logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कर्जत: दारूच्या नशेत पत्नीला काठीने मारहाण; कोयत्याने जीवे मारण्याची धमकी कर्जत तालुक्यातील कोरेगाव परिसरातील मुरकुटवाडी येथे दारूच्या नशेत पतीने पत्नीला काठीने मारहाण करून शिवीगाळ केली तसेच कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी छकुली आकाश बर्डे (वय २१, रा. मुरकुटवाडी, कोरेगाव, ता. कर्जत) यांनी फिर्याद दिली असून, आकाश रामदास बर्डे (रा. अंबळनेर, ता. पाटोदा, जि. बीड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांचा विवाह आकाश रामदास बर्डे याच्यासोबत झाला असून, त्याला दारूचे व्यसन आहे. दारू पिल्यानंतर तो मारहाण करत असल्याने त्या गेल्या दोन-तीन वर्षांपासून आपल्या दोन मुलांसह माहेरी मुरकुटवाडी येथे राहत आहेत. आरोपी मागील चार महिन्यांपासून फिर्यादीकडे राहत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास आरोपी दारू पिऊन घरी आला. त्याने फिर्यादीच्या फोनपे खात्यावर बाबासाहेब मारुती बर्डे यांनी पैसे का पाठवले, अशी विचारणा करत मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पैसे भावाच्या कामाचे असल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात हातातील काठीने मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या हातात कोयता घेऊन शिवीगाळ करत, पैसे परत न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाण सुरू असताना फिर्यादीचा मेव्हणा राम पवार हा सोडविण्यासाठी आला. त्यालाही आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर छकुली बर्डे यांनी आकाश रामदास बर्डे याच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

5 hrs ago
user_कर्जत लाईव्ह
कर्जत लाईव्ह
Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
5 hrs ago
d3de7757-39e7-4515-88b4-816ed9b8dd86

कर्जत: दारूच्या नशेत पत्नीला काठीने मारहाण; कोयत्याने जीवे मारण्याची धमकी कर्जत तालुक्यातील कोरेगाव परिसरातील मुरकुटवाडी येथे दारूच्या नशेत पतीने पत्नीला काठीने मारहाण करून शिवीगाळ केली तसेच कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी छकुली आकाश बर्डे (वय २१, रा. मुरकुटवाडी, कोरेगाव, ता. कर्जत) यांनी फिर्याद दिली असून, आकाश रामदास बर्डे (रा. अंबळनेर, ता. पाटोदा, जि. बीड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांचा विवाह आकाश रामदास बर्डे याच्यासोबत झाला असून, त्याला दारूचे व्यसन आहे. दारू पिल्यानंतर तो मारहाण करत असल्याने त्या गेल्या दोन-तीन वर्षांपासून आपल्या दोन मुलांसह माहेरी मुरकुटवाडी येथे राहत आहेत. आरोपी मागील चार महिन्यांपासून फिर्यादीकडे राहत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास आरोपी दारू पिऊन घरी आला. त्याने फिर्यादीच्या फोनपे खात्यावर बाबासाहेब मारुती बर्डे यांनी पैसे का पाठवले, अशी विचारणा करत मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पैसे भावाच्या कामाचे असल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात हातातील काठीने मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या हातात कोयता घेऊन शिवीगाळ करत, पैसे परत न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाण सुरू असताना फिर्यादीचा मेव्हणा राम पवार हा सोडविण्यासाठी आला. त्यालाही आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर छकुली बर्डे यांनी आकाश रामदास बर्डे याच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना
    1
    दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • यवतमाळ मध्ये साखरेचा ट्रक पलटी लोकांनी साखरेची पोती केली लंपास.
    1
    यवतमाळ मध्ये साखरेचा ट्रक पलटी लोकांनी साखरेची पोती केली लंपास.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.
    1
    तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस 

तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस 
बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर येते NALSA अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षा युनिट योजना 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला मोहोळ जिल्हा सोलापूर येथे नालसा अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षण युनिट 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
    1
    मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर येते NALSA अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षा युनिट योजना 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला
मोहोळ जिल्हा सोलापूर येथे नालसा अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षण युनिट 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
    user_प्रताप शेळके
    प्रताप शेळके
    Farmer मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • "हे नाकर्त्यांचं आंदोलन.. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलेले नाही..!"
    1
    "हे नाकर्त्यांचं आंदोलन.. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलेले नाही..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    29 min ago
  • मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.
    1
    मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध
निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार; गुन्हा दाखल करण्याची नगराध्यक्षा छाया शेलार यांची मागणी हा माझा नव्हे, संविधान, लोकशाही आणि कर्जतकरांचा अपमान”; पत्रकार परिषदेत छाया शेलार आक्रमक कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याचा प्रकार हा केवळ व्यक्तीचा अपमान नसून लोकशाही व्यवस्थेचा, संविधानाने प्रदान केलेल्या पदाचा आणि समस्त कर्जतकर जनतेचा अवमान असल्याचा आरोप करीत संबंधितांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगराध्यक्षा सौ. छाया सुनील शेलार यांनी केली. दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी कर्जत नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात काही व्यक्तींनी प्रवेश करून नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घातल्याचा प्रकार घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. निधीच्या विषयाला राजकीय रंग दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाल्या की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन २०२६-२७ अंतर्गत प्राप्त निधी शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या वस्ती तसेच राखीव प्रभागासाठी खर्च करण्यात येत आहे. मात्र, या विषयाला जाणूनबुजून राजकीय रंग देऊन नगरपंचायत कार्यालयात गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मला कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. माझ्याकडे या विषयाची कोणतीही विचारपूस करण्यात आली नाही. थेट नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून अवमान करण्यात आला. लोकशाहीमध्ये प्रश्न मांडण्याचे अनेक मार्ग असताना अशा प्रकारे पदाचा अवमान करणे योग्य नाही,” असे शेलार यांनी सांगितले. “खुर्चीचा अवमान म्हणजे पदाचा अवमान” “नगराध्यक्षा हे शहराचे प्रथम नागरिक पद आहे. नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान हा केवळ माझा वैयक्तिक अपमान म्हणून पाहता येणार नाही. हा संविधानिक लोकशाही व्यवस्थेने दिलेल्या पदाचा अवमान आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडेही पाठविण्यात आल्याचे नगराध्यक्षा शेलार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गटनेते सतिश पाटील, नगरसेविका अश्विनी दळवी,लालासाहेब शेळके, दत्ता पिसाळ, रवी सुपेकर,नंदकुमार भैलुमे, सुनील शेलार उपस्थित होते.
    3
    नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार; गुन्हा दाखल करण्याची नगराध्यक्षा छाया शेलार यांची मागणी
हा माझा नव्हे, संविधान, लोकशाही आणि कर्जतकरांचा अपमान”; पत्रकार परिषदेत छाया शेलार आक्रमक
कर्जत / प्रतिनिधी : नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालण्याचा प्रकार हा केवळ व्यक्तीचा अपमान नसून लोकशाही व्यवस्थेचा, संविधानाने प्रदान केलेल्या पदाचा आणि समस्त कर्जतकर जनतेचा अवमान असल्याचा आरोप करीत संबंधितांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगराध्यक्षा सौ. छाया सुनील शेलार यांनी केली.
दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी कर्जत नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या दालनात काही व्यक्तींनी प्रवेश करून नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घातल्याचा प्रकार घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
निधीच्या विषयाला राजकीय रंग दिल्याचा आरोप
पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाल्या की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन २०२६-२७ अंतर्गत प्राप्त निधी शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या वस्ती तसेच राखीव प्रभागासाठी खर्च करण्यात येत आहे. मात्र, या विषयाला जाणूनबुजून राजकीय रंग देऊन नगरपंचायत कार्यालयात गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
“मला कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. माझ्याकडे या विषयाची कोणतीही विचारपूस करण्यात आली नाही. थेट नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून अवमान करण्यात आला. लोकशाहीमध्ये प्रश्न मांडण्याचे अनेक मार्ग असताना अशा प्रकारे पदाचा अवमान करणे योग्य नाही,” असे शेलार यांनी सांगितले.
