logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आर्णी–दारव्हा मार्गावरील बसेस वेळेवर सोडण्याची मागणी आर्णी ते दारव्हा या मार्गावरील बसेस वेळेवर न सुटल्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व प्रवासी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत बस स्थानकावर गाड्या उपलब्ध नसल्याने रोज अपडाऊन करणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही बसेस महागाव कसबा येथूनच परत फिरत असल्याने त्या आर्णीपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे प्रवासी अडकून पडत आहेत. आगामी बाबा कंबलपोस यात्रेमुळे प्रवाशांची संख्या वाढणार असून, बस व्यवस्थापनाचे नियोजन कसे होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वेळेवर बस सेवा सुरू न केल्यास प्रवाशी नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिमोद मुधाने, लोकसभा अध्यक्ष (यवतमाळ–वाशीम) यांनी आर्णी बस स्थानकावर दिला.

3 hrs ago
user_GAJAANNAN THHAKKARE
GAJAANNAN THHAKKARE
दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
3 hrs ago

आर्णी–दारव्हा मार्गावरील बसेस वेळेवर सोडण्याची मागणी आर्णी ते दारव्हा या मार्गावरील बसेस वेळेवर न सुटल्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व प्रवासी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत बस स्थानकावर गाड्या उपलब्ध नसल्याने रोज अपडाऊन करणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही बसेस महागाव कसबा येथूनच परत फिरत असल्याने त्या आर्णीपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे प्रवासी अडकून पडत आहेत. आगामी बाबा कंबलपोस यात्रेमुळे प्रवाशांची संख्या वाढणार असून, बस व्यवस्थापनाचे नियोजन कसे होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वेळेवर बस सेवा सुरू न केल्यास प्रवाशी नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिमोद मुधाने, लोकसभा अध्यक्ष (यवतमाळ–वाशीम) यांनी आर्णी बस स्थानकावर दिला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. मात्र काही लाभार्थ्यांकडून प्रत्यक्ष बांधकाम सुरू न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांना सूचना व मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दारव्हा तालुक्यात प्रत्यक्ष भेट देत गुरुवारला पाहणी दौरा केला. या दौऱ्यात मीरासे खोपडी येथे घरकुल लाभार्थ्यांची सिईओ यांनी भेट घेतली. त्याचप्रमाणे बोरी, लाडखेड,तरनोळी, तळेगाव, लोही, डोल्हारी देवी याठिकाणी भेट देऊन  लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत सीईओ पत्की यांनी घरकुलाचे काम तात्काळ सुरू करून ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच घरकुल योजनांमधील अडचणी समजून घेत आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्यासह गटविकास अधिकारी राजीव शिंदे, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,  ग्रामसेवक , ग्रामरोजगार सहाय्यक  तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
    1
    प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. मात्र काही लाभार्थ्यांकडून प्रत्यक्ष बांधकाम सुरू न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांना सूचना व मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दारव्हा तालुक्यात प्रत्यक्ष भेट देत गुरुवारला पाहणी दौरा केला.
या दौऱ्यात मीरासे खोपडी येथे घरकुल लाभार्थ्यांची सिईओ यांनी भेट घेतली. त्याचप्रमाणे बोरी, लाडखेड,तरनोळी, तळेगाव, लोही, डोल्हारी देवी याठिकाणी भेट देऊन  लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत सीईओ पत्की यांनी घरकुलाचे काम तात्काळ सुरू करून ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच घरकुल योजनांमधील अडचणी समजून घेत आवश्यक मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्यासह गटविकास अधिकारी राजीव शिंदे, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,  ग्रामसेवक , ग्रामरोजगार सहाय्यक  तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • विज्ञान भारती व मेडिकल कॉलेज यांचे संयुक्त विद्यमाने लेडी हार्डिंग वाशिम येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दिनांक 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे तरी या प्रदर्शनीला भेट देण्याची आवाहन गट विकास अधिकारी पंचायत समिती वाशिम यांनी केले आहे
    1
    विज्ञान भारती व मेडिकल कॉलेज यांचे संयुक्त विद्यमाने लेडी हार्डिंग वाशिम येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दिनांक 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे तरी या प्रदर्शनीला भेट देण्याची आवाहन गट विकास अधिकारी पंचायत समिती वाशिम यांनी केले आहे
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer Karanja, Washim•
    10 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणा-या चिखलवर्धा येथील जिल्हा परीषद उर्दु शाळेचे मुख्याध्यापक मोहसीन सुलतान चव्हाण यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुणे येथे एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पंचायत समिती अंतर्गत येणा-या चिखलवर्धा येथील जिल्हा परीषद उर्दु शाळेचे मुख्याध्यापक मोहसीन सुलतान चव्हाण यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुणे येथे एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    2 hrs ago
  • मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अनुसूचित जातीच्या तरुणास जातिवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महाकाली नगर परिसरात घर बांधकाम सुरू असताना जेसीबी ऑपरेटरला मारहाण करण्यात आली तसेच जातिवाचक अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 📍 स्थान: मुर्तिजापुर 📰 India News R7 | उपसंपादक – मोहम्मद रिज़वान सिद्दीक
    9
    मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अनुसूचित जातीच्या तरुणास जातिवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महाकाली नगर परिसरात घर बांधकाम सुरू असताना जेसीबी ऑपरेटरला मारहाण करण्यात आली तसेच जातिवाचक अपशब्द वापरल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
📍 स्थान: मुर्तिजापुर
📰 India News R7 | उपसंपादक – मोहम्मद रिज़वान सिद्दीक
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Israrkhn
    1
    Post by Israrkhn
    user_Israrkhn
    Israrkhn
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • दुचाकी अपघातात वनी येथील माजी नगरसेवकाचा मृत्यू, दुर्गापूर येथील घटना झरी घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात वणी येथील माजी नगरसेवक राजेश डफ (वय अंदाजे ५५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश डफ हे झरी येथे एका बैठकीसाठी आले होते. बैठक आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकी क्रमांक MH-29 A S 1856 ने वणीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, झरी–घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीचे संतुलन अचानक बिघडल्याने वाहन रस्त्याखालील खड्यात जाऊन कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर शेजारील शेतात कापूस वेचत असलेल्या महिलांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना व पोलिसांना ही माहिती दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास वणी पोलीस करीत असल्याची माहिती आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे
    1
    दुचाकी अपघातात वनी येथील माजी नगरसेवकाचा मृत्यू, दुर्गापूर येथील घटना
झरी घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील  वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात वणी येथील माजी नगरसेवक राजेश डफ (वय अंदाजे ५५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश डफ हे झरी येथे एका बैठकीसाठी आले होते. बैठक आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकी क्रमांक MH-29 A S 1856 ने वणीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, झरी–घोन्सा मार्गावरील दुर्गापूर गावाजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीचे संतुलन अचानक बिघडल्याने वाहन रस्त्याखालील खड्यात जाऊन कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काही वेळानंतर शेजारील शेतात कापूस वेचत असलेल्या महिलांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना व पोलिसांना ही माहिती दिली. यावरून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास वणी पोलीस करीत असल्याची माहिती आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • आर्णी ते दारव्हा या मार्गावरील बसेस वेळेवर न सुटल्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व प्रवासी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत बस स्थानकावर गाड्या उपलब्ध नसल्याने रोज अपडाऊन करणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही बसेस महागाव कसबा येथूनच परत फिरत असल्याने त्या आर्णीपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे प्रवासी अडकून पडत आहेत. आगामी बाबा कंबलपोस यात्रेमुळे प्रवाशांची संख्या वाढणार असून, बस व्यवस्थापनाचे नियोजन कसे होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वेळेवर बस सेवा सुरू न केल्यास प्रवाशी नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिमोद मुधाने, लोकसभा अध्यक्ष (यवतमाळ–वाशीम) यांनी आर्णी बस स्थानकावर दिला.
    1
    आर्णी ते दारव्हा या मार्गावरील बसेस वेळेवर न सुटल्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व प्रवासी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत बस स्थानकावर गाड्या उपलब्ध नसल्याने रोज अपडाऊन करणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही बसेस महागाव कसबा येथूनच परत फिरत असल्याने त्या आर्णीपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे प्रवासी अडकून पडत आहेत.
आगामी बाबा कंबलपोस यात्रेमुळे प्रवाशांची संख्या वाढणार असून, बस व्यवस्थापनाचे नियोजन कसे होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वेळेवर बस सेवा सुरू न केल्यास प्रवाशी नागरिकांसह बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिमोद मुधाने, लोकसभा अध्यक्ष (यवतमाळ–वाशीम) यांनी आर्णी बस स्थानकावर दिला.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.