Shuru
Apke Nagar Ki App…
धरणाचे पाणी भीमा नदीत खानापूर येथे दाखल; शेतकऱ्यांकडून आठ तास वीजपुरवठ्याची मागणी वीर धरणातून सोडलेले पाणी आज भीमा नदीमार्गे खानापूर येथे दाखल झाले आहे. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. नदीत पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतीसाठी पाणी उचलण्याचे काम वेगाने करता यावे, यासाठी उद्यापासून दररोज किमान आठ तास अखंड वीजपुरवठा करण्यात यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. वेळेत आणि पुरेशा कालावधीसाठी वीज उपलब्ध झाल्यास खरीप पिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच सिंचनाची कामे सुरळीत पार पडतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांची ही मागणी तातडीने मान्य करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
Akkalkot news
धरणाचे पाणी भीमा नदीत खानापूर येथे दाखल; शेतकऱ्यांकडून आठ तास वीजपुरवठ्याची मागणी वीर धरणातून सोडलेले पाणी आज भीमा नदीमार्गे खानापूर येथे दाखल झाले आहे. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. नदीत पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतीसाठी पाणी उचलण्याचे काम वेगाने करता यावे, यासाठी उद्यापासून दररोज किमान आठ तास अखंड वीजपुरवठा करण्यात यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. वेळेत आणि पुरेशा कालावधीसाठी वीज उपलब्ध झाल्यास खरीप पिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच सिंचनाची कामे सुरळीत पार पडतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांची ही मागणी तातडीने मान्य करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- 2026 आषाढी वारीतील वारकऱ्यांची प्रभाकर महाराज मठामध्ये सेवा करताना1
- लातूर. दशनाम गोसावी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प; २ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य 'पंचसूत्री' सोहळा* *दशनाम गोसावी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प; २ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य 'पंचसूत्री' सोहळा* पत्रकार परिषदेत धर्मवीर भारती व व्यंकटेश पुरी यांनी जागवल्या देव, देश अन् धर्माच्या स्मृती! लातूर (दि. २८ जुलै) : "दशनाम गोसावी समाजाने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक आणि अतुलनीय योगदान दिले आहे. हा गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर ठेवूनच, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत," असे प्रतिपादन व्यंकटेश पुरी आणि प्रतिष्ठित उद्योजक धर्मवीर भारती यांनी केले. दशनाम गोसावी समाज , लातूर या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात सकाळी १०:०० वाजता आयोजित भव्य 'पंचसूत्री सोहळ्याची' माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते संयुक्तपणे बोलत होते. गेली ३१ वर्षे, म्हणजेच १९९६ पासून दशनाम गोसावी समाज ही संघटना लातूरमध्ये समाजकार्यात अत्यंत सक्रियपणे कार्यरत असून अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे, हाच वारसा पुढे नेत या भव्य कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत उद्योजक धर्मवीर भारती यांच्या समाज उन्नतीसाठीच्या मोठ्या योगदानाचा आणि त्यांनी समाजातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेळोवेळी पुढे केलेल्या मदतीच्या हाताचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी गोसावी वुमन्स विंगच्या सुरेखा धर्मवीर भारती (भारती मॅडम) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानच्या व्यापक उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, २ ऑगस्ट रोजी होणारा हा पंचसूत्री सोहळा केवळ एक कौतुक सोहळा नसून समाज बांधणीसाठी घेतलेला एक ध्यास आहे. समाजातील गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी 'भारती फाउंडेशन'च्या वतीने शैक्षणिक साहित्यासोबतच शिलाई मशीन वाटप केवळ एवढ्यावरच न थांबता हळदीकुंकू आणि विविध सांस्कृतिक सणांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे काम ही विंग करत आहे. समाजातील विधवा महिलांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणून, त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणणे, हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत अल्का गोसावी यांच्यासह विनायक गिरी, राजेंद्र गिरी, मोती गिरी गोसावी, मकरंद गिरी, प्रमोद बन, पद्माकर गिरी, विश्वजीत गिरी, चंद्रशेखर गिरी आणि बाळासाहेब भारती आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून हभप श्री. महादेव महाराज चाकरवाडीकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून हभप श्री. अविनाशजी भारती महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. स्वप्निल भय्या भारती, प्रमुख अतिथी सूर्यकांता गिरी गोसावी, पुणे यांच्या सह महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांतून नामांकित व्यक्ती श्री. सुखदेव गिरी (कोल्हापूर), श्री. अनुप गोसावी (नाशिक), श्री. ओमप्रकाश गिरी (बीड), श्री. मुन्ना गिरी गोसावी, पंढरपूर आणि श्री. गणेश पुरी (नागपूर) हे प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्यात सत्कार आणि स्कॉलरशिपचा लाभ मिळवण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मार्क मेमोसह ९९२०६ २११११ (मयूर भारती प्रॉपर्टीज ऑफिस) या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आपली नावनोंदणी करून घेणे आवश्यक आहे. लातूरच्या या ऐतिहासिक आणि प्रबोधनपर सोहळ्यास दशनाम गोसावी समाजातील सर्व समाज बांधव, भगिनी, आणि युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्घाटकांच्या विचारांचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन दशनाम गोसावी समाज, लातूरच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्वांसाठी प्रीती भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.1
- दर्शनाम गोसावी समाजाची पत्रकार परिषद उत्साहात संपन्न ‘पंचसूत्री सोहळ्या’ची सविस्तर माहिती लातूर, दि.२८ (प्रतिनिधी) : दर्शनाम गोसावी समाज, लातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद मंगळवारी हॉटेल भोज, हनुमान चौक, मेन रोड, लातूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या पत्रकार परिषदेत रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘पंचसूत्री सोहळ्या’ची सविस्तर माहिती पत्रकारांसमोर मांडण्यात आली. यावेळी आयोजकांनी सांगितले की, समाजामध्ये शिक्षण, सामाजिक ऐक्य, गुणवंतांचा गौरव आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने पंचसूत्री सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, निवृत्त कर्मचारी व ज्येष्ठांचा सन्मान, ‘समाजभूषण पुरस्कार’ वितरण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत, तसेच समाज प्रबोधनपर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत समाजाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना, समाजातील युवकांना शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यावर भर देण्यात आला. समाज संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. आगामी पंचसूत्री सोहळा हा केवळ सत्काराचा कार्यक्रम नसून समाजातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक प्रगतीचा संदेश देणारा सोहळा ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहनही करण्यात आले. पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील विविध प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि कॅमेरामन उपस्थित होते. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आयोजकांनी सविस्तर उत्तरे देत पंचसूत्री सोहळ्याची रूपरेषा स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेस धर्मवीर भारती, व्यंकटेश पुरी यांच्यासह दर्शनाम गोसावी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पत्रकारांचे आभार मानून पंचसूत्री सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.1
- मोंढा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत चार दुकाने फोडली, पोलिसांनी गस्त वाढवावी – व्यापाऱ्यांची मागणी1
- आरक्षण नहीं खटकता, तुम्हें बराबरी खटकती हैपहले जातिवाद मिटाओ, फिर आरक्षण हटाओ..!!* *1
- बुद्धघोष यास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्याकडे दत्तक; बीडमध्ये प्रेरणादायी सोहळा बुद्धघोष यास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्याकडे दत्तक; बीडमध्ये प्रेरणादायी सोहळा बीड | प्रतिनिधी तथागत गौतम बुद्ध यांच्या समता, करुणा आणि प्रज्ञेच्या धम्माचा प्रसार अधिक व्यापक व गतिमान करण्याच्या उद्देशाने पाटोदा येथील जावळे कुटुंबीयांनी आपल्या बुद्धघोष या मुलास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्या स्वाधीन करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. हा दत्तक सोहळा मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या बीड येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला. भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) हे वर्षावासानिमित्त बीड येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे वास्तव्यास असून, धम्मप्रसारासाठीचा धम्मरथ देखील त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी जावळे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतल्याने उपस्थितांनी त्याचे स्वागत केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष, कोषाध्यक्ष गोपीनाथ बनसोडे, सुनील जावळे तसेच बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बुद्धघोष याला शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल धम्मप्रवासासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. या प्रसंगी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांनी धम्माचा प्रसार, सामाजिक परिवर्तन आणि मानवकल्याणासाठी तरुण पिढीने पुढे येण्याचे आवाहन केले. हा सोहळा धम्मनिष्ठा, समर्पण आणि समाजप्रबोधनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.1
- धरणाचे पाणी भीमा नदीत खानापूर येथे दाखल; शेतकऱ्यांकडून आठ तास वीजपुरवठ्याची मागणी वीर धरणातून सोडलेले पाणी आज भीमा नदीमार्गे खानापूर येथे दाखल झाले आहे. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. नदीत पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतीसाठी पाणी उचलण्याचे काम वेगाने करता यावे, यासाठी उद्यापासून दररोज किमान आठ तास अखंड वीजपुरवठा करण्यात यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. वेळेत आणि पुरेशा कालावधीसाठी वीज उपलब्ध झाल्यास खरीप पिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच सिंचनाची कामे सुरळीत पार पडतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांची ही मागणी तातडीने मान्य करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.1
- विद्यार्थ्यांवरील अन्याय, हिंसाचार आणि लाठीमाराबाबत पंतप्रधानांनी उत्तर द्यावे; खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी लोकसभेत मांडलेल्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर स्पष्ट भूमिका मांडून उत्तर देणे आवश्यक आहे, अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रियंका गांधी यांनी लोकसभेत मांडलेल्या वस्तुस्थितीला पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे. देशातील विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय, त्यांच्यावरील हिंसाचार, लाठीमार, अश्रुधुराचा वापर आणि शस्त्रांचा कथित वापर या गंभीर घटनांचा सरकारने विचार करणे आवश्यक आहे.” विद्यार्थ्यांवरील कारवाईमागचे कारण काय होते? या कारवाईचे आदेश कोणी दिले? याबाबत देशाच्या जनतेला सत्य जाणून घेण्याचा अधिकार असून, केंद्रीय गृहमंत्र्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देणे उचित आहे, असेही त्यांनी नमूद केले. महिलांवर कथितपणे झालेल्या क्रूर अत्याचारांबाबतही सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी करत खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “देशातील नागरिक आणि विद्यार्थी न्याय व उत्तरदायित्वाची मागणी करत असताना, ते काही अवाजवी मागत आहेत का? देशातील जनतेची मागणी इतकी मोठी आहे का?” विद्यार्थ्यांवरील कथित अन्याय आणि आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक कारवाईबाबत सरकारने पारदर्शकपणे भूमिका स्पष्ट करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.1