logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एनडीटीएच्या वतीने ‘चालक दिन–२०२६’ उत्साहात; २२५ चालकांना अपघाती विमा, २०० चालकांना सोलापुरी चादरींचे वाटप *चालकांचा सन्मान म्हणजे देशाच्या गतिमान अर्थव्यवस्थेचा सन्मान - प्रकाश गवळी* नाशिक,दि.१७ सप्टेंबर २०२६ :-* देशाच्या अर्थव्यवस्थेची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याबरोबरच उद्योग, व्यापार, शेती, बाजारपेठ आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन गतिमान ठेवण्यात वाहनचालक बांधवांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ऊन, वारा, पाऊस, दिवस-रात्र यांची तमा न बाळगता हजारो किलोमीटरचा प्रवास करून देशाची जीवनवाहिनी अखंड सुरू ठेवणाऱ्या या कष्टकरी चालक बांधवांच्या कार्याचा गौरव म्हणजे देशाच्या गतिमान अर्थव्यवस्थेचा सन्मान आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केले. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल, आडगाव नाशिक येथे ‘चालक दिन–२०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात चालकांच्या सन्मानासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी, सामाजिक सुरक्षितता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष पी.एम. सैनी, चेअरमन राजेंद्र नाना फड, महासचिव बजरंग शर्मा, फंड कमिटीचे चेअरमन सुभाष जांगडा यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी परिवहन अधिकारी श्रीनिवास जल्लावार,आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण,महाराष्ट्र चेंबरचे माजी उपाध्यक्ष संजय सोनवणे, गोल्डन डेज स्कूलचे संचालक हरबीर चौधरी, प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष किशोर लोखंडे, नगरसेवक नामदेव शिंदे, नगरसेवक सुरेश खेताडे, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस समाधान जेजुरकर, अजय खरा, कोपरगाव संघटनेचे अध्यक्ष आयुब कच्छी यांच्यासह वाहतूक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रकाश गवळी पुढे म्हणाले की, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सातत्याने पाठपुरवा करून नाशिकमध्ये अद्ययावत ट्रक टर्मिनल उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये सर्व वाहतूकदारांना सहभागी करून घेण्यात यावे. याठिकाणी चालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत त्यांना ट्रक टर्मिनलमध्ये सुरक्षित व सन्मानजनक वातावरण मिळावे,यामुळे चालकांचा सन्मान वाढण्यासोबतच त्यांच्या आरोग्याचीही योग्य काळजी घेता येईल, चालक आणि वाहतूकदारांच्या हिताच्या दृष्टीने नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन करत असलेले कार्य अतिशय महत्वाचे आहे,असे त्यांनी सांगितले. देशातील मालवाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात चालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असतानाही त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक सुविधांकडे पुरेसे लक्ष जाणे आवश्यक आहे. ‘चालकांचा सन्मान – सुरक्षित वाहतुकीचा संकल्प’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या चालक दिनाच्या माध्यमातून चालक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्यांच्या कल्याणासाठी समाजाने आणि संबंधित यंत्रणांनी अधिक संवेदनशीलतेने पुढे यावे, असे आवाहन प्रकाश गवळी यांनी यावेळी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना नाशिकचे मनपाचे अतिरिक्त उपायुक्त आधीरंजन चौधरी यांनी चालक बांधवांचे योगदान अधोरेखित करताना सांगितले की, चालकांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेचे सल्लागार सुनील बुरड, जे. पी. जाधव, जयपाल शर्मा, महावीर मित्तल, रामभाऊ सूर्यवंशी, संजय तोडी, हरिसिंग तिवारी यांच्यासह कार्यक्रमाचे चेअरमन सियाराम शर्मा, व्हाइस चेअरमन महेंद्रसिंग राजपूत, तसेच उपाध्यक्ष शंकरराव धनावडे, सदाशिव पवार, सतीश कलंत्री, भगवान कटीरा, सुनील ढाने, हसरत शेख, शक्तिसिंग राजपुरोहित, नरेश बन्सल, मनोज उदावंत, किशन बेनिवाल, सजनसिंग राजपुरोहित, जस्वंदरसिंग रांधवा, रंधवीरसिंग, संभाजी जाधवर, संदीप बिर्ला, गुणपाल, अशोक पवार, अशोक वाघ, राजेश शर्मा, दीपक पांडे, माणिक मेमाणे, महावीर शर्मा आणि सुरेश शर्मा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूकदार, वाहनमालक आणि चालक यांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच चालक कल्याणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. चालकांची आरोग्य तपासणी, अपघाती विमा, प्रशिक्षण, सुरक्षितता आणि आवश्यक मूलभूत सुविधा या विषयांना संघटनेने सातत्याने प्राधान्य दिले असल्याचे संघटनेचे माजी अध्यक्ष जयपाल शर्मा यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले. चालक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात चालक बांधवांच्या आरोग्याचा विचार करून कार्यक्रमात मोफत आरोग्य तपासणी, १०३ चालकांची नेत्र तपासणी ९० चालकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. तसेच आयोजित रक्तदान शिबिरात २५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. यावेळी २२५ चालक बांधवांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या किमतीचे अपघाती विमा संरक्षण देण्यात आले. तसेच २०० चालक बांधवांना सोलापुरी चादरींचे वाटप करण्यात आले. चालक बांधवांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

