राहुरी फॅक्टरी येथील पादचारी उड्डाण पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त. काम सुरु झाल्याने पालकांमध्ये आनंद. राहुरी फॅक्टरी येथील पादचारी उड्डाण पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त. काम सुरु झाल्याने पालकांमध्ये आनंद. आप्पासाहेब ढूस यांचेकडून आ. तनपुरे यांचे आभार.. राहुरी फॅक्टरी दि. 16 सप्टेंबर २०२६ अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हद्दीत राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील नगर मनमाड महामार्गावर शाळकरी मुलांसाठी जवळपास दीड कोटी रुपये खर्चाच्या लोखंडी पादचारी उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली झाल्याने पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून आप्पासाहेब ढूस यांनी आ. प्राजक्त दादा तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.. राष्ट्रीय महामार्गचे अहिल्यानगरचे प्रोजेक्ट डायरेक्टर पी. बी. दिवान साहेब यांना दि. 19 जानेवारी 2021 रोजी देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी निवेदन देऊन डॉ बा बा तनपुरे सह साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नगर मनमाड महामार्गावर शाळकरी मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी लोखंडी पादचारी पुलाची निर्मिती करण्याची मागणी करून सातत्याने सहा वर्ष पाठपुरावा केल्याने अखेर या कामाला गती मिळाली व पुलाचे काम सुरू झाले होते. तथापि येथील काही विघ्न संतोषी मंडळींनी या पुलाचे काम हाणून पाडण्यासाठी वर पर्यंत प्रयत्न करून काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काही महिने या पुलाचे काम बंद पडले होते.. तथापि आप्पासाहेब ढूस यांनी विधान परिषद सदस्य आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मदतीने या कामाला पुन्हा गती दिली व आज या पुलाच्या कामाला पुन्हा मुहूर्त मिळाल्याने काम सुरू झाले आहे. सदर काम सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आप्पासाहेब ढूस यांनी आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील पादचारी उड्डाण पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त. काम सुरु झाल्याने पालकांमध्ये आनंद. राहुरी फॅक्टरी येथील पादचारी उड्डाण पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त. काम सुरु झाल्याने पालकांमध्ये आनंद. आप्पासाहेब ढूस यांचेकडून आ. तनपुरे यांचे आभार.. राहुरी फॅक्टरी दि. 16 सप्टेंबर २०२६ अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हद्दीत राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील नगर मनमाड महामार्गावर शाळकरी मुलांसाठी जवळपास दीड कोटी रुपये खर्चाच्या लोखंडी पादचारी उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली झाल्याने पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून आप्पासाहेब ढूस
यांनी आ. प्राजक्त दादा तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.. राष्ट्रीय महामार्गचे अहिल्यानगरचे प्रोजेक्ट डायरेक्टर पी. बी. दिवान साहेब यांना दि. 19 जानेवारी 2021 रोजी देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी निवेदन देऊन डॉ बा बा तनपुरे सह साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नगर मनमाड महामार्गावर शाळकरी मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी लोखंडी पादचारी पुलाची निर्मिती करण्याची मागणी करून सातत्याने सहा वर्ष पाठपुरावा केल्याने अखेर या कामाला गती मिळाली व पुलाचे काम सुरू झाले होते. तथापि येथील
काही विघ्न संतोषी मंडळींनी या पुलाचे काम हाणून पाडण्यासाठी वर पर्यंत प्रयत्न करून काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काही महिने या पुलाचे काम बंद पडले होते.. तथापि आप्पासाहेब ढूस यांनी विधान परिषद सदस्य आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मदतीने या कामाला पुन्हा गती दिली व आज या पुलाच्या कामाला पुन्हा मुहूर्त मिळाल्याने काम सुरू झाले आहे. सदर काम सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आप्पासाहेब ढूस यांनी आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे.
- मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.1
- Post by सोनू पटेल4
- हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या हलवाई गणेशासमोर डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण . शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या हलवाई गणेशासमोर डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भक्तिमय उपक्रमामुळे परिसरात चैतन्यपूर्ण आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले. हलवाई गणेशासमोर विद्यार्थ्यांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण दरवर्षीप्रमाणे यंदाही हलवाई गणेशासमोर विद्यार्थ्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. डेक्कन स्कुलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी अथर्वशीर्षाचे महत्त्व व महती विशद करून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे उपाध्यक्ष वैभव लांडे, शरद मुसळे, मंडळाचे माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, अशोक काळे, प्रेम मुसळे,श्याम परदेशी, अविनाश जाधव, प्रणव मुसळे, बाळासाहेब ढोबळे ,सिंकदर मन्यार रमणलाल मुसळे, नारायण काळे, श्याम कोळपकर , शिक्षक सखाराम पुरी, आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. आभार अशोक काळे यांनी मानले. हलवाई चौक गणेश मित्र मंडळाने धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत. काही वर्षांपूर्वी मंडळाने विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून वाचलेल्या निधीतून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मंडळाचा उत्सव मंडप खड्डेविरहित ठेवण्याची परंपराही कायम आहे. शहरात महिलांसाठी सामूहिक महिला आरतीचा उपक्रम सर्वप्रथम मंडळाने सुरू केला. पर्यावरण संवर्धनासाठी महिला आरतीच्या वेळी महिलांना तुळशीची तसेच देशी वृक्षांची रोपे भेट देण्यात येतात. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटली जातात. गणेशोत्सव काळात बंदोबस्त व स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिस व नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळ्यातून सन्मान केला जातो. आरोग्य शिबिरे, जनजागृती, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप असे उपक्रमही राबविले जातात. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आतापर्यंत ३५ हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. कोरोनाकाळात गरजू नागरिकांना अन्नधान्य किट, तसेच सांगली व महाड परिसरातील पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत मंडळाने केली. लोकवर्गणीतून हलवाई गणेशाला चांदीचे आभूषणे अर्पण करण्यात आली असून गणेशजयंतीच्या महाप्रसादासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. दरवर्षी पौराणिक, धार्मिक किंवा सामाजिक विषयांवरील देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. विविध धर्मांचे नागरिक मंडळाच्या उपक्रमात सहभागी होतात. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीनेही मंडळाच्या कार्याची दखल घेऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण, मुलांना खाऊवाटप तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची सांगड घालणारे मंडळ म्हणून हलवाई चौक गणेश मित्र मंडळाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.4
- एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात गणपती बाप्पांचे झांज व ढोलताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पांच्या आगमनासाठी संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते. खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. तसेच प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाप्पांच्या दर्शन घेतले. सर्वांनी बाप्पांकडे आपल्या व आपल्या देशासाठी शांतता, सुख व समृद्धी ची प्रार्थना केली.सर्वांना मोदक व खिरापत वाटप करण्यात आली. सदर बाप्पांच्या आगमनासाठी संदीप वाकचौरे, बाळासाहेब सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, मयूर भागवत सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.4
- छत्रपती संभाजीनगर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना पाटोदा येथे त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण दीर्घकाळ सुरू होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अशक्तपणा आणि निर्जलीकरणाचा त्रास झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून विविध वैद्यकीय तपासण्या पुन्हा करण्यात येणार आहेत. सध्या जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती तपासली जात आहे. त्यांची सध्याची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीकडे मराठा समाजासह समर्थकांचे लक्ष लागले आहे.4
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री शहरात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे,1
- SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा। SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।1
- जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, ठाकरेंची आमदार अंबादास दानवे लाईव्ह1