logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स्वछतेचे अनेक पुरस्कार घेऊनही.. येथील मुलींची, काट्यातून जाते शाळेची वाट.! 📌 स्वछतेचे अनेक पुरस्कार घेऊनही.. येथील मुलींची, काट्यातून जाते शाळेची वाट.! 📌 काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण.? 📌 रक्षाबंधनाचे निमित्ताने आप्पासाहेब ढूस यांचा नगरपरिषदेला खडा सवाल.. देवळाली प्रवरा : प्रतिनिधी देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत विकास आराखडा आणि भूमिअभिलेखाच्या नकाशावर अस्तित्वात असलेले श्री त्रिंबकराज स्वामी मंदिरापासून ते गणिभाई स्वा मिल मार्गे मराठी व माध्यमिक विद्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते प्रत्यक्षात मात्र गायब झाल्याने शाळकरी मुला मुलींना काट्यातून शाळेची वाट शोधावी लागत आहे. आणि जर या काट्यात लहान मुले आणि मुलींबरोबर काही अनुचित प्रकार झाला तर त्याला जबाबदार कोण? असा खडा सवाल सामाजिक कार्यकर्ते आप्पसाहेब ढूस यांनी रक्षा बंधनाच्या निमित्ताने नगरपरिषदेला केला आहे. एकेकाळी आशिया खंडात सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या आणि देशपातळीवर स्वच्छतेचे अनेक पुरस्कार मिळविलेल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या गावठाणातून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हक्काचा रस्ता उपलब्ध नसल्याने लहान मुलामुलींना चक्क काट्याकुट्यातून वाट काढत शाळा गाठावी लागत आहे. हे अत्यंत धक्कादायक चित्र आहे. वेळ प्रसंगी या वाटेवर विद्यार्थ्यांना डुकरे आणि सापांचा सामना करण्याची वेळ येत असून, लहान मुलींसोबत एखादी अनुचित घटना घडण्याची वाट पालिका प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते आप्पसाहेब ढूस यांनी केला आहे.. पुढे बोलताना ढूस म्हणाले की, नगरपालिकेच्या विकास आराखड्यात तसेच भूमिअभिलेखाच्या नकाशावर शाळेकडे जाणारे रस्ते दाखविण्यात आलेले असताना प्रत्यक्षात हे रस्ते गेले कुठे?, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून घरे उभारण्यात आल्याची परिस्थिती आहे. मात्र, पालिकेच्या अतिक्रमण विभागाला हे अतिक्रमण दिसत नसल्याने आश्चर्य वाटते . ◼️ विद्यार्थ्यांसाठी रस्ता नाही, मग विकास कसला? देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित रस्ता मिळत नसेल, तर शहराच्या विकासाच्या गप्पा मारण्याला अर्थ काय? असा सवालही ढूस यांनी केला आहे. शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना दररोज काट्याकुट्यातून, झुडपांमधून वाट काढावी लागत आहे. या मार्गावर साप, डुकरे किंवा इतर प्राण्यांचा धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? पालिकेने आजपर्यंत विकास आराखड्यातील या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून ते मोकळे करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे नकाशावर असलेले रस्ते प्रत्यक्षात अतिक्रमणाच्या विळख्यात कसे गेले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सुरक्षित रस्ता देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी एखादा विद्यार्थी सापाच्या दंशाला किंवा डुकराच्या हल्ल्याला बळी पडण्याची पालिका वाट पाहणार आहे का? पालिकेने तातडीने जागे होऊन नकाशावरचे रस्ते शोधावेत, अतिक्रमणे हटवावीत आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वाट उपलब्ध करून द्यावी; अन्यथा एखाद्या मुलीसोबत या काट्यात काही अनुचित प्रकार घडल्यास आणि त्यामुळे नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील. ◼️अनुचित घटना घडण्यापूर्वी पालिकेला जाग येणार का? शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्यांची पाहणी करावी. विकास आराखडा व भूमिअभिलेखाच्या नकाशानुसार रस्त्यांची हद्द निश्चित करून अतिक्रमणे हटवावीत आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आप्पसाहेब ढूस यांचेसह पालक व नागरिकांतून होत आहे.