2 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
2 hrs ago
6a4e54a3-a906-4b07-baec-f2dd9eafecb5

एनडीटीएच्या वतीने ‘चालक दिन–२०२६’ उत्साहात; २२५ चालकांना अपघाती विमा, २०० चालकांना सोलापुरी चादरींचे वाटप *चालकांचा सन्मान म्हणजे देशाच्या गतिमान अर्थव्यवस्थेचा सन्मान - प्रकाश गवळी* नाशिक,दि.१७ सप्टेंबर २०२६ :-* देशाच्या अर्थव्यवस्थेची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याबरोबरच उद्योग, व्यापार, शेती, बाजारपेठ आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन गतिमान ठेवण्यात वाहनचालक बांधवांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ऊन, वारा, पाऊस, दिवस-रात्र यांची तमा न बाळगता हजारो किलोमीटरचा प्रवास करून देशाची जीवनवाहिनी अखंड सुरू ठेवणाऱ्या या कष्टकरी चालक बांधवांच्या कार्याचा गौरव म्हणजे देशाच्या गतिमान अर्थव्यवस्थेचा सन्मान आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केले. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल, आडगाव नाशिक येथे ‘चालक दिन–२०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात चालकांच्या सन्मानासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी, सामाजिक सुरक्षितता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष पी.एम. सैनी, चेअरमन राजेंद्र नाना फड, महासचिव बजरंग शर्मा,

c40302d3-91c0-4163-b1ed-feed9ea5b17f

फंड कमिटीचे चेअरमन सुभाष जांगडा यांनी विशेष पुढाकार घेतला. यावेळी परिवहन अधिकारी श्रीनिवास जल्लावार,आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण,महाराष्ट्र चेंबरचे माजी उपाध्यक्ष संजय सोनवणे, गोल्डन डेज स्कूलचे संचालक हरबीर चौधरी, प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष किशोर लोखंडे, नगरसेवक नामदेव शिंदे, नगरसेवक सुरेश खेताडे, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस समाधान जेजुरकर, अजय खरा, कोपरगाव संघटनेचे अध्यक्ष आयुब कच्छी यांच्यासह वाहतूक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रकाश गवळी पुढे म्हणाले की, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सातत्याने पाठपुरवा करून नाशिकमध्ये अद्ययावत ट्रक टर्मिनल उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये सर्व वाहतूकदारांना सहभागी करून घेण्यात यावे. याठिकाणी चालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत त्यांना ट्रक टर्मिनलमध्ये सुरक्षित व सन्मानजनक वातावरण मिळावे,यामुळे चालकांचा सन्मान वाढण्यासोबतच त्यांच्या आरोग्याचीही योग्य काळजी घेता येईल, चालक आणि वाहतूकदारांच्या हिताच्या दृष्टीने नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन करत असलेले कार्य अतिशय महत्वाचे आहे,असे त्यांनी सांगितले. देशातील मालवाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात चालकांची

