८ लाखांचा मुद्देमाल जप्त; लिफ्टचा बहाणा अन् गळ्याला हात, वृद्ध महिलांना लुटणारी टोळी जेरबंद! कर्जत / प्रतिनिधी : लिफ्ट देण्याचा बहाणा करायचा, निर्जन ठिकाणी वाहन थांबवायचे आणि संधी साधून वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढायचा... विरोध झाला तर थेट जीवे मारण्याची धमकी! अशा धक्कादायक पद्धतीने वृद्ध महिलांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. नागलवाडी–मिरजगाव रस्त्यावर ६५ वर्षीय महिलेचे मंगळसूत्र लुटणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आले असून, चौकशीत पाथर्डी परिसरातील अशाच एका गुन्ह्याचीही कबुली मिळाली आहे. कोमल भाऊसाहेब नन्नवरे (३०, डावरवाडी, ता. पैठण) आणि लक्ष्मण मोहन जामदार (२६, कोकणगाव, ता. श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हुंडाई ऑरा कार, सोन्याचे दागिने, मोबाईल व नंबर प्लेट असा तब्बल ८ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २० ऑगस्ट रोजी द्वारकाबाई उत्तम डाडर या मिरजगावला जाण्यासाठी नागलवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ वाहनाची वाट पाहत होत्या. यावेळी पांढऱ्या रंगाची कार थांबली. वाहनातील पुरुष व महिलेने मिरजगावला जात असल्याचे सांगत लिफ्ट दिली. काही अंतरावर जुन्या बंद पेट्रोल पंपाजवळ चालकाने लघुशंकेचा बहाणा करून कार थांबवली. त्यानंतर वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न सुरू झाला. महिलेने प्रतिकार करताच तिचे तोंड दाबण्यात आले. कारमधील महिलेनेही गळ्यातील सुमारे सात ग्रॅमचे मणीमंगळसूत्र ओढून काढले. आरडाओरड केल्यास गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या आदेशानंतर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे २५ ऑगस्ट रोजी कोमल नन्नवरे हिला तारकपूर बसस्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तिच्या माहितीवरून लक्ष्मण जामदार हा कारमधून अहिल्यानगरच्या दिशेने येत असल्याचे समोर आले. त्यानंतर सापळा रचून त्यालाही कोंबडीवाला मळा परिसरात पकडण्यात आले. चौकशीत आरोपींनी नागलवाडीतील गुन्ह्याची कबुली देतानाच पाथर्डी–अहिल्यानगर रस्त्यावर एका वृद्ध महिलेला लिफ्ट देऊन तिचे मंगळसूत्र लुटल्याची आणि तिला गाडीतून खाली ढकलल्याची माहिती दिली. त्यामुळे पाथर्डी पोलिस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. ९८०/२०२६ही उघडकीस आला आहे. या टोळीने आणखी किती महिलांना अशाच पद्धतीने लक्ष्य केले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. जामदारकडून विनाक्रमांकाची हुंडाई ऑरा कार, एमएच ४२ बीएन ८९९९ नंबर प्लेट, सहा ग्रॅम सोन्याचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाथर्डीतील लुटीचे दागिने आपल्याकडे असल्याचे त्याने सांगितले, तर नागलवाडीतील दागिने विकून मिळालेली रक्कम बँक खात्यात जमा केल्याचेही तपासात समोर आले. या कारवाईत फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, जालिंदर साखरे, प्रशांत राठोड व ज्योती शिंदे यांनी सहभाग घेतला. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चौकट : लिफ्टच्या आमिषाला बळी पडू नका! वृद्ध, महिला तसेच एकट्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना हेरून लिफ्टच्या बहाण्याने लुटण्याचा प्रकार गंभीर होत आहे. अनोळखी वाहनातून लिफ्ट घेणे टाळावे आणि संशयास्पद व्यक्ती अथवा वाहन आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

- नेपाळ मधील आलेल्या पुराचे रौद्र रूप. डोळ्यात पाणी आणणारी दृश्य.1
- 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..1
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.1
- Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे! Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!1
- मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) मुप्टा बीड जिल्हा च्या वतीने तीव्र निदर्शने : शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित रहा: प्रा शशिकांत जावळे (जिल्हा सचिव) बीड: (महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन.)मुप्टा चे संस्थापक सचिव प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय जिल्हा परिषद, बीड येथे तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. *प्रमुख मागण्या:* 1)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करण्यास कारणीभूत ऑनलाइन संच मान्यतेत टाकण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता देण्यात याव्यात. 2) इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गाच्या प्रात्यक्षिक बॅच चा कार्यभार 30 विद्यार्थ्या ऐवजी प्रति 20 विद्यार्थ्या ची बॅच प्रचलित पूर्वीसारखे कायम करावी. 3) शिक्षकांचे प्रलंबित देयके (वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक ,निवड श्रेणी फरक आदी.) तात्काळ अदा करावीत. 4) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रस्ताव तात्काळ निकाली काढावीत. 5) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे बंद केलेले जीपीएफ खाते तात्काळ पूर्ववत करावीत. 6) सातव्या वेतन आयोगामधील पाचवा हप्ता रोखीने अदा करावा. 7) सर्व शिक्षकांचे जीपीएफ खाते तात्काळ ऑनलाइन करून ऑनलाईन स्लिप वितरित कराव्यात . 8) अनुदान प्रचलित टप्पा वाढ देण्यात यावा. 9) सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे , जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे ,ज्युनियर विभाग चे जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे, जिल्हा सचिव शैलेश चिलवंत आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.शिक्षकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या निदर्शनास बहुसंख्येने उपस्थित राहावे.1
- *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे *नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड व मुख्य अभियंता औ.वि केंद्र यांनी लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे* बीड दि. २१ (प्रतिनिधी) रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी व औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पिराजी पतंगे यांनी १५ आॅगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली होती . आज आंदोलनाचा 7 वा दिवस सुरू झाला तरी त्यांचे अन्नत्याग उपोषण सुरूच होते, जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर आज ते टोकाची भूमिका घेतील असा इशारा संघटनेच्या वतीने दिला होता. त्याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी लेखी पत्र दिल्यामुळे सलग सात दिवस सुरू असलेले अन्नत्याग उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले, अशी माहिती कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्या अधिनस्थ कंत्राटदाराकडून कंत्राटी कामगारांना किमान वेतन अधिनियम व प्रचलित कामगार कायद्याच्या सोई सवलतीचा लाभ आजतागायत मिळत नाही तो मिळावा, शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन परिपत्रक / आदेश निर्गमित केले त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत नसल्याने त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ मिळवून देण्यासाठी अन्नत्याग उपोषणाचे हत्यार उपसले होते. अखेर ७ व्या दिवशी लोकशाही मार्गाने आंदोलन केले त्याला यश मिळाले.वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर मुख्य अभियंता यांनी दि . २४ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त बैठक आयोजित केली , तर घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना येत्या १५ दिवसात त्यांचे मूलभूत अधिकार व हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी लेखी पत्र देऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे सादर केला जाईल असे लेखी पत्र दिले. नगरपरिषद बीड च्या सफाईची निविदा काढून कामगारांना लवकरच कामावर रुजू करण्यात येईल असे लेखी पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद बीड यांनी दिल्यामुळे सलग ७ दिवस सुरू असलेले भाई राजेश कुमार जोगदंड यांचे अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले. अपर जिल्हादंडाधिकारी यांचे प्रतिनिधी महसूल सहायक शिवाजी पाटील यांनी वीज कंत्राटी कामगार वैजनाथ पतंगे यांना लिंबू सरबत दिले तर जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांचे प्रतिनिधी सुधाकर नागरगोजे, किशोर डमाले यांनी रोजंदारी मजदुर सेना मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड तथा सफाई कामगारांचे प्रतिनिधी यांना जलपान देऊन अन्नत्याग उपोषणाची सांगता केली, सदरील आंदोलनास भारतीय दलित पँथर चे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे सर, बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी पाठिंबा दिला होता. अशी माहिती रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.1
- अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे1
- निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.4