logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुर्तिजापुरात जातिवाचक शिवीगाळ व मारहाण; एकावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अनुसूचित जातीच्या तरुणास जातिवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महाकाली नगर परिसरात घर बांधकाम सुरू असताना जेसीबी ऑपरेटरला मारहाण करण्यात आली तसेच जातिवाचक अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 📍 स्थान: मुर्तिजापुर 📰 India News R7 | उपसंपादक – मोहम्मद रिज़वान सिद्दीक

2 hrs ago
user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
MOHAMMED RIZWAN RAHEMAN
Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
2 hrs ago
78048b56-4692-4bd2-8952-22c67f9a6b81

मुर्तिजापुरात जातिवाचक शिवीगाळ व मारहाण; एकावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अनुसूचित जातीच्या तरुणास जातिवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महाकाली नगर परिसरात घर बांधकाम सुरू असताना जेसीबी ऑपरेटरला मारहाण करण्यात आली तसेच जातिवाचक अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 📍 स्थान: मुर्तिजापुर 📰 India News R7 | उपसंपादक – मोहम्मद रिज़वान सिद्दीक

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आर्णी ते दारव्हा या मार्गावरील बसेस वेळेवर न सुटल्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व प्रवासी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत बस स्थानकावर गाड्या उपलब्ध नसल्याने रोज अपडाऊन करणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही बसेस महागाव कसबा येथूनच परत फिरत असल्याने त्या आर्णीपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे प्रवासी अडकून पडत आहेत. आगामी बाबा कंबलपोस यात्रेमुळे प्रवाशांची संख्या वाढणार असून, बस व्यवस्थापनाचे नियोजन कसे होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वेळेवर बस सेवा सुरू न केल्यास प्रवाशी नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिमोद मुधाने, लोकसभा अध्यक्ष (यवतमाळ–वाशीम) यांनी आर्णी बस स्थानकावर दिला.
    1
    आर्णी ते दारव्हा या मार्गावरील बसेस वेळेवर न सुटल्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व प्रवासी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत बस स्थानकावर गाड्या उपलब्ध नसल्याने रोज अपडाऊन करणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही बसेस महागाव कसबा येथूनच परत फिरत असल्याने त्या आर्णीपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे प्रवासी अडकून पडत आहेत.
आगामी बाबा कंबलपोस यात्रेमुळे प्रवाशांची संख्या वाढणार असून, बस व्यवस्थापनाचे नियोजन कसे होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वेळेवर बस सेवा सुरू न केल्यास प्रवाशी नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिमोद मुधाने, लोकसभा अध्यक्ष (यवतमाळ–वाशीम) यांनी आर्णी बस स्थानकावर दिला.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • #Hashtag #IndiaUSDeal #भारतअमेरिकाकरार #शेतकरी #DrAjitNavale #AgricultureNews #ShegaonLive अशाच महत्त्वाच्या आणि निर्भीड बातम्यांसाठी Shegaon Live ला Subscribe करा
    1
    #Hashtag
#IndiaUSDeal
#भारतअमेरिकाकरार
#शेतकरी
#DrAjitNavale
#AgricultureNews
#ShegaonLive
अशाच महत्त्वाच्या आणि निर्भीड बातम्यांसाठी Shegaon Live ला Subscribe करा
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    पत्रकार शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • खामगाव: संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सकल हिंदू समाजाच्या वतीने विश्वकर्मा वस्ती, सुटाळा बु. येथे हिंदू समाजातील एकता, सनातन धर्म-संस्कृतीचे संवर्धन आणि हिंदू जागृतीस चालना देण्यासाठी विराट हिंदू संमेलन कन्या शाळेजवळच्या मैदानात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते स्वप्नील राऊत (बुलढाणा विभाग प्रचारक) तसेच ह.भ.प.संतोष महाराज मनसुटे (रोहणा), आरती सुनील मुळे, खामगाव यांची उपस्थित होती. सुरुवातीला गोमाता पूजन व भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते स्वप्नील राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असून या निमित्ताने खामगाव शहरात व्यापक गृहसंपर्क अभियान तसेच हिंदू संमेलन असे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. संघाच्या माध्यमातून समाजात पंचपरिवर्तन या संकल्पनेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्व-आधारित जीवनशैली आणि नागरिक कर्तव्ये या पाच मूल्यांचा समाजाने अंगीकार करून त्यानुसार आचरण करणे आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर शिवव्याख्याते ह.भ.प. संतोष महाराज मनसुटे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे आजच्या काळात जातीभेद नष्ट करून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी आरती मुळे यांनी नारी शक्ती जागरण या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले. या संमेलनात परिसरातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. विध्यार्त्यानी माँ जिजाऊ वंदना, ऑपरेशन सिंदूर नाटिका, तसेच मोबाईलचे वाढते व्यसन या विषयावर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता अनासने तर आभार हर्षल देवकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता भारत मातेची सामूहिक आरतीने करण्यात आली.
