logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्रीजी पार्क जगतापवाडी परिसरात गेल्या दहा वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांना मूलभूत सुविधांअभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण कॉलनीत पक्का रस्ता नसल्यामुळे नागरिकांची मोठी हालपेष्टा होत आहे. त्यातच ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डास आणि मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. याशिवाय या भागात अद्याप पिण्याच्या पाण्याची सुविधाही पोहोचलेली नाही. या बिकट समस्यांबाबत वारंवार ग्रामपंचायतीत तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपयोग होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे प्रशासनाने या सर्व समस्यांची तात्काळ गंभीर दखल घेऊन रस्ता आणि पिण्याच्या पाण्यासह सर्व प्रश्न त्वरित सोडवावेत, अशी कळकळीची विनंती रहिवाशांनी केली आहे.

4 hrs ago
user_मधुकर व
मधुकर व
नंदुरबार, नंदुरबार, महाराष्ट्र•
4 hrs ago

श्रीजी पार्क जगतापवाडी परिसरात गेल्या दहा वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांना मूलभूत सुविधांअभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण कॉलनीत पक्का रस्ता नसल्यामुळे नागरिकांची मोठी हालपेष्टा होत आहे. त्यातच ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डास आणि मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. याशिवाय या भागात अद्याप पिण्याच्या पाण्याची सुविधाही पोहोचलेली नाही. या बिकट समस्यांबाबत वारंवार ग्रामपंचायतीत तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपयोग होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे प्रशासनाने या सर्व समस्यांची तात्काळ गंभीर दखल घेऊन रस्ता आणि पिण्याच्या पाण्यासह सर्व प्रश्न त्वरित सोडवावेत, अशी कळकळीची विनंती रहिवाशांनी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • श्रीजी पार्क जगतापवाडी परिसरात गेल्या दहा वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांना मूलभूत सुविधांअभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण कॉलनीत पक्का रस्ता नसल्यामुळे नागरिकांची मोठी हालपेष्टा होत आहे. त्यातच ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डास आणि मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. याशिवाय या भागात अद्याप पिण्याच्या पाण्याची सुविधाही पोहोचलेली नाही. या बिकट समस्यांबाबत वारंवार ग्रामपंचायतीत तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपयोग होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे प्रशासनाने या सर्व समस्यांची तात्काळ गंभीर दखल घेऊन रस्ता आणि पिण्याच्या पाण्यासह सर्व प्रश्न त्वरित सोडवावेत, अशी कळकळीची विनंती रहिवाशांनी केली आहे.
    2
    श्रीजी पार्क जगतापवाडी परिसरात गेल्या दहा वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांना मूलभूत सुविधांअभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण कॉलनीत पक्का रस्ता नसल्यामुळे नागरिकांची मोठी हालपेष्टा होत आहे. त्यातच ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डास आणि मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. याशिवाय या भागात अद्याप पिण्याच्या पाण्याची सुविधाही पोहोचलेली नाही.

