विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप; स्वामी ट्रस्ट व सिनर्जी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप; स्वामी ट्रस्ट व सिनर्जी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम स्वामी ट्रस्ट व सिनर्जी फाउंडेशन, सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. प्राथमिक शाळा, करंजुल (क) येथील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पावसापासून संरक्षण मिळून शाळेत ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना मदतीचा हात देणाऱ्या स्वामी ट्रस्ट व सिनर्जी फाउंडेशन, सुरत यांच्या सामाजिक बांधिलकीचे शाळा व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हीच या समाजोपयोगी उपक्रमाची खरी पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शाळेच्या वतीने दोन्ही संस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप; स्वामी ट्रस्ट व सिनर्जी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप; स्वामी ट्रस्ट व सिनर्जी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम स्वामी ट्रस्ट व सिनर्जी फाउंडेशन, सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. प्राथमिक शाळा, करंजुल (क) येथील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पावसापासून संरक्षण मिळून शाळेत ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना मदतीचा हात देणाऱ्या स्वामी ट्रस्ट व सिनर्जी फाउंडेशन, सुरत यांच्या सामाजिक बांधिलकीचे शाळा व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हीच या समाजोपयोगी उपक्रमाची खरी पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शाळेच्या वतीने दोन्ही संस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
- आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. -- --1
- दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .1
- सार्वजनिक ठिकाण पे गंदगी करने के लिए कौन दिया परवानगी पुच्छी है जनता सार्वजनिक ठिकाण प्रति नाशिक रोड देवदली कॅम्प प्लास्टिक से कितनी बडी गंदगी होती है और बिमारी उपयोग पर रोक लगाने के लिए सरकार ने पुरा कितना प्रार्थना किया पर लोगों को समझ में आना चाहिये लोगों की राय है की सार्वजनिक स्थान पर गंडगी ना करे जब सरकार है पर कार्रवाई लेती है टैब लोगों को समझ में आता है एक सार्वजनिक स्थान पर गंदगी ना करे, यह किसी धर्म किसी मजहब के लिए नहीं हर लोग हर वर्ग के लिए है गंडगी ना करे1
- टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.1
- तळोद्यातील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवड तळोद्यातील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवड मानाचा व नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या तळोदा शहरातील शनी गल्ली येथील श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाची सन २०२६ नूतन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी अभिजित कलाल, उपाध्यक्षपदी दिनेश बुनकर, खजिनदारपदी किरण पाटील, तर सचिवपदी मनोज लोहार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची मोठी परंपरा लाभली आहे. गेल्या ७० वर्षांपासून मंडळाच्या वतीने जनप्रबोधनात्मक देखावे, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत मंडळाने विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय पारितोषिकेही मिळवली आहेत. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाही गणेशोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मंडळाच्या या निवडीबद्दल पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.1
- Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला... पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला. चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले. सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. #DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews1
- RTO च्या दंडात्मक कारवाई विरोधात उ बा ठा शिवसेनेचा एल्गार; स्कूल व्हॅन चालकांचा rto कार्यालयावर धडक मोर्चा आरटीओ प्रशासनाकडून सुरू असलेल्या दंडात्मक कारवाईचा निषेध आणि प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेने मंगळवारी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला. या आंदोलनामुळे आरटीओ कार्यालय परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, महिला आघाडीच्या स्वाती पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने वाहतूकदार आणि खासगी स्कूल व्हॅन चालक सहभागी झाले होते. आंदोलकांनी आरटीओ प्रशासनाकडून स्कूल व्हॅन चालकांवर होत असलेल्या कथित आर्थिक दंडात्मक कारवाईला तीव्र विरोध केला. फिटनेस नियमांचे पालन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही चालकांनी दिला आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये शालेय वाहनांसाठी ‘७+१’ सीटिंग क्षमता मंजूर करावी आणि वाहनांमध्ये लेडी कंडक्टर ठेवण्याची सक्ती रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. लेडी कंडक्टरच्या पगाराचा अतिरिक्त आर्थिक भार पालकांवर पडत असून, त्यातून पालक आणि चालकांमध्ये विनाकारण वाद निर्माण होत असल्याचा दावा संघटनेने केला. तसेच आरटीओकडून स्कूल व्हॅन चालकांवर सुरू असलेली कठोर आर्थिक दंडात्मक कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली. शहरातील अनेक शाळा एकाच वेळेत सुटत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे शाळांच्या सुटण्याच्या वेळेत किमान १५ मिनिटांचे अंतर ठेवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या परिवहन समित्यांमध्ये खासगी वाहन चालकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. चालकांच्या प्रत्यक्ष अडचणी आणि वाहतूक व्यवस्थेतील समस्या प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनामुळे आरटीओ कार्यालय परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. मोठ्या संख्येने चालक आणि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्याने प्रशासनाचे लक्ष या प्रश्नांकडे वेधले गेले. आता आरटीओ प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे स्कूल व्हॅन चालकांसह पालकांचे लक्ष लागले आहे.4
- खड्ड्याने घेतला सुनील बोरसेंचा बळी महापौरांसमोर आई-पत्नी-मुलींचा आक्रोश महापौरांकडून आर्थिक मदत-नोकरीचे आश्वासन अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्याने कष्टकरी सुनील बोरसे यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रंगकाम करून संपूर्ण कुटुंबाचा एकहाती उदरनिर्वाह करणाऱ्या सुनील यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारच हरपला. या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बोरसे यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुनील यांच्या आई, पत्नी आणि मुलींनी महापौरांसमोरच एकच टाहो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘घर चालवणारा माणूसच गेला… आता आम्ही कोणाकडे पाहायचं?’ या आक्रोशाने बोरसे कुटुंबीयांचे दुःख शब्दांतून व्यक्त होत होते. सुनील हे रंगकाम करून सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या मृत्यूने घरातील आर्थिक आधार पूर्णपणे कोलमडला आहे. महापौरांसमोर आई, पत्नी आणि मुलींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तोंडून निघणारा आक्रोश पाहून उपस्थित वातावरण अक्षरशः हेलावून गेले. कुटुंबाचा आधार असलेला सुनील एका खड्ड्यामुळे गेला आणि मागे राहिलेल्या कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. बोरसे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी त्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्याला मानधनावर नोकरी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले असून सुनील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. त्यामुळे बोरसे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कधीही भरून निघणार नाही. महापौरांनी कुटुंबीयांना धीर देत ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे’ या भावनेने मदतीचे आश्वासन दिले. मात्र, बोरसे कुटुंबीयांच्या अश्रूंनी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या सांत्वनपर भेटीप्रसंगी नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सभापती समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन, वैभव महिरे यांच्यासह बोरसे कुटुंबीय उपस्थित होते.4