logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी स्क्वॉड) अवैध दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये ₹2 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात दोन मोटारसायकली, एक मोपेड तसेच मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 26 जुलै 2026 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात गस्त घालत असताना मौजा लाडकी-बुरकोणी मार्गावर दोन मोटारसायकलींवरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे बबन थुल व भगवान काळे यांना ताब्यात घेण्यात आले. बबन थुल याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 100 सिलबंद बाटल्या (किंमत ₹12,000) तसेच हिरो पॅशन प्रो मोटारसायकल (किंमत ₹90,000) असा एकूण ₹1.02 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर भगवान काळे याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिलीच्या 100 देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹12,000) व हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (किंमत ₹70,000) असा एकूण ₹82 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच दरम्यान संत तुकडोजी वॉर्ड येथील संदीप चाफले हा आपल्या मोपेडच्या डिकीत विदेशी दारू ठेवून विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून हिरो डेस्टिनी मोपेड (किंमत ₹1 लाख), रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिलीच्या 6 बाटल्या तसेच रॉयल चॅलेंजर्स कंपनीच्या 180 मिलीच्या 4 बाटल्या असा एकूण ₹1.04 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ₹2.88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक तसेच पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश इटकल आणि डीबी पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, प्रवीण बोधणे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई मंगेश वाघमारे, आशिष नेवारे व रोहित साठे यांनी संयुक्तपणे केली.

2 hrs ago
user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
2 hrs ago

हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी स्क्वॉड) अवैध दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये ₹2 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात दोन मोटारसायकली, एक मोपेड तसेच मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 26 जुलै 2026 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात गस्त घालत असताना मौजा लाडकी-बुरकोणी मार्गावर दोन मोटारसायकलींवरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे बबन थुल व भगवान काळे यांना ताब्यात घेण्यात आले. बबन थुल याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 100 सिलबंद बाटल्या (किंमत ₹12,000) तसेच हिरो पॅशन प्रो मोटारसायकल (किंमत ₹90,000) असा एकूण ₹1.02 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर भगवान काळे याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिलीच्या 100 देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹12,000) व हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (किंमत ₹70,000) असा एकूण ₹82 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच दरम्यान संत तुकडोजी वॉर्ड येथील संदीप चाफले हा आपल्या मोपेडच्या डिकीत विदेशी दारू ठेवून विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून हिरो डेस्टिनी मोपेड (किंमत ₹1 लाख), रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिलीच्या 6 बाटल्या तसेच रॉयल चॅलेंजर्स कंपनीच्या 180 मिलीच्या 4 बाटल्या असा एकूण ₹1.04 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ₹2.88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक तसेच पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश इटकल आणि डीबी पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, प्रवीण बोधणे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई मंगेश वाघमारे, आशिष नेवारे व रोहित साठे यांनी संयुक्तपणे केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी स्क्वॉड) अवैध दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये ₹2 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात दोन मोटारसायकली, एक मोपेड तसेच मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 26 जुलै 2026 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात गस्त घालत असताना मौजा लाडकी-बुरकोणी मार्गावर दोन मोटारसायकलींवरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे बबन थुल व भगवान काळे यांना ताब्यात घेण्यात आले. बबन थुल याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 100 सिलबंद बाटल्या (किंमत ₹12,000) तसेच हिरो पॅशन प्रो मोटारसायकल (किंमत ₹90,000) असा एकूण ₹1.02 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर भगवान काळे याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिलीच्या 100 देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹12,000) व हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (किंमत ₹70,000) असा एकूण ₹82 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच दरम्यान संत तुकडोजी वॉर्ड येथील संदीप चाफले हा आपल्या मोपेडच्या डिकीत विदेशी दारू ठेवून विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून हिरो डेस्टिनी मोपेड (किंमत ₹1 लाख), रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिलीच्या 6 बाटल्या तसेच रॉयल चॅलेंजर्स कंपनीच्या 180 मिलीच्या 4 बाटल्या असा एकूण ₹1.04 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ₹2.88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक तसेच पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश इटकल आणि डीबी पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, प्रवीण बोधणे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई मंगेश वाघमारे, आशिष नेवारे व रोहित साठे यांनी संयुक्तपणे केली.
    1
    हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी स्क्वॉड) अवैध दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये ₹2 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात दोन मोटारसायकली, एक मोपेड तसेच मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

