नांदेडच्या नवा मोंढा भागातून एक अतिशय प्रेरणादायी बातमी समोर आली आहे अर्थात, ही प्रेरणा कायद्याचे धिंडवडे कसे काढावेत, यासाठी आहे. २४ जुलै रोजी एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) दुकान क्रमांक १२,नवा मोंढा नांदेड येथील ताडी/सिंदी दुकानावर धाड टाकली. गुन्हा काय? तर ताडी खरेदीचे बिल नाही आणि वाहतुकीची बिल्टीही नाही. परिणामी, प्रशासनाने तत्परता दाखवत दुकानाचे परवाना रद्द केला आणि दुकान बंद करण्याचे आदेश दिले. पण खरी जादूतर दुसऱ्या दिवशी घडली. ज्या दुकानाचे लायसन्स रद्द झाले होते, ते २५ जुलैला पुन्हा एकदा जोमात सुरू झाले! जणू काही एफडीएचे आदेश म्हणजे कागदाचा तुकडा आणि प्रशासनाची कारवाई म्हणजे निव्वळ फार्स असावा. प्रशासकीय मोदक आणि झोपलेले अधिकारीमुंबईत बसून तुकाराम मुंडे शिस्तीचे डोस पाजत असताना, नांदेडमधील स्थानिक प्रशासन मात्र मोदकांच्या नादी लागून नंबरच्या कारभारात गुंतले आहे की काय, असा प्रश्न पडतो. ज्या दुकानावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांची होती, त्याच दुकानात ग्राहकांची वर्दळ सुरू असताना हे अधिकारी नेमके कोणत्या विश्वात मग्न होते? दुकानाचे अनोखे व्यवस्थापनया दुकानाची गंमत अशी की, मालक नांदेडमध्ये राहतच नाही. काही स्थानिक युवक हे दुकान एजन्सी तत्त्वावर चालवत आहेत. मालक नाही, अधिकृत कागदपत्रे नाहीत, तरीही दुकान ऑलवेज सुरू आहे! कायद्याची भीती नसलेले हे धाडस पाहून सामान्य जनतेने थक्क व्हायचे की प्रशासनाच्या नाकर्तेपणावर हसायचे? पुरावे उपलब्ध, कारवाई कधी? दुकान २४ तासांत पुन्हा सुरू झाल्याचे छायाचित्रे आणि व्हिडिओ पुरावे म्हणून उपलब्ध आहेत. आता प्रश्न हा उरतो की, तुकाराम मुंडे यांच्या आदेशाचा असा सरेआम घात करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का? की केवळ कागदावर परवाने रद्द करून प्रशासन आपले हात झटकून मोकळे होणार? जर कायद्याचे राज्य असेल, तर या जादूई ताडी/सिंधी दुकानाला पुन्हा टाळे लागणे गरजेचे आहे, अन्यथा अशा बेकायदा कृत्यांचे नांदेड मॉडेल सर्वत्र पायंडा पाडेल.