    2
    खामगाव: संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सकल हिंदू समाजाच्या वतीने विश्वकर्मा वस्ती, सुटाळा बु. येथे हिंदू समाजातील एकता, सनातन धर्म-संस्कृतीचे संवर्धन आणि हिंदू जागृतीस चालना देण्यासाठी विराट हिंदू संमेलन कन्या शाळेजवळच्या मैदानात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते स्वप्नील राऊत (बुलढाणा विभाग प्रचारक) तसेच ह.भ.प.संतोष महाराज मनसुटे (रोहणा), आरती सुनील मुळे, खामगाव यांची उपस्थित होती. सुरुवातीला गोमाता पूजन व भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.  
यावेळी प्रमुख वक्ते स्वप्नील राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असून या निमित्ताने खामगाव शहरात व्यापक गृहसंपर्क अभियान तसेच हिंदू संमेलन असे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. संघाच्या माध्यमातून समाजात पंचपरिवर्तन या संकल्पनेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्व-आधारित जीवनशैली आणि नागरिक कर्तव्ये या पाच मूल्यांचा समाजाने अंगीकार करून त्यानुसार आचरण करणे आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यानंतर शिवव्याख्याते ह.भ.प. संतोष महाराज मनसुटे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे आजच्या काळात जातीभेद नष्ट करून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी आरती मुळे यांनी नारी शक्ती जागरण या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले.
या संमेलनात परिसरातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. विध्यार्त्यानी माँ जिजाऊ वंदना, ऑपरेशन सिंदूर नाटिका, तसेच मोबाईलचे वाढते व्यसन या विषयावर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता अनासने तर आभार हर्षल देवकर यांनी मानले.  कार्यक्रमाची सांगता भारत मातेची सामूहिक आरतीने करण्यात आली.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणा-या चिखलवर्धा येथील जिल्हा परीषद उर्दु शाळेचे मुख्याध्यापक मोहसीन सुलतान चव्हाण यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुणे येथे एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणा-या चिखलवर्धा येथील जिल्हा परीषद उर्दु शाळेचे मुख्याध्यापक मोहसीन सुलतान चव्हाण यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुणे येथे एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    4 hrs ago
  • हिंगोली _मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांची शिक्षकाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी जिल्हा परिषद कार्यालयातील प्रकार
    1
    हिंगोली _मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांची शिक्षकाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी जिल्हा परिषद कार्यालयातील प्रकार
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • दुचाकी अपघातात वनी येथील माजी नगरसेवकाचा मृत्यू, दुर्गापूर येथील घटना झरी घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात वणी येथील माजी नगरसेवक राजेश डफ (वय अंदाजे ५५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश डफ हे झरी येथे एका बैठकीसाठी आले होते. बैठक आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकी क्रमांक MH-29 A S 1856 ने वणीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, झरी–घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीचे संतुलन अचानक बिघडल्याने वाहन रस्त्याखालील खड्यात जाऊन कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर शेजारील शेतात कापूस वेचत असलेल्या महिलांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना व पोलिसांना ही माहिती दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास वणी पोलीस करीत असल्याची माहिती आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे
    1
    दुचाकी अपघातात वनी येथील माजी नगरसेवकाचा मृत्यू, दुर्गापूर येथील घटना