26 जुलै 2026 रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात गस्त घालत असताना मौजा लाडकी-बुरकोणी मार्गावर दोन मोटारसायकलींवरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे बबन थुल व भगवान काळे यांना ताब्यात घेण्यात आले. बबन थुल याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 100 सिलबंद बाटल्या (किंमत ₹12,000) तसेच हिरो पॅशन प्रो मोटारसायकल (किंमत ₹90,000) असा एकूण ₹1.02 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर भगवान काळे याच्याकडून रॉकेट कंपनीच्या 90 मिलीच्या 100 देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹12,000) व हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (किंमत ₹70,000) असा एकूण ₹82 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याच दरम्यान संत तुकडोजी वॉर्ड येथील संदीप चाफले हा आपल्या मोपेडच्या डिकीत विदेशी दारू ठेवून विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून हिरो डेस्टिनी मोपेड (किंमत ₹1 लाख), रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिलीच्या 6 बाटल्या तसेच रॉयल चॅलेंजर्स कंपनीच्या 180 मिलीच्या 4 बाटल्या असा एकूण ₹1.04 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ₹2.88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक तसेच पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश इटकल आणि डीबी पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, प्रवीण बोधणे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई मंगेश वाघमारे, आशिष नेवारे व रोहित साठे यांनी संयुक्तपणे केली.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आज आपल्या सेहताकडे लक्ष पुरवा. प्रत्येक आरोग्य समस्यांचा योग्य आणि सुरक्षित उपाय उपलब्ध आहे. हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यकृत आजार, आणि फुफ्फुसाचे आजार (अस्थमा आणि क्षयरोग) यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य सल्ला महत्त्वाचा आहे. मधुमेहाच्या उपचारात एक नवीन आणि सोपी पद्धत साप्ताहिक इंसुलिन आहे, ज्याचा उल्लेख डॉ. मेहेर अब्बास यांनी केला आहे. या प्रकारचा इंसुलिन प्रकार 1 आणि प्रकार 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. स्वास्थ्यविषयक कोणत्याही सल्ल्यासाठी किंवा नियुक्ती बुक करण्यासाठी +91 9125734374 या क्रमांकात संपर्क साधा. #DrMeherAbbas #Diabetes #Insulin #Awiqliinsulininjection #Type1diabetes #Type2diabetes
    1
    आज आपल्या सेहताकडे लक्ष पुरवा. प्रत्येक आरोग्य समस्यांचा योग्य आणि सुरक्षित उपाय उपलब्ध आहे. हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यकृत आजार, आणि फुफ्फुसाचे आजार (अस्थमा आणि क्षयरोग) यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य सल्ला महत्त्वाचा आहे.

मधुमेहाच्या उपचारात एक नवीन आणि सोपी पद्धत साप्ताहिक इंसुलिन आहे, ज्याचा उल्लेख डॉ. मेहेर अब्बास यांनी केला आहे. या प्रकारचा इंसुलिन प्रकार 1 आणि प्रकार 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे.

स्वास्थ्यविषयक कोणत्याही सल्ल्यासाठी किंवा नियुक्ती बुक करण्यासाठी +91 9125734374 या क्रमांकात संपर्क साधा.

#DrMeherAbbas #Diabetes #Insulin #Awiqliinsulininjection #Type1diabetes #Type2diabetes
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    9 hrs ago
  • कळंब येथील रॉयल पॅलेस येथे २५ जुलै रोजी दुपारी एक वाजता 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरामध्ये कळंब, बाभुळगाव, केळापूर व पांढरकवडा तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसह विविध महसुली सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला. त्यासोबतच लोकसेवा हक्क कायदा, जीवंत सातबारा मोहीम, अभिलेख दुरुस्ती, घरकुल योजना आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील २७ विभागांच्या सहभागातून आयोजित या अभियानाद्वारे ३,८१५ हून अधिक लाभार्थ्यांना ५,७०७ विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    कळंब येथील रॉयल पॅलेस येथे २५ जुलै रोजी दुपारी एक वाजता 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले.

या शिबिरामध्ये कळंब, बाभुळगाव, केळापूर व पांढरकवडा तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसह विविध महसुली सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला. त्यासोबतच लोकसेवा हक्क कायदा, जीवंत सातबारा मोहीम, अभिलेख दुरुस्ती, घरकुल योजना आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले.

राळेगाव विधानसभा मतदारसंघातील २७ विभागांच्या सहभागातून आयोजित या अभियानाद्वारे ३,८१५ हून अधिक लाभार्थ्यांना ५,७०७ विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्या विरोधात माहिती अधिकार कायदा आणि दप्तर दिरंगाई अधिनियम अंतर्गत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचा आधार म्हणून माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींचा आणि दप्तर दिरंगाई अधिनियमाच्या तरतुदींचा संदर्भ घेतला गेला आहे. या चौकशीची मागणी केली गेली आहे कारण राहुल परिहार यांच्यावर काही आरोप आहेत ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे. या मागणीमुळे संबंधित प्राधिकरणांवर दबाव आला आहे की ते या आरोपांची तपासणी करावीत आणि योग्य कारवाई करावीत.
    1
    महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्या विरोधात माहिती अधिकार कायदा आणि दप्तर दिरंगाई अधिनियम अंतर्गत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचा आधार म्हणून माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींचा आणि दप्तर दिरंगाई अधिनियमाच्या तरतुदींचा संदर्भ घेतला गेला आहे.

