logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दहीहंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव" या विचारांना प्रेरणा मानत त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी

12 hrs ago
user_पत्रकार Dipak Bhande
पत्रकार Dipak Bhande
अकोले, अकोला, महाराष्ट्र•
12 hrs ago

दहीहंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव" या विचारांना प्रेरणा मानत त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दहीहंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव" या विचारांना प्रेरणा मानत त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी
    1
    दहीहंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
"जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव" या विचारांना प्रेरणा मानत त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी
    user_पत्रकार Dipak Bhande
    पत्रकार Dipak Bhande
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जिल्हा प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम संपन्न.. अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाले
    1
    जिल्हा प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम संपन्न.. 
अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाले
    user_विदर्भ शासन न्यूज..
    विदर्भ शासन न्यूज..
    दर्यापूर, अमरावती, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • तांदुळवाडी येथील करुणा बुध्द विहारात प्रवित्र ग्रंथ मिलिंद प्रश्न पठणास आंरभ तांदुळवाडी येथील करुणा बुध्द विहारात प्रवित्र ग्रंथ मिलिंद प्रश्न पठणास आंरभ अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील तांदुळवाडी येथील करुणा बुद्ध विहार चैरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि. २९ जुलै रोजी आषाढ पौर्णिमे पासुन वर्षावास प्रारंभ करण्यात आला.सदर वर्षावास आषाढ पौर्णिमा ते आश्वीन पौर्णिमा या तीन महीन्याच्या कालावधी मध्ये येथील बुद्ध‌विहारामध्ये पवित्र ग्रंथ मिलीद प्रश्न, पठणाला सुरवात झाली असुन ट्रस्टच्या वतीने समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी पवीत्र ग्रंथ ट्रस्ट चे अध्यक्ष राजुभाऊ रायबोले यांनी पठण करावा अशी विनंती करण्यात आल्या नंतर अध्यक्षांनी सर्वाची विनंती स्वीकारून ग्रंथ पठणाला सुरवात केली. यावेळी ट्रस्ट चे उपाध्यक्ष साहेबराव गवारगुरु, ट्रस्टचे कोषाध्यक्ष माणिकराव रायबोले, सचिव सुनील वानखडे, सदस्य बाळकृष्ण रायबोले, शरद बगाडे, डॉ.देविदास आठवले, अशोक रायबोले, व धम्म जागृती उपासिका संघाच्या अध्यक्षा आशाबाई रायबोले, विद्या रायबोले, नर्मदा रायबोले, शिलाबाई हातोले, नंदा गवारगुरु, ललीता गवारगुरु, प्रभावती रायबोले, संध्या पाखरे ,नंदा गायकवाड, दुर्गाबाई रायबोले, बेबी वानखडे, बेबी रायबोले, कांता रायबोले, शेंगाबाई रायबोले, ज्योती आठवले, दुर्गाबाई भारसाकडे, सुर्यकांता आठवले,विद्या जिवन रायबोले ,संगीता आठवले वंदना हातोले,शारदा निशांत रायबोले, कमलाबाई रायबोले, निता वानखडे ,रजनी पाखरे, सुमित्रा इंगळे,सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक सदर मिलिंद प्रश्न या पवित्र ग्रंथाचा आंनद घेत आहेत.या ग्रंथाच्या समारोप कार्यक्रम मोठ्या हर्षात साजरा करण्यात येणार असल्याचे समजते.
