महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत देगलूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीच्या प्रांगणात २३ जुलै ते २५ जुलै २०२६ दरम्यान पशुपालकांसाठी तीन दिवसांची तांत्रिक कार्यशाळा संपन्न झाली. नांदेड जिल्ह्याचे दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यशाळेत देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव आणि कंधार या पाच तालुक्यांतील ९१६ पशुपालकांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातील युवक, महिला व शेतकऱ्यांना पशुपालनातून स्वावलंबी बनवणे आणि शेतीला जोडधंदा म्हणून अधिक उत्पन्न मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेत शेळीपालन, दुग्धव्यवसाय, आधुनिक पशुपालन व्यवस्था, संतुलित आहार, रोगप्रतिबंधक उपाययोजना, लसीकरण, प्रजनन व्यवस्थापन, आर्थिक नियोजन आणि शासकीय अनुदान योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. आर. व्ही. सुरेवाड, डॉ. गौतम खिल्लारे, डॉ. रोहित धुमाळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाशमवार आणि उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. आर. व्ही. सुरेवाड व डॉ. सुरेश पाशमवार यांच्या हस्ते पशुपालकांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता प्रशिक्षण प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत देगलूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीच्या प्रांगणात २३ जुलै ते २५ जुलै २०२६ दरम्यान पशुपालकांसाठी तीन दिवसांची तांत्रिक कार्यशाळा संपन्न झाली. नांदेड जिल्ह्याचे दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यशाळेत देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव आणि कंधार या पाच तालुक्यांतील ९१६ पशुपालकांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातील युवक, महिला व शेतकऱ्यांना पशुपालनातून स्वावलंबी बनवणे आणि शेतीला जोडधंदा म्हणून अधिक उत्पन्न मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेत शेळीपालन,
दुग्धव्यवसाय, आधुनिक पशुपालन व्यवस्था, संतुलित आहार, रोगप्रतिबंधक उपाययोजना, लसीकरण, प्रजनन व्यवस्थापन, आर्थिक नियोजन आणि शासकीय अनुदान योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. आर. व्ही. सुरेवाड, डॉ. गौतम खिल्लारे, डॉ. रोहित धुमाळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाशमवार आणि उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. आर. व्ही. सुरेवाड व डॉ. सुरेश पाशमवार यांच्या हस्ते पशुपालकांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता प्रशिक्षण प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
- महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत देगलूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीच्या प्रांगणात २३ जुलै ते २५ जुलै २०२६ दरम्यान पशुपालकांसाठी तीन दिवसांची तांत्रिक कार्यशाळा संपन्न झाली. नांदेड जिल्ह्याचे दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यशाळेत देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव आणि कंधार या पाच तालुक्यांतील ९१६ पशुपालकांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातील युवक, महिला व शेतकऱ्यांना पशुपालनातून स्वावलंबी बनवणे आणि शेतीला जोडधंदा म्हणून अधिक उत्पन्न मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेत शेळीपालन, दुग्धव्यवसाय, आधुनिक पशुपालन व्यवस्था, संतुलित आहार, रोगप्रतिबंधक उपाययोजना, लसीकरण, प्रजनन व्यवस्थापन, आर्थिक नियोजन आणि शासकीय अनुदान योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. आर. व्ही. सुरेवाड, डॉ. गौतम खिल्लारे, डॉ. रोहित धुमाळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाशमवार आणि उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. आर. व्ही. सुरेवाड व डॉ. सुरेश पाशमवार यांच्या हस्ते पशुपालकांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता प्रशिक्षण प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.2
- नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघ, नांदेड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव आणि कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे.1
- नांदेडच्या नवा मोंढा भागातून एक अतिशय प्रेरणादायी बातमी समोर आली आहे अर्थात, ही प्रेरणा कायद्याचे धिंडवडे कसे काढावेत, यासाठी आहे. २४ जुलै रोजी एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) दुकान क्रमांक १२,नवा मोंढा नांदेड येथील ताडी/सिंदी दुकानावर धाड टाकली. गुन्हा काय? तर ताडी खरेदीचे बिल नाही आणि वाहतुकीची बिल्टीही नाही. परिणामी, प्रशासनाने तत्परता दाखवत दुकानाचे परवाना रद्द केला आणि दुकान बंद करण्याचे आदेश दिले. पण खरी जादूतर दुसऱ्या दिवशी घडली. ज्या दुकानाचे लायसन्स रद्द झाले होते, ते २५ जुलैला पुन्हा एकदा जोमात सुरू झाले! जणू काही एफडीएचे आदेश म्हणजे कागदाचा तुकडा आणि प्रशासनाची कारवाई म्हणजे निव्वळ फार्स असावा. प्रशासकीय मोदक आणि झोपलेले अधिकारीमुंबईत बसून तुकाराम मुंडे शिस्तीचे डोस पाजत असताना, नांदेडमधील स्थानिक प्रशासन मात्र मोदकांच्या नादी लागून नंबरच्या कारभारात गुंतले आहे की काय, असा प्रश्न पडतो. ज्या दुकानावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांची होती, त्याच दुकानात ग्राहकांची वर्दळ सुरू असताना हे अधिकारी नेमके कोणत्या विश्वात मग्न होते? दुकानाचे अनोखे व्यवस्थापनया दुकानाची गंमत अशी की, मालक नांदेडमध्ये राहतच नाही. काही स्थानिक युवक हे दुकान एजन्सी तत्त्वावर चालवत आहेत. मालक नाही, अधिकृत कागदपत्रे नाहीत, तरीही दुकान ऑलवेज सुरू आहे! कायद्याची भीती नसलेले हे धाडस पाहून सामान्य जनतेने थक्क व्हायचे की प्रशासनाच्या नाकर्तेपणावर हसायचे? पुरावे उपलब्ध, कारवाई कधी? दुकान २४ तासांत पुन्हा सुरू झाल्याचे छायाचित्रे आणि व्हिडिओ पुरावे म्हणून उपलब्ध आहेत. आता प्रश्न हा उरतो की, तुकाराम मुंडे यांच्या आदेशाचा असा सरेआम घात करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का? की केवळ कागदावर परवाने रद्द करून प्रशासन आपले हात झटकून मोकळे होणार? जर कायद्याचे राज्य असेल, तर या जादूई ताडी/सिंधी दुकानाला पुन्हा टाळे लागणे गरजेचे आहे, अन्यथा अशा बेकायदा कृत्यांचे नांदेड मॉडेल सर्वत्र पायंडा पाडेल.1
- नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोहळी येथील हनुमान मंदिर परिसरात भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून हे शिबीर भरवण्यात आले असून, यासाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे संयुक्त सहकार्य लाभले आहे.1
- लातूर शहरात आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात एक भव्य महामोर्चा निघाला. हजारोच्या संख्येने समाज बांधव, शहरातील आणि जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, आणि नगरसेवक या महामोर्चात सहभागी झाले. हा मोर्चा अण्णाभाऊ साठे चौकातून निघाला. आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या महामोर्चातून आपली भूमिका बजावली.1
- NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक इशारा दिला आहे.1
- देशातील परीक्षा व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परीक्षा पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली या हाय पॉवर टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. ही टास्क फोर्स परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, तिची सुरक्षितता वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवणार आहे.1
- नांदेड येथील शाकुंतल स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील 'शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी' या भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना संस्कृतीचा वारसा लाभावा आणि संस्कृतीची जाण व्हावी या हेतूने शाळेतर्फे सर्व सणांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या दिंडीमध्ये विविध प्रकारचे देखावे सादरीकृत करण्यात आले असून त्याद्वारे सामाजिक संदेशही देण्यात आला. अतिशय मोठ्या उत्साहात ही दिंडी पार पडली.1