logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अखिल भारतीय गो सम्मान अभियान अंतर्गत तहसीलदार यांना निवेदन रिसोड अखिल भारतीय गो सम्मान अभियान अंतर्गत संपूर्ण भारत देशात दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशी गाईंचे संरक्षण करण्यासाठी निवेदन देण्यात आले. रिसोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी 10 वाजता शुभम सरनाईक यांच्या सजवलेल्या देशी गाईसह गो सम्मान अभियान अंतर्गत गो सम्मान यात्रा काढण्यात आली व तहसील कार्यालय येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना अखिल भारतीय गोसम्मान अभियान अंतर्गत 2880 गोभक्तांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशी गाईंचे संरक्षण होण्यासाठी गाईला राष्ट्रमाता चा दर्जा देण्यात यावा, शालेय अभ्यासक्रमामध्ये गो विज्ञान हा विषय अनिवार्य करण्यात यावा, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर गाईंचे अपघात होतात म्हणून गो ॲम्बुलन्स ठेवण्यात याव्यात,गाईंना चारा उपलब्ध होण्यासाठी चारा सुरक्षा कायदा करण्यात यावा,केंद्र सरकारने केंद्रीय गोसेवा व संरक्षण अधिनियम लागू करावा,गाईंची तस्करी व गोहत्या बंद होण्यासाठी कडक कायदा करून आजीवन कारावास ही शिक्षा देण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन देते वेळी नारायणी गोशाळा प्रकल्प मोरगव्हाणचे गजानन कोकाटे, छत्रपती गोशाळा बोरखेडी चे तुकाराम महाराज जायभाये, श्री सखाराम महाराज गोरक्षण प्रतिष्ठानचे प्रतिनिधी प्रा दीपक जोशी प्रा स्वप्निल साकळे, सद्गुरु दत्त गोरक्षण व वन्य औषधी संस्था कवठाचे वीरेंद्र सरनाईक,निवृत्ती पाटील डॉ अशोक इंगोले, जयंत वसमतकर,दिगंबर भिते, शितल पांडे, स्नेहा लोथे,भावना भिते, लता ईरतकर,नंदू मगर, विजय खडसे, समाधान छत्रे,भीमा माळेकर, नंदू देशमुख, निलेश जैन, महादेव पावडे, प्रज्वल सरनाईक, रितेश सरनाईक, अनिल सोनुने,शरद सरनाईक,रमेश रोडे,सुनील अल्लाट, आबाराव सरनाईक,घनश्याम फडतडे, प्रितेश सरनाईक,महादेव देशमुख,गोपाल सरनाईक,अभिषेक सरनाईक,सागर महाराज शांडिले,गजानन मुलंगे, अजबराव देशमुख यांच्या शेकडो गो भक्त उपस्थित होते.तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी निवेदन स्वीकारून पुढील कारवाई साठी पाठविण्याचे सांगितले.

23 hrs ago
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
23 hrs ago
a4ae9431-a8d0-4039-a98b-9bd5fe3c88c5

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    54 min ago
  • आमदार रवी राणा यांना नवनीत राणा यांनी दिल्या शुभेच्छा #navneetrana #ravirana #Amravati
    1
    आमदार रवी राणा यांना नवनीत राणा यांनी दिल्या शुभेच्छा
#navneetrana #ravirana #Amravati
    user_Purn borse
    Purn borse
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • fhdudunxjx jdjdmjcjd
    1
    fhdudunxjx
jdjdmjcjd
    user_Saifullah khatir
    Saifullah khatir
    भातकुली, अमरावती, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • *महाराष्ट्रातील सर्व शाळांप्रमाणेच दारापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत अभियान उत्साहात राबविण्यात आले*
    1
    *महाराष्ट्रातील सर्व शाळांप्रमाणेच दारापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत अभियान उत्साहात राबविण्यात आले*
    user_विदर्भ शासन न्यूज..
    विदर्भ शासन न्यूज..
