‘भारत उत्सव २०२६’च्या परीक्षकपदी परभणीचे डॉ. पंकज खेडकर; राज्यभरातील कलाकारांच्या कलाविष्काराचे करणार परीक्षण परभणी (प्रतिनिधी):- अखिल लोककला सांस्कृतिक संघटना, पुणे यांच्या वतीने १६ मे ते २२ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय तथा राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत उत्सव २०२६’ या सांस्कृतिक महोत्सवासाठी परभणीचे सुप्रसिद्ध कलारसिक व अभ्यासू व्यक्तिमत्त्व डॉ. पंकज खेडकर यांची तज्ज्ञ परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे परभणीच्या सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात देशभरातील कलाकार विविध लोककला प्रकार सादर करणार आहेत. विशेषतः लोकनृत्य आणि एकांकिका या स्पर्धा महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार असून या स्पर्धांचे परीक्षण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी डॉ. पंकज खेडकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. डॉ. खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परीक्षणातून विविध भागांतून सहभागी होणाऱ्या कलाकारांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या निवडीमुळे परभणी जिल्ह्याच्या सांस्कृतिक परंपरेला एक वेगळी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. अखिल लोककला सांस्कृतिक संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रमोद ननवरे यांनी निवडीचे अधिकृत पत्र पाठवून डॉ. खेडकर यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

- कीर्तनकार आणि संतांविरोधातील आरोपांनंतर पंढरपूर, आळंदीसह अनेक ठिकाणी निषेध; जाहीर माफी व अटकेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात कथित “प्रतिगामी विचारांची घुसखोरी” झाल्याचा आरोप करत काही कीर्तनकार आणि संत-महंतांची नावे सार्वजनिक केल्याने राज्यभर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय, हिंदू संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असून, लवांडे यांच्या विधानाने संत परंपरेचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे. पंढरपूर, आळंदी यांसह अनेक ठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. आंदोलकांनी लवांडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तात्काळ अटकेची मागणी केली. दरम्यान, संबंधित संत आणि वारकरी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही विविध संघटनांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावरील तालखेड फाटा परिसरात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता डिझेल मिळवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.1
- महाराष्ट्रामध्ये शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन पुकारण्यात आले. संतप्त आंदोलकांनी शासनाचा जीआर (सरकारी अध्यादेश) जाळून आपला निषेध नोंदवला.1
- *चिखलवाडी ते गुरुद्वारा कॉर्नर रस्ता 'नरकयातना'; प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे नागरिक आणि व्यापारी हैराण!* "*आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासन सुस्त; जुना मोंढा बाजारपेठेतील व्यापारावर मोठा परिणाम*" शिवकुमार काळे सविस्तर वृत्त नांदेड: शहरातील अत्यंत गजबजलेली आणि मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना मोंढा भागाला जोडणारा चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा कॉर्नर हा मुख्य रस्ता मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असून, स्थानिक प्रशासनाच्या 'बघ्याच्या भूमिके'वर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाहतूक कोंडी आणि धुळीचे साम्राज्य हा रस्ता शहराचा मुख्य दुवा असल्याने येथे २४ तास वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्ता खोदलेल्या अवस्थेत असल्याने येथे रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत आहे. वाहनधारकांना खड्ड्यांतून आणि चिखलातून कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून, पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले जुना मोंढा ही शहराची प्रमुख बाजारपेठ आहे. मात्र, रस्ता खराब असल्यामुळे ग्राहक या भागात येण्यास टाळाटाळ करत आहेत. याचा थेट परिणाम स्थानिक व्यापारी वर्गावर होत असून, व्यवसायात मोठी घट झाली आहे. "अनेकवेळा तक्रारी देऊनही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही, आम्ही जगायचे कसे?" असा सवाल येथील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. आमदारांच्या सूचनेलाही केराची टोपली? या गंभीर प्रश्नावर दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोरकर यांनी देखील मध्यस्थी करून प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. स्थानिक वृत्तपत्रांतून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासकीय अधिकारी याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे "प्रशासन नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करतंय?" अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. नागरिकांची शेवटची विनंती स्थानिक नागरिक आणि व्यापारी संघटनेने प्रशासनाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती केली आहे की, पावसाळ्यापूर्वी किंवा लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करून सर्वसामान्यांची या त्रासातून मुक्तता करावी. आता या बातमीची दखल घेऊन प्रशासन हालचाल करणार की पुन्हा आश्वासनांची बोळवण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. #viralnews #viralpost #viralreelsシ #atulsave #MygovIndia #nandeddiaries #nandedkar #nanded #NWNC #maharashtra1
- मयत कुटुंबियांची वैजनाथ पावडे यांनी घेतली भेट 👏👏👏 हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथील रहिवासी धोंडीबा बार्शी हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करत आहेत. त्यांचा मुलगा योगेश धोंडीबा बार्शी हा देखील आपल्या आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी रात्रंदिवस रानोमाळ फिरून मेंढपाळ व्यवसाय करत होता. परंतु नियतीने अचानक घाला घातल्याने योगेश बार्शी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील पूर्णा परिसरामध्ये मेंढ्या चारत असताना दिनांक ६ मे रोजी योगेश यांनी मेंढ्यांना तलावावर पाणी पाजण्यासाठी नेले होते. त्यानंतर स्वतः आंघोळ करण्यासाठी तलावात उतरले असता अचानक पाय घसरल्याने त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतरही संबंधित प्रशासनाने अद्याप या कुटुंबाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आज धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष – वैजनाथ पावडे यांनी मयताच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संबंधित भागातील तहसीलदार आणि मतदारसंघातील आमदार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून या कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. “गरीब मेंढपाळ कुटुंबावर ओढवलेले हे संकट अत्यंत वेदनादायी असून शासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे करावा,” अशी अपेक्षा यावेळी वैजनाथ पावडे यांनी व्यक्त केली. धनगर समाज युवा मल्हार सेना ही सदैव मेंढपाळ समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास देखील त्यांनी कुटुंबियांना दिला.1
- विजय थालपती ने तमिलनाडु मुख्यमंत्री पद की शपथ ली थालपती का सियासी सफर की शुरुआत हुई1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- धाराशिव-उजनी राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात बीएलओचे काम पूर्ण करून परतणाऱ्या एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून, राज्यमार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.1