या चौकशीची मागणी केली गेली आहे कारण राहुल परिहार यांच्यावर काही आरोप आहेत ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे. या मागणीमुळे संबंधित प्राधिकरणांवर दबाव आला आहे की ते या आरोपांची तपासणी करावीत आणि योग्य कारवाई करावीत.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील हिंग्णा तालुक्यातील धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री सुधीर बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना केली. मंत्री बावनकुळे यांनी देवस्थानाच्या परिसरातील विकासासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. देवस्थान परिसरातील सुविधा वाढवण्यासाठी त्यांनी विशेष भर दिली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी देखील त्यांच्या भेटीचे स्वागत केले.
    1
    महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील हिंग्णा तालुक्यातील धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाला महसूल मंत्री सुधीर बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना केली.

मंत्री बावनकुळे यांनी देवस्थानाच्या परिसरातील विकासासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. देवस्थान परिसरातील सुविधा वाढवण्यासाठी त्यांनी विशेष भर दिली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी देखील त्यांच्या भेटीचे स्वागत केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • हिंगणा तालुक्यातील उमरी वाघ येथे काही लोकांनी खोट्या तक्रारी केल्या आणि लोकांच्या खोट्या सह्या केल्या, ज्यामुळे सामान्य नागरिकांना मानसिक त्रास होत आहे आणि शासनाची दिशाभूल होत आहे. या समस्यांबाबत तालुका प्रतिनिधींनी हिंगणा तहसीलदार मॅडम यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की या गंभीर प्रकरणावर योग्य चौकशी केली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे. हिंगणा तहसीलदार मॅडम यांनी या निवेदनाचा गंभीर विचार केला आणि या प्रकरणावर सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की खोट्या तक्रारी करून मानसिक त्रास देणाऱ्या आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.
    1
    हिंगणा तालुक्यातील उमरी वाघ येथे काही लोकांनी खोट्या तक्रारी केल्या आणि लोकांच्या खोट्या सह्या केल्या, ज्यामुळे सामान्य नागरिकांना मानसिक त्रास होत आहे आणि शासनाची दिशाभूल होत आहे. या समस्यांबाबत तालुका प्रतिनिधींनी हिंगणा तहसीलदार मॅडम यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की या गंभीर प्रकरणावर योग्य चौकशी केली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे.

हिंगणा तहसीलदार मॅडम यांनी या निवेदनाचा गंभीर विचार केला आणि या प्रकरणावर सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की खोट्या तक्रारी करून मानसिक त्रास देणाऱ्या आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात मांडळ-किन्ही-शिवणी-कुजबा रस्त्यावर होणाऱ्या जनक्षोभाचा आवाज जोर धरू लागला आहे. वर्षभरातच लाखो रुपये खर्च करून बनवलेल्या या रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सरकारी पैशांची उधळपट्टी आणि अधिकाऱ्यांची भ्रष्ट वृत्ती याचा जिवंत पुरावा म्हणजे हा रस्ता! वर्षभरापूर्वीच बनवलेला हा रस्ता आज शोधूनही सापडत नाही. रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता आहे की मृत्यूची दरी? असा संताप आता नागरिक व्यक्त करत आहेत. कंत्राटदार-अधिकारी साखळीचा भांडाफोड: वर्षभरात रस्ता उखडतोच कसा? निकृष्ट दर्जाची खडी आणि नावापुरते डांबर वापरून लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या मेहेरबानीमुळेच कंत्राटदाराचे उखडले पांढरे झाले असून सामान्य जनतेला मात्र धुळीचे आणि खड्ड्यांचे साम्राज्य सहन करावे लागत आहे. प्रवाशांच्या जिवाशी खेळ: या रस्त्यावरून रोज हजारो शेतकरी, शाळकरी मुले आणि नागरिक प्रवास करतात. खड्ड्यांमुळे दररोज गाड्यांचे अपघात होत असून निष्पाप लोक जखमी होत आहेत. एखादा मोठा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल विचारला जात आहे. अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा: या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा स्पष्ट संशय आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) कसून चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना व त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे. ७ दिवसांत काम नाही तर 'ठिय्या' आंदोलन! सार्वजनिक बांधकाम विभागाने गाढ झोपेतून जागे व्हावे. येत्या ७ दिवसांच्या आत या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने सुरू झाले नाही, तर PWD कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालयाचे कामकाज ठप्प केले जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थांचा सवाल: "जनतेचा कर रूपाने आलेला पैसा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. ७ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर PWD अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांत बसवून जाब विचारू!"
    1
    नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात मांडळ-किन्ही-शिवणी-कुजबा रस्त्यावर होणाऱ्या जनक्षोभाचा आवाज जोर धरू लागला आहे. वर्षभरातच लाखो रुपये खर्च करून बनवलेल्या या रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