- नांदेडच्या नवा मोंढा भागातून एक अतिशय प्रेरणादायी बातमी समोर आली आहे अर्थात, ही प्रेरणा कायद्याचे धिंडवडे कसे काढावेत, यासाठी आहे. २४ जुलै रोजी एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) दुकान क्रमांक १२,नवा मोंढा नांदेड येथील ताडी/सिंदी दुकानावर धाड टाकली. गुन्हा काय? तर ताडी खरेदीचे बिल नाही आणि वाहतुकीची बिल्टीही नाही. परिणामी, प्रशासनाने तत्परता दाखवत दुकानाचे परवाना रद्द केला आणि दुकान बंद करण्याचे आदेश दिले. पण खरी जादूतर दुसऱ्या दिवशी घडली. ज्या दुकानाचे लायसन्स रद्द झाले होते, ते २५ जुलैला पुन्हा एकदा जोमात सुरू झाले! जणू काही एफडीएचे आदेश म्हणजे कागदाचा तुकडा आणि प्रशासनाची कारवाई म्हणजे निव्वळ फार्स असावा. प्रशासकीय मोदक आणि झोपलेले अधिकारीमुंबईत बसून तुकाराम मुंडे शिस्तीचे डोस पाजत असताना, नांदेडमधील स्थानिक प्रशासन मात्र मोदकांच्या नादी लागून नंबरच्या कारभारात गुंतले आहे की काय, असा प्रश्न पडतो. ज्या दुकानावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांची होती, त्याच दुकानात ग्राहकांची वर्दळ सुरू असताना हे अधिकारी नेमके कोणत्या विश्वात मग्न होते? दुकानाचे अनोखे व्यवस्थापनया दुकानाची गंमत अशी की, मालक नांदेडमध्ये राहतच नाही. काही स्थानिक युवक हे दुकान एजन्सी तत्त्वावर चालवत आहेत. मालक नाही, अधिकृत कागदपत्रे नाहीत, तरीही दुकान ऑलवेज सुरू आहे! कायद्याची भीती नसलेले हे धाडस पाहून सामान्य जनतेने थक्क व्हायचे की प्रशासनाच्या नाकर्तेपणावर हसायचे? पुरावे उपलब्ध, कारवाई कधी? दुकान २४ तासांत पुन्हा सुरू झाल्याचे छायाचित्रे आणि व्हिडिओ पुरावे म्हणून उपलब्ध आहेत. आता प्रश्न हा उरतो की, तुकाराम मुंडे यांच्या आदेशाचा असा सरेआम घात करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का? की केवळ कागदावर परवाने रद्द करून प्रशासन आपले हात झटकून मोकळे होणार? जर कायद्याचे राज्य असेल, तर या जादूई ताडी/सिंधी दुकानाला पुन्हा टाळे लागणे गरजेचे आहे, अन्यथा अशा बेकायदा कृत्यांचे नांदेड मॉडेल सर्वत्र पायंडा पाडेल.1
- नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोहळी येथील हनुमान मंदिर परिसरात भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून हे शिबीर भरवण्यात आले असून, यासाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे संयुक्त सहकार्य लाभले आहे.1
- नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघ, नांदेड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव आणि कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे.1
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हजारो शेतकऱ्यांच्या कर्जराशीमध्ये मोठा तफावत दिसून आला आहे. प्रत्यक्ष कर्ज, यादीतील रक्कम आणि आधार प्रमाणीकरणानंतर दिसणारी रक्कम यामध्ये मोठा फरक असल्याने शेतकरी खूपच संभ्रमात आहेत. शासनाने शेतकऱ्यांशी पारदर्शकता ठेवून तात्काळ खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्व त्रुटी दुरुस्त करण्याची आणि पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यासंदर्भात आज दिनांक 27 जुलै रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे तात्काळ याद्या दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत मोठा घोटाळा उघड झाल्याचे आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केले आहेत.1
- शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.1
- देशातील परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परीक्षा पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली या हाय पॉवर टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. ही टास्क फोर्स परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, तिची सुरक्षितता वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवणार आहे.1
- उमरखेड खरेदी-विक्री संघाच्या कामात मनमानी कारभार चालला असून शासनाची कोणतीही रॉयल्टी न घेता हजारो ब्रास मुरुम थेट बाजारात विकला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराने स्वतःच्या मर्जीने हजारो ब्रास मुरुमाची बाजारात विक्री केली आहे. शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता मनमानी पद्धतीने मुरुमाची विक्री केल्याप्रकरणी आणि खरेदी-विक्री संघाच्या या कारभारावर आता सामान्य नागरिकांमधून थेट सवाल उपस्थित केले जात आहेत.1
- नांदेड येथील शाकुंतल स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील 'शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी' या भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना संस्कृतीचा वारसा लाभावा आणि संस्कृतीची जाण व्हावी या हेतूने शाळेतर्फे सर्व सणांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या दिंडीमध्ये विविध प्रकारचे देखावे सादरीकृत करण्यात आले असून त्याद्वारे सामाजिक संदेशही देण्यात आला. अतिशय मोठ्या उत्साहात ही दिंडी पार पडली.1