कु.चेतना हिरे हिला शालेय जीवनात स्वप्नांना पंख देणाऱ्या श्रीम.पी डी बडोला माध्यमिक विद्यालय वरखेडी येथील शिक्षिका सौ. संगीता सूर्यवंशी मॅडम कु.चेतना हिरे हिला शालेय जीवनात स्वप्नांना पंख देणाऱ्या श्रीम.पी डी बडोला माध्यमिक विद्यालय वरखेडी येथील शिक्षिका सौ. संगीता सूर्यवंशी मॅडम “आयुष्यात काही व्यक्ती अशा भेटतात, ज्या नकळत आपल्या आयुष्याला नवी दिशा देऊन जातात. त्यांच्या एका प्रोत्साहनामुळे आपल्यातील सुप्त गुणांना नवे पंख मिळतात आणि आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा मिळते. माझ्या शालेय जीवनातही अशीच एक व्यक्ती मला लाभली त्या म्हणजे माझ्या मराठीच्या शिक्षिका सौ. संगीता सूर्यवंशी मॅडम. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान शिकवले नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवायला आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला शिकवले.” माझे इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित श्रीमती प्याराबाई धनराज बडोला माध्यमिक विद्यालय, वरखेडी ता. पाचोरा जि. जळगाव येथे झाले. पाचवी ते सातवीपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात, तर आठवी ते दहावीपर्यंत दुपारच्या सत्रात भरायची.लहानपणापासूनच मला बोलण्याची आणि लिहिण्याची खूप आवड होती; मात्र ती आवड फक्त शाळेपुरतीच मर्यादित होती. आठवीत गेल्यानंतर माझा परिचय मराठीच्या शिक्षिका सौ. संगीता सूर्यवंशी मॅडम यांच्याशी झाला आणि माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली. मॅडमनी माझ्यातील लिखाण आणि वक्तृत्वाची आवड ओळखली आणि मला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. आजही मला तो दिवस स्पष्ट आठवतो… सन २०१८ मध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पाचोरा तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक शाळेतून तीन निबंध पाठवायचे होते. तेव्हा मॅडमनी मला सांगितले, “तू निबंध लिही, आपण तो स्पर्धेसाठी पाठवूया.” परंतु मी थोडी घाबरले होते. मी मॅडमना म्हणाले, “मला निबंध लिहिताच येत नाही… मी कसा लिहू?” तेव्हा मॅडमनी केवळ मला धीरच दिला नाही, तर निबंध कसा लिहायचा, परिच्छेद कसे मांडायचे, मुद्दे कसे मांडायचे, अगदी ओळी काढण्यापासून ते विचारांची मांडणी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट अत्यंत संयमाने शिकवली. आणि त्यांच्या त्या अमूल्य मार्गदर्शनामुळे माझा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक आला. ते बक्षीस माझ्या आयुष्यातील पहिलेच बक्षीस होते. त्या दिवशी मला जितका आनंद झाला होता, त्याहून अधिक आनंद मॅडमना झाला होता; कारण त्यांच्या विश्वासाला मी सार्थ ठरवले होते. त्या दिवसापासून मॅडमनी सतत मला प्रोत्साहन दिले. “तू यापेक्षाही अधिक चांगलं करू शकतेस,” हा त्यांचा विश्वास माझ्यात आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला. पुढील वर्षी शेंदुर्णी संस्थेचे संस्थापक कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव रघुनाथराव गरुड यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यांच्याबद्दल माझ्याकडे काहीच माहिती नव्हती. पण मॅडमनी मला त्यांच्या जीवन कार्यावर असलेले पुस्तक दिले,योग्य मार्गदर्शन केले, माहिती कशी शोधायची, मुद्देसूद मांडणी कशी करायची हे शिकवले. त्यांच्या सहकार्यामुळे त्या वर्षी माझा जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक आला. त्यानंतरच्या वर्षीही हीच स्पर्धा आयोजित करण्यात आली; मात्र त्या वेळी मॅडमची बदली दुसऱ्या गावी झाली होती. मला वाटले होते की आता मला मार्गदर्शन करणारे कोणीच राहिले नाही. पण मॅडमनी पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवत सांगितले, “तू निबंध लिही… मी नक्की तुला मार्गदर्शन करेन.” त्यांच्या त्या शब्दांनी पुन्हा माझ्यात नवी उमेद निर्माण झाली आणि त्या वर्षीही मी यश संपादन केले. शालेय जीवनात त्यांनी मला केवळ मार्गदर्शनच केले नाही, तर माझ्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून दिले. माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले आणि स्वप्न पाहण्याची हिंमत दिली. आज शाळा सोडून पाच वर्षे झाली असली, तरी त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे शब्द आणि त्यांनी दिलेली प्रेरणा आजही माझ्यासोबत कायम आहे. शिक्षक हे फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यालाही योग्य दिशा देत असतात. माझ्या आयुष्यात संगीता सूर्यवंशी मॅडम या अशाच एका प्रेरणादायी शिक्षिका ठरल्या. त्यांनी माझ्यातील गुण ओळखले, मला घडवले आणि प्रत्येक वेळी माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणूनच आजही माझ्या प्रत्येक यशामागे त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि आशीर्वादाचा मोठा वाटा आहे. खरंच, आयुष्यात काही शिक्षक हे फक्त शिक्षक राहत नाहीत… ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा कायमस्वरूपी प्रेरणास्रोत बनून जातात. कु. चेतना रणदीप हिरे

- जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.1