dafc5640-2505-445e-8067-a147eb2269c3

भूमिका अत्यंत महत्त्वाची असतानाही त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक सुविधांकडे पुरेसे लक्ष जाणे आवश्यक आहे. ‘चालकांचा सन्मान – सुरक्षित वाहतुकीचा संकल्प’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या चालक दिनाच्या माध्यमातून चालक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्यांच्या कल्याणासाठी समाजाने आणि संबंधित यंत्रणांनी अधिक संवेदनशीलतेने पुढे यावे, असे आवाहन प्रकाश गवळी यांनी यावेळी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना नाशिकचे मनपाचे अतिरिक्त उपायुक्त आधीरंजन चौधरी यांनी चालक बांधवांचे योगदान अधोरेखित करताना सांगितले की, चालकांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेचे सल्लागार सुनील बुरड, जे. पी. जाधव, जयपाल शर्मा, महावीर मित्तल, रामभाऊ सूर्यवंशी, संजय तोडी, हरिसिंग तिवारी यांच्यासह कार्यक्रमाचे चेअरमन सियाराम शर्मा, व्हाइस चेअरमन महेंद्रसिंग राजपूत, तसेच उपाध्यक्ष शंकरराव धनावडे, सदाशिव पवार, सतीश कलंत्री, भगवान कटीरा, सुनील ढाने, हसरत शेख, शक्तिसिंग राजपुरोहित, नरेश बन्सल, मनोज उदावंत, किशन बेनिवाल, सजनसिंग राजपुरोहित, जस्वंदरसिंग रांधवा, रंधवीरसिंग, संभाजी जाधवर, संदीप बिर्ला, गुणपाल, अशोक

4a6184e1-014b-495d-b0ac-668e78c2daf4

पवार, अशोक वाघ, राजेश शर्मा, दीपक पांडे, माणिक मेमाणे, महावीर शर्मा आणि सुरेश शर्मा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूकदार, वाहनमालक आणि चालक यांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच चालक कल्याणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. चालकांची आरोग्य तपासणी, अपघाती विमा, प्रशिक्षण, सुरक्षितता आणि आवश्यक मूलभूत सुविधा या विषयांना संघटनेने सातत्याने प्राधान्य दिले असल्याचे संघटनेचे माजी अध्यक्ष जयपाल शर्मा यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले. चालक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात चालक बांधवांच्या आरोग्याचा विचार करून कार्यक्रमात मोफत आरोग्य तपासणी, १०३ चालकांची नेत्र तपासणी ९० चालकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. तसेच आयोजित रक्तदान शिबिरात २५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. यावेळी २२५ चालक बांधवांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या किमतीचे अपघाती विमा संरक्षण देण्यात आले. तसेच २०० चालक बांधवांना सोलापुरी चादरींचे वाटप करण्यात आले. चालक बांधवांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार नाशिक गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
    1
    नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार

नाशिक 
गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज आप लोगों bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती
    1
    ब्रेकिंग न्यूज आप लोगों  bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show
देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती
    user_Harish Kumar Gautam
    Harish Kumar Gautam
    Voice of people नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन* कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन* कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक
    3
    *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन*
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात
*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन*
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली.
या पथसंचलनावेळी  अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने अभिवादन उपमहापौर विलास शिंदे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी केले पुजन नाशिक :-महानगरपालिकेच्या वतीने केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर,विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त जगताप, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, मनीषा पाटेकर,कनिष्ठ अभियंता तेजल मोरे,साहेबराव भोसले,श्रीकांत भोई,रमेश पागे, संजय मोरे, मनोज गायधनी, रवी पवार आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
    1
    प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने अभिवादन उपमहापौर विलास शिंदे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी केले पुजन 
नाशिक :-महानगरपालिकेच्या वतीने केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर,विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त जगताप, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, मनीषा पाटेकर,कनिष्ठ अभियंता तेजल मोरे,साहेबराव भोसले,श्रीकांत भोई,रमेश पागे, संजय मोरे, मनोज गायधनी, रवी पवार आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
    user_PRASIDHI PRAMUKH NEWS
    PRASIDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके
    1
    सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके
सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके
    user_Raj Kumar
    Raj Kumar
    Photographer India•
    6 hrs ago
  • NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : ​नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. ​तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..​ NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : ​नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. ​तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..​
    1
    NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : 
​नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे.
​तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..​
NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : 
​नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे.
​तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..​
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.
    1
    निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन
नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन! नगरसेवकांचा धारणकरांवर हल्लाबोल; कारवाईची मागणी “काम करा, अन्यथा घरी बसवण्याचा आयुक्तांचा स्मार्ट सिटीच्या सीईओंना इशारा वॉल मन च्या विभागनीय बदल्या करण्याचे महापौरांचे आदेश
    4
    पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन! नगरसेवकांचा धारणकरांवर हल्लाबोल; कारवाईची मागणी
“काम करा, अन्यथा घरी बसवण्याचा आयुक्तांचा स्मार्ट सिटीच्या सीईओंना इशारा वॉल मन च्या विभागनीय बदल्या करण्याचे महापौरांचे आदेश
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.