सरकारी पैशांची उधळपट्टी आणि अधिकाऱ्यांची भ्रष्ट वृत्ती याचा जिवंत पुरावा म्हणजे हा रस्ता! वर्षभरापूर्वीच बनवलेला हा रस्ता आज शोधूनही सापडत नाही. रस्त्यावरून डांबर गायब झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता आहे की मृत्यूची दरी? असा संताप आता नागरिक व्यक्त करत आहेत.

कंत्राटदार-अधिकारी साखळीचा भांडाफोड: वर्षभरात रस्ता उखडतोच कसा? निकृष्ट दर्जाची खडी आणि नावापुरते डांबर वापरून लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या मेहेरबानीमुळेच कंत्राटदाराचे उखडले पांढरे झाले असून सामान्य जनतेला मात्र धुळीचे आणि खड्ड्यांचे साम्राज्य सहन करावे लागत आहे.

प्रवाशांच्या जिवाशी खेळ: या रस्त्यावरून रोज हजारो शेतकरी, शाळकरी मुले आणि नागरिक प्रवास करतात. खड्ड्यांमुळे दररोज गाड्यांचे अपघात होत असून निष्पाप लोक जखमी होत आहेत. एखादा मोठा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल विचारला जात आहे.

अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा: या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा स्पष्ट संशय आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) कसून चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना व त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे.

७ दिवसांत काम नाही तर 'ठिय्या' आंदोलन! सार्वजनिक बांधकाम विभागाने गाढ झोपेतून जागे व्हावे. येत्या ७ दिवसांच्या आत या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने सुरू झाले नाही, तर PWD कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यालयाचे कामकाज ठप्प केले जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

ग्रामस्थांचा सवाल: "जनतेचा कर रूपाने आलेला पैसा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. ७ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर PWD अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांत बसवून जाब विचारू!"
    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Mechanic कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राळेगाव शहरातील वसंत जिनिंग येथे महिलांसाठी मोफत NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमात एकूण १,४७९ महिलांनी मोफत नोंदणीचा लाभ घेतला. महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मिळणाऱ्या या स्मार्ट कार्डमुळे महिलांना एसटी बससह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवास करणे शक्य होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाले. त्यांनी लाभार्थी महिलांना स्मार्ट कार्डचे वितरण करताना, राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध लोककल्याणकारी योजना राबवत असल्याचे सांगत महिलांनी आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्लसिंह चौहान यांनीही या योजनेमुळे दैनंदिन प्रवासात महिलांना मोठी मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला महामंडळाचे अधिकारी, भाजपचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन संयोजक ॲड. प्रितेश वर्मा यांच्यासह सहसंयोजक प्रकाश खुडसंगे, बादशाह काजी व उमेश मेश्राम यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खुडसंगे यांनी केले, प्रास्ताविकातून ॲड. प्रितेश वर्मा यांनी उद्देश स्पष्ट केला, तर बादशाह काजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
    1
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राळेगाव शहरातील वसंत जिनिंग येथे महिलांसाठी मोफत NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमात एकूण १,४७९ महिलांनी मोफत नोंदणीचा लाभ घेतला. महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मिळणाऱ्या या स्मार्ट कार्डमुळे महिलांना एसटी बससह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवास करणे शक्य होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाले. त्यांनी लाभार्थी महिलांना स्मार्ट कार्डचे वितरण करताना, राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध लोककल्याणकारी योजना राबवत असल्याचे सांगत महिलांनी आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्लसिंह चौहान यांनीही या योजनेमुळे दैनंदिन प्रवासात महिलांना मोठी मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला महामंडळाचे अधिकारी, भाजपचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन संयोजक ॲड. प्रितेश वर्मा यांच्यासह सहसंयोजक प्रकाश खुडसंगे, बादशाह काजी व उमेश मेश्राम यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खुडसंगे यांनी केले, प्रास्ताविकातून ॲड. प्रितेश वर्मा यांनी उद्देश स्पष्ट केला, तर बादशाह काजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.