- महसूल पथकाला हुलकावणी देत माटरगावयेथे ट्रॅक्टरसह चालक फरार शासकीय वाहनालाच अडवून जीवघेणा पाठलाग, चालकावर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर मंडळातील माटरगाव शिवारात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडला. तरीही चालकाने चलाखीने ट्रॅक्टर पळवला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या - प्रकरणी सुलतानपूर मंडळ अधिकारी अनुना कावळे यांनी खुलताबाद ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किरण गायकवाड (रा. सुलतानपूर वर गुन्हा दाखल झाला. मंडळ अधिकारी कावळे यांना ८ मे रोजी फुलमस्ता नदीपात्रातून काही जण अवैधरित्या वाळूचे उत्खनन, वाहतूक करत असल्याचे सांगण्यात आले. ९ मे पहाटे महसूल पथक कारवाईसाठी रवाना झाले.तपासणी सुरू असताना तेथे दुधाची गाडी आली. त्या वाहनाला रस्ता देण्याच्या बहाण्याने चालकाने ट्रॅक्टर बाजूला घेतल्याचे भासवत सुलतानपूरच्या दिशेने धूम ठोकली. पथकाने पाठलाग केला. मात्र ट्रॅक्टरने ओव्हरटेक करू दिले नाही.पथकात अनुना कावळे, शेख मोयुनोदिन, सविता वाहटुळे होते. यावेळी ट्रॅक्टर चालकाने माझ्याकडे परवाना नाही. काय करायचे ते करून घ्या, असे म्हणाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.4
- महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.1
- बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.1
- घाटी रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर नातेवाईकांचा संताप रिकाम्या रूम असूनही रुग्णांना बेड नाही. घाटी रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर नातेवाईकांचा संताप रिकाम्या रूम असूनही रुग्णांना बेड नाही; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप नागरिकांनी केले आहे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 2, 8, 19 आणि 37 मध्ये अनेक रूम रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड व रूम उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टर व त्यांच्या नातेवाईकांसाठीच या रूम राखीव ठेवण्यात आल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, रुग्ण गंभीर अवस्थेत असतानाही “बेड उपलब्ध नाही”, “रूम खाली नाही” अशी उत्तरे दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक रूम रिकाम्या दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत विचारणा केल्यावर काही कर्मचाऱ्यांनी “आम्हाला शिकवू नका”, “कोणाला रूम द्यायची हे आम्हाला माहिती आहे”, असे उद्धट उत्तर दिल्याचाही आरोप करण्यात आला.रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले की, घाटी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी गादी, बेड किंवा योग्य उपचार व्यवस्था नसल्याने रुग्णांना जमिनीवर किंवा जिथे जागा मिळेल तिथे थांबावे लागत आहे. “घाटी हे फक्त नावापुरते गरीबांचे रुग्णालय आहे का?” असा सवाल संतप्त नातेवाईकांनी उपस्थित केला. याशिवाय, डॉक्टर वेळेवर रुग्ण तपासण्यासाठी येत नसल्याचा तसेच काही डॉक्टर सतत मोबाईलवर व्यस्त असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येत असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. तक्रार करण्यासाठी पुढे गेलेल्या काही नातेवाईकांना सुरक्षा रक्षकांकडून दमदाटी व मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराला कंटाळून काही नातेवाईकांनी आपल्या रुग्णांना घाटीतून हलवून हेगडेवार रुग्णालयात दाखल केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे घाटी रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.1
- नंदुऱ्यामध्ये 'रियांश अमृत ज्यूस'ने सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करत असल्याचा दावा केला आहे. 'हर हर रियांश, हर घर रियांश' या घोषणेसह हे उत्पादन घरोघरी पोहोचवले जात आहे. या ज्यूसच्या परिणामकारकतेबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चा सुरु आहे.1
- औरंगाबादच्या वाळूज पोलीस स्टेशनजवळ भीषण अपघात झाला, ज्यात एक महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदत केली.1
- हरियाणामुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज पश्चिम बंगालला भेट दिली. यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीला नमन करत नवीन सरकारच्या स्थापनेबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील 'विकसित भारता'च्या संकल्पात पश्चिम बंगाल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले.1
- अतिक्रमण कारवाईची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार दिव्यांग महिला माठ विक्रेती नाही तर भिक्षेकरी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधील सेव्हन हिल्स ते शाहनूरमियाँ दर्गा दरम्यान झालेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर, प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्यासाठी एका दिव्यांग महिलेचा खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी केली. तेव्हा व्हिडिओत दिसणाऱ्या दिव्यांग महिलेचा माठ विक्री व्यवसायाशी कोणताही संबंध नाही. काही समाजकंटकांनी प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण करण्यासाठी तिचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.2