Shuru
Apke Nagar Ki App…
सेनगाव तालुक्यात विविध परिसरात दमदार पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला सेनगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेती पिकांना मोठे जीवनदान मिळाले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या त्यातच सेनगाव तालुक्यातील विविध परिसरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.
Shankar bhairane
सेनगाव तालुक्यात विविध परिसरात दमदार पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला सेनगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेती पिकांना मोठे जीवनदान मिळाले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या त्यातच सेनगाव तालुक्यातील विविध परिसरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्र. 2 गुरुद्वारा लंगर साहिब व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड. बांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षमित्र हरित नांदेड अभियान - 2026 महा वृक्षलागवड कार्यक्रम शनिवार, दिनांक 8 ऑगस्ट 2026 | स्थळ : श्री हनुमान गड संस्थान शुभहस्ते मा. खा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब महंत श्री गरुडदासजी त्यागी महाराज1
- गवंढाळा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल अपूर्ण; संतप्त ग्रामस्थांचा पंचायत समितीत ठिय्या! खामगाव : तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायती मधील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि विकासकामांच्या अनियमिततेची चौकशी करून पूर्ण अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन मांडले. काही दिवसांपूर्वी गवंढाळा येथील रहिवासी गोपाल सतीश पांढरे आणि महेंद्र रमेश पाटील यांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी गट विकास अधिकारी यांनी १० दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.त्यानुसार आज सोमवारी सादर करण्यात आलेला चौकशी अहवाल अत्यंत अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाने सादर केलेला अहवाल अपूर्ण असून तो आम्हाला अजिबात मान्य नाही.जोपर्यंत सर्व मुद्द्यांची निष्पक्ष चौकशी होऊन पूर्ण अहवाल दिला जात नाही, तोपर्यंत पंचायत समितीतून उठणार नाही. गरज पडल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.4
- अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेशनगर, गोलापांगरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागला असून, या कारवाईत महिंद्रा युवो ५८५ ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बिनविरोध निवड अध्यक्ष तुषार राठोड तर उपाध्यक्ष मिनल खतगावकर1
- कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार ; रोहित पगारीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी खामगाव : येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी करून समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी रोहित पगारीया नामक व्यक्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे लेखी फिर्याद दाखल केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दर गुरुवारी गुरांचा बाजार भरवला जातो. या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या व विक्री होणाऱ्या जनावरांची रीतसर नोंद ठेवली जाते. इयर टॅगिंगशिवाय जनावरांच्या खरेदी-विक्रीवर पूर्णतः बंदी असून सर्व कामकाज कायदेशीर प्रक्रियेनुसार चालते. असे असतानाही, रोहित पगारीया या व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी व शिपायांबद्दल अत्यंत अश्लील व शिवीगाळयुक्त भाषेचा वापर केला. तसेच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातून येणाऱ्या गोवंशाची व नंदीची परस्पर अवैध विक्री सुरू आहे.पास व वैद्यकीय प्रमाणपत्र न बनवता पैसे खाऊन जनावरे कसायांच्या हवाली केली जातात, असा गंभीर व बिनबुडाचा आरोप त्याने केला. याशिवाय त्याने पोलीस प्रशासनाबाबतही बदनामीकारक वक्तव्ये करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारे व दोन समाजांत तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक विधान केले आहे.कोणताही अधिकृत पुरावा नसताना सार्वजनिक व्यासपीठावर खोटी माहिती पसरवून बाजार समितीची प्रतिमा मलीन करणे, शिवीगाळ करणे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणी आरोपी रोहित पगारीयावर विविध कलमांन्वये तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.4
- 📍नांदेड पोलिसांचे उत्कृष्ट कार्य! 👮♂️Excellent Work by Nanded Police! 🚨1