३,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत आरोपी सैयद अमीर सैयद रब्बानी (वय ७०, रा. शिवाजीनगर) याच्या अड्ड्यावर धाड टाकून ६ LPG गॅस सिलेंडर (HP व इंडेन कंपनीचे), लाल-निळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोटर, वजन काटा आणि नोझलसह ३ नळ्या असा २८,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी पुरवठा अधिकारी रोशनी फुलझेले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर धाड; शिवाजीनगर पोलिसांत दोन गुन्हे दाखल, ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त! खामगाव : शहरातील शौकत कॉलनी आणि दाल फैल परिसरात बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी आणि रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यांवर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या कारवायांत गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ६२,१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी
तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशनी बळीराम फुलझेले यांनी पंचांसह शौकत कॉलनी व दाल फैल भागात छापे टाकला असता आरोपी मोइन खान इलीयास खान (वय २३, रा. जुनाफैल मस्तान चौक) हा इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने घरगुती गॅस सिलेंडरचे बेकायदेशीर रिफिलिंग करताना आढळून आला. त्याच्याकडून १८ हजारांची 'मेट्रो सुपर' इलेक्ट्रिक मोटर, HP कंपनीचे भरलेले गॅस सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व रिफिलिंग नोझल असा एकूण ३३,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर दुसऱ्या कारवाईत आरोपी सैयद अमीर सैयद रब्बानी (वय ७०, रा. शिवाजीनगर) याच्या अड्ड्यावर धाड टाकून ६ LPG गॅस सिलेंडर (HP व इंडेन कंपनीचे), लाल-निळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोटर, वजन काटा आणि नोझलसह ३ नळ्या असा २८,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी पुरवठा अधिकारी रोशनी फुलझेले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
- बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर धाड; शिवाजीनगर पोलिसांत दोन गुन्हे दाखल, ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त! खामगाव : शहरातील शौकत कॉलनी आणि दाल फैल परिसरात बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी आणि रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यांवर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या कारवायांत गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ६२,१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशनी बळीराम फुलझेले यांनी पंचांसह शौकत कॉलनी व दाल फैल भागात छापे टाकला असता आरोपी मोइन खान इलीयास खान (वय २३, रा. जुनाफैल मस्तान चौक) हा इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने घरगुती गॅस सिलेंडरचे बेकायदेशीर रिफिलिंग करताना आढळून आला. त्याच्याकडून १८ हजारांची 'मेट्रो सुपर' इलेक्ट्रिक मोटर, HP कंपनीचे भरलेले गॅस सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व रिफिलिंग नोझल असा एकूण ३३,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत आरोपी सैयद अमीर सैयद रब्बानी (वय ७०, रा. शिवाजीनगर) याच्या अड्ड्यावर धाड टाकून ६ LPG गॅस सिलेंडर (HP व इंडेन कंपनीचे), लाल-निळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोटर, वजन काटा आणि नोझलसह ३ नळ्या असा २८,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.या प्रकरणी पुरवठा अधिकारी रोशनी फुलझेले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.3
- SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी! बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात... SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी! बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात... जळगाव जामोद (प्रतिनिधी) : SIR प्रक्रियेत मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व संविधानप्रेमी नागरिकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, SIR प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि वगळलेली नावे मतदार यादीत पुनर्स्थापित करावीत, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “ज्ञानेश कुमार तो झाँकी है, मोदी-शहा बाकी है,” अशी टीका करत सामान्य, गरीब व वंचित नागरिकांचा मताचा अधिकार हिरावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, जयश्री शेळके, संगीतराव भोंगळ, विश्वनाथ कांबळे, दत्ता पाटील, बी.टी. जाधव, लक्ष्मणराव घुमरे, रामविजय बुरुंगले, तुकाराम काळपांडे,वर्षा इंगळे, ज्योती खेडेकर, ईरफान पठाण, आशिष वायझोडे, झिया उल हक, प्रमोद सपकाळ, सचिन बोन्द्रे, समाधान दामधर, पी.एम. जाधव, अजहर देशमुख, अनंता वाघ, महादेव भालतडक, सरस्वती बापट, सविता देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.1
- मोईन गवळी खून प्रकरणाचा छडा लावण्यात यश दोन आरोपी गजाआड अकोला : बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत २९ सप्टेंबर रोजी झालेल्या मोईन गवळी यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला. प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. २९ सप्टेंबरच्या रात्री अमरावतीहून अर्टिगा कारने बाळापूरकडे येत असताना पारस फाटा उड्डाणपुलाजवळ रस्त्यावरून जाण्यावरून दुचाकीवरील दोघांशी वाद झाला. त्यानंतर अडाणपुलाजवळ आरोपींनी चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मोईन गवळी गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात भा.न्या.सं. कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींची पूर्वओळख नसल्याने तसेच घटनास्थळी सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याने तपासाचे आव्हान होते. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हळकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने माहितीदारांचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. त्यातून वैभव पुरुषोत्तम शितळे (२२) आणि गौरव गजानन घुगे (२६), दोघेही खडकी, अकोला, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत वाहनाला कट लागल्याच्या वादातून हल्ला केल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील कारवाईसाठी दोघांना बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.1
- BABBAN Ali BABBAN Ali1
- दुष्काळाच्या छायेत सोयाबीनची कापणी! मिरापूरात पीक कापणी प्रयोगातून उत्पादनाची नोंद | India News R7 मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम मंडळ अंतर्गत मिरापूर येथे सोयाबीन पिकाचा पीक कापणी प्रयोग महसूल विभागाच्या वतीने नियमानुसार पार पडला. ग्राम महसूल अधिकारी प्रियंका पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रयोगात महसूल विभाग, विमा कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. युनूस शेख यांच्या शेतातील नमुन्यात ४२० ग्रॅम, तर अजहर जमील यांच्या शेतातील नमुन्यात ९५५ ग्रॅम उत्पादनाची नोंद करण्यात आली. पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला असून, दुष्काळग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत, पीक विमा भरपाई, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. 📺 इंडिया न्यूज आर सेवन सहसंपादक : सफदर शाह व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe करा.1
- बाभळी येथील उर्दू शाळा क्र. १० मधील शालेय पोषण आहाराच्या खिचडीत कीटक आढळल्याचा गंभीर प्रकार समोर. बाभळी येथील उर्दू शाळा क्र. १० मधील शालेय पोषण आहाराच्या खिचडीत कीटक आढळल्याचा गंभीर प्रकार समोर.1
- गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू गिरडा फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू बुलढाणा : आज रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास गिरडा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात निखिल नावाच्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निखिल हा आपल्या अॅक्सेस दुचाकीवरून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना गिरडा फाट्याजवळ हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. मात्र, तोपर्यंत निखिलचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यास सुरुवात केली. अपघात नेमका कशामुळे व कोणत्या परिस्थितीत झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून तपासानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.1
- पिंपळगाव राजा येथे अवैध लाकूड वाहतूक पकडली ; खामगाव वनविभागाची कारवाई खामगाव : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, खामगावअंतर्गत पिंपळगाव राजा परिसरात अवैध वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक करणारा मेटॅडोर वनविभागाच्या पथकाने ५ ऑक्टोबर रोजी रात्री धाड टाकून जप्त केला. या कारवाईत दीड लाख रुपये किमतीचे वाहन आणि लाकड असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव वनपरिक्षेत्राचे पश्चिम वनपाल यशवंत देशमुख हे पथकासह पिंपळगाव राजा भागात गस्तीवर होते. दरम्यान, एका मेटॅडोरमधून (क्रमांक एमएच 28 बी 6173) बेकायदेशीरपणे लाकडांची वाहतूक होत असल्याची गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली. पथकाने तत्काळ सापळा रचून सदर वाहनाला अडवले व तपासणी केली. तपासणीदरम्यान मेटॅडोरमध्ये आंबा आणि इतर अडजात वृक्षांची तोडलेली २० हजार १२० रुपये किमतीची लाकडे आढळून आली. वनविभागाने लाकडासह मेटॅडोर जप्त करून खामगाव येथे आणले. चालक शेख शाबीर (रा. पिंपळगाव राजा) याच्याविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल यशवंत देशमुख व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.2