“खुर्चीचा अवमान म्हणजे पदाचा अवमान”
“नगराध्यक्षा हे शहराचे प्रथम नागरिक पद आहे. नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान हा केवळ माझा वैयक्तिक अपमान म्हणून पाहता येणार नाही. हा संविधानिक लोकशाही व्यवस्थेने दिलेल्या पदाचा अवमान आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडेही पाठविण्यात आल्याचे नगराध्यक्षा शेलार यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला गटनेते सतिश पाटील, नगरसेविका अश्विनी दळवी,लालासाहेब शेळके, दत्ता पिसाळ, रवी सुपेकर,नंदकुमार भैलुमे, सुनील शेलार उपस्थित होते.
    user_SM Rokhthok News
    SM Rokhthok News
    Salesperson कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार
    1
    बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन, बाजरी यांसह खरीप पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये अर्थात हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच थकीत पीकविमा तात्काळ जमा करावा, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली. या मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने राजेंद्र आमटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातून शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे पीक आणि करपलेल्या बाजरीची कणसे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. हलगी वाजवत शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे वेधण्यात आले. ‘पीकविमा तात्काळ मिळालाच पाहिजे’, ‘दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने मागील १५ ते २० दिवसांपासून बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, डॉ. गणेश ढवळे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सुशीलाताई मोराळे, बाळासाहेब मोरे, अशोकराव येडे, ज्ञानेश्वर राऊत, रामधन जमले, कुलदीप करपे, हनुमान घोडके, राजू गायके, खाजाभाई पठाण, दीपक जाधव, प्रदीप घुमरे, बळीराम मेहेत्रे, सतीश विसाफे, मच्छिंद्र साठे, शाम पांढरे, खंडू गाडेकर, धनंजय सागर, अण्णा वाणी, रोहिदास मस्के, मुसा बेग, चांद बॅग, राजाभाऊ साळुंखे, विक्रम साळुंखे, विष्णू साळुंखे, सुलेमान पठाण, मुसा पठाण, विक्रम शिंदे, दिलीप शिंदे, मशरूम साळुंखे, सुरेश साळुंखे आदींसह बीड तालुक्यातील ३० ते ३५ गावांमधील शेतकरी उपस्थित होते. चौकट : सोयाबीन, कापूस, बाजरी घेऊन शेतकरी आंदोलनात ‘हलगी बजाव’ आंदोलनात शेतकरी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे दाणे आणि दाणे न भरलेल्या बाजरीच्या कणसे घेऊन सहभागी झाले. पिकांची झालेली दयनीय अवस्था शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष करपलेली पिके आंदोलनस्थळी आणली होती. आंदोलनात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. चौकट : हलगीच्या नादाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी वाजवून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. हलगीच्या कडकडाटासह शेतकऱ्यांनी विविध मागण्यांच्या घोषणा दिल्याने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
    1
    दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश
दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश
बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन, बाजरी यांसह खरीप पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये अर्थात हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच थकीत पीकविमा तात्काळ जमा करावा, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली.
या मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने राजेंद्र आमटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातून शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे पीक आणि करपलेल्या बाजरीची कणसे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. हलगी वाजवत शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे वेधण्यात आले. ‘पीकविमा तात्काळ मिळालाच पाहिजे’, ‘दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने मागील १५ ते २० दिवसांपासून बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, डॉ. गणेश ढवळे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सुशीलाताई मोराळे, बाळासाहेब मोरे, अशोकराव येडे, ज्ञानेश्वर राऊत, रामधन जमले, कुलदीप करपे, हनुमान घोडके, राजू गायके, खाजाभाई पठाण, दीपक जाधव, प्रदीप घुमरे, बळीराम मेहेत्रे, सतीश विसाफे, मच्छिंद्र साठे, शाम पांढरे, खंडू गाडेकर, धनंजय सागर, अण्णा वाणी, रोहिदास मस्के, मुसा बेग, चांद बॅग, राजाभाऊ साळुंखे, विक्रम साळुंखे, विष्णू साळुंखे, सुलेमान पठाण, मुसा पठाण, विक्रम शिंदे, दिलीप शिंदे, मशरूम साळुंखे, सुरेश साळुंखे आदींसह बीड तालुक्यातील ३० ते ३५ गावांमधील शेतकरी उपस्थित होते.
चौकट : सोयाबीन, कापूस, बाजरी घेऊन शेतकरी आंदोलनात
‘हलगी बजाव’ आंदोलनात शेतकरी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे दाणे आणि दाणे न भरलेल्या बाजरीच्या कणसे घेऊन सहभागी झाले. पिकांची झालेली दयनीय अवस्था शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष करपलेली पिके आंदोलनस्थळी आणली होती. आंदोलनात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
चौकट : हलगीच्या नादाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी वाजवून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. हलगीच्या कडकडाटासह शेतकऱ्यांनी विविध मागण्यांच्या घोषणा दिल्याने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.