या बिकट समस्यांबाबत वारंवार ग्रामपंचायतीत तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपयोग होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे प्रशासनाने या सर्व समस्यांची तात्काळ गंभीर दखल घेऊन रस्ता आणि पिण्याच्या पाण्यासह सर्व प्रश्न त्वरित सोडवावेत, अशी कळकळीची विनंती रहिवाशांनी केली आहे.
    user_मधुकर व
    मधुकर व
    नंदुरबार, नंदुरबार, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • शहादा तालुक्यातील सोनवल त. बो येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात शालेय दिंडी काढली. "विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल..." या अखंड नामघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून संत परंपरेचा संदेश दिला, तर विठ्ठल व रुक्मिणीचे रूप धारण केलेले विद्यार्थी ग्रामस्थांचे मुख्य आकर्षण ठरले. विद्यार्थिनींनी पारंपरिक फुगडीचा ठेका धरत आणि विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट टाळवादन करत सर्वांची मने जिंकली. गावातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या दिंडीचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रुपेशकुमार दिगंबर नागलगावे यांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करत SIR मॅपिंगचे महत्त्व स्पष्ट केले. येत्या दोन दिवसांत आवश्यक मॅपिंग पूर्ण करून गावातील कोणताही पात्र नागरिक या प्रक्रियेपासून वंचित राहू नये आणि भविष्यातील अडचणी व गैरसोय टळावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. दिंडीच्या समारोपानंतर ग्रामस्थांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्याला अध्यात्म, संस्कार आणि संस्कृतीची जोड दिली जात असल्याने ग्रामस्थांकडून शिक्षकांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. या भक्तिमय सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील वारकरी मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, सहशिक्षिका जयश्री मॅडम, शाळेच्या स्वयंपाकी भगिनी, सर्व शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
    3
    शहादा तालुक्यातील सोनवल त. बो येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात शालेय दिंडी काढली. "विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल..." या अखंड नामघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून संत परंपरेचा संदेश दिला, तर विठ्ठल व रुक्मिणीचे रूप धारण केलेले विद्यार्थी ग्रामस्थांचे मुख्य आकर्षण ठरले. विद्यार्थिनींनी पारंपरिक फुगडीचा ठेका धरत आणि विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट टाळवादन करत सर्वांची मने जिंकली. गावातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या दिंडीचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रुपेशकुमार दिगंबर नागलगावे यांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करत SIR मॅपिंगचे महत्त्व स्पष्ट केले. येत्या दोन दिवसांत आवश्यक मॅपिंग पूर्ण करून गावातील कोणताही पात्र नागरिक या प्रक्रियेपासून वंचित राहू नये आणि भविष्यातील अडचणी व गैरसोय टळावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. दिंडीच्या समारोपानंतर ग्रामस्थांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्याला अध्यात्म, संस्कार आणि संस्कृतीची जोड दिली जात असल्याने ग्रामस्थांकडून शिक्षकांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. या भक्तिमय सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील वारकरी मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, सहशिक्षिका जयश्री मॅडम, शाळेच्या स्वयंपाकी भगिनी, सर्व शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • वंचित बहुजन आघाडी युवा नवापूर तालुका शाखेच्या वतीने नवापूरकरांनी बंदला दिलेल्या संपूर्ण पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात मिळालेल्या विजयाबाबत आणि या लढ्यात सहकार्य केल्याबद्दल संघटनेकडून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
    2
    वंचित बहुजन आघाडी युवा नवापूर तालुका शाखेच्या वतीने नवापूरकरांनी बंदला दिलेल्या संपूर्ण पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात मिळालेल्या विजयाबाबत आणि या लढ्यात सहकार्य केल्याबद्दल संघटनेकडून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
    user_उमेश बापू पवार
    उमेश बापू पवार
    Social worker नवापूर, नंदुरबार, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • धुळे शहरातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडजाई रोड अंडरपास येथे अनेक दिवसांपासून साचलेल्या घाण पाण्याची समस्या आणि रस्त्याचा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी सोनगीर टोल प्रशासनाने अखेर काम सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक अमिन पटेल आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अंडरपासमधील साचलेल्या पाण्यात उभे राहून प्रशासनाचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलन छेडले होते. यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. या समस्येची दखल घेत 'धुळे क्राईम न्यूज'चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अब्दुल रहमान मलिक यांनी बातमी प्रभावीपणे प्रसारित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी टोल अधिकाऱ्यांना तत्काळ काम सुरू करण्याचे कडक आदेश दिले. प्रशासकीय हालचालींनंतर सध्या वडजाई रोड अंडरपासजवळ पाईप टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, पाईप टाकण्याचे काम सुरू झाले असले तरी संबंधित ठिकाणी अद्याप कॉंक्रिटीकरण करण्यात आलेले नाही आणि नागरिकांच्या सोयीसाठी पथदिवे देखील बसवण्यात आलेले नाहीत, अशी खंत अमिन पटेल यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने फक्त वरवरची मलमपट्टी न करता हे काम त्वरित आणि दर्जेदारपणे पूर्ण करावे. अंडरपासचे कॉंक्रिटीकरण आणि पथदिव्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास काँग्रेस आणि सामाजिक संघटनांच्या वतीने याच ठिकाणी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
    1
    धुळे शहरातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडजाई रोड अंडरपास येथे अनेक दिवसांपासून साचलेल्या घाण पाण्याची समस्या आणि रस्त्याचा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी सोनगीर टोल प्रशासनाने अखेर काम सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक अमिन पटेल आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अंडरपासमधील साचलेल्या पाण्यात उभे राहून प्रशासनाचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलन छेडले होते. यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. या समस्येची दखल घेत 'धुळे क्राईम न्यूज'चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अब्दुल रहमान मलिक यांनी बातमी प्रभावीपणे प्रसारित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी टोल अधिकाऱ्यांना तत्काळ काम सुरू करण्याचे कडक आदेश दिले.