43 min ago
user_पत्रकार जालिंदर आल्हाट
पत्रकार जालिंदर आल्हाट
राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र•
43 min ago

स्वछतेचे अनेक पुरस्कार घेऊनही.. येथील मुलींची, काट्यातून जाते शाळेची वाट.! 📌 स्वछतेचे अनेक पुरस्कार घेऊनही.. येथील मुलींची, काट्यातून जाते शाळेची वाट.! 📌 काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण.? 📌 रक्षाबंधनाचे निमित्ताने आप्पासाहेब ढूस यांचा नगरपरिषदेला खडा सवाल.. देवळाली प्रवरा : प्रतिनिधी देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत विकास आराखडा आणि भूमिअभिलेखाच्या नकाशावर अस्तित्वात असलेले श्री त्रिंबकराज स्वामी मंदिरापासून ते गणिभाई स्वा मिल मार्गे मराठी व माध्यमिक विद्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते प्रत्यक्षात मात्र गायब झाल्याने शाळकरी मुला मुलींना काट्यातून शाळेची वाट शोधावी लागत आहे. आणि जर या काट्यात लहान मुले आणि मुलींबरोबर काही अनुचित प्रकार झाला तर त्याला जबाबदार कोण? असा खडा सवाल सामाजिक कार्यकर्ते आप्पसाहेब ढूस यांनी रक्षा बंधनाच्या निमित्ताने नगरपरिषदेला केला आहे. एकेकाळी आशिया खंडात सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या आणि देशपातळीवर स्वच्छतेचे अनेक पुरस्कार मिळविलेल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या गावठाणातून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हक्काचा रस्ता उपलब्ध नसल्याने लहान मुलामुलींना चक्क काट्याकुट्यातून वाट काढत शाळा गाठावी लागत आहे. हे अत्यंत धक्कादायक चित्र आहे. वेळ प्रसंगी या वाटेवर विद्यार्थ्यांना डुकरे आणि सापांचा सामना करण्याची वेळ येत असून, लहान मुलींसोबत एखादी अनुचित घटना घडण्याची वाट पालिका प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते आप्पसाहेब ढूस यांनी केला आहे.. पुढे बोलताना ढूस म्हणाले की, नगरपालिकेच्या विकास आराखड्यात तसेच भूमिअभिलेखाच्या नकाशावर शाळेकडे जाणारे रस्ते दाखविण्यात आलेले असताना प्रत्यक्षात हे रस्ते गेले कुठे?, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून घरे उभारण्यात आल्याची परिस्थिती आहे. मात्र, पालिकेच्या अतिक्रमण विभागाला हे अतिक्रमण दिसत नसल्याने आश्चर्य वाटते . ◼️ विद्यार्थ्यांसाठी रस्ता नाही, मग विकास कसला? देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित रस्ता मिळत नसेल, तर शहराच्या विकासाच्या गप्पा मारण्याला अर्थ काय? असा सवालही ढूस यांनी केला आहे. शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना दररोज काट्याकुट्यातून, झुडपांमधून वाट काढावी लागत आहे. या मार्गावर साप, डुकरे किंवा इतर प्राण्यांचा धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? पालिकेने आजपर्यंत विकास आराखड्यातील या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून ते मोकळे करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे नकाशावर असलेले रस्ते प्रत्यक्षात अतिक्रमणाच्या विळख्यात कसे गेले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सुरक्षित रस्ता देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी एखादा विद्यार्थी सापाच्या दंशाला किंवा डुकराच्या हल्ल्याला बळी पडण्याची पालिका वाट पाहणार आहे का? पालिकेने तातडीने जागे होऊन नकाशावरचे रस्ते शोधावेत, अतिक्रमणे हटवावीत आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वाट उपलब्ध करून द्यावी; अन्यथा एखाद्या मुलीसोबत या काट्यात काही अनुचित प्रकार घडल्यास आणि त्यामुळे नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील. ◼️अनुचित घटना घडण्यापूर्वी पालिकेला जाग येणार का? शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्यांची पाहणी करावी. विकास आराखडा व भूमिअभिलेखाच्या नकाशानुसार रस्त्यांची हद्द निश्चित करून अतिक्रमणे हटवावीत आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आप्पसाहेब ढूस यांचेसह पालक व नागरिकांतून होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • स्वछतेचे अनेक पुरस्कार घेऊनही.. येथील मुलींची, काट्यातून जाते शाळेची वाट.! 