पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयातर्फे २४ तारखेला आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात झाली. भजन, अभंग आणि श्री विठ्ठलाच्या जयघोषात ही दिंडी कन्या विद्यालय कोंडवाडा गल्ली येथून निघाली. त्यानंतर चावडी, जामनेर रोड, कृष्णापुरी आणि शिव कॉलनी मार्गे श्री विठ्ठल मंदिराकडे दर्शनासाठी नेण्यात आली. या दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी पारंपारिक नऊवारी साड्या, पांढरे गणवेश, क्रीडा गणवेश आणि शालेय गणवेश परिधान करून वेगवेगळे संघ तयार केले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी विद्यार्थिनींनी श्री विठ्ठल भक्तीच्या गीतांवर पारंपारिक नृत्य, लेझीम नृत्य, आईचा जोगवा आणि वारकरी फुगडी यांसारखे कलाविष्कार सादर केले. श्री विठ्ठलाची आकर्षक सजवलेली पालखी, विद्यार्थिनींच्या डोईवरील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या विलोभनीय मूर्ती, तुळशी वृंदावन, टाळ-मृदुंग आणि भगव्या पताकांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. शिव कॉलनीतील श्री विठ्ठल मंदिर येथे सोहळ्याचा समारोप झाला, जिथे विठ्ठल-रुक्मिणीचे मनभावन नृत्य सादर करण्यात आले. विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे विशेष सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या होत्या, तसेच समारोपप्रसंगी विद्यार्थिनींना जिलेबी व केळी यांसह प्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री लक्ष्मण पाटील, श्री योगेश पाटील व श्री राजेंद्र पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. दिंडीच्या यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र चव्हाण, प्रा. अंकिता देशमुख, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. संगीता राजपूत, जयदीप पाटील, अनिल पाटील, अंबालाल पवार, नंदू पाटील, संगीता बाविस्कर, सुरेखा बडे, उमेश कडलग, पायल पाटील, शिवराम पाटील, धनराज धनगर आणि शकील खाटीक यांनी परिश्रम घेतले.

- पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयातर्फे २४ तारखेला आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात झाली. भजन, अभंग आणि श्री विठ्ठलाच्या जयघोषात ही दिंडी कन्या विद्यालय कोंडवाडा गल्ली येथून निघाली. त्यानंतर चावडी, जामनेर रोड, कृष्णापुरी आणि शिव कॉलनी मार्गे श्री विठ्ठल मंदिराकडे दर्शनासाठी नेण्यात आली. या दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी पारंपारिक नऊवारी साड्या, पांढरे गणवेश, क्रीडा गणवेश आणि शालेय गणवेश परिधान करून वेगवेगळे संघ तयार केले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी विद्यार्थिनींनी श्री विठ्ठल भक्तीच्या गीतांवर पारंपारिक नृत्य, लेझीम नृत्य, आईचा जोगवा आणि वारकरी फुगडी यांसारखे कलाविष्कार सादर केले. श्री विठ्ठलाची आकर्षक सजवलेली पालखी, विद्यार्थिनींच्या डोईवरील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या विलोभनीय मूर्ती, तुळशी वृंदावन, टाळ-मृदुंग आणि भगव्या पताकांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. शिव कॉलनीतील श्री विठ्ठल मंदिर येथे सोहळ्याचा समारोप झाला, जिथे विठ्ठल-रुक्मिणीचे मनभावन नृत्य सादर करण्यात आले. विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे विशेष सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या होत्या, तसेच समारोपप्रसंगी विद्यार्थिनींना जिलेबी व केळी यांसह प्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री लक्ष्मण पाटील, श्री योगेश पाटील व श्री राजेंद्र पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. दिंडीच्या यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र चव्हाण, प्रा. अंकिता देशमुख, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. संगीता राजपूत, जयदीप पाटील, अनिल पाटील, अंबालाल पवार, नंदू पाटील, संगीता बाविस्कर, सुरेखा बडे, उमेश कडलग, पायल पाटील, शिवराम पाटील, धनराज धनगर आणि शकील खाटीक यांनी परिश्रम घेतले.1
- विठ्ठलमय वातावरणात 'श्री स्वामी समर्थ ग्राम विकास अभियान'च्या वतीने प्रसादाच्या माध्यमातून स्वामी भक्तीचा जागर करत अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या भक्तीमय उपक्रमात स्वामी भक्तीचा उत्साह आणि प्रसादाचे वाटप श्रद्धेने पार पडले.1
- भोकरदनकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरात डॉ. निर्मळ यांच्या "पार्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि दातांचा दवाखाना" या रुग्णालयाचा भव्य शुभारंभ होणार आहे. हा सोहळा सोमवार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी पार पडणार आहे.1
- धुळ्यात विद्यार्थ्यांनी भव्य 'विजय तिरंगा रॅली' काढली असून यादरम्यान राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपला तीव्र निषेध नोंदवला आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.1
- आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील दसरा मैदान चौकातील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अनेक भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून विठ्ठल आणि रुक्माईचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या प्राचीन विठ्ठल मंदिरात पंढरी दुमदुमली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.2
- केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे हित जपणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी करणे आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण मंत्रालयाची धुरा स्वीकारताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या अपेक्षांचा सन्मान करत शिक्षण अधिक आधुनिक, सर्वसमावेशक आणि रोजगाराभिमुख करण्यासाठी काम केले जाईल अशी ग्वाही दिली. याशिवाय देशातील शैक्षणिक संस्थांचा दर्जा उंचावणे, डिजिटल शिक्षणाचा विस्तार करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे ही सरकारची प्रमुख उद्दिष्टे असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.1
- जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे नैसर्गिक आपत्तीचे संकट निर्माण झाले आहे. तंगमार्ग परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून प्रभावित भागात बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.1