logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

यश हे सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनात दडलेले—सौ. अपर्णाताई फुंडकर सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न. शेगाव : येथील सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पस येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई (MSBTE) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी २०२५ डिप्लोमा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागरदादा फुंडकर तर खामगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई सागर फुंडकर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंतजी कुलकर्णी, तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रिती चोपडे, तंत्रनिकेतन अधिष्ठाता प्रा. सचिन इंगळे, डॉ. धीरज वानखेडे, तसेच कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिंगळे साहेब, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व माता सरस्वती पूजनाने झाली तसेच लोकनेते महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे यांनी भाषणात विद्यार्थ्यांच्या यशाचे महत्त्व सांगताना असे उल्लेख केले की, “आजचा हा दिवस केवळ प्रमाणपत्रांचा नसून परिश्रम, चिकाटी, शिस्त व आत्मविश्वासाच्या विजयाचा उत्सव आहे.” या समारंभात अभियांत्रिकी शाखांमधील प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. MSBTE हिवाळी २०२५ परीक्षेत उत्कृष्ट गुण संपादन करून संस्थेचा नावलौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. त्यानंतर मा. सौ. अपर्णाताई फुंडकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “यश हे केवळ गुणांमध्ये नसून सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यात दडलेले असते.” तर अध्यक्षीय भाषणात मा. श्री. सागर फुंडकर यांनी विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करत राहण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण झाल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भक्ती चौधरी आणि कु. आनंदी वानखडे यांनी केले असून आभार प्रदर्शन कु. अक्षदा कवडकर हिने केले. व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

on 15 January
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist Shegaon, Buldhana•
on 15 January
498e46eb-f291-43b7-a5ad-929d76233f5c

यश हे सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनात दडलेले—सौ. अपर्णाताई फुंडकर सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न. शेगाव : येथील सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पस येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई (MSBTE) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी २०२५ डिप्लोमा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागरदादा फुंडकर तर खामगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई सागर फुंडकर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंतजी कुलकर्णी, तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रिती चोपडे, तंत्रनिकेतन अधिष्ठाता प्रा. सचिन इंगळे, डॉ. धीरज वानखेडे, तसेच कला, विज्ञान

b86e649e-fca5-4c1c-ac29-b15b7587aa37

व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिंगळे साहेब, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व माता सरस्वती पूजनाने झाली तसेच लोकनेते महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंत्रनिकेतन प्राचार्या प्रा. प्रीती चोपडे यांनी भाषणात विद्यार्थ्यांच्या यशाचे महत्त्व सांगताना असे उल्लेख केले की, “आजचा हा दिवस केवळ प्रमाणपत्रांचा नसून परिश्रम, चिकाटी, शिस्त व आत्मविश्वासाच्या विजयाचा उत्सव आहे.” या समारंभात अभियांत्रिकी शाखांमधील प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. MSBTE हिवाळी २०२५ परीक्षेत उत्कृष्ट गुण संपादन करून संस्थेचा नावलौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांचे

100990ff-d32d-4b33-b5da-e39c74dab1ea

उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. त्यानंतर मा. सौ. अपर्णाताई फुंडकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “यश हे केवळ गुणांमध्ये नसून सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यात दडलेले असते.” तर अध्यक्षीय भाषणात मा. श्री. सागर फुंडकर यांनी विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करत राहण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण झाल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भक्ती चौधरी आणि कु. आनंदी वानखडे यांनी केले असून आभार प्रदर्शन कु. अक्षदा कवडकर हिने केले. व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धीविनायक टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खामगाव: हवामान खात्याने ३० मार्च २६ पासून राज्यात काही दिवस ढगाळ हवामान व वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. अंदाजानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. तर शहरातही काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडत होता. वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू होता. तर काही भागायत विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना उकाळ्याचा त्रास सहन करावा लागत होता. टिळक राष्ट्रीय विद्यालयाजवळील झाड वादळी वाऱ्यामुळे 30 मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रस्त्यावर पडले होते. मात्र 3 दिवस उलटूनही झाड रस्त्यावरच पडले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.
    1
    खामगाव: हवामान खात्याने  ३० मार्च २६ पासून राज्यात काही दिवस ढगाळ हवामान व वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. अंदाजानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. तर शहरातही काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडत होता. वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू होता. तर काही भागायत विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना उकाळ्याचा त्रास सहन करावा लागत होता. टिळक राष्ट्रीय विद्यालयाजवळील झाड वादळी वाऱ्यामुळे 30 मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रस्त्यावर पडले होते. मात्र 3 दिवस उलटूनही झाड रस्त्यावरच पडले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • नमस्कार! आपण पाहत आहात Shegaon Live बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे... ग्रामसेवक १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला! अॅन्टी करप्शन ब्युरोची खामगावमध्ये धडक कारवाई! बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) विजय माधव गवई यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या नमुना ८-अ नोंदीत दुरुस्ती करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीनंतर १० हजार रुपयांवर व्यवहार ठरवण्यात आला होता. आज दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय, खामगाव येथे सापळा रचण्यात आला आणि तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, आणि पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील दिपक जाधव, जगदीश पवार, रंजीत व्यवहारे, शैलेश सोनवणे, नितीन शेटे आणि अर्शद शेख या अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. या प्रकरणी संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर कोणताही शासकीय अधिकारी लाच मागत असेल, तर नागरिकांनी त्वरित अॅन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    नमस्कार! आपण पाहत आहात Shegaon Live
बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे...
ग्रामसेवक १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला!
अॅन्टी करप्शन ब्युरोची खामगावमध्ये धडक कारवाई!
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) विजय माधव गवई यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या नमुना ८-अ नोंदीत दुरुस्ती करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.
त्यानंतर तडजोडीनंतर १० हजार रुपयांवर व्यवहार ठरवण्यात आला होता.
आज दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय, खामगाव येथे सापळा रचण्यात आला आणि तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई
पोलीस अधीक्षक बापू बांगर,
अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे,
आणि पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील
दिपक जाधव, जगदीश पवार, रंजीत व्यवहारे, शैलेश सोनवणे, नितीन शेटे आणि अर्शद शेख
या अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
या प्रकरणी संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जर कोणताही शासकीय अधिकारी लाच मागत असेल, तर नागरिकांनी त्वरित अॅन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    12 hrs ago
  • वरवंड नगरीत खंडेरायाचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न; विजय सपकाळ यांनी ओढला मानाचा नंगर!
    1
    वरवंड नगरीत खंडेरायाचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न; विजय सपकाळ यांनी ओढला मानाचा नंगर!
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • तुळजापुरात खाकीचा माज : भाविकांना अमानुष मारहाण, पार्किंग वादातून पोलिस-भाविक झटापट तुळजापूर (धाराशिव) : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात पार्किंगच्या मुद्द्यावरून पोलिस आणि भाविकांमध्ये झालेल्या झटापटीत काही महिला भाविकांसह अनेकांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळजापूरमध्ये खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर “खाकीचा माज” अशी तीव्र टीका होत आहे. घटना नुकतीच घडली असून, मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. पार्किंग व्यवस्थेबाबत वाद झाल्याने पोलिसांनी भाविकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद ते हाणामारीपर्यंत मजल गेली. उपलब्ध व्हिडिओ फुटेजमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांकडून भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. यात महिला भाविकांचाही समावेश असल्याने संताप व्यक्त होत आहे. डीवायएसपी निलेश देशमुख यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी या घटनेत सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. भाविकांकडून पोलिसांवर अमानुष मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, तर पोलिस बाजूने नियमांचे उल्लंघन आणि अडथळा आणल्याचे कारण दिले जाण्याची शक्यता आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठ आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. मात्र पार्किंग, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असतात. या घटनेने भाविकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या काय? घटनेची पोलिस प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे. मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून पार्किंग आणि भाविक सुविधा सुधारण्याची मागणी होत आहे.
    1
    तुळजापुरात खाकीचा माज : भाविकांना अमानुष मारहाण, पार्किंग वादातून पोलिस-भाविक झटापट
तुळजापूर (धाराशिव) : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात पार्किंगच्या मुद्द्यावरून पोलिस आणि भाविकांमध्ये झालेल्या झटापटीत काही महिला भाविकांसह अनेकांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळजापूरमध्ये खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर “खाकीचा माज” अशी तीव्र टीका होत आहे.
घटना नुकतीच घडली असून, मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. पार्किंग व्यवस्थेबाबत वाद झाल्याने पोलिसांनी भाविकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद ते हाणामारीपर्यंत मजल गेली. उपलब्ध व्हिडिओ फुटेजमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांकडून भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. यात महिला भाविकांचाही समावेश असल्याने संताप व्यक्त होत आहे.
डीवायएसपी निलेश देशमुख यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी या घटनेत सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. भाविकांकडून पोलिसांवर अमानुष मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, तर पोलिस बाजूने नियमांचे उल्लंघन आणि अडथळा आणल्याचे कारण दिले जाण्याची शक्यता आहे.
तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठ आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. मात्र पार्किंग, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असतात. या घटनेने भाविकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या काय?
घटनेची पोलिस प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे.
मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून पार्किंग आणि भाविक सुविधा सुधारण्याची मागणी होत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बुलढाण्यात महामानवांच्या जयंतीचा जयघोष; चार दिवस रंगणार वैचारिक आणि सांस्कृतिक महोत्सव
    1
    बुलढाण्यात महामानवांच्या जयंतीचा जयघोष; चार दिवस रंगणार वैचारिक आणि सांस्कृतिक महोत्सव
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.