    4
    तांदुळवाडी येथील करुणा बुध्द विहारात प्रवित्र ग्रंथ मिलिंद  प्रश्न पठणास आंरभ   
तांदुळवाडी येथील करुणा बुध्द विहारात प्रवित्र ग्रंथ मिलिंद  प्रश्न पठणास आंरभ   
अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट तालुक्यातील तांदुळवाडी येथील 
करुणा बुद्ध विहार चैरिटेबल ट्रस्टच्या वतीने 
दि. २९ जुलै रोजी आषाढ पौर्णिमे पासुन वर्षावास प्रारंभ करण्यात आला.सदर वर्षावास आषाढ पौर्णिमा ते आश्वीन पौर्णिमा या तीन महीन्याच्या कालावधी मध्ये येथील बुद्ध‌विहारामध्ये पवित्र ग्रंथ मिलीद प्रश्न, पठणाला सुरवात झाली असुन ट्रस्टच्या वतीने समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी पवीत्र ग्रंथ ट्रस्ट चे अध्यक्ष राजुभाऊ रायबोले यांनी पठण करावा अशी विनंती करण्यात आल्या नंतर अध्यक्षांनी  सर्वाची विनंती स्वीकारून ग्रंथ पठणाला सुरवात केली. यावेळी ट्रस्ट चे उपाध्यक्ष साहेबराव गवारगुरु, ट्रस्टचे कोषाध्यक्ष माणिकराव रायबोले, सचिव सुनील वानखडे, सदस्य बाळकृष्ण रायबोले, शरद बगाडे, डॉ.देविदास आठवले, अशोक रायबोले, व धम्म जागृती उपासिका संघाच्या अध्यक्षा आशाबाई रायबोले, विद्या रायबोले, नर्मदा रायबोले, शिलाबाई हातोले, नंदा गवारगुरु, ललीता गवारगुरु, प्रभावती रायबोले, संध्या पाखरे ,नंदा गायकवाड, दुर्गाबाई रायबोले, बेबी वानखडे, बेबी रायबोले, कांता रायबोले, शेंगाबाई रायबोले, ज्योती आठवले, दुर्गाबाई भारसाकडे, सुर्यकांता आठवले,विद्या जिवन रायबोले ,संगीता आठवले वंदना हातोले,शारदा निशांत रायबोले, कमलाबाई रायबोले, निता वानखडे ,रजनी पाखरे, सुमित्रा इंगळे,सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक सदर मिलिंद प्रश्न या पवित्र ग्रंथाचा आंनद घेत आहेत.या ग्रंथाच्या समारोप कार्यक्रम मोठ्या हर्षात साजरा करण्यात येणार असल्याचे समजते.
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • तिरंगा विजय जल्लोष साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा तिरंगा विजय जल्लोष साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा
    1
    तिरंगा विजय जल्लोष  साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा
तिरंगा विजय जल्लोष  साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • *“जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांची अलोट गर्दी डॉ संजय कुटे यांच्या मेळाव्यातून दूध-केळी क्षेत्रात क्रांतीचा निर्धार!” “जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांची अलोट गर्दी डॉ संजय कुटे यांच्या मेळाव्यातून दूध-केळी क्षेत्रात क्रांतीचा निर्धार!” कुटे गुरुजी फॉउंडेशन चा अभिनव उपक्रम स्व. उमिलाताई श्रीराम कुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीराम कुटे गुरुजी फॉउंडेशन च्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळावा उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. या मेळाव्यास परिसरातील हजारो शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले. स्व उर्मिलाताई कुटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर वक्त्यांचे स्वागत होऊन मुख्य कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. आयोजकाच्या वतीने डॉ काळपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दुध उत्पादन व व्यस्थापन या विषयी नेचर डिलाईट चे प्रमुख अर्जुनराव देसाई आणि सीईओ सिंग यांनी तर केळी या विषयावर आंतरराष्ट्रीय तज्ञ् के बी पाटील यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केले. शेतीमाला करिता कोल्ड स्टोरेज कीती महत्वाचे आहे याबाबत सखोल माहिती राजेंद्र कुटे यांनी केले. मेळाव्यात अचूक आणि शास्त्रोक्त शेतीचा मार्ग स्वीकारल्यास शेतकऱ्यांच्या माध्यमातून भारत जगाच्या उत्पादनात आपला वाटा अधिक मजबूत करू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीस मोठा वाव असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भविष्याचा वेध घेणे आवश्यक असल्याचे वक्त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा उल्लेख करत,आता केवळ उत्पादन नाही, तर मूल्यवर्धन करून दूध आणि केळी क्षेत्रात क्रांती घडवून आणायची आहे,” असा ठाम निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांसाठी एक सक्षम प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला असून, त्याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. मेळाव्यातील सर्व तज्ञ् हे शेतकऱ्यांना भविष्यातही मार्गदर्शन करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असें आश्वासन आ डॉ संजय कुटे यांनी यावेळी दिले, या मेळाव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून,दूध व केळी क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्याचा निर्धार अधिक बळकट झाला आहे. कार्यक्रमाचे शेवटी आ डॉ कुटे यांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या बद्दल शेतकरी बंधुचे आणि नागरिकांचे आभार मानले
    1
    *“जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांची अलोट गर्दी डॉ संजय कुटे यांच्या मेळाव्यातून दूध-केळी क्षेत्रात क्रांतीचा निर्धार!”
“जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांची अलोट गर्दी डॉ संजय कुटे यांच्या मेळाव्यातून दूध-केळी क्षेत्रात क्रांतीचा निर्धार!”
कुटे गुरुजी फॉउंडेशन चा अभिनव उपक्रम
स्व. उमिलाताई श्रीराम कुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीराम कुटे गुरुजी फॉउंडेशन च्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळावा उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. या मेळाव्यास परिसरातील हजारो शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले. स्व उर्मिलाताई कुटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर वक्त्यांचे स्वागत होऊन मुख्य कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. आयोजकाच्या वतीने डॉ काळपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दुध उत्पादन व व्यस्थापन या विषयी नेचर डिलाईट चे प्रमुख अर्जुनराव देसाई आणि सीईओ सिंग यांनी तर केळी या विषयावर आंतरराष्ट्रीय तज्ञ् के बी पाटील यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केले. शेतीमाला करिता कोल्ड स्टोरेज कीती महत्वाचे आहे याबाबत सखोल माहिती राजेंद्र कुटे यांनी केले. 
मेळाव्यात अचूक आणि शास्त्रोक्त शेतीचा मार्ग स्वीकारल्यास शेतकऱ्यांच्या माध्यमातून भारत जगाच्या उत्पादनात आपला वाटा अधिक मजबूत करू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीस मोठा वाव असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भविष्याचा वेध घेणे आवश्यक असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा उल्लेख करत,आता केवळ उत्पादन नाही, तर मूल्यवर्धन करून दूध आणि केळी क्षेत्रात क्रांती घडवून आणायची आहे,” असा ठाम निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांसाठी एक सक्षम प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला असून, त्याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
मेळाव्यातील सर्व तज्ञ् हे शेतकऱ्यांना भविष्यातही मार्गदर्शन करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असें आश्वासन आ डॉ संजय कुटे यांनी यावेळी दिले, या मेळाव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून,दूध व केळी क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्याचा निर्धार अधिक बळकट झाला आहे.
कार्यक्रमाचे शेवटी आ डॉ कुटे यांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या बद्दल शेतकरी बंधुचे आणि नागरिकांचे आभार मानले
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
    1
    जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • खिरोडा नजीक भीषण अपघात; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे जखमींचे प्राण वाचले..! खिरोडा नजीक भीषण अपघात; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे जखमींचे प्राण वाचले! वेळीच धावले मदतीला; गंभीर जखमींना अकोल्यात हलवले, पोलिसांचा तपास सुरू शेगाव | प्रतिनिधी शेगाव–वरवट मार्गावरील खिरोडा गावाजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना पाहताच खिरोडा येथील तरुणांनी मानवतेचा परिचय देत क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत उपचार मिळाल्याने जीव वाचण्याची आशा निर्माण झाली. अपघाताची माहिती मिळताच दादा ठाकूर, गणेश हिवराळे, नवलसिंग पवार, आकाश दंगे, पवन हिवराळे, विश्वजित हिवराळे, निलेश तायडे आणि आदित्य हिवराळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. कोणत्याही प्रकारची वाट न पाहता त्यांनी तातडीने सहृदयी मोटे उपजिल्हा रुग्णालय, शेगाव येथे उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, अपघातातील जखमी ज्ञानेश्वर विठ्ठल आमझरे व त्यांच्या आईची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी दिली. दोघांवरही वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत असून पुढील कारवाई सुरू आहे. "अपघाताच्या क्षणी माणुसकीच सर्वात मोठी ठरते; खिरोडा ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस आणि तत्परता कौतुकास्पद आहे."
    1
    खिरोडा नजीक भीषण अपघात; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे जखमींचे प्राण वाचले..!
खिरोडा नजीक भीषण अपघात; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे जखमींचे प्राण वाचले!
वेळीच धावले मदतीला; गंभीर जखमींना अकोल्यात हलवले, पोलिसांचा तपास सुरू
शेगाव | प्रतिनिधी
शेगाव–वरवट मार्गावरील खिरोडा गावाजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना पाहताच खिरोडा येथील तरुणांनी मानवतेचा परिचय देत क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत उपचार मिळाल्याने जीव वाचण्याची आशा निर्माण झाली.
अपघाताची माहिती मिळताच दादा ठाकूर, गणेश हिवराळे, नवलसिंग पवार, आकाश दंगे, पवन हिवराळे, विश्वजित हिवराळे, निलेश तायडे आणि आदित्य हिवराळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. कोणत्याही प्रकारची वाट न पाहता त्यांनी तातडीने सहृदयी मोटे उपजिल्हा रुग्णालय, शेगाव येथे उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, अपघातातील जखमी ज्ञानेश्वर विठ्ठल आमझरे व त्यांच्या आईची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी दिली. दोघांवरही वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
या घटनेने पुन्हा एकदा या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत असून पुढील कारवाई सुरू आहे.
"अपघाताच्या क्षणी माणुसकीच सर्वात मोठी ठरते; खिरोडा ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस आणि तत्परता कौतुकास्पद आहे."
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.