मुंबई. हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ विविध योजना माहिती पत्रकाचे विमोचन ———————————————- हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ विविध योजना माहिती पत्रकाचे विमोचन ———मुंबई -दिनांक २० मार्च २०२६ रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी माहिती पत्रकाचे विमोचन व्यवस्थापकीय संचालक मा.श्री बाबासाहेब जी बेलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाव्यवस्थापक श्री प्रशांत जी गेडाम साहेब, यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक श्री सुरेंद्र जी यावलीकर साहेब, अँड प्रदिपसिंह गंगणे संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड (हिंदु खाटीक युवा संघटन) यांची उपस्थिती होती जवळपास ७०,००० माहिती पत्रके छापण्यात आली असून महाराष्ट्राच्या विविध भागात सदरची पत्रके पाठवली जाणार असून सुशिक्षित बेरोजगार युवक ,युवतीच्या आर्थिक उन्नतीसाठी समाजाच्या विविध संघटना व पदाधिकारी यांनी जिल्हा समन्वयक यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त समाजबांधवां पर्यंत विविध योजनाची माहिती पोहचवून प्रचार व प्रसार करण्याचे व लाभ मिळवून देण्याचे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबई कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे अँड प्रदिपसिंह गंगणे लातूर

- प स कार्यालय तुळजापूर कामानिमित्त आलेल्या माणसांसाठी पंखे होतात बंद, ज्या विभागात माणसंच नाहीत त्या विभागाचे पंखे होतात चालू1
- Post by Laxman Ugile1
- मुखेडच्या लेकीचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत गौरव मुखेड दि. १५ एप्रिल रोजी नागपूर येथे अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने पार पडलेल्या द्वितीय दिक्षांत समारोहात मुखेडची लेक डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांचा महामहीम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुरमु व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांनी AIIMS, Nagpur येथून सन. २०२० च्या बॕचमध्ये MBBS आॕब्स्टेट्रिक्स व गायनेकाॕलाॕजी या विषयात प्रथम व जनरल मेडिसीन या विषयात द्वितीय आल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. तसेच १२ वी नीट-२०२० मध्ये ७२० पैकी ६६७ गुण घेऊन देशात १४५० वा क्रमांक मिळविला. डॉ. ऋतुजा ही AIIMS ला मुखेड आणि परिसरातून जाणारी एकमेव विद्यार्थीनी होती. तिच्या या यशामध्ये तिचे वडिल डॉ. अशोक कौरवार व आई डॉ. रचिता कौरवार यांचे अथक परिश्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत. डॉ. ऋतुजाला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुखेडकरांची छाती गर्वाने फुलली असून परिसरात तीच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.7
- नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- Post by Anil Rathod1
- ----- (प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन तरुण मंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,या शिबिरात तब्बल 61 तरुणांनी सहभाग नोंदवत त्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले,कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली,रक्तसंकलनासाठी सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते आणि त्यांचा विशेष सहकार्य या शिबिरास लाभला, मंडळाच्या वतीने सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला, ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन तरुण मंडळाने पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते आणि पहिल्याच वेळी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,या विधायक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.याप्रसंगी ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Post by Digital media.1