    दर्यापूर, अमरावती, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • अकोला: भीषण उन्हाळ्यामुळे पाण्यासाठी व्याकुळ झालेले वन्यजीव आता मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. अशीच एक घटना आज, २८ एप्रिल २०२६ रोजी मोरगाव भाकरे येथे घडली. येथील अविनाश भाकरे यांच्या शेतातील सुमारे ८० फूट खोल विहिरीत एक हरण पडले होते. मात्र, वनविभागाच्या सतर्कतेमुळे आणि रेस्क्यू टीमच्या धाडसामुळे या हरणाला जीवदान मिळाले आहे. अविनाश भाकरे यांना त्यांच्या शेतातील खोल विहिरीत हरण पडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने अकोला वनविभागाचे वनपाल गजानन गायकवाड यांना या घटनेची माहिती दिली. विहीर अत्यंत खोल आणि अडगळीची असल्याने हरणाचे प्राण वाचवणे हे मोठे आव्हान होते. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने तात्काळ रेस्क्यू टीमला पाचारण केले. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, तुषार आवारे, प्रवीण पवार आणि प्रदीप खडे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. विहीर खोल असल्याने वनविभागाच्या शिडीचा वापर करण्यात आला. वैद्यकीय सहाय्यक प्रवीण पवार यांनी जीवाची पर्वा न करता शिडीने ८० फूट खाली उतरले. खाली उतरल्यानंतर त्यांनी हरणाला सुरक्षितपणे बांधले आणि टीमच्या मदतीने वर काढले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर हरणाला पाणी पाजण्यात आले. विशेष म्हणजे, इतक्या उंचावरून पडूनही हरणाला कोणतीही गंभीर दुखापत किंवा फ्रॅक्चर झाले नव्हते. प्राथमिक तपासणीनंतर त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या मोहिमेनंतर बोलताना मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी सांगितले की, "सध्या पाणी टंचाईमुळे वन्यजीव गावांकडे आणि विहिरींकडे वळत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी शेतकरी वर्गाने विहिरीपासून काही अंतरावर पाणी साठवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून वन्यजीव पाणी पिऊन पुन्हा जंगलाकडे परत जातील." या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पवन भाकरे आणि अमोल भाकरे यांनी मोलाची मदत केली. वनविभागाच्या या तत्परतेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
    1
    अकोला:
भीषण उन्हाळ्यामुळे पाण्यासाठी व्याकुळ झालेले वन्यजीव आता मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. अशीच एक घटना आज, २८ एप्रिल २०२६ रोजी मोरगाव भाकरे येथे घडली. येथील अविनाश भाकरे यांच्या शेतातील सुमारे ८० फूट खोल विहिरीत एक हरण पडले होते. मात्र, वनविभागाच्या सतर्कतेमुळे आणि रेस्क्यू टीमच्या धाडसामुळे या हरणाला जीवदान मिळाले आहे.
अविनाश भाकरे यांना त्यांच्या शेतातील खोल विहिरीत हरण पडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने अकोला वनविभागाचे वनपाल गजानन गायकवाड यांना या घटनेची माहिती दिली. विहीर अत्यंत खोल आणि अडगळीची असल्याने हरणाचे प्राण वाचवणे हे मोठे आव्हान होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने तात्काळ रेस्क्यू टीमला पाचारण केले. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, तुषार आवारे, प्रवीण पवार आणि प्रदीप खडे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले.
विहीर खोल असल्याने वनविभागाच्या शिडीचा वापर करण्यात आला.
वैद्यकीय सहाय्यक प्रवीण पवार यांनी जीवाची पर्वा न करता शिडीने ८० फूट खाली उतरले.
खाली उतरल्यानंतर त्यांनी हरणाला सुरक्षितपणे बांधले आणि टीमच्या मदतीने वर काढले.
विहिरीतून बाहेर काढल्यानंतर हरणाला पाणी पाजण्यात आले. विशेष म्हणजे, इतक्या उंचावरून पडूनही हरणाला कोणतीही गंभीर दुखापत किंवा फ्रॅक्चर झाले नव्हते. प्राथमिक तपासणीनंतर त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
या मोहिमेनंतर बोलताना मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी सांगितले की, "सध्या पाणी टंचाईमुळे वन्यजीव गावांकडे आणि विहिरींकडे वळत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी शेतकरी वर्गाने विहिरीपासून काही अंतरावर पाणी साठवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून वन्यजीव पाणी पिऊन पुन्हा जंगलाकडे परत जातील."
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पवन भाकरे आणि अमोल भाकरे यांनी मोलाची मदत केली. वनविभागाच्या या तत्परतेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer बाळापूर, अकोला, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Sk Chand
    1
    Post by Sk Chand
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.