झरी घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील  वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात वणी येथील माजी नगरसेवक राजेश डफ (वय अंदाजे ५५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश डफ हे झरी येथे एका बैठकीसाठी आले होते. बैठक आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकी क्रमांक MH-29 A S 1856 ने वणीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, झरी–घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीचे संतुलन अचानक बिघडल्याने वाहन रस्त्याखालील खड्यात जाऊन कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काही वेळानंतर शेजारील शेतात कापूस वेचत असलेल्या महिलांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना व पोलिसांना ही माहिती दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास वणी पोलीस करीत असल्याची माहिती आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ​खामगाव: शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या मस्तान चौकात रात्री च्या सुमारास दोन बेवारस बैलांमध्ये जोरदार झुंज झाली. या भीषण युद्धामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, भररस्त्यात सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अचानक दोन बैल एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात झुंज सुरू झाली. मस्तान चौक हा शहरातील मुख्य व्यापारी मार्ग असल्याने तिथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. झुंज सुरू होताच आसपासच्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरक्षित केली, तर वाहनधारकांनी आपली वाहने वळवून पळ काढला. ​एककीकडे भीतीचे वातावरण असताना, दुसरीकडे ही झुंज पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक तरुण या घटनेचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करताना दिसले. मात्र, या गर्दीमुळे बैलांना बाजूला जाण्यास जागा उरली नाही आणि ते अधिकच बिथरले. या प्रकारामुळे चौकातील वाहतूक सुमारे अर्धा ते एक तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ​सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकींचे किरकोळ नुकसान झाल्याची चर्चा आहे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने तातडीने करावा, अशी मागणी आता मस्तान चौकातील स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
    1
    ​खामगाव: शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या मस्तान चौकात रात्री च्या सुमारास दोन बेवारस बैलांमध्ये जोरदार झुंज झाली. या भीषण युद्धामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, भररस्त्यात सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. 
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अचानक दोन बैल एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात झुंज सुरू झाली. मस्तान चौक हा शहरातील मुख्य व्यापारी मार्ग असल्याने तिथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. झुंज सुरू होताच आसपासच्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरक्षित केली, तर वाहनधारकांनी आपली वाहने वळवून पळ काढला. ​एककीकडे भीतीचे वातावरण असताना, दुसरीकडे ही झुंज पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक तरुण या घटनेचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करताना दिसले. मात्र, या गर्दीमुळे बैलांना बाजूला जाण्यास जागा उरली नाही आणि ते अधिकच बिथरले. या प्रकारामुळे चौकातील वाहतूक सुमारे अर्धा ते एक तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ​सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकींचे किरकोळ नुकसान झाल्याची चर्चा आहे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने तातडीने करावा, अशी मागणी आता मस्तान चौकातील स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा वीर राजे संभाजी पुरस्कार यावर्षी आयएएस आदिबा अहेमद यांना जाहीर करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव दरम्यान घाटंजीमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा वीर राजे संभाजी पुरस्कार यावर्षी आयएएस आदिबा अहेमद यांना जाहीर करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव दरम्यान घाटंजीमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    6 hrs ago
  • "उबाळखेड ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा संशय; ग्रामसभेला सरपंच-ग्रामसेवकांची दांडी, ग्रामस्थांचे थेट जिल्हा परिषदेत धाव !"
    1
    "उबाळखेड ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा संशय; ग्रामसभेला सरपंच-ग्रामसेवकांची दांडी, ग्रामस्थांचे थेट जिल्हा परिषदेत धाव !"
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.