पत्नीची कुरकुर, चिडचिड म्हणजे क्रूरता नव्हे घटस्फोटासाठी ठोस पुरावे आवश्यक; उच्च न्यायालयाचा निर्वाळा नागपूर, ता. १६ : पत्नीची किरकोळ कुरकुर, चिडचिड किंवा नाराजी यांना थेट ‘क्रूरता’ म्हणता येणार नाही. घटस्फोटासाठी क्रूरतेचा आरोप करताना संबंधित वर्तनाच्या ठोस आणि विशिष्ट घटना पुराव्यांसह सिद्ध करणे आवश्यक आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. यासह पतीची घटस्फोटाची याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पतीने पत्नी सासूशी भांडते, अपत्य न होण्यास त्याला दोष देते, हुंडा व छळाच्या तक्रारी करते तसेच नागपुरात राहण्याचा आग्रह धरते, असे आरोप केले होते. मात्र, न्यायालयाला क्रूरतेची कोणतीही ठोस घटना सिद्ध झाल्याचे आढळले नाही. उलट पत्नीने पती व कुटुंबीयांना मदत केल्याचे आणि सहजीवन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. पती ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत असून त्याचे मासिक उत्पन्न २३,८०८ रुपये आहे. पत्नीने विवाहानंतर परिचारिकेची नोकरी सोडल्याने तिला स्वतंत्र उत्पन्न नाही. त्यामुळे दरमहा पाच हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेशही न्यायालयाने कायम ठेवला.
पत्नीची कुरकुर, चिडचिड म्हणजे क्रूरता नव्हे घटस्फोटासाठी ठोस पुरावे आवश्यक; उच्च न्यायालयाचा निर्वाळा नागपूर, ता. १६ : पत्नीची किरकोळ कुरकुर, चिडचिड किंवा नाराजी यांना थेट ‘क्रूरता’ म्हणता येणार नाही. घटस्फोटासाठी क्रूरतेचा आरोप करताना संबंधित वर्तनाच्या ठोस आणि विशिष्ट घटना पुराव्यांसह सिद्ध करणे आवश्यक आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. यासह पतीची घटस्फोटाची याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पतीने पत्नी सासूशी भांडते, अपत्य न होण्यास त्याला दोष देते, हुंडा व छळाच्या तक्रारी करते तसेच नागपुरात राहण्याचा आग्रह धरते, असे आरोप केले होते. मात्र, न्यायालयाला क्रूरतेची कोणतीही ठोस घटना सिद्ध झाल्याचे आढळले नाही. उलट पत्नीने पती व कुटुंबीयांना मदत केल्याचे आणि सहजीवन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. पती ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत असून त्याचे मासिक उत्पन्न २३,८०८ रुपये आहे. पत्नीने विवाहानंतर परिचारिकेची नोकरी सोडल्याने तिला स्वतंत्र उत्पन्न नाही. त्यामुळे दरमहा पाच हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेशही न्यायालयाने कायम ठेवला.
- भंडारा में ध्वनि प्रदूषण और यातायात नियमों के उल्लंघन को लेकर पुलिस ने डीजे वाहन पर कारवाई की है। गणेश चतुर्थी के मद्देनजर पुलिस प्रशासन द्वारा जिले के सभी गणेश मंडलों को तेज आवाज वाले डीजे और धुमाल का इस्तेमाल नहीं करने की स्पष्ट सूचना दी गई थी। 14 सितंबर 2026 को गणेश प्रतिमा स्थापना के दौरान भंडारा पुलिस की पेट्रोलिंग टीम को झूलेलाल चौक में एक बड़ा डीजे वाहन खड़ा दिखाई दिया। वाहन से यातायात में बाधा उत्पन्न हो रही थी और कुछ ही समय में डीजे बजाने की तैयारी थी। पुलिस ने तत्काल वाहन चालक को हिरासत में लेकर पूछताछ की। चालक ने अपना नाम जांभोरा निवासी दिनेश सुरेश सपाटे उम्र 32 वर्ष बताया। पूछताछ में उसने बताया कि झूलेलाल चौक स्थित विघ्नहर्ता गणेश मंडल के अध्यक्ष राजेश गंगवानी ने ₹25,000 में यह डीजे वाहन गणेश स्थापना के लिए बुलाया था। जांच में वाहन के लिए आवश्यक परिवहन अनुमति नहीं मिली। साथ ही बड़े स्पीकर लगाकर वाहन मॉडिफाई किया जाने की बात सामने आई। इसके बाद चालक मालिक, मंडल अध्यक्ष और अन्य सदस्यों के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने डीजे वाहन डिटेन कर आगे की कारवाई के लिए आरटीओ को पत्र भेजा है। पुलिस ने सभी गणेश मंडलों से नियमों का पालन करने की अपील की है। भंडारा में ध्वनि प्रदूषण और यातायात नियमों के उल्लंघन को लेकर पुलिस ने डीजे वाहन पर कारवाई की है। गणेश चतुर्थी के मद्देनजर पुलिस प्रशासन द्वारा जिले के सभी गणेश मंडलों को तेज आवाज वाले डीजे और धुमाल का इस्तेमाल नहीं करने की स्पष्ट सूचना दी गई थी। 14 सितंबर 2026 को गणेश प्रतिमा स्थापना के दौरान भंडारा पुलिस की पेट्रोलिंग टीम को झूलेलाल चौक में एक बड़ा डीजे वाहन खड़ा दिखाई दिया। वाहन से यातायात में बाधा उत्पन्न हो रही थी और कुछ ही समय में डीजे बजाने की तैयारी थी। पुलिस ने तत्काल वाहन चालक को हिरासत में लेकर पूछताछ की। चालक ने अपना नाम जांभोरा निवासी दिनेश सुरेश सपाटे उम्र 32 वर्ष बताया। पूछताछ में उसने बताया कि झूलेलाल चौक स्थित विघ्नहर्ता गणेश मंडल के अध्यक्ष राजेश गंगवानी ने ₹25,000 में यह डीजे वाहन गणेश स्थापना के लिए बुलाया था। जांच में वाहन के लिए आवश्यक परिवहन अनुमति नहीं मिली। साथ ही बड़े स्पीकर लगाकर वाहन मॉडिफाई किया जाने की बात सामने आई। इसके बाद चालक मालिक, मंडल अध्यक्ष और अन्य सदस्यों के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने डीजे वाहन डिटेन कर आगे की कारवाई के लिए आरटीओ को पत्र भेजा है। पुलिस ने सभी गणेश मंडलों से नियमों का पालन करने की अपील की है।1
- अबब!! निष्टी येथील शेतकऱ्याच्या शेतात आढळला अकरा फुट लांबीचा अजगर ११ फुट अजगर सर्पमित्रांनी शिताफीने पकडले भिवापूर (प्रतिनिधी ) निष्टी ता. पवनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ११ फुट अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. याबाबत शेतकऱ्याने सर्पमित्रांला बोलविले. यावेळी सर्पमित्र दुर्गेश बडघरे यांच्या टिमने अतिशय काळजीपुर्वक ११ फुट अजगर यास पकडले आणि वनविभाच्या सुचनेनुसार पुल्लरच्या जंगलात सोडण्यात आले. भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेला निष्टी ता. पवनी येथील शेतकरी भगवान चट्टे यांच्या शेतात काल सकाळी ९ वाजता भव्य मोठा अजगर आढळून आला. त्यामुळे शेतकरी चांगलाच भयभीत झाला. त्याने भिवापूर येथील सर्पमित्रांना पाचरण केले. ११ फुट अजगर सर्पमित्र दुर्गेश बडघरे , जाकीर सय्यद, कृणाल रोहनकर, प्रदीप मडावी यांनी मोठया शिताफीने पकडून त्यास उमरेड कऱ्हाडला अभयारण्य कार्यालयात याबाबतची नोंद केली. या अजगराचे वजन २१ किलो होते. त्याचे वय ५ ते ७ वर्षे इतके सांगण्यात आले. हा बिनविषारी होता अशी माहिती आहे. हा भव्य अजगर पुल्लरच्या जंगलात वनविभाग माध्यमातून अधिवासात सोडण्यात आले.1
- कु.रविना रवी रंगारी हिचा सत्कार एकोडी येथील रहिवासी कु.रविना रवि रंगारी ही पवित्र पोर्टल अंतर्गत रयत शिक्षण संस्था सातारा येथे क्रीडा शिक्षकम्हणून नियुक्ती झाली त्या करिता नवनिकेतन नाट्य कला संच एकोडी च्या वतीने घरी जाऊन रविना चा स्मृती चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रविना ही अत्यंत मेहनती मुलगी लहानपनापासून क्रीडा क्षेत्राची आवड, धनुर्विद्या तिचा आवडता खेळ व त्या खेळात ती राष्ट्रीय पातळीपर्यत खेडायला गेली आई वडिलांचे संस्कार , कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने बोलणे हा तिचा स्वभाव सर्वांना आवडत असतो त्या निमित्ताने तिच्या मेहनतीने जिद्द चिकाटीने तिने पवित्र पोर्टल अंतर्गत सातारा येथे क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. सत्कार करतांना नवनिकेतन नाट्य कला संचाचे पदाधिकारी कलावंत ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, कमलाकर चांदेवार,एकनाथ कोटांगले, फिरोज कोटांगले, टिकाराम द्रगकर, राधेश्याम चौधरी,अमित भैसारे,कैलास जांभूळकर,कार्तिक मेश्राम, संदिप कोटांगले, पूरणदास निपाने, रंजना रंगारी, रवीकुमार रंगारी उपस्थित होते.1
- जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे : जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.1
- चंद्रपूर शहरात आंबेडकरी जनतेचा भव्य आक्रोश मोर्चा, दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन चंद्रपुरात आज दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन अंतर्गत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला, आयोजित मोर्च्यात आंबेडकरी जनतेतर्फे 9 मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये प्रमुख मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर या संस्थेमध्ये एकाच परिवारातील तसेच नातेसंबंधातील रक्त नात्याचे सदस्य नसावे व त्यात जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी सर्वानुमते निवडलेले अथवा पाठविलेल्या समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश असावा.1
- आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा! विविध गावांमध्ये महिला बचत भवन व विकास कामांचे थाटात भूमिपूजन संपन्न नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. देवरी, १५ सप्टेंबर २०२६: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. संजयजी पुराम यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि दूरदृष्टीतून देवरी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गतिशीलता प्राप्त झाली आहे. याच विकास पर्वांतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये महिला बचत गटांसाठी हक्काचे 'महिला बचत भवन' तसेच अन्य महत्त्वपूर्ण विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा मोठा कार्यक्रम पार पडला. माजी महिला व बालकल्याण सभापती तथा वर्तमान जिल्हा परिषद सदस्य सौ. सविता संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते या सर्व विकास कामांचे गाव-गाव प्रत्यक्ष भेट देऊन अत्यंत उत्साहात भूमिपूजन संपन्न झाले. विविध गावांमध्ये पार पडलेली विकास कामे व भूमिपूजन सोहळा (सविस्तर तपशील) * मौजा ककोडी (ता. देवरी): येथील ग्रामस्थांच्या आणि महिलांच्या मागणीचा विचार करून, रावण मैदानाजवळ तब्बल १५ लक्ष रुपये खर्चाच्या भव्य अशा सभागृह बांधकामाचे दुपारी १२ वाजता भूमिपूजन करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना विविध सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच, याच गावात हनुमान मंदिरा जवळ ५ लक्ष रुपये खर्चाच्या गट्टू लावण्याच्या कामाचे दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी भूमिपूजन संपन्न झाले, ज्यामुळे परिसराची दळणवळण व स्वच्छता सुधारेल. * मौजा चीपोटा (ता. देवरी): येथील आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक, सामाजिक व पारंपरिक उपक्रमांना हक्काची जागा मिळावी, यासाठी १५ लक्ष रुपये खर्चाच्या 'आदिवासी समाज भवन' बांधकामाचे दुपारी १ वाजता भूमिपूजन करण्यात आले. * मौजा पालांदूर (ता. देवरी): येथील वर्दळीच्या आणि मध्यवर्ती अशा बाजार चौकात १५ लक्ष रुपये खर्चाच्या नवीन सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दुपारी २ वाजता पार पडले. यामुळे बाजारनिमित्त येणाऱ्या नागरिकांना व महिला वर्गान विशेष सवलत व सोय मिळणार आहे. * मौजा बोरगांव / बाजार (ता. देवरी): येथील तलाठी कार्यालयाजवळ परिसरातील प्रशासकीय व सामाजिक कामकाजाच्या सुविधेसाठी १५ लक्ष रुपये खर्चाच्या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दुपारी ३ वाजता अत्यंत उत्साहात करण्यात आले. महिला बचत गटांचा वाढला उत्साह, व्यक्त केली कृतज्ञता या प्रत्येक गावातील भूमिपूजन सोहळ्यादरम्यान ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या महिलांमध्ये व भगिनींमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला. आपल्या भावना व्यक्त करताना महिलांनी सांगितले की, "आतापर्यंत आम्हाला आमच्या बचत गटाच्या मासिक मीटिंग्स, आर्थिक व्यवहार किंवा महिलांचे विविध प्रशिक्षण व इतर कार्यक्रम घेण्यासाठी हक्काची आणि सुरक्षित जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत असे. परंतु, आमदार मा. संजयजी पुराम आणि सौ. सविता संजय पुराम यांनी आमची ही मोठी अडचण लक्षात घेऊन आमच्यासाठी हक्काचे 'महिला बचत भवन' उपलब्ध करून दिले आहे. यामुळे आता बचत गटाचे कामकाज करणे अत्यंत सोयीस्कर झाले आहे." यावेळी महिलांनी आमदार संजय पुराम व सौ. सविता संजय पुराम यांचे मनःपूर्वक आभार मानले. मोठ्या संख्येने नागरिकांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या प्रत्येक गावातील भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी संबंधित गावांचे माननीय सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. या सर्व विकास कामांमुळे देवरी तालुक्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल ठरत आहे.1
- ईतवारा बाजार में अतिक्रमण है2
- जबरी चोरी करणाऱ्या दोन अज्ञातांना अवघ्या काही तासांत बेड्या,नांदगाव पेठ पोलिसांची धडक कारवाई 1