logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शनिवारी सकाळच्या सुमारास मंठा–जिंतूर राज्य मार्गावरील नानसी पुनर्वसन परिसरात दोन ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

3 hrs ago
user_AJINKYA S DAWANE
AJINKYA S DAWANE
मंठा, जालना, महाराष्ट्र•
3 hrs ago

शनिवारी सकाळच्या सुमारास मंठा–जिंतूर राज्य मार्गावरील नानसी पुनर्वसन परिसरात दोन ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवत गुरुवारी, २५ जून रोजी विविध ठिकाणी धडक कारवाई केली. यात जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला, अवैध देशी दारू जप्त करण्यात आली आणि विनापरवाना धारदार तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तळणी बसस्थानकाजवळ देवगाव रोडलगत पैशांवर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी ५.५० वाजता छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ४ हजार ९२० रुपये रोख रक्कम, सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि ५२ पत्त्यांचा कॅट असा एकूण १ लाख १४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्याच दिवशी सायंकाळी ७.५० वाजता संभाजीनगर परिसरात विनापरवाना धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका इसमावर कारवाई करत सुमारे ८०० रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली; आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच, तळणी बसस्थानक परिसरात एका संशयित व्यक्तीची तपासणी केली असता, त्याच्याकडून १८० एमएलच्या 'भिंगरी संत्रा' देशी दारूच्या १४ बाटल्या, म्हणजेच अंदाजे १ हजार ४०० रुपये किमतीचा साठा विनापरवाना बाळगताना आढळून आला, याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जालना पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. तिन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित तपास अधिकारी करत आहेत. दरम्यान, परिसरात जुगार, अवैध दारू विक्री, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे किंवा इतर कोणतेही अवैध प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ मंठा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले असून, अशा अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
    1
    जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवत गुरुवारी, २५ जून रोजी विविध ठिकाणी धडक कारवाई केली. यात जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला, अवैध देशी दारू जप्त करण्यात आली आणि विनापरवाना धारदार तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तळणी बसस्थानकाजवळ देवगाव रोडलगत पैशांवर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी ५.५० वाजता छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ४ हजार ९२० रुपये रोख रक्कम, सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि ५२ पत्त्यांचा कॅट असा एकूण १ लाख १४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्याच दिवशी सायंकाळी ७.५० वाजता संभाजीनगर परिसरात विनापरवाना धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका इसमावर कारवाई करत सुमारे ८०० रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली; आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच, तळणी बसस्थानक परिसरात एका संशयित व्यक्तीची तपासणी केली असता, त्याच्याकडून १८० एमएलच्या 'भिंगरी संत्रा' देशी दारूच्या १४ बाटल्या, म्हणजेच अंदाजे १ हजार ४०० रुपये किमतीचा साठा विनापरवाना बाळगताना आढळून आला, याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई जालना पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. तिन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित तपास अधिकारी करत आहेत. दरम्यान, परिसरात जुगार, अवैध दारू विक्री, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे किंवा इतर कोणतेही अवैध प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ मंठा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले असून, अशा अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
    1
    परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महानगर पालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते शाळेसाठी संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमावेळी वृक्षारोपण उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. उद्योजक घनश्याम शेठ गोयल यांनी या कामासाठी तातडीने पुढाकार घेत, सीएसआर निधीतून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
    1
    महानगर पालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते शाळेसाठी संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमावेळी वृक्षारोपण उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. उद्योजक घनश्याम शