logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेडमध्ये हळद विषयक खरेदीदार–विक्रेता मेळावा दर्जेदार उत्पादन व निर्यात संधी वाढवण्यावर भर नांदेड :  जागतिक हळद व्यापारात भारताचे नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी दर्जेदार उत्पादन व ट्रेसेबिलिटीचे महत्त्व अधिक असून “हळद उत्पादनासाठी भारताची जागतिक स्तरावर मजबूत ओळख आहे. दर्जा सुधारणा, ट्रेसेबिलिटी आणि मूल्यवर्धन यावर भर दिल्यास आपल्या शेतकरी व उद्योगांसाठी निर्यात संधी अधिक वाढतील, असे प्रतिपादन राष्ट्रीय हळद बोर्डाच्या सचिव  सौ. एन. भवानीश्री यांनी केले.  हळद क्षेत्रातील व्यापार संधी वाढविणे आणि बाजारपेठेतील दुवे मजबूत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय हळद बोर्डाच्यावतीने, स्पायसेस बोर्ड इंडिया यांच्या सहकार्याने आज नांदेड येथील VITS हॉटेलमध्ये हळद विषयक खरेदीदार–विक्रेता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, देशभरातील निर्यातदार, उद्योग प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी झाले.  या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय हळद बोर्डाच्या सचिव सौ. एन. भवानीश्री यांच्या उपस्थितीत झाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे तसेच मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोली येथील प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी हळद मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी शेतकरी, संस्था आणि निर्यातदार यांच्या समन्वयित प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट केले. “खरेदीदार–विक्रेता मेळावे हे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडण्याचे प्रभावी व्यासपीठ असून मूल्यवर्धन व चांगला दर मिळविण्यासाठी नवी संधी निर्माण करतात, असेही त्यांनी सांगितले.  मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोलीचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत संदेश पाठवून हळद-आधारित उद्योग बळकट करण्याचे तसेच शेतकऱ्यांचा मूल्यवर्धन उपक्रमांमध्ये सहभाग वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.  उत्पादकता व गुणवत्ता वाढविण्यासाठी सुधारित शेती पद्धती आणि तंत्रज्ञान विकसित करण्याच्या गरजेवर भर दिल्याचे सांगून संशोधन संस्थांची भूमिका सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी स्पष्ट केली.  कार्यक्रमादरम्यान कृषी विभाग, राज्य शासनाच्या उद्योग विभाग, निर्यातदार संघटना तसेच संशोधन संस्था (मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोली) यांचे तज्ज्ञ यांनी तांत्रिक सत्रे घेतली. या सत्रांमध्ये हळद लागवडीत उत्पादकता व गुणवत्ता वाढविणे, निर्यात दर्जा मानके व अवशेष नियंत्रण, मूल्यवर्धनाच्या संधी तसेच सेंद्रिय हळद उत्पादन तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.  कार्यक्रमात प्रगतिशील शेतकऱ्यांनी सेंद्रिय हळद लागवड व जीआय टॅग प्राप्त वायगाव हळदीच्या विपणनाविषयी अनुभव शेअर केले. तसेच खरेदीदार, निर्यातदार, शेतकरी व FPOs यांच्यातील व्यापार भागीदारी व खरेदी संधींबाबत चर्चेसाठी विशेष नेटवर्किंग सत्र आयोजित करण्यात आले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपसंचालक, स्पायसेस बोर्ड, प्रादेशिक कार्यालय मुंबई सिमांता सैकिया  यांनी स्वागतपर भाषण करून हळद मूल्यसाखळीतील विविध घटकांमध्ये सहकार्य वाढविणे हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे सांगितले. शेवटी  स्पायसेस बोर्ड प्रादेशिक कार्यालय मुंबईच्या सहाय्यक संचालक डॉ. ममता कृष्णा धनकुटे  यांनी आभार मानले.  हा खरेदीदार-विक्रेता मेळावा हळद उत्पादक व निर्यातदार यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी, दर्जेदार उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हळद क्षेत्रात मूल्यवर्धन वाढविण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे.

1 hr ago
user_Info news
Info news
Nanded, Maharashtra•
1 hr ago
a6c0f80f-b0bf-461d-9190-afc4d65c507f

More news from Maharashtra and nearby areas
  • हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीज पोल, डीपी हलविणे, वाढती वीजबिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३३ केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
    1
    हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीज पोल, डीपी हलविणे, वाढती वीजबिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३३ केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    10 hrs ago
  • Post by Info news
    1
    Post by Info news
    user_Info news
    Info news
    Nanded, Maharashtra•
    11 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    15 hrs ago
  • नांदेडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील महिलांनी दिलेल्या शुभेच्छांवर आधारित एक बातमी आहे: नांदेडमध्ये जागतिक महिला दिनाचा उत्साह; कर्तृत्ववान महिलांकडून शुभेच्छांचा वर्षाव नांदेड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वच क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.'नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती' हा मंत्र जपत, पोलीस दल, शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांनी समाजाच्या प्रगतीसाठी आपला संकल्प जाहीर केला विविध क्षेत्रांतील महिलांचा सहभाग नांदेडमधील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, उद्योजिका आणि अंगणवाडी सेविकांपर्यंत सर्वच स्तरातील महिलांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. शहरात ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले असून समाजमाध्यमांवरही (Social Media) शुभेच्छांचा पूर आला आहे प्रामुख्याने पोलीस दलातील महिलांनी "ती सक्षम, ती निडर" अशा घोषणांसह महिला सुरक्षेचा संदेश दिला * जागरूकता अभियान: महिलांचे हक्क, शिक्षण आणि समान संधी या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करून 'सावित्रीच्या लेकी' आपला वारसा पुढे नेत असल्याचे अधोरेखित करण्यात आले * आरोग्य शिबिरे: काही ठिकाणी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. महत्त्वाचा संदेश या निमित्ताने तज्ज्ञ महिलांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, महिला दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तो महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवण्याचा दिवस आहे. "लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण हाच उद्याच्या उज्ज्वल भारताचा पाया आहे," असा सूर या वेळी उमटला एकूणच, नांदेडमध्ये सर्व क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या रणरागिणींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत हा दिवस प्रेरणादायी बनवला आहे.
    4
    नांदेडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील महिलांनी दिलेल्या शुभेच्छांवर आधारित एक बातमी आहे:
नांदेडमध्ये जागतिक महिला दिनाचा उत्साह; कर्तृत्ववान महिलांकडून शुभेच्छांचा वर्षाव
नांदेड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वच क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.'नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती' हा मंत्र जपत, पोलीस दल, शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांनी समाजाच्या प्रगतीसाठी आपला संकल्प जाहीर केला
विविध क्षेत्रांतील महिलांचा सहभाग
नांदेडमधील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, उद्योजिका आणि अंगणवाडी सेविकांपर्यंत सर्वच स्तरातील महिलांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. शहरात ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले असून समाजमाध्यमांवरही (Social Media) शुभेच्छांचा पूर आला आहे प्रामुख्याने पोलीस दलातील महिलांनी "ती सक्षम, ती निडर" अशा घोषणांसह महिला सुरक्षेचा संदेश दिला 
* जागरूकता अभियान: महिलांचे हक्क, शिक्षण आणि समान संधी या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करून 'सावित्रीच्या लेकी' आपला वारसा पुढे नेत असल्याचे अधोरेखित करण्यात आले
* आरोग्य शिबिरे: काही ठिकाणी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.
महत्त्वाचा संदेश
या निमित्ताने तज्ज्ञ महिलांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, महिला दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तो महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवण्याचा दिवस आहे. "लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण हाच उद्याच्या उज्ज्वल भारताचा पाया आहे," असा सूर या वेळी उमटला
एकूणच, नांदेडमध्ये सर्व क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या रणरागिणींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत हा दिवस प्रेरणादायी बनवला आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    17 hrs ago
  • Post by गंगाधर जक्कुलवार
    1
    Post by गंगाधर जक्कुलवार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की स्वाधार योजना २०२५-२६ अंतर्गत मध्ये ज्या कोणाचे अर्ज सेंडबॅक मध्ये आले असतील तर १६ मार्चपूर्वी त्रुटींची पूर्तता करा, अन्यथा लाभमिळण्यात अडचण येईल ! " शिवानंद मीनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांची माहिती
    1
    नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की स्वाधार योजना २०२५-२६ अंतर्गत मध्ये ज्या कोणाचे अर्ज सेंडबॅक मध्ये आले असतील तर १६ मार्चपूर्वी त्रुटींची पूर्तता करा, अन्यथा लाभमिळण्यात अडचण येईल ! " शिवानंद मीनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांची माहिती
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Press Mukhed Bablu Mulla
    2
    Post by Press Mukhed Bablu Mulla
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नांदेड : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानने न्यूझीलंडला चारीमुंड्या चित करत विजेतेपद पटकावल्याचा आनंद नांदेडकरांनी जल्लोषात साजरा केला. अमरनाथ राजुरकर आणि धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून कुसुम सभागृहात मोठ्या पडद्यावर लावण्यात आलेला सामना पाहण्यासाठी शेकडो क्रीडारसिकांनी गर्दी केली होती. यावेळी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेल्या सुमारे २०० आजी-माजी क्रिकेटपटूंचा आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भाजपा नांदेड महानगरच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियममध्ये बसल्याचा आनंद मोफत अनुभवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मोठ्या पडद्यावरील प्रक्षेपणाची सुरुवात नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रविण साले होते.यावेळी कुबेरनगरीचे सतीश सुगनचंदजी शर्मा, डॉ. सचिन उमरेकर, व्यंकटेश जिंदम, नगरसेवक आशिष नेरलकर व राजू यन्नम, बागड्या यादव, शिवप्रसाद राठी, धीरज स्वामी, तौसिफ अहमद, धनंजय नलबलवार, निलेश कुंटूरकर, चंचलसिंघ जट, राजन जोजारे, कर्मचारी नेते रामेश्वर वाघमारे, तहसीलदार रघुनाथसिंह चौहान, रुपेश व्यास, महेंद्र तरटे, राजेश देशमुख ,हरजिंदरसिंघ संधू,संतोष मानधनी आदींची प्रमुख उपस्थिती होती. संयोजक दिलीप ठाकूर, सुरेश लोट, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, प्रकाश उंटवाले, अरुण काबरा, सुरेश निल्लावार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सविता काबरा, स्नेहलता जायस्वाल, शिला जांभळे व रागिणी जोशी, सुषमा हुरणे यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित सर्व महिलांचे स्वागत माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन शीतल खांडील व लक्ष्मण खाडे यांनी केले. या निमित्ताने प्रथमच एकत्र आलेल्या नांदेडच्या सुमारे २०० आजी-माजी क्रिकेटपटूंचा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. नंदू कुलकर्णी यांच्या हस्ते आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये नांदेड भूषण ॲड. मिलिंद एकताटे, राजीव किवळेकर, सुधाकर पाढरे, शिवाजी डहाळे, रतन साडेगावकर, मंगेश कामतीकर, श्याम आडे, बालाजी गिरगावकर, रणजितसिंघ चिरागिया, परविंदरसिंघ रामगडीया,मोहनसिंघ रोडगी,राजू जाधव,रवी पाटील, शंकर नांदेडकर, शैलेश देशमुख, नरेंद्र पटवारी, राजा गायकवाड, प्रसन्न घोगरे, राम शेळके, सचिन चौहान, संतोष औंढेकर, वसंत साबळे यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश होता. अश्या प्रकारचा गौरव पहिल्यांदाच झाल्या मुळे खेळाडूंनी समाधान व्यक्त केले. रमेश मेगदे यांनी पाठविलेला कृतज्ञता संदेशही यावेळी वाचून दाखविण्यात आला. तसेच कमलाकर बिरादार, नरेश दंडवते, करणसिंह बैस, ज्ञानेश्वर सुनेगावकर, धनंजय कुलकर्णी, नकुल जैन,श्रीराम मोटरगे यांच्यासह अनेक माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.