📌 स्वछतेचे अनेक पुरस्कार घेऊनही.. येथील मुलींची, काट्यातून जाते शाळेची वाट.! 📌 काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण.? 📌 रक्षाबंधनाचे निमित्ताने आप्पासाहेब ढूस यांचा नगरपरिषदेला खडा सवाल.. देवळाली प्रवरा : प्रतिनिधी देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत विकास आराखडा आणि भूमिअभिलेखाच्या नकाशावर अस्तित्वात असलेले श्री त्रिंबकराज स्वामी मंदिरापासून ते गणिभाई स्वा मिल मार्गे मराठी व माध्यमिक विद्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते प्रत्यक्षात मात्र गायब झाल्याने शाळकरी मुला मुलींना काट्यातून शाळेची वाट शोधावी लागत आहे. आणि जर या काट्यात लहान मुले आणि मुलींबरोबर काही अनुचित प्रकार झाला तर त्याला जबाबदार कोण? असा खडा सवाल सामाजिक कार्यकर्ते आप्पसाहेब ढूस यांनी रक्षा बंधनाच्या निमित्ताने नगरपरिषदेला केला आहे. एकेकाळी आशिया खंडात सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या आणि देशपातळीवर स्वच्छतेचे अनेक पुरस्कार मिळविलेल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या गावठाणातून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हक्काचा रस्ता उपलब्ध नसल्याने लहान मुलामुलींना चक्क काट्याकुट्यातून वाट काढत शाळा गाठावी लागत आहे. हे अत्यंत धक्कादायक चित्र आहे. वेळ प्रसंगी या वाटेवर विद्यार्थ्यांना डुकरे आणि सापांचा सामना करण्याची वेळ येत असून, लहान मुलींसोबत एखादी अनुचित घटना घडण्याची वाट पालिका प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते आप्पसाहेब ढूस यांनी केला आहे.. पुढे बोलताना ढूस म्हणाले की, नगरपालिकेच्या विकास आराखड्यात तसेच भूमिअभिलेखाच्या नकाशावर शाळेकडे जाणारे रस्ते दाखविण्यात आलेले असताना प्रत्यक्षात हे रस्ते गेले कुठे?, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून घरे उभारण्यात आल्याची परिस्थिती आहे. मात्र, पालिकेच्या अतिक्रमण विभागाला हे अतिक्रमण दिसत नसल्याने आश्चर्य वाटते . ◼️ विद्यार्थ्यांसाठी रस्ता नाही, मग विकास कसला? देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित रस्ता मिळत नसेल, तर शहराच्या विकासाच्या गप्पा मारण्याला अर्थ काय? असा सवालही ढूस यांनी केला आहे. शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना दररोज काट्याकुट्यातून, झुडपांमधून वाट काढावी लागत आहे. या मार्गावर साप, डुकरे किंवा इतर प्राण्यांचा धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? पालिकेने आजपर्यंत विकास आराखड्यातील या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून ते मोकळे करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे नकाशावर असलेले रस्ते प्रत्यक्षात अतिक्रमणाच्या विळख्यात कसे गेले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सुरक्षित रस्ता देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी एखादा विद्यार्थी सापाच्या दंशाला किंवा डुकराच्या हल्ल्याला बळी पडण्याची पालिका वाट पाहणार आहे का? पालिकेने तातडीने जागे होऊन नकाशावरचे रस्ते शोधावेत, अतिक्रमणे हटवावीत आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वाट उपलब्ध करून द्यावी; अन्यथा एखाद्या मुलीसोबत या काट्यात काही अनुचित प्रकार घडल्यास आणि त्यामुळे नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील. ◼️अनुचित घटना घडण्यापूर्वी पालिकेला जाग येणार का? शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्यांची पाहणी करावी. विकास आराखडा व भूमिअभिलेखाच्या नकाशानुसार रस्त्यांची हद्द निश्चित करून अतिक्रमणे हटवावीत आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आप्पसाहेब ढूस यांचेसह पालक व नागरिकांतून होत आहे.
    1
    स्वछतेचे अनेक पुरस्कार घेऊनही.. येथील मुलींची,  काट्यातून जाते शाळेची वाट.!
📌 स्वछतेचे अनेक पुरस्कार घेऊनही.. येथील मुलींची,  काट्यातून जाते शाळेची वाट.!
📌 काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण.?
📌 रक्षाबंधनाचे निमित्ताने आप्पासाहेब ढूस यांचा नगरपरिषदेला खडा सवाल..
देवळाली प्रवरा : प्रतिनिधी
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत विकास आराखडा आणि भूमिअभिलेखाच्या नकाशावर अस्तित्वात असलेले श्री त्रिंबकराज स्वामी मंदिरापासून ते गणिभाई स्वा मिल मार्गे मराठी व माध्यमिक विद्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते प्रत्यक्षात मात्र गायब झाल्याने शाळकरी मुला मुलींना काट्यातून शाळेची वाट शोधावी लागत आहे. आणि जर या काट्यात लहान मुले आणि मुलींबरोबर काही अनुचित प्रकार झाला तर त्याला जबाबदार कोण? असा खडा सवाल सामाजिक कार्यकर्ते आप्पसाहेब ढूस यांनी रक्षा बंधनाच्या निमित्ताने नगरपरिषदेला केला आहे.
एकेकाळी आशिया खंडात सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या आणि देशपातळीवर स्वच्छतेचे अनेक पुरस्कार मिळविलेल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या गावठाणातून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी हक्काचा रस्ता उपलब्ध नसल्याने लहान मुलामुलींना चक्क काट्याकुट्यातून वाट काढत शाळा गाठावी लागत आहे. हे अत्यंत धक्कादायक चित्र आहे. वेळ प्रसंगी या वाटेवर विद्यार्थ्यांना डुकरे आणि सापांचा सामना करण्याची वेळ येत असून, लहान मुलींसोबत एखादी अनुचित घटना घडण्याची वाट पालिका प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते आप्पसाहेब ढूस यांनी केला आहे.. पुढे बोलताना ढूस म्हणाले की, नगरपालिकेच्या विकास आराखड्यात तसेच भूमिअभिलेखाच्या नकाशावर शाळेकडे जाणारे रस्ते दाखविण्यात आलेले असताना प्रत्यक्षात हे रस्ते गेले कुठे?, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून घरे उभारण्यात आल्याची परिस्थिती आहे. मात्र, पालिकेच्या अतिक्रमण विभागाला हे अतिक्रमण दिसत नसल्याने आश्चर्य वाटते .
◼️ विद्यार्थ्यांसाठी रस्ता नाही, मग विकास कसला?
देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित रस्ता मिळत नसेल, तर शहराच्या विकासाच्या गप्पा मारण्याला अर्थ काय? असा सवालही ढूस यांनी केला आहे. शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना दररोज काट्याकुट्यातून, झुडपांमधून वाट काढावी लागत आहे. या मार्गावर साप, डुकरे किंवा इतर प्राण्यांचा धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? 
पालिकेने आजपर्यंत विकास आराखड्यातील या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून ते मोकळे करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे नकाशावर असलेले रस्ते प्रत्यक्षात अतिक्रमणाच्या विळख्यात कसे गेले, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सुरक्षित रस्ता देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी एखादा विद्यार्थी सापाच्या दंशाला किंवा डुकराच्या हल्ल्याला बळी पडण्याची पालिका वाट पाहणार आहे का? 
पालिकेने तातडीने जागे होऊन नकाशावरचे रस्ते शोधावेत, अतिक्रमणे हटवावीत आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वाट उपलब्ध करून द्यावी; अन्यथा एखाद्या मुलीसोबत या काट्यात काही अनुचित प्रकार घडल्यास आणि त्यामुळे नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील.
◼️अनुचित घटना घडण्यापूर्वी पालिकेला जाग येणार का?
शाळेत जाणाऱ्या  विद्यार्थ्यांसोबत एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्यांची पाहणी करावी. विकास आराखडा व भूमिअभिलेखाच्या नकाशानुसार रस्त्यांची हद्द निश्चित करून अतिक्रमणे हटवावीत आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आप्पसाहेब ढूस यांचेसह पालक व नागरिकांतून होत आहे.
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र•
    43 min ago
  • सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप; ग्रामसभेत लाभार्थ्यांना समोर आणल्याने उडाला खडाजंगी. आरडा तोलाजी ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक! प्रश्नांचा भडिमार... पोलिस बंदोबस्तात पार पडलेली ग्रामसभा अखेर तहकूब!
    1
    सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप
सिंचन विहिरीसाठी ३० ते ४० हजार आणि घरकुलासाठी ५ ते १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप; ग्रामसभेत लाभार्थ्यांना समोर आणल्याने उडाला खडाजंगी.
आरडा तोलाजी ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक! प्रश्नांचा भडिमार...
पोलिस बंदोबस्तात पार पडलेली ग्रामसभा अखेर तहकूब!
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम येवला तालुक्यातील देवळाणे बोकटे पाड्यावर रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा, प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा सणाचे औचित्य साधून येवला येथील जनकल्याण सेवा समितीचे 25व्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त अध्यक्ष नारायण मामा शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी वंचित वस्त्यांमध्ये जाऊन कष्टकरी भगिनींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला जातो. यावर्षी येवला तालुक्यातील बोगटे येथील मोरे वस्तीवर जनकल्याण सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी भेट देऊन ८१ कष्टकरी भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली. यावेळी भगिनींना साडी-चोळी व छत्रीचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या २५ वर्षांपासून हा सामाजिक व मानवतावादी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. याप्रसंगी आपल्या मनोगतात नारायण मामा शिंदे म्हणाले, “रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या या दिवशी जात-पात, धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून आम्ही या कष्टकरी भगिनींना आपली बहीण मानतो. त्यांच्या हातून राखी बांधून घेत मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान, प्रेम आणि आपुलकी मिळावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.” या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर झळके सर, रावसाहेब दाभाडे, रामेश्वर कलंत्री, डॉ. विलास दाभाडे व गुमानसिंग परदेशी उपस्थित होते. यावेळी समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे, उपाध्यक्ष किशोर कुमावत, सुदाम दाणे पाटील, सुरजमल करवा . दत्ता नागडेकर, विजय पोंदे, शशिकांत मालपुरे, बाळासाहेब देशमुख, रवी नागपुरे, सुदर्शन खिल्लारे, सचिन वखारे, राजेंद्र ताटे, गोविंदा शिंदे व स्वप्निल शिंदे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. गावातील रवींद्र रायबान काळे, नंदू देवरे, शिवाजी कोटमे, बाळासाहेब काळे, चांगदेव मोरे, रंगनाथ मोरे, मच्छिंद्र मोरे तसेच भजनी मंडळातील अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी प्रभाकर जळके सर, रावसाहेब दाभाडे व दुर्गा भाऊसाहेब मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जनकल्याण सेवा समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी गुमानसिंग परदेशी यांनी आभार मानले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करणारा ठरला. यावेळी बालगोपालांना बिस्किट व चॉकलेटचे ही वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान
येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम
रक्षाबंधनानिमित्त ८१ कष्टकरी भगिनींचा साडी-चोळी व छत्री देऊन सन्मान
येवला तालुक्यातील देवळाना बोगटे आदिवासी पाड्यावर जनकल्याण सेवा समितीचा मानवतेचा उपक्रम
येवला तालुक्यातील देवळाणे बोकटे पाड्यावर रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा, प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणारा सणाचे औचित्य साधून येवला येथील जनकल्याण सेवा समितीचे 25व्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त अध्यक्ष नारायण मामा शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी वंचित वस्त्यांमध्ये जाऊन कष्टकरी भगिनींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला जातो.
यावर्षी येवला तालुक्यातील बोगटे येथील मोरे वस्तीवर जनकल्याण सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी भेट देऊन ८१ कष्टकरी भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली. यावेळी भगिनींना साडी-चोळी व छत्रीचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या २५ वर्षांपासून हा सामाजिक व मानवतावादी उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
याप्रसंगी आपल्या मनोगतात नारायण मामा शिंदे म्हणाले, “रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या या दिवशी जात-पात, धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून आम्ही या कष्टकरी भगिनींना आपली बहीण मानतो. त्यांच्या हातून राखी बांधून घेत मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान, प्रेम आणि आपुलकी मिळावी, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.”
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर झळके सर, रावसाहेब दाभाडे, रामेश्वर कलंत्री, डॉ. विलास दाभाडे व गुमानसिंग परदेशी उपस्थित होते.
यावेळी समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे, उपाध्यक्ष किशोर कुमावत, सुदाम दाणे पाटील, सुरजमल करवा . दत्ता नागडेकर, विजय पोंदे, शशिकांत मालपुरे, बाळासाहेब देशमुख, रवी नागपुरे, सुदर्शन खिल्लारे, सचिन वखारे, राजेंद्र ताटे, गोविंदा शिंदे व स्वप्निल शिंदे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
गावातील रवींद्र रायबान काळे, नंदू देवरे, शिवाजी कोटमे, बाळासाहेब काळे, चांगदेव मोरे, रंगनाथ मोरे, मच्छिंद्र मोरे तसेच भजनी मंडळातील अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.
यावेळी प्रभाकर जळके सर, रावसाहेब दाभाडे व दुर्गा भाऊसाहेब मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जनकल्याण सेवा समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी गुमानसिंग परदेशी यांनी आभार मानले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करणारा ठरला.
यावेळी बालगोपालांना बिस्किट व चॉकलेटचे ही वाटप करण्यात आले
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पत्रकाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी गुन्हा दाखल येवला येथील पत्रकार दीपक सोनवणे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने येवला शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ व ३५१(३) अन्वये नोंद करण्यात आली असून प्रवीण पवार या संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गंगा दरवाजा परिसरात बँक ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. पूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून प्रवीण पवार यांनी पत्रकार दीपक सोनवणे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी, “आमच्या नादी लागू नको, तुला जिवंत ठेवणार नाही,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप दीपक सोनवणे यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी या फिर्यादीची नोंद केली आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार दीपक सोनवणे यांनी केली आहे. या घटनेमुळे येवला शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास व कारवाईकडे लक्ष लागले आहे.
    1
    पत्रकाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी गुन्हा दाखल
येवला येथील पत्रकार दीपक सोनवणे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने येवला शहर पोलीस ठाण्यात फिर्याद  नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ व ३५१(३) अन्वये नोंद करण्यात आली असून प्रवीण पवार या संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गंगा दरवाजा परिसरात बँक ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. पूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून प्रवीण पवार यांनी पत्रकार दीपक सोनवणे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.
यावेळी, “आमच्या नादी लागू नको, तुला जिवंत ठेवणार नाही,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप दीपक सोनवणे यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी या फिर्यादीची  नोंद केली आहे.
या प्रकरणातील संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार दीपक सोनवणे यांनी केली आहे. या घटनेमुळे येवला शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास व कारवाईकडे लक्ष लागले आहे.
    user_Prashant kalanke
    Prashant kalanke
    Photographer येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कुणबी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांची फरफट; वैजापूरमध्ये शैक्षणिक नुकसानाची भीती वैजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रमाणपत्राअभावी प्रवेश, शिष्यवृत्ती व आरक्षणाच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. जात प्रमाणपत्राबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दाखला रद्द झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
    1
    कुणबी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांची फरफट; वैजापूरमध्ये शैक्षणिक नुकसानाची भीती
वैजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रमाणपत्राअभावी प्रवेश, शिष्यवृत्ती व आरक्षणाच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. जात प्रमाणपत्राबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दाखला रद्द झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    25 min ago
  • भोकरदन शहरातील अतिक्रमण धारकांनी तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आवाहन
    1
    भोकरदन शहरातील अतिक्रमण धारकांनी तीन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आवाहन
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सिल्लोड शहरात रक्षाबंधन निमित्त आमदार जो सत्कार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर.... सिल्लोड (प्रतिनिधी) : शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला भगिनींनी आमदार अब्दुल सत्तार यांना राखी बांधल्या. रक्षाबंधनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित महिला भगिनींना साडी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना आमदार सत्तार म्हणाले की, “भावाचा आधार आणि बहिणीची माया हे अतूट नाते रक्षाबंधनाच्या माध्यमातून अधिक दृढ होते. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाचे वचन देतो. हे नाते प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित महिला भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये उत्साह राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळत असून, महिलांच्या खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपयांचे अनुदान जमा होत आहे. त्यामुळे यंदाच्या राखी पौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल “आम्ही यापूर्वीच सांगितले होते की, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय नसून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे,” असे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले. महिला आता केवळ ‘चूल आणि मूल’ यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून आयएएस, आयपीएस, इंजिनीअरिंगसह विविध क्षेत्रांत महिला अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत आहेत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. “मी जरी आपला सख्खा भाऊ नसलो, तरी माझ्या लाडक्या बहिणींच्या सुख-दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून, त्यांच्या मदतीसाठी आयुष्यभर कटिबद्ध राहीन,” अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, शकुंतलाबाई बनसोड, मेघा शाह, नगरसेविका वैशाली पाटील, रेखा गायकवाड, पर्वताबाई दुधे, तसेच सुमनबाई तांगडे, शांताबाई कावले, कमलबाई जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
    3
    सिल्लोड शहरात रक्षाबंधन निमित्त आमदार जो सत्कार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर....
सिल्लोड (प्रतिनिधी)  : शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला भगिनींनी आमदार अब्दुल सत्तार यांना राखी बांधल्या.
रक्षाबंधनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित महिला भगिनींना साडी भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना आमदार सत्तार म्हणाले की, “भावाचा आधार आणि बहिणीची माया हे अतूट नाते रक्षाबंधनाच्या माध्यमातून अधिक दृढ होते. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाचे वचन देतो. हे नाते प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित महिला भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये उत्साह
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळत असून, महिलांच्या खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपयांचे अनुदान जमा होत आहे. त्यामुळे यंदाच्या राखी पौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल
“आम्ही यापूर्वीच सांगितले होते की, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय नसून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे,” असे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले.
महिला आता केवळ ‘चूल आणि मूल’ यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून आयएएस, आयपीएस, इंजिनीअरिंगसह विविध क्षेत्रांत महिला अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत आहेत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. “मी जरी आपला सख्खा भाऊ नसलो, तरी माझ्या लाडक्या बहिणींच्या सुख-दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून, त्यांच्या मदतीसाठी आयुष्यभर कटिबद्ध राहीन,” अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, शकुंतलाबाई बनसोड, मेघा शाह, नगरसेविका वैशाली पाटील, रेखा गायकवाड, पर्वताबाई दुधे, तसेच सुमनबाई तांगडे, शांताबाई कावले, कमलबाई जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • राहुरी फॅक्टरी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे जंगी स्वागत राहुरी फॅक्टरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेऊन बारामतीकडे मोटारीने रवाना झाल्या. यावेळी राहुरी फॅक्टरी येथे त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, साई आदर्शचे वेदांत कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवा नेते किरण कडू,अमृत धुमाळ, संजय पोटे, सुखदेव मुसमाडे,यमनाजी आघाव, आप्पासाहेब ढुस, पंढरीनाथ पवार,कारभारी खुळे,अनिल चव्हाण,रंगनाथ घाडगे, वैशाली नान्नोर,साई त्रिभुवन,सोमा आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
    1
    राहुरी फॅक्टरी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे जंगी स्वागत
राहुरी फॅक्टरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत
राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेऊन बारामतीकडे मोटारीने रवाना झाल्या. यावेळी राहुरी फॅक्टरी येथे त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी आ.संग्राम जगताप, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, साई आदर्शचे वेदांत कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवा नेते किरण कडू,अमृत धुमाळ, संजय पोटे, सुखदेव मुसमाडे,यमनाजी आघाव, आप्पासाहेब ढुस, पंढरीनाथ पवार,कारभारी खुळे,अनिल चव्हाण,रंगनाथ घाडगे, वैशाली नान्नोर,साई त्रिभुवन,सोमा आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.