Shuru
Apke Nagar Ki App…
ब्रेकिंग: पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? मोदींचं जनतेला मोठं आवाहन! जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वाढत्या इंधन टंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचा वापर संयमाने करा, शहरात असल्यास मेट्रोचा वापर करा आणि मालवाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य द्या, असे आवाहन मोदींनी केले आहे.
Gaurishankar Dhikar
ब्रेकिंग: पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? मोदींचं जनतेला मोठं आवाहन! जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वाढत्या इंधन टंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचा वापर संयमाने करा, शहरात असल्यास मेट्रोचा वापर करा आणि मालवाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य द्या, असे आवाहन मोदींनी केले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बुलढाणा जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर 'टार्गेट संपले' असे सांगत नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी बंद झाली आहे. यामुळे आधीच नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून व्यापाऱ्यांकडून लुटीचा आरोप आहे. शासनाने तात्काळ खरेदी सुरू न केल्यास राज्यभरात मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.1
- श्री गजानन महाराज संस्थानने शेगाव मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी लागू केली आहे. मंदिर परिसरातील वाढती गर्दी आणि गोंधळामुळे मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल तात्काळ जप्त केला जाईल, असा कडक इशारा संस्थानने दिला आहे.1
- अकोला.बोगस बांधकामामुळे राव नगर मागचा नाला पडला.याला जबाबदार कोण अकोला डाबकी रोड येथील रावनगर मांगे नाल्यावरच बांधकाम सुरु असून नाल्यातलं घाण पाणी उपसा न करता, खाली मास काँग्रॅटिकरण न करता फक्त दोन्ही side ने नाला उभा केला या कडे महानगर पालिकेचे दुर्लक्ष हे सर्व जबाबदारी आयुक्त ची असून तें आणि बांधकाम विभागातील गुजर साहेब या भ्रष्ट नाल्या संदर्भात जबाबदार आहेत. लवकर लवकर महानगर पालिकेच्या ज्या कंत्राटदार / ठेकेदारला हा ठेका दिला होता त्याचा ठेका रद्द करून चौकशी करावी. आणि नाल्यावरच बांधकाम त्वरित थांबवावे. तरी आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर कारवाई करावी. अशी मांगणी येथील नागरिक करत आहेत.4
- नंदुऱ्यामध्ये 'रियांश अमृत ज्यूस'ने सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करत असल्याचा दावा केला आहे. 'हर हर रियांश, हर घर रियांश' या घोषणेसह हे उत्पादन घरोघरी पोहोचवले जात आहे. या ज्यूसच्या परिणामकारकतेबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चा सुरु आहे.1
- येवला/येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप1
- महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.1
- JKV NEWS 24 पेज को लाइक करें शेयर करें फॉलो करें 98814508911
- रिकाम्या रूम असूनही रुग्णांना प्रतीक्षा; घाटीत संतापाची लाट रिकाम्या रूम असूनही रुग्णांना प्रतीक्षा; घाटीत संतापाची लाट छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील अनेक रूम रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले जात नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. वार्ड क्रमांक 2, 8, 19 आणि 37 मध्ये रिकाम्या रूम दिसत असतानाही “बेड नाही” असे सांगितले जात असल्याने नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळत असल्याचा आरोप करत, गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. काही डॉक्टर वेळेवर तपासणीसाठी येत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.1