Shuru
Apke Nagar Ki App…
जिल्हा प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम संपन्न.. अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाले
विदर्भ शासन न्यूज..
जिल्हा प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम संपन्न.. अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाले
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जिल्हा प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम संपन्न.. अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाले1
- तांदुळवाडी येथील करुणा बुध्द विहारात प्रवित्र ग्रंथ मिलिंद प्रश्न पठणास आंरभ तांदुळवाडी येथील करुणा बुध्द विहारात प्रवित्र ग्रंथ मिलिंद प्रश्न पठणास आंरभ अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील तांदुळवाडी येथील करुणा बुद्ध विहार चैरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि. २९ जुलै रोजी आषाढ पौर्णिमे पासुन वर्षावास प्रारंभ करण्यात आला.सदर वर्षावास आषाढ पौर्णिमा ते आश्वीन पौर्णिमा या तीन महीन्याच्या कालावधी मध्ये येथील बुद्धविहारामध्ये पवित्र ग्रंथ मिलीद प्रश्न, पठणाला सुरवात झाली असुन ट्रस्टच्या वतीने समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी पवीत्र ग्रंथ ट्रस्ट चे अध्यक्ष राजुभाऊ रायबोले यांनी पठण करावा अशी विनंती करण्यात आल्या नंतर अध्यक्षांनी सर्वाची विनंती स्वीकारून ग्रंथ पठणाला सुरवात केली. यावेळी ट्रस्ट चे उपाध्यक्ष साहेबराव गवारगुरु, ट्रस्टचे कोषाध्यक्ष माणिकराव रायबोले, सचिव सुनील वानखडे, सदस्य बाळकृष्ण रायबोले, शरद बगाडे, डॉ.देविदास आठवले, अशोक रायबोले, व धम्म जागृती उपासिका संघाच्या अध्यक्षा आशाबाई रायबोले, विद्या रायबोले, नर्मदा रायबोले, शिलाबाई हातोले, नंदा गवारगुरु, ललीता गवारगुरु, प्रभावती रायबोले, संध्या पाखरे ,नंदा गायकवाड, दुर्गाबाई रायबोले, बेबी वानखडे, बेबी रायबोले, कांता रायबोले, शेंगाबाई रायबोले, ज्योती आठवले, दुर्गाबाई भारसाकडे, सुर्यकांता आठवले,विद्या जिवन रायबोले ,संगीता आठवले वंदना हातोले,शारदा निशांत रायबोले, कमलाबाई रायबोले, निता वानखडे ,रजनी पाखरे, सुमित्रा इंगळे,सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक सदर मिलिंद प्रश्न या पवित्र ग्रंथाचा आंनद घेत आहेत.या ग्रंथाच्या समारोप कार्यक्रम मोठ्या हर्षात साजरा करण्यात येणार असल्याचे समजते.4
- दहीहंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव" या विचारांना प्रेरणा मानत त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी1
- महावितरण च्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू;खा.बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीनंतरच मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांची सहमती1
- तिरंगा विजय जल्लोष साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा तिरंगा विजय जल्लोष साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा1
- *पेडगाव येथे भरधाव ट्रक दुकानात घुसला; मोठे आर्थिक नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे पेडगाव : छत्रपती संभाजीनगर–नागपूर समृद्धी महामार्गावरील पेडगाव परिसरात रविवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेला एपी 21 एटी 4376 क्रमांकाचा ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या एका व्यापाऱ्याच्या दुकानात घुसला. या अपघातामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ट्रकचा वेग अतिशय जास्त होता. अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुकानावर आदळला. धडकेचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेत घटनास्थळी गर्दी केली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. या अपघातात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुकानात ठेवलेल्या दोन गणपती मूर्ती पूर्णपणे तुटल्या. तसेच दुकानातील इतर साहित्याचेही नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचा नेमका अंदाज अद्याप समोर आलेला नाही. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी दुकान बंद असल्याने आणि परिसरात कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली. अन्यथा हा अपघात अधिक गंभीर ठरू शकला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रक हटविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक भरधाव वेगात असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघातामागील नेमके कारण तांत्रिक बिघाड, चालकाचा निष्काळजीपणा की अन्य काही, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या घटनेनंतर समृद्धी महामार्गालगत असलेल्या दुकानांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.3