पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हजारो शेतकऱ्यांच्या कर्जराशीमध्ये मोठा तफावत दिसून आला आहे. प्रत्यक्ष कर्ज, यादीतील रक्कम आणि आधार प्रमाणीकरणानंतर दिसणारी रक्कम यामध्ये मोठा फरक असल्याने शेतकरी खूपच संभ्रमात आहेत. शासनाने शेतकऱ्यांशी पारदर्शकता ठेवून तात्काळ खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्व त्रुटी दुरुस्त करण्याची आणि पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यासंदर्भात आज दिनांक 27 जुलै रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे तात्काळ याद्या दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत मोठा घोटाळा उघड झाल्याचे आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हजारो शेतकऱ्यांच्या कर्जराशीमध्ये मोठा तफावत दिसून आला आहे. प्रत्यक्ष कर्ज, यादीतील रक्कम आणि आधार प्रमाणीकरणानंतर दिसणारी रक्कम यामध्ये मोठा फरक असल्याने शेतकरी खूपच संभ्रमात आहेत. शासनाने शेतकऱ्यांशी पारदर्शकता ठेवून तात्काळ खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्व त्रुटी दुरुस्त करण्याची आणि पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यासंदर्भात आज दिनांक 27 जुलै रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे तात्काळ याद्या दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत मोठा घोटाळा उघड झाल्याचे आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केले आहेत.
- काँग्रेस प्रभारी रेहाना रियाज चिस्ती यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.1
- नांदेड येथील शाकुंतल स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील 'शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी' या भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना संस्कृतीचा वारसा लाभावा आणि संस्कृतीची जाण व्हावी या हेतूने शाळेतर्फे सर्व सणांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या दिंडीमध्ये विविध प्रकारचे देखावे सादरीकृत करण्यात आले असून त्याद्वारे सामाजिक संदेशही देण्यात आला. अतिशय मोठ्या उत्साहात ही दिंडी पार पडली.1
- बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला आहे. याप्रश्नी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले असून त्यांनी अडकलेल्या पीक विम्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.1
- जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.1
- महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीतील रक्कम आणि संबंधित बँकांमधील प्रत्यक्ष कर्जाची रक्कम यामध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याने शेतकरी मोठ्या संभ्रमात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मते, सरकारी यादीत दर्शविलेली रक्कम आणि बँकेच्या नोंदीतील कर्जाची रक्कम जुळत नसल्याने पुढील प्रक्रियेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही पुढील प्रक्रिया करण्यापूर्वी सरकारच्या यादीतील कर्जाची रक्कम आणि बँकेच्या नोंदीतील कर्जाची रक्कम काळजीपूर्वक पडताळून पाहावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही रक्कम समान असल्याची खात्री झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून दुरुस्तीची मागणी करावी. दरम्यान, कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वारंवार वेठीस धरले जात असल्याची भावना व्यक्त होत असून, ही परिस्थिती तातडीने सुधारावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा राज्यभरातील शेतकरी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे.1
