महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राळेगाव शहरातील वसंत जिनिंग येथे महिलांसाठी मोफत NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमात एकूण १,४७९ महिलांनी मोफत नोंदणीचा लाभ घेतला. महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मिळणाऱ्या या स्मार्ट कार्डमुळे महिलांना एसटी बससह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवास करणे शक्य होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाले. त्यांनी लाभार्थी महिलांना स्मार्ट कार्डचे वितरण करताना, राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध लोककल्याणकारी योजना राबवत असल्याचे सांगत महिलांनी आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्लसिंह चौहान यांनीही या योजनेमुळे दैनंदिन प्रवासात महिलांना मोठी मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला महामंडळाचे अधिकारी, भाजपचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन संयोजक ॲड. प्रितेश वर्मा यांच्यासह सहसंयोजक प्रकाश खुडसंगे, बादशाह काजी व उमेश मेश्राम यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खुडसंगे यांनी केले, प्रास्ताविकातून ॲड. प्रितेश वर्मा यांनी उद्देश स्पष्ट केला, तर बादशाह काजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राळेगाव शहरातील वसंत जिनिंग येथे महिलांसाठी मोफत NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमात एकूण १,४७९ महिलांनी मोफत नोंदणीचा लाभ घेतला. महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मिळणाऱ्या या स्मार्ट कार्डमुळे महिलांना एसटी बससह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवास करणे शक्य होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाले. त्यांनी लाभार्थी महिलांना स्मार्ट कार्डचे वितरण करताना, राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध लोककल्याणकारी योजना राबवत असल्याचे सांगत महिलांनी आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्लसिंह चौहान यांनीही या योजनेमुळे दैनंदिन प्रवासात महिलांना मोठी मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला महामंडळाचे अधिकारी, भाजपचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन संयोजक ॲड. प्रितेश वर्मा यांच्यासह सहसंयोजक प्रकाश खुडसंगे, बादशाह काजी व उमेश मेश्राम यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खुडसंगे यांनी केले, प्रास्ताविकातून ॲड. प्रितेश वर्मा यांनी उद्देश स्पष्ट केला, तर बादशाह काजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
- कळंब येथील रॉयल पॅलेस येथे २५ जुलै रोजी दुपारी एक वाजता 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरामध्ये कळंब, बाभुळगाव, केळापूर व पांढरकवडा तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसह विविध महसुली सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला. त्यासोबतच लोकसेवा हक्क कायदा, जीवंत सातबारा मोहीम, अभिलेख दुरुस्ती, घरकुल योजना आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील २७ विभागांच्या सहभागातून आयोजित या अभियानाद्वारे ३,८१५ हून अधिक लाभार्थ्यांना ५,७०७ विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- दिल्लीतील आंदोलनाला यश मिळाल्यानंतर वर्ध्याच्या हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली युवकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विजय जल्लोष साजरा केला. सरकारचा निर्णय हा जनतेच्या संघर्षाचा विजय असल्याचे सांगत युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, संघटित आणि शांततापूर्ण आंदोलनामुळे अखेर सरकारला युवकांच्या आवाजासमोर झुकावे लागले आणि आपला निर्णय बदलावा लागला. हा विजय लोकशाहीचा असून तो केवळ एका संघटनेचा नसून सर्वसामान्य जनता आणि युवकांच्या एकजुटीच्या संघर्षाचे फळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या आनंदात युवकांनी एकमेकांना मिठाई भरवून अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी जनतेच्या समस्या आणि युवकांच्या हितासाठी भविष्यातही लोकशाही मार्गाने अशाच प्रकारे आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पार पडलेल्या या विजय उत्सवाने शहरवासीयांचेही विशेष लक्ष वेधून घेतले.1
- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून वर्धा येथे आयोजित तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरात तब्बल ६,६०८ नागरिकांनी विविध आजारांची मोफत तपासणी करून घेतली. आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील हे पहिले शिबिर पार पडले असून, यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक राहिला. तपासणी करून घेतलेल्यांमध्ये ३,०८७ पुरुष आणि ३,५२१ महिलांचा समावेश आहे. या शिबिरात सर्वाधिक ४,१८६ नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. त्याशिवाय ६३८ रुग्णांची हाडरोग, ५९६ रुग्णांची कान-नाक-घसा, ३५४ रुग्णांची दंत, ३२५ रुग्णांची त्वचारोग आणि १३२ महिलांची स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. ४,२२५ नागरिकांची औषधवैद्यक, १,०४७ जणांची असंसर्गजन्य आजार, ३०१ रुग्णांची HLH, १९७ रुग्णांची मानसोपचार, ३९४ रुग्णांची ईसीजी आणि ७ महिलांची स्तन कॅन्सर तपासणी झाली. या तपासणीदरम्यान ५८ रुग्णांमध्ये हृदयरोग, १०६ जणांमध्ये मधुमेह व रक्तदाब तर २२ संशयित कर्करोग रुग्ण आढळले. शिबिरात ३,८१७ रुग्णांना औषधांचे तर ३,२६१ नागरिकांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले. शिबिरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ३४५ नागरिकांचे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यात आले, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे ६६ रुग्णांचे आर्थिक मदतीचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच १९९ अपंग बांधवांकडून आवश्यक साहित्यासाठी मोजमाप घेण्यात आले. या पहिल्याच शिबिराला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नागरिकांना पुढील तीन शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील महाआरोग्य शिबिरे ८ व ९ ऑगस्ट रोजी तळेगाव (शामजीपंत), १० व ११ ऑगस्ट रोजी हिंगणघाट आणि १३ व १४ ऑगस्ट रोजी देवळी येथे आयोजित केली जाणार आहेत.1