तसेच दिलीप ठाकूर यांच्या विविध नव्वद उपक्रमात सहकार्य करणारे अन्नदाते व देणगीदारांच्या गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे १९९५ पासून ॲड. दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सामने नांदेडमध्ये मोठ्या पडद्यावर मोफत दाखवण्याची परंपरा सातत्याने जपत आहेत. आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकाचे आठ आणि ट्वेंटी-२० विश्वचषकाचे दहा असे एकूण अठरा विश्वचषक स्पर्धांचे सामने त्यांनी मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित केले आहेत. २००७ व २०११ मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर तसेच २००७, २०२४ व २०२५ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी शहरात भव्य विजय रॅलीचे आयोजनही केले होते. रोमहर्षक अंतिम सामना पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी अर्धा तास आधीपासूनच प्रचंड गर्दी केल्याने कुसुम सभागृह खचाखच भरले होते. भव्य आणि स्पष्ट प्रक्षेपणामुळे उपस्थितांना स्टेडियममध्ये बसल्याचा अनुभव मिळत होता. भारतीय खेळाडूंच्या प्रत्येक चौकार-षटकाराला जोरदार दाद मिळत होती, तर न्यूझीलंडचे खेळाडू बाद होताच घोषणांनी सभागृह दणाणून जात होते. भारताच्या विजयानंतर प्रेक्षकांनी भांगडा करत आनंद साजरा केला. उपस्थितांनी दिलीप ठाकूर यांना खांद्यावर उचलून घोषणाबाजी केली. सामना संपल्यानंतर महेश देबडवार यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि शहरातून दुचाकी रॅली काढून तिरंगा हातात घेऊन उत्साहात जल्लोष करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती, प्रभुदास वाडेकर, जगतसिंह ठाकूर, उमेश बडगे,गोपीचंद पांडागळे, सागर कळसकर,संभाजी बस्वदे यांनी परिश्रम घेतले. १९९५ पासून क्रीडारसिकांसाठी मोठ्या पडद्यावर क्रिकेट सामने पाहण्याची मोफत सोय उपलब्ध करून देत असल्याबद्दल ॲड. दिलीप ठाकूर तसेच यावेळी पुढाकार घेतल्याबद्दल अमर राजुरकर यांचे क्रिकेटप्रेमींनी विशेष कौतुक केले.
    1
    नांदेड : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानने न्यूझीलंडला चारीमुंड्या चित करत विजेतेपद पटकावल्याचा आनंद नांदेडकरांनी जल्लोषात साजरा केला. अमरनाथ राजुरकर आणि धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून कुसुम सभागृहात मोठ्या पडद्यावर लावण्यात आलेला सामना पाहण्यासाठी शेकडो क्रीडारसिकांनी गर्दी केली होती. यावेळी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेल्या सुमारे २०० आजी-माजी क्रिकेटपटूंचा आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
भाजपा नांदेड महानगरच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियममध्ये बसल्याचा आनंद मोफत अनुभवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मोठ्या पडद्यावरील प्रक्षेपणाची सुरुवात नांदेड भूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रविण साले होते.यावेळी कुबेरनगरीचे सतीश सुगनचंदजी शर्मा, डॉ. सचिन उमरेकर, व्यंकटेश जिंदम, नगरसेवक आशिष नेरलकर व राजू यन्नम, बागड्या यादव, शिवप्रसाद राठी, धीरज स्वामी, तौसिफ अहमद, धनंजय नलबलवार, निलेश कुंटूरकर, चंचलसिंघ जट, राजन जोजारे, कर्मचारी नेते रामेश्वर वाघमारे, तहसीलदार रघुनाथसिंह चौहान, रुपेश व्यास, महेंद्र तरटे, राजेश देशमुख ,हरजिंदरसिंघ संधू,संतोष मानधनी आदींची प्रमुख उपस्थिती होती. संयोजक दिलीप ठाकूर, सुरेश लोट, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, प्रकाश उंटवाले, अरुण काबरा, सुरेश निल्लावार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सविता काबरा, स्नेहलता जायस्वाल, शिला जांभळे व रागिणी जोशी, सुषमा हुरणे यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित सर्व महिलांचे स्वागत माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन शीतल खांडील व लक्ष्मण खाडे यांनी केले.
या निमित्ताने प्रथमच एकत्र आलेल्या नांदेडच्या सुमारे २०० आजी-माजी क्रिकेटपटूंचा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. नंदू कुलकर्णी यांच्या हस्ते आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये नांदेड भूषण ॲड. मिलिंद एकताटे, राजीव किवळेकर, सुधाकर पाढरे, शिवाजी डहाळे, रतन साडेगावकर, मंगेश कामतीकर, श्याम आडे, बालाजी गिरगावकर, रणजितसिंघ चिरागिया, परविंदरसिंघ रामगडीया,मोहनसिंघ  रोडगी,राजू जाधव,रवी पाटील, शंकर नांदेडकर, शैलेश देशमुख, नरेंद्र पटवारी, राजा गायकवाड, प्रसन्न घोगरे, राम शेळके, सचिन चौहान, संतोष औंढेकर, वसंत साबळे यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश होता. अश्या प्रकारचा गौरव पहिल्यांदाच झाल्या मुळे खेळाडूंनी समाधान व्यक्त केले. रमेश मेगदे यांनी पाठविलेला कृतज्ञता संदेशही यावेळी वाचून दाखविण्यात आला. तसेच कमलाकर बिरादार, नरेश दंडवते, करणसिंह बैस, ज्ञानेश्वर सुनेगावकर, धनंजय कुलकर्णी, नकुल जैन,श्रीराम मोटरगे यांच्यासह अनेक माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.तसेच दिलीप ठाकूर यांच्या विविध नव्वद उपक्रमात सहकार्य करणारे अन्नदाते व देणगीदारांच्या गौरव करण्यात आला. 
विशेष म्हणजे १९९५ पासून ॲड. दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सामने नांदेडमध्ये मोठ्या पडद्यावर मोफत दाखवण्याची परंपरा सातत्याने जपत आहेत. आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकाचे आठ आणि ट्वेंटी-२० विश्वचषकाचे दहा असे एकूण अठरा विश्वचषक स्पर्धांचे सामने त्यांनी मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित केले आहेत. २००७ व २०११ मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर तसेच २००७, २०२४ व २०२५ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी शहरात भव्य विजय रॅलीचे आयोजनही केले होते.
रोमहर्षक अंतिम सामना पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी अर्धा तास आधीपासूनच प्रचंड गर्दी केल्याने कुसुम सभागृह खचाखच भरले होते. भव्य आणि स्पष्ट प्रक्षेपणामुळे उपस्थितांना स्टेडियममध्ये बसल्याचा अनुभव मिळत होता. भारतीय खेळाडूंच्या प्रत्येक चौकार-षटकाराला जोरदार दाद मिळत होती, तर न्यूझीलंडचे खेळाडू बाद होताच घोषणांनी सभागृह दणाणून जात होते. भारताच्या विजयानंतर प्रेक्षकांनी भांगडा करत आनंद साजरा केला. उपस्थितांनी दिलीप ठाकूर यांना खांद्यावर उचलून घोषणाबाजी केली. सामना संपल्यानंतर महेश देबडवार यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि शहरातून दुचाकी रॅली काढून तिरंगा हातात घेऊन उत्साहात जल्लोष करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती, प्रभुदास वाडेकर, जगतसिंह ठाकूर, उमेश बडगे,गोपीचंद पांडागळे, सागर कळसकर,संभाजी बस्वदे यांनी परिश्रम घेतले. १९९५ पासून क्रीडारसिकांसाठी मोठ्या पडद्यावर क्रिकेट सामने पाहण्याची मोफत सोय उपलब्ध करून देत असल्याबद्दल ॲड. दिलीप ठाकूर तसेच यावेळी पुढाकार घेतल्याबद्दल अमर राजुरकर यांचे क्रिकेटप्रेमींनी विशेष कौतुक केले.
    user_Info news
    Info news
    Nanded, Maharashtra•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.