नांदेड जिल्ह्यातील सांगवी (बु.) हिंगोली रोड येथील श्री खाटू श्याम बाबा मंदिरामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या पावन पर्वावर मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी एकादशीच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरातील मोठ्या संख्येने श्याम भक्त बाबांच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते. जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात या श्रद्धेने अनेक भाविक येथे हजर झाले होते. तसेच ज्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या, त्यांनी आपले नवस फेडण्यासाठी मंदिरात हजेरी लावली होती. श्री श्याम बाबांची दिवसातून पाच वेळा आरती केली जाते; या सर्व आरत्यांना भाविकांनी अलोट गर्दी केली होती. मंदिरात आलेल्या सर्व भाविकांना श्री श्याम बाबा मंदिर समितीच्या वतीने अल्पोपहार आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भक्ताची गैरसोय होऊ नये, यासाठी समितीचे पदाधिकारी, स्थानिक सेवादार आणि स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती. प्रत्येकाला सुलभ दर्शन मिळावे यासाठी सेवाभावी वृत्तीने वैयक्तिक लक्ष दिले जात होते. धार्मिक उत्सवाचे औचित्य साधत मंदिर समितीने सामाजिक बांधिलकी देखील जपली. यानिमित्त मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य भाविकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून रक्तदान केले आणि आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. याच विशेष दिनी 'गोरक्षा गौ सन्मान आव्हान' यात्रेनिमित्त जालन्याहून आलेले सनातनी गौसेवक धर्म सिंहनी, साध्वी गायत्री दीदी आणि त्यांचे बंधू यांनी श्री खाटू श्याम बाबांचे दर्शन घेतले. या प्रसंगी श्री श्याम बाबा मंदिर समितीच्या वतीने सर्व मान्यवर गौसेवकांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. समितीचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि सेवादाऱ्यांच्या अथांग परिश्रमामुळे हा एकादशी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

- नांदेड शहरात वाहतूक विभागाच्या नियमांना केराची टोपली दाखवत भरदिवसा जड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात जड वाहनांना दिवसा प्रवेश बंदी असतानाही, बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांची मोठी वाहने मुख्य रस्त्यांवरून बिनधास्तपणे धावत आहेत. विशेष म्हणजे, यातील काही वाहनांवर नंबर प्लेट देखील नसून, त्यांना प्रशासनाची कोणतीही भीती उरलेली नाही की काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नियमानुसार शहरात जड वाहनांची वाहतूक केवळ रात्री १० नंतर करणे बंधनकारक आहे. परंतु, सध्या शहरात दिवसाढवळ्या बांधकाम साहित्य, वाळू आणि सिमेंट मिक्सरच्या मोठ्या गाड्या सर्रास फिरताना दिसत आहेत. या बेजबाबदार वाहतुकीमुळे गेल्या काही महिन्यांत अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून काही निष्पाप नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. या जड वाहनांमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून, सर्वसामान्य वाहनधारक, पादचारी आणि शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एकीकडे वाहतूक शाखा सर्वसामान्य दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात तत्परता दाखवते; मग दुसरीकडे या बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या आणि विना नंबरच्या गाड्यांवर कारवाई का केली जात नाही? असा संतप्त सवाल जनता उपस्थित करत आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची किंवा जीवितहानीची वाट पाहत आहे का? असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आता या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन नांदेड वाहतूक पोलीस प्रशासन या मुजोर वाहनधारकांवर कडक कायदेशीर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.4
- नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोहळी येथील हनुमान मंदिर परिसरात भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून हे शिबीर भरवण्यात आले असून, यासाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे संयुक्त सहकार्य लाभले आहे.1
- महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीतील रक्कम आणि संबंधित बँकांमधील प्रत्यक्ष कर्जाची रक्कम यामध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याने शेतकरी मोठ्या संभ्रमात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मते, सरकारी यादीत दर्शविलेली रक्कम आणि बँकेच्या नोंदीतील कर्जाची रक्कम जुळत नसल्याने पुढील प्रक्रियेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही पुढील प्रक्रिया करण्यापूर्वी सरकारच्या यादीतील कर्जाची रक्कम आणि बँकेच्या नोंदीतील कर्जाची रक्कम काळजीपूर्वक पडताळून पाहावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही रक्कम समान असल्याची खात्री झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून दुरुस्तीची मागणी करावी. दरम्यान, कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वारंवार वेठीस धरले जात असल्याची भावना व्यक्त होत असून, ही परिस्थिती तातडीने सुधारावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा राज्यभरातील शेतकरी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे.1
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हजारो शेतकऱ्यांच्या कर्जराशीमध्ये मोठा तफावत दिसून आला आहे. प्रत्यक्ष कर्ज, यादीतील रक्कम आणि आधार प्रमाणीकरणानंतर दिसणारी रक्कम यामध्ये मोठा फरक असल्याने शेतकरी खूपच संभ्रमात आहेत. शासनाने शेतकऱ्यांशी पारदर्शकता ठेवून तात्काळ खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्व त्रुटी दुरुस्त करण्याची आणि पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यासंदर्भात आज दिनांक 27 जुलै रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे तात्काळ याद्या दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत मोठा घोटाळा उघड झाल्याचे आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केले आहेत.1
- उमरखेड़ नगर परिषद में धूल खाते हुए ऑटो क्या फिर से दिव्यांग भाइयों कि सेवा में आयेंगे या फिर भंगार में जायेंगे? उमरखेड़ नगर परिषद में धूल खाते हुए ऑटो क्या फिर से दिव्यांग भाइयों कि सेवा में आयेंगे या फिर भंगार में जायेंगे आम नागरिकों का सवाल? दिव्यांग भाइयों को इंसाफ कौन देगा? उमरखेड़ नगर परिषद में दिव्यांगो को अब उनके हक का 5 टक्के निधि मिलने लगा है पर दिव्यांग भाइयों के लिए लाए गए ऑटो अब धूल खाते हुए पड़े है.1
- महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत देगलूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीच्या प्रांगणात २३ जुलै ते २५ जुलै २०२६ दरम्यान पशुपालकांसाठी तीन दिवसांची तांत्रिक कार्यशाळा संपन्न झाली. नांदेड जिल्ह्याचे दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यशाळेत देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव आणि कंधार या पाच तालुक्यांतील ९१६ पशुपालकांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातील युवक, महिला व शेतकऱ्यांना पशुपालनातून स्वावलंबी बनवणे आणि शेतीला जोडधंदा म्हणून अधिक उत्पन्न मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेत शेळीपालन, दुग्धव्यवसाय, आधुनिक पशुपालन व्यवस्था, संतुलित आहार, रोगप्रतिबंधक उपाययोजना, लसीकरण, प्रजनन व्यवस्थापन, आर्थिक नियोजन आणि शासकीय अनुदान योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. आर. व्ही. सुरेवाड, डॉ. गौतम खिल्लारे, डॉ. रोहित धुमाळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाशमवार आणि उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. आर. व्ही. सुरेवाड व डॉ. सुरेश पाशमवार यांच्या हस्ते पशुपालकांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता प्रशिक्षण प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.2
- नांदेड जिल्ह्यातील सांगवी (बु.) हिंगोली रोड येथील श्री खाटू श्याम बाबा मंदिरामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या पावन पर्वावर मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी एकादशीच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरातील मोठ्या संख्येने श्याम भक्त बाबांच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते. जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात या श्रद्धेने अनेक भाविक येथे हजर झाले होते. तसेच ज्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्या, त्यांनी आपले नवस फेडण्यासाठी मंदिरात हजेरी लावली होती. श्री श्याम बाबांची दिवसातून पाच वेळा आरती केली जाते; या सर्व आरत्यांना भाविकांनी अलोट गर्दी केली होती. मंदिरात आलेल्या सर्व भाविकांना श्री श्याम बाबा मंदिर समितीच्या वतीने अल्पोपहार आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भक्ताची गैरसोय होऊ नये, यासाठी समितीचे पदाधिकारी, स्थानिक सेवादार आणि स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती. प्रत्येकाला सुलभ दर्शन मिळावे यासाठी सेवाभावी वृत्तीने वैयक्तिक लक्ष दिले जात होते. धार्मिक उत्सवाचे औचित्य साधत मंदिर समितीने सामाजिक बांधिलकी देखील जपली. यानिमित्त मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य भाविकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून रक्तदान केले आणि आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. याच विशेष दिनी 'गोरक्षा गौ सन्मान आव्हान' यात्रेनिमित्त जालन्याहून आलेले सनातनी गौसेवक धर्म सिंहनी, साध्वी गायत्री दीदी आणि त्यांचे बंधू यांनी श्री खाटू श्याम बाबांचे दर्शन घेतले. या प्रसंगी श्री श्याम बाबा मंदिर समितीच्या वतीने सर्व मान्यवर गौसेवकांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. समितीचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि सेवादाऱ्यांच्या अथांग परिश्रमामुळे हा एकादशी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.1
- भिवंडी शहरातील उड्डाणपुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा पुतळा दोरीने लटकवल्याचा प्रकार शुक्रवार दिनांक 24 जुलै 2017 रोजी सायंकाळी झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. भारतीय जनता पक्षाने संबंधित दोषींविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषींना लवकरात लवकर अटक न झाल्यास कायद्याच्या चौकटीत लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजपने प्रशासनाला दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या घटनेमुळे खूपच आक्रोशित झाले आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, दोषींवर जर त्वरित कारवाई केली गेली नाही तर ते आंदोलन करण्यास भाग पाडले जातील. भाजपने प्रशासनाला आंदोलनाची चेतावणी दिली आहे.1