लोणार सरोवर व शेगाव येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल उत्साहात मानवत (प्रतिनिधी) : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मानवत येथील विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी सहा वाजता ११ एसटी बसमधून सहलीसाठी प्रस्थान करण्यात आले. या सहलीमध्ये सहावी ते आठवीपर्यंतचे जवळपास ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रथम लोणार सरोवर या जगप्रसिद्ध उल्काजन्य सरोवराला भेट दिली. सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेल्या या विवराच्या परिसरात ऐतिहासिक मंदिरे व समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते. येथे असलेले कमळजा माता मंदिर हे १२ व्या शतकातील प्राचीन मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. बेसॉल्ट खडकात तयार झालेले लोणार सरोवर हे जगातील एकमेव आघाती सरोवर असून भूगर्भशास्त्रज्ञांसाठी ते महत्त्वाचा अभ्यासविषय मानले जाते. सरोवराच्या परिसरातील घनदाट जंगल आणि विविध पक्ष्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण वेधले. यानंतर विद्यार्थ्यांनी खामगाव येथील नामांकित बिस्किट कारखान्याला भेट दिली. या ठिकाणी बिस्किटांची निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. कारखान्यातील कामगारांशी संवाद साधून या उद्योगामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होत असल्याची माहितीही विद्यार्थ्यांना मिळाली. भेटीनंतर विद्यार्थ्यांना बिस्किटांचे पुडेही देण्यात आले. त्यानंतर सहल श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव येथे पोहोचली. हे पवित्र तीर्थक्षेत्र विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९व्या शतकात प्रकट झालेल्या श्री गजानन महाराज यांचे हे समाधीस्थळ असून मंदिर संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ व भक्तांसाठी सेवाभावी असल्याचे विद्यार्थ्यांनी अनुभवले. मंदिर परिसरातील संगमरवरी समाधी मंदिर तसेच भक्तांसाठी दररोज दिला जाणारा मोफत महाप्रसाद यामुळे विद्यार्थ्यांना आध्यात्मिक व सांस्कृतिक अनुभव मिळाला. या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, इतिहास, उद्योग व अध्यात्म यांची प्रत्यक्ष माहिती मिळाली असून सहल अत्यंत आनंददायी व ज्ञानवर्धक ठरल्याची भावना शिक्षक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

- विलास बारहाते मानवत : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ११ एसटी बसने निघाले जवळपास ५०० विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी या सहली मध्ये होते. प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले. हे पर्यटकांसह अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. ५० हजार वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालतेय. येथील १२ व्या शतकातील प्राचीन मंदिरे, जसे की कमळजा माता मंदिर, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहवयास मिळतोय. लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे. जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना पाहिला. कश्या प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले. हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजलंय. त्यानंतर ही सहल शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९ व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधी स्थळ असून, येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय. मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे. जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते. दर्शन व प्रसाद घेतल्या नंतर सहल मानवत च्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा दिड च्या सुमारास सुखद सहलीचा अनुभव घेत पोहोचली.1
- *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*1
- तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.1
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- 🚩 पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩 हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव दत्त संस्थान येथे २० ते २७ मार्च २०२६ दरम्यान श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार आहे. यापूर्वी परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 🙏 #Himayatnagar #Pimpalgaon #RamKatha #DattYagya #NamSankirtan ReligiousEvent Maharashtra SpiritualProgram Bhakti SanatanDharma 🚩🙏1
- कस्तुरबा गांधी मुलींच्या वस्तीग्रह जालना येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला1
- इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं1
- सोनपेठ पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या निकिता अवचारे यांची निवड : उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख1