Shuru
Apke Nagar Ki App…
वाटंबरे येथील जिल्हा प्राथमिक केंद्र शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या बालदिंडी सोहळ्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
दत्तात्रय पवार
वाटंबरे येथील जिल्हा प्राथमिक केंद्र शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या बालदिंडी सोहळ्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वाटंबरे येथील जिल्हा प्राथमिक केंद्र शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या बालदिंडी सोहळ्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.1
- राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे शनिवार, दि. २५ जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्याची सुरुवात श्री क्षेत्र बिरोबा यांच्या पवित्र दर्शनाने होणार आहे. दर्शनानंतर टेंभू सिंचन योजनेअंतर्गत तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सिंचनाशी संबंधित विविध प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीत सुरू असलेल्या कामांचा आढावा, प्रलंबित कामे, पाणी सोडण्यातील अडचणी, नवीन पाइपलाइनचे प्रस्ताव तसेच टेंभू योजनेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व गावांच्या समस्या मंत्रीमहोदयांसमोर मांडून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील आणि त्यावर प्रभावी व तातडीने तोडगा काढण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, सिंचन व्यवस्थेच्या बळकटीसाठी आणि टेंभू योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.1
- आमदार रोहित पाटील यांनी मंत्री विखे पाटील हे टेंभू योजनेची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली आहे.1
- देशभरात पेपरफुटी प्रकरणांवर तीव्र चिंता व्यक्त होत असताना केंद्र सरकार याविरोधात अत्यंत कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उशिरा एका व्हिडिओ संदेशाद्वारे दिले आहेत. शुक्रवारी यासंदर्भात आणखी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर, पंतप्रधानांनी एकाच दिवसात दुसऱ्यांदा या गंभीर विषयावर आपली भूमिका मांडली आहे. पेपरफुटी प्रकरणांमधील दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.1
- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले आहे.1
- लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २३ जुलै रोजी गरवा कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर कडाडले आहेत. आवक कमी झालेली असली तरी गरवा कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. बाजार समितीत सध्या कांदा नंबर एकला २१०० ते २४०० रुपये, कांदा नंबर दोनला १४०० ते २१०० रुपये आणि कांदा नंबर तीनला ८०० ते १४०० रुपये असे दर मिळत आहेत. या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कांदा चांगल्या प्रतीचा वाळवून आणि योग्य प्रतवारी करूनच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन उपसभापती सुनील शेळके पाटील, सचिव भानुदास यादव आणि अमोद शेळके पाटील यांनी केले आहे.2
- आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज अक्कलकोट शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. या बंदला व्यापारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती. बंददरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने शहरात आवश्यक बंदोबस्त ठेवला होता. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने जनजागृती करत हा बंद यशस्वी केला. या बंदच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संपूर्ण बंद अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.1
- लातूरमध्ये औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या 'अटलसेतू' या कार्यालयाचे उद्घाटन आणि नवनियुक्त आमदार व खासदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते दिल्ली येथे पावसाळी अधिवेशनात असल्याने, त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव शशिकांत वडकुते यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला.1