- नांदेडच्या नवा मोंढा भागातून एक अतिशय प्रेरणादायी बातमी समोर आली आहे अर्थात, ही प्रेरणा कायद्याचे धिंडवडे कसे काढावेत, यासाठी आहे. २४ जुलै रोजी एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) दुकान क्रमांक १२,नवा मोंढा नांदेड येथील ताडी/सिंदी दुकानावर धाड टाकली. गुन्हा काय? तर ताडी खरेदीचे बिल नाही आणि वाहतुकीची बिल्टीही नाही. परिणामी, प्रशासनाने तत्परता दाखवत दुकानाचे परवाना रद्द केला आणि दुकान बंद करण्याचे आदेश दिले. पण खरी जादूतर दुसऱ्या दिवशी घडली. ज्या दुकानाचे लायसन्स रद्द झाले होते, ते २५ जुलैला पुन्हा एकदा जोमात सुरू झाले! जणू काही एफडीएचे आदेश म्हणजे कागदाचा तुकडा आणि प्रशासनाची कारवाई म्हणजे निव्वळ फार्स असावा. प्रशासकीय मोदक आणि झोपलेले अधिकारीमुंबईत बसून तुकाराम मुंडे शिस्तीचे डोस पाजत असताना, नांदेडमधील स्थानिक प्रशासन मात्र मोदकांच्या नादी लागून नंबरच्या कारभारात गुंतले आहे की काय, असा प्रश्न पडतो. ज्या दुकानावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांची होती, त्याच दुकानात ग्राहकांची वर्दळ सुरू असताना हे अधिकारी नेमके कोणत्या विश्वात मग्न होते? दुकानाचे अनोखे व्यवस्थापनया दुकानाची गंमत अशी की, मालक नांदेडमध्ये राहतच नाही. काही स्थानिक युवक हे दुकान एजन्सी तत्त्वावर चालवत आहेत. मालक नाही, अधिकृत कागदपत्रे नाहीत, तरीही दुकान ऑलवेज सुरू आहे! कायद्याची भीती नसलेले हे धाडस पाहून सामान्य जनतेने थक्क व्हायचे की प्रशासनाच्या नाकर्तेपणावर हसायचे? पुरावे उपलब्ध, कारवाई कधी? दुकान २४ तासांत पुन्हा सुरू झाल्याचे छायाचित्रे आणि व्हिडिओ पुरावे म्हणून उपलब्ध आहेत. आता प्रश्न हा उरतो की, तुकाराम मुंडे यांच्या आदेशाचा असा सरेआम घात करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का? की केवळ कागदावर परवाने रद्द करून प्रशासन आपले हात झटकून मोकळे होणार? जर कायद्याचे राज्य असेल, तर या जादूई ताडी/सिंधी दुकानाला पुन्हा टाळे लागणे गरजेचे आहे, अन्यथा अशा बेकायदा कृत्यांचे नांदेड मॉडेल सर्वत्र पायंडा पाडेल.1
- मिळालेल्या माहितीनुसार, कंधारचे आमदार डॉ. तुषार राठोड हे 'नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स' परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी शनिवार, २५ एप्रिल रोजी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अमेरिकेला रवाना झाले. तर आज, २७ जुलै रोजी मिळालेल्या ताज्या अपडेट्सनुसार, त्यांचा हा दौरा विविध देशांतील संसदीय कार्यपद्धती आणि सुशासनाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. अमेरिकेतील राज्यांच्या विधिमंडळांच्या प्रतिष्ठित संस्थेच्या परिषदेसाठी आणि 'नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही संस्था विधिमंडळ कार्यपद्धती, सार्वजनिक धोरणे, संशोधन आणि आंतरराज्य सहकार्य वाढवण्यासाठी कार्य करते. अमेरिकेला रवाना होताना विमानतळावर सहकारी, समर्थक आणि हितचिंतकांनी आमदार डॉ. तुषार राठोड यांना शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यादरम्यान आमदार राठोड विविध राज्यांच्या विधिमंडळांची कार्यपद्धती, सुशासन, लोकाभिमुख धोरणे आणि नावीन्यपूर्ण विकास मॉडेल्सचा सखोल अभ्यास करत आहेत. विशेष म्हणजे, आज मिळालेल्या माहितीनुसार या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तब्बल ४० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.1
- अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील शासकीय धान्य गोदामाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. सततच्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून कचरा आणि झुडपांमुळे लाखो रुपयांचे शासकीय अन्नधान्य धोक्यात आल्याचा आरोप होत आहे. गोदाम परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून तेथे काम करणाऱ्या हमाल आणि कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व स्वच्छ शौचालयाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. पुरवठा विभागाच्या या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.1
- अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर शहर पोलिसांनी वीजवाहक अॅल्युमिनियम तारे चोरी प्रकरणाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ₹३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात अॅल्युमिनियम तारे, अर्थिंग वायर, महिंद्रा जितो चारचाकी, सुझुकी बर्गमन दुचाकी व लोखंडी कटरचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या पथकाने केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.1