प्रशासकीय हालचालींनंतर सध्या वडजाई रोड अंडरपासजवळ पाईप टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, पाईप टाकण्याचे काम सुरू झाले असले तरी संबंधित ठिकाणी अद्याप कॉंक्रिटीकरण करण्यात आलेले नाही आणि नागरिकांच्या सोयीसाठी पथदिवे देखील बसवण्यात आलेले नाहीत, अशी खंत अमिन पटेल यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने फक्त वरवरची मलमपट्टी न करता हे काम त्वरित आणि दर्जेदारपणे पूर्ण करावे. अंडरपासचे कॉंक्रिटीकरण आणि पथदिव्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास काँग्रेस आणि सामाजिक संघटनांच्या वतीने याच ठिकाणी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील दसरा मैदान चौकातील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अनेक भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून विठ्ठल आणि रुक्माईचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या प्राचीन विठ्ठल मंदिरात पंढरी दुमदुमली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
    2
    आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील दसरा मैदान चौकातील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अनेक भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून विठ्ठल आणि रुक्माईचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या प्राचीन विठ्ठल मंदिरात पंढरी दुमदुमली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
    user_जनहित लोक कल्याण संस्थ धु
    जनहित लोक कल्याण संस्थ धु
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पांझरा मध्यम प्रकल्प ८१ टक्के भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पुढील काही तासांत धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पांझरा मध्यम प्रकल्प ८१ टक्के भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पुढील काही तासांत धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Photographer धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मालेगाव शहरातील जुना आग्रा रोडवर एकरा टूल्स या दुकानासमोर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली असून तेथे गळती सुरू झाली आहे. सध्या या लिकेजचे प्रमाण कमी असले तरी ते कधीही वाढण्याची शक्यता आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बुधवार २९ जुलै, गुरुवार ३० जुलै व शुक्रवार ३१ जुलै अशा तीन दिवसांचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. शटडाऊनचे सुधारित वेळापत्रक नियोजन करून जाहीर केले जाईल. जलवाहिनी दुरुस्तीचे हे ठिकाण अत्यंत रहदारीचे आणि वर्दळीचे असल्याने कामात येणाऱ्या अडचणींमुळे दुरुस्तीसाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बुधवार २९ जुलै ते शुक्रवार ३१ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत मालेगाव शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
    1
    मालेगाव शहरातील जुना आग्रा रोडवर एकरा टूल्स या दुकानासमोर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली असून तेथे गळती सुरू झाली आहे. सध्या या लिकेजचे प्रमाण कमी असले तरी ते कधीही वाढण्याची शक्यता आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बुधवार २९ जुलै, गुरुवार ३० जुलै व शुक्रवार ३१ जुलै अशा तीन दिवसांचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. शटडाऊनचे सुधारित वेळापत्रक नियोजन करून जाहीर केले जाईल.

जलवाहिनी दुरुस्तीचे हे ठिकाण अत्यंत रहदारीचे आणि वर्दळीचे असल्याने कामात येणाऱ्या अडचणींमुळे दुरुस्तीसाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बुधवार २९ जुलै ते शुक्रवार ३१ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत मालेगाव शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पर्यावरणातील अननैसर्गिक बदल आणि बिघडलेल्या ऋतूचक्राला आळा घालण्यासाठी वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील 'राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू'च्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील डोंगरगाव येथे सीड बॉल रुजविणे आणि वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम उत्साहात पार पाडला. वाढत्या वातावरण बदलांमुळे जनसामान्य प्रभावित होत असल्याने या समस्येवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाधिकारी एस. बी. पवार यांनी डोंगरगाव येथील डोंगराळ भागाची निवड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी खड्डे खोदून सीड बॉल रुजवले. विद्यालयाच्या स्काउट विभागाने एकूण १५०० सीड बॉल तयार केले होते, ज्यामध्ये चिंच, पेरू, लिंब आणि पिंपळ अशा विविध प्रकारच्या बियांचा वापर करण्यात आला होता. ही संकल्पना स्काउट विभाग प्रमुख व्ही. एस. पावरा यांची होती. हे सीड बॉल डोंगरगाव येथील अमरधाम परिसरात टाकून वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाची मूळ संकल्पना सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. संजय जाधव आणि सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव यांची होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना प्लस टूचे प्रमुख प्रा. एस. बी. पवार, व्ही. एस. पावरा, ए. एच. तेलगोटे, प्रा. जी. एन. सोनवणे, प्रा. एल. आय. भावसार, प्रा. आर. पी. पाटील, प्रा. हितेश देवरे आणि प्रा. डी. एल. धनगर यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य जी. एम. पाटील व उपप्राचार्य जे. बी. पवार उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
    3
    पर्यावरणातील अननैसर्गिक बदल आणि बिघडलेल्या ऋतूचक्राला आळा घालण्यासाठी वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातील 'राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू'च्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील डोंगरगाव येथे सीड बॉल रुजविणे आणि वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम उत्साहात पार पाडला. वाढत्या वातावरण बदलांमुळे जनसामान्य प्रभावित होत असल्याने या समस्येवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

कार्यक्रमाधिकारी एस. बी. पवार यांनी डोंगरगाव येथील डोंगराळ भागाची निवड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी खड्डे खोदून सीड बॉल रुजवले. विद्यालयाच्या स्काउट विभागाने एकूण १५०० सीड बॉल तयार केले होते, ज्यामध्ये चिंच, पेरू, लिंब आणि पिंपळ अशा विविध प्रकारच्या बियांचा वापर करण्यात आला होता. ही संकल्पना स्काउट विभाग प्रमुख व्ही. एस. पावरा यांची होती. हे सीड बॉल डोंगरगाव येथील अमरधाम परिसरात टाकून वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाची मूळ संकल्पना सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. संजय जाधव आणि सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव यांची होती.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना प्लस टूचे प्रमुख प्रा. एस. बी. पवार, व्ही. एस. पावरा, ए. एच. तेलगोटे, प्रा. जी. एन. सोनवणे, प्रा. एल. आय. भावसार, प्रा. आर. पी. पाटील, प्रा. हितेश देवरे आणि प्रा. डी. एल. धनगर यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य जी. एम. पाटील व उपप्राचार्य जे. बी. पवार उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.