- चांदूर रेल्वे उपविभागाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील 'गणेश इन' सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज भव्य 'महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे व शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय दाखले आणि प्रशासकीय कामे एकाच छताखाली जलद गतीने मार्गी लावणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना व शेतकऱ्यांना विविध महसुली कामांचा तात्काळ निपटारा करून शासकीय दाखले व कल्याणकारी योजनांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, नगराध्यक्षा सौ. अर्चना अडसड (रोठे अक्का), उपविभागीय अधिकारी (महसूल) आणि महसूल विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारी विशेष रूपाने उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- वर्धा जिल्ह्यातील आर्वी बसस्थानकावर जागोजागी अत्यंत मोठे खड्डे पडले असून बसेसच्या येण्या-जाण्याच्या मुख्य मार्गावरच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानकातून बसेस बाहेर जाताना आणि आत येताना बसची बॉडी खड्ड्यांमध्ये आदळत आहे. याच गाड्यांमधून दररोज प्रवासी आणि शालेय विद्यार्थी प्रवास करत असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून अपघाताची दाट शक्यता बनली आहे. जुलै महिना सुरू झाला तरीही बसस्थानकावरील हे खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. या बसस्थानकाच्या नवीन सिमेंटिंकरण आणि मजबुतीकरणासाठी ₹3 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे, तरीही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. कोणतेही कारण नसताना वर्षानुवर्षे कामे लांबवत ठेवण्याची प्रथाच आर्वीचे स्थानिक लोकप्रतिनिधी चालवत आहेत. स्थानिक विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, राज्यसभा खासदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून गाढ झोपेत आहेत. तसेच राज्याचे परिवहन मंत्री आणि मुंबईतील महामंडळ प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून त्यांना स्थानिक नागरिकांची कोणतीही काळजी नसल्याची स्थिती आहे. या सर्व प्रकारावर आम आदमी पार्टी आर्वीचे संयोजक अक्षय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिवहन मंत्री आणि राज्य सरकारने या समस्येची तात्काळ दखल घेऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.4
- नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सुकळी (गुपचूप) ग्रामपंचायतीमध्ये दलित निधीतून सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. कामाच्या ठिकाणी अनिवार्य असलेला माहिती फलक लावलेला नसून निधीचा तपशील, प्रशासकीय मंजुरी आणि कंत्राटदाराची माहिती लपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप कार्यकर्ते दिनेश कोडापे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप केला आणि संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी किशोर डाखोळे यांनी रविवार असल्यामुळे कंत्राटदाराने काम सुरू केले असावे असे सांगत, पाहणी करून आवश्यक माहिती फलक तातडीने लावण्याचे स्पष्ट केले. तर हिंगणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप गोडशलवार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. चौकशीत कोणतीही अनियमितता, नियमभंग किंवा शासकीय निधीच्या वापरात त्रुटी आढळल्यास जबाबदार ग्रामविकास अधिकारी, कंत्राटदार व संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.1
- Post by Dipak Sonawal1
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राळेगाव शहरातील वसंत जिनिंग येथे महिलांसाठी मोफत NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमात एकूण १,४७९ महिलांनी मोफत नोंदणीचा लाभ घेतला. महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मिळणाऱ्या या स्मार्ट कार्डमुळे महिलांना एसटी बससह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवास करणे शक्य होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाले. त्यांनी लाभार्थी महिलांना स्मार्ट कार्डचे वितरण करताना, राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध लोककल्याणकारी योजना राबवत असल्याचे सांगत महिलांनी आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्लसिंह चौहान यांनीही या योजनेमुळे दैनंदिन प्रवासात महिलांना मोठी मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला महामंडळाचे अधिकारी, भाजपचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन संयोजक ॲड. प्रितेश वर्मा यांच्यासह सहसंयोजक प्रकाश खुडसंगे, बादशाह काजी व उमेश मेश्राम यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खुडसंगे यांनी केले, प्रास्ताविकातून ॲड. प्रितेश वर्मा यांनी उद्देश स्पष्ट केला, तर बादशाह काजी यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.1