सु. भा. पाटील प्राथमिक शाळा पाचोरा येथील विद्यार्थी विधान जयश्री कोमल वाघ याने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा; संविधान हाती घेऊन जिंकली सर्वांची मने सु. भा. पाटील प्राथमिक शाळा पाचोरा येथील विद्यार्थी विधान जयश्री कोमल वाघ याने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा; संविधान हाती घेऊन जिंकली सर्वांची मने सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी *विधान जयश्री कोमल वाघ* या विद्यार्थ्याने साकारलेली बाबासाहेबांची वेशभूषा सर्वांसाठी विशेष आकर्षण ठरली. कोट-पॅन्ट, डोळ्यांवर चष्मा आणि हातात भारतीय संविधानाचे पुस्तक घेऊन विधान जेव्हा मंचावर उभा राहिला, तेव्हा क्षणभर सर्वांना साक्षात डॉ बाबासाहेबच समोर उभे आहेत असा भास झाला. त्याच्या चेहऱ्यावरची गंभीरता, चालण्यातला आत्मविश्वास आणि वेशभूषेतील नेमकेपणा यामुळे त्याचे सादरीकरण जिवंत आणि प्रभावी ठरले. उपस्थितानी त्याच्या वेशभूषेचे कौतुक केले आणि सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळून राहिल्या. यानंतर विधानने आपल्या साध्या, सोप्या पण थेट मनाला भिडणाऱ्या गोड आवाजात बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रभावी वक्तृत्व सादर केले. *“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”* हा संदेश त्याने अतिशय सहज आणि ओघवत्या भाषेत मांडला. त्याचा गोड आवाज, स्पष्ट उच्चार आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी यामुळे शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक यांची मने जिंकली. कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांनी विधान वाघच्या या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. लहान वयात एवढी समज, आत्मविश्वास आणि सादरीकरणाची ताकद पाहून सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांविषयी आदर निर्माण होतो, त्यांच्या विचारांची ओळख होते आणि त्यांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. एकूणच, विधान वाघ याच्या जिवंत आणि प्रभावी सादरीकरणामुळे बाबासाहेबांची जयंती अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय ठरली. विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम सर्वांच्या लक्षात राहील, असे वातावरण यावेळी पाहायला मिळाले.

- गॅससाठी जीवावर उदार! एजन्सीसमोरच व्यक्तीने फोडले डोके – प्रशासनावर प्रश्नचिन्ह छत्रपती संभाजीनगर : घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या संतापातून एका ५० वर्षीयv व्यक्तीने स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१६ एप्रिल) दुपारी रांजणगाव शेणपुजी (ता. गंगापूर) येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बालचंद नेमाने (वय ५०, रा. रांजणगाव) हे गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलिंडरसाठी कमल गॅस एजन्सीवर वारंवार चकरा मारत होते. मात्र, सततच्या प्रयत्नांनंतरही त्यांना सिलिंडर मिळाला नाही. शुक्रवारी दुपारी एजन्सीसमोर उभे राहून त्यांनी “घरी बायकोला काय तोंड दाखवू? मुलं उपाशी आहेत...” अशी व्यथा व्यक्त केली. संतापाच्या भरात त्यांनी स्वतःच्या डोक्यावर जोरात मारल्याने त्यांचे डोके फुटले आणि ते रक्तबंबाळ झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना मदत केली व उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रांजणगाव-वालूज परिसरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. एजन्सीवर मोठ्या रांगा लागत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस एजन्सींना घरपोच वितरण करण्याचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्राहकांसाठी आवाहन : गॅस संदर्भातील तक्रारींसाठी1
- धरणगाव (प्रतिनिधी) – मौजे वंजारी ता. धरणगाव येथील शेतकरी श्री. पुरुषोत्तम शंकर चौधरी यांच्या गट क्रमांक 39/2 मधील शेतात आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत सुमारे 80 आर क्षेत्रातील उभे मका पीक पूर्णतः जळून खाक झाले असून 100 टक्के नुकसान झाले आहे. घटनेनंतर तत्काळ पंचनामा करण्यात आला असून तलाठी इफ्तार देशमुख यांनी पाहणी करून अहवाल तयार केला. यावेळी एमएसईबीचे स्थानिक कर्मचारी तसेच गावातील नागरिक तुषार यशवंत चौधरी, ताराचंद अशोक महाजन, नामदेव पांडुरंग पाटील, शंकर भगवान पाटील व शांताराम जगन्नाथ महाजन उपस्थित होते. दरम्यान, अशा प्रकारच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येते.शासनाने त्वरित काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.1
- बोरगांव बाजार येथे विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...2
- वडोद बाजार येथे गिरजा नदीत रात्रीचे दहा वाजून तर सकाळचे पाच वाजता दहा-बारा ट्रॅक्टर आणि टिप्पर लाख रुपयाची वाढू उपसा करत आहे पोलीस यांच्यावर कारवाई करायला पोलीस स्टेशनला फोन लावल्यावर ते सांगते आम्ही गाडी पाठवतो आणि कोणीच पाठवत नाही वाढू ट्रॅक्टरचे हप्ते चालू आहे म्हणून तर याच्यावर काय ॲक्शन नाही मी कंट्रोल रूमलाही फोन केला होता त्यांचाही काय ॲक्शन नाही मी तहसीलदार साहेबांना त्यांचाही काही ॲक्शन नाही असंच चालू राहिला तर सरकार असं लय मोठा नुकसान होईल प्रकृतीचा नुकसान होईल दररोजची लाख रुपाची वाळू उपसा होत आहे आणि प्रशासनाला याच्यावर काही लक्ष नाही1
- धुळे जिल्ह्यात तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर थंड पेये आणि पाणीदार फळांची मागणी वाढली आहे.1
- भोकरदनमध्ये जयंती उत्सव 2026मोठ्या उत्सहात साजरा, जयंती मिरवणुकीत वृद्धसह, तरुण तरुणीनी धरला तालावर ठेका1
- Post by Harshal patil2
- जालना आरटीओ कार्यालयाशेजारी भीषण आग; गायरान जळून खाक जालना शहरातील आरटीओ कार्यालयाच्या शेजारील परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गायरान जमिनीवरील सुकलेल्या गवताने क्षणात पेट घेतल्याने आग वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गायरान क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुकलेल्या गवतामुळे आग अधिक भडकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.1