कत्तलीसाठी नेली जाणारी ९ लाखांची जनावरे कर्जत पोलिसांकडून जप्त कर्जत शहरातील आतरवाडा परिसरात कत्तलीच्या उद्देशाने अवैधिरत्या गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या तस्करांवर कर्जत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी नऊ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ९ मे २०२६ रोजी पहाटे ५:१० च्या सुमारास, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कर्जत गावच्या शिवारातील आतरवाडा भागात परवेज काजी यांच्या घराशेजारील मोकळ्या मैदानात दोन गाड्यांमध्ये गोवंश जनावरे कत्तलीसाठी भरून ठेवलेली आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप (MH ४५ T ४०९२) आणि टाटा मॅजिक (MH १६ AY २६२८) या दोन वाहनांमधून जनावरांची सुटका केली. यामध्ये चार जर्सी गाई (किंमत १ लाख रुपये), एक काळी गाय (किंमत २५ हजार रुपये) आणि तीन लहान जर्सी गाई (किंमत ६० हजार रुपये) यांसह साडेसात लाख रुपयांची दोन वाहने असा एकूण ९ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही जनावरे कोणत्याही चारा-पाण्याची सोय न करता, अतिशय दाटीवाटीने निर्दयपणे बांधून ठेवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अलीम रफिक कुरेशी आणि शोएब असलम कुरेशी (दोघेही रा. कुरेशी गल्ली, कर्जत) यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम (सुधारित २०१५) आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, उपनिरीक्षक प्रदीप बोराडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे, लक्ष्मण ढवळे, मनोज मुरकुटे, राजेंद्र थोरात आणि होमगार्ड ऋषिकेश वाघमारे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीष शिंदे करत आहेत.

- श्री जगदंबा देवी ट्रस्टची नवीन कार्यकारिणी सर्वधर्मसमभाव ठेवत लोकशाही मार्गाने व्हावी: रवींद्र दामोदरे.1
- अहिल्यानगरमधील कर्जत-जामखेड भागातील बेनवडीचे भावी सरपंच परशुराम गदादे अठरा समाजांसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात आहेत. त्यांचे कार्य समाजात सलोखा आणि एकोपा निर्माण करणारे आहे.1
- अहिल्यानगर शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी 'ब्लॉकस्पॉट पेट्रोलिंग' मोहीम सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर किंवा नशा करून त्रास देणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. यामुळे शहरात शांतता व सुरक्षितता राखण्यास मदत होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.1
- सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.1
- सोलापूर जिल्ह्यातील धनश्री पवारने वडिलांचे प्रेत घरात असतानाही अवघ्या दीड तासात मराठीचा पेपर दिला. या स्थितीतही तिने 65 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या जिद्दीची आणि संघर्षावर मात करण्याच्या वृत्तीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.1
- न्यू मुंबई चायनीज बिडकीन बस स्टॅन्ड समोर आहे. मुंबई चायनीज दुसरी शाखा फारोळा. मुंबई चायनीज मालक इमरान शहा यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .1
- अनेक पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा कुदळवाडीमध्ये कोणासाठी...? पुन्हा "रात्रीस खेळ चाले" होणार का?1
- सोलापूर शहरात मार्केट यार्ड परिसरातील एका घरात दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्याने तीन तोळे सोने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.1