logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) प्रभावीपणे लागू करून मातंग समाजाला न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी अमरावती येथे सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विराट ‘आक्रोश क्रांती मोर्चा’ मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी राजकमल चौक येथून मोर्चास प्रारंभ होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, जिथे शासनाच्या प्रतिनिधींना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव, पदाधिकारी, युवक, महिला, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते वाहनांच्या ताफ्यासह अमरावतीत दाखल झाले होते. मोर्चादरम्यान समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी घोषणाबाजी करण्यात आली तसेच आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) लागू करणे, मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेणे, समाजाला समान प्रतिनिधित्व व घटनात्मक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी विशेष योजना राबविण्याची मागणी समाविष्ट आहे. मोर्चा शांततेत पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानले असून, समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

5 hrs ago
user_Santosh Waghmare
Santosh Waghmare
T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
5 hrs ago

अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) प्रभावीपणे लागू करून मातंग समाजाला न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी अमरावती येथे सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विराट ‘आक्रोश क्रांती मोर्चा’ मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी राजकमल चौक येथून मोर्चास प्रारंभ होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, जिथे शासनाच्या प्रतिनिधींना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव, पदाधिकारी, युवक, महिला, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते वाहनांच्या ताफ्यासह अमरावतीत दाखल झाले होते. मोर्चादरम्यान समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी घोषणाबाजी करण्यात आली तसेच आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) लागू करणे, मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेणे, समाजाला समान प्रतिनिधित्व व घटनात्मक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी विशेष योजना राबविण्याची मागणी समाविष्ट आहे. मोर्चा शांततेत पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानले असून, समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

More news from Amravati and nearby areas
  • अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) प्रभावीपणे लागू करून मातंग समाजाला न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी अमरावती येथे सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विराट ‘आक्रोश क्रांती मोर्चा’ मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी राजकमल चौक येथून मोर्चास प्रारंभ होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, जिथे शासनाच्या प्रतिनिधींना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव, पदाधिकारी, युवक, महिला, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते वाहनांच्या ताफ्यासह अमरावतीत दाखल झाले होते. मोर्चादरम्यान समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी घोषणाबाजी करण्यात आली तसेच आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) लागू करणे, मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेणे, समाजाला समान प्रतिनिधित्व व घटनात्मक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी विशेष योजना राबविण्याची मागणी समाविष्ट आहे. मोर्चा शांततेत पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानले असून, समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
    1
    अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) प्रभावीपणे लागू करून मातंग समाजाला न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी अमरावती येथे सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विराट ‘आक्रोश क्रांती मोर्चा’ मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी राजकमल चौक येथून मोर्चास प्रारंभ होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, जिथे शासनाच्या प्रतिनिधींना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव, पदाधिकारी, युवक, महिला, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते वाहनांच्या ताफ्यासह अमरावतीत दाखल झाले होते.

मोर्चादरम्यान समाजाच्या घटनात्मक हक्कांसाठी घोषणाबाजी करण्यात आली तसेच आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) लागू करणे, मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेणे, समाजाला समान प्रतिनिधित्व व घटनात्मक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी विशेष योजना राबविण्याची मागणी समाविष्ट आहे. मोर्चा शांततेत पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानले असून, समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    5 hrs ago
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप भाऊ पोर्टफोडे हे आर्वी विधानसभा अध्यक्ष आहेत.
    1
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप भाऊ पोर्टफोडे हे आर्वी विधानसभा अध्यक्ष आहेत.
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे शेतकरी आणि तरुणांच्या मुद्द्यांवर आयोजित प्रस्तावित आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले भारतीय किसान युनियनचे (किसान) प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा पंचायत वार्ड क्रमांक २२ चे उमेदवार प्रिन्स रावत यांच्या पथकाला टूंडला टोल प्लाझावर पोलिसांनी रोखले. प्रिन्स रावत हे आपल्या प्रिन्स हॉटेल येथील कॅम्प कार्यालयातून संघटनेच्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जंतर मंतरसाठी रवाना झाले होते. मात्र, टूंडला पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक वैजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या पोलीस बंदोबस्ताने त्यांना टोलवरच पुढे जाण्यापासून रोखले. पोलीस कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत प्रिन्स रावत यांनी आरोप केला की, लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. शेतकरी आणि तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असून भारतीय किसान युनियन याचा कडक शब्दांत निषेध करते. सत्याला रोखले जाऊ शकते पण हरवले जाऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी हक्कांची लढाई लोकशाही मार्गाने सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही शेतकरी हितासाठी शांततापूर्ण मार्गाने संघर्ष जारी ठेवण्याचा संकल्प केला.
    1
    नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे शेतकरी आणि तरुणांच्या मुद्द्यांवर आयोजित प्रस्तावित आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले भारतीय किसान युनियनचे (किसान) प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा पंचायत वार्ड क्रमांक २२ चे उमेदवार प्रिन्स रावत यांच्या पथकाला टूंडला टोल प्लाझावर पोलिसांनी रोखले. प्रिन्स रावत हे आपल्या प्रिन्स हॉटेल येथील कॅम्प कार्यालयातून संघटनेच्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जंतर मंतरसाठी रवाना झाले होते. मात्र, टूंडला पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक वैजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या पोलीस बंदोबस्ताने त्यांना टोलवरच पुढे जाण्यापासून रोखले.

पोलीस कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत प्रिन्स रावत यांनी आरोप केला की, लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. शेतकरी आणि तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असून भारतीय किसान युनियन याचा कडक शब्दांत निषेध करते. सत्याला रोखले जाऊ शकते पण हरवले जाऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी हक्कांची लढाई लोकशाही मार्गाने सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही शेतकरी हितासाठी शांततापूर्ण मार्गाने संघर्ष जारी ठेवण्याचा संकल्प केला.
    user_राजेंद्र वामनराव खंडारे
    राजेंद्र वामनराव खंडारे
    आष्टी, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पेपरफुटीप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. यासोबतच सध्या सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण लागल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे.
    1
    पेपरफुटीप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. यासोबतच सध्या सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण लागल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट ग्रामीण मंडळातर्फे वेळा येथे 'कृषी माऊली सोहळा' मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. या सोहळ्याच्या प्रसंगी गरजू व विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना शेतीविषयक किटचे वाटप करून मोलाचा उपक्रम राबवण्यात आला. याच कार्यक्रमात कृषी सहाय्यक अधिकारी श्री. चौधरी सर यांनी उपस्थितांना माती परीक्षण आणि सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन करत आधुनिक व शाश्वत शेतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. हा उपक्रम भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ व जिल्हाध्यक्ष सौ. वैशालीताई येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा जिल्ह्याच्या प्रभारी सौ. मायाताई ननावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सारिका ठोंबरे, जिल्हा महामंत्री श्रेया देशमुख, जिल्हा महामंत्री रवीला आखाडे, सहसंयोजक उमा पानवटकर, जिल्हा विधानसभा प्रमुख चित्राताई ठाकूर, हिंगणघाट ग्रामीण अध्यक्ष कीर्ती सायंकार, अलका लोणकर, ममता डुकरे, कांचन खाटिक, कविता धारणे, भारती महाकाळकर, भारती गोडे, वैशाली बालपांडे, सोनाली नौकरकार, मंगला कुमरे, सुनीता कामडी यांच्यासह पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
    1
    वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट ग्रामीण मंडळातर्फे वेळा येथे 'कृषी माऊली सोहळा' मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. या सोहळ्याच्या प्रसंगी गरजू व विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना शेतीविषयक किटचे वाटप करून मोलाचा उपक्रम राबवण्यात आला. याच कार्यक्रमात कृषी सहाय्यक अधिकारी श्री. चौधरी सर यांनी उपस्थितांना माती परीक्षण आणि सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन करत आधुनिक व शाश्वत शेतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

हा उपक्रम भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ व जिल्हाध्यक्ष सौ. वैशालीताई येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा जिल्ह्याच्या प्रभारी सौ. मायाताई ननावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सारिका ठोंबरे, जिल्हा महामंत्री श्रेया देशमुख, जिल्हा महामंत्री रवीला आखाडे, सहसंयोजक उमा पानवटकर, जिल्हा विधानसभा प्रमुख चित्राताई ठाकूर, हिंगणघाट ग्रामीण अध्यक्ष कीर्ती सायंकार, अलका लोणकर, ममता डुकरे, कांचन खाटिक, कविता धारणे, भारती महाकाळकर, भारती गोडे, वैशाली बालपांडे, सोनाली नौकरकार, मंगला कुमरे, सुनीता कामडी यांच्यासह पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचाराच्या निषेधार्थ आता जनताही रस्त्यावर उतरली आहे. या लाठीमार कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घाटंजी बंदची हाक देण्यात आली होती. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नागरिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरून विरोध दर्शवत आहेत.
    1
    दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचाराच्या निषेधार्थ आता जनताही रस्त्यावर उतरली आहे. या लाठीमार कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली.

विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घाटंजी बंदची हाक देण्यात आली होती. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नागरिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरून विरोध दर्शवत आहेत.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    13 hrs ago
  • हिंगणघाट पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करत विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत १ लाख २१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २४ जुलै रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. मौजा जाम येथून हिंगणघाटकडे ब्रह्मा पाटील (रा. चाकूर, ता. समुद्रपूर) हा MH-40-DK-8157 क्रमांकाच्या टीव्हीएस ज्युपिटर मोपेडवर विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून एनएच-४४ सर्व्हिस रोडवरील रायडग हॉटेलजवळ दोन पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. संशयिताला थांबवून वाहनाची तपासणी केली असता, मोपेडच्या पुढील चुंगडीत व डिकीत रॉयल स्टॅग कंपनीच्या १८० मिलीच्या ३० निपा (₹१२,०००), ओ.सी.डब्ल्यू. कंपनीच्या ३० निपा (₹१०,५००), ऑल सीझन कंपनीच्या १५ निपा (₹५,७५०) आणि कासबर्ग कंपनीचे ८ बिअर टिन (₹३,२००) आढळून आले. या दारूसाठ्यासह ₹९०,००० किमतीची मोपेडही जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या निर्देशानुसार पोलीस हवालदार प्रविण बोधाने, स्वप्नील जिवने, जगदीश चव्हाण आणि पोलीस अंमलदार सागर समृतवार व अमोल गीते यांनी पार पाडली.
    1
    हिंगणघाट पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करत विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत १ लाख २१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २४ जुलै रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.

मौजा जाम येथून हिंगणघाटकडे ब्रह्मा पाटील (रा. चाकूर, ता. समुद्रपूर) हा MH-40-DK-8157 क्रमांकाच्या टीव्हीएस ज्युपिटर मोपेडवर विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून एनएच-४४ सर्व्हिस रोडवरील रायडग हॉटेलजवळ दोन पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. संशयिताला थांबवून वाहनाची तपासणी केली असता, मोपेडच्या पुढील चुंगडीत व डिकीत रॉयल स्टॅग कंपनीच्या १८० मिलीच्या ३० निपा (₹१२,०००), ओ.सी.डब्ल्यू. कंपनीच्या ३० निपा (₹१०,५००), ऑल सीझन कंपनीच्या १५ निपा (₹५,७५०) आणि कासबर्ग कंपनीचे ८ बिअर टिन (₹३,२००) आढळून आले. या दारूसाठ्यासह ₹९०,००० किमतीची मोपेडही जप्त करण्यात आली.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या निर्देशानुसार पोलीस हवालदार प्रविण बोधाने, स्वप्नील जिवने, जगदीश चव्हाण आणि पोलीस अंमलदार सागर समृतवार व अमोल गीते यांनी पार पाडली.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Tojibur
    1
    Post by Tojibur
    user_Tojibur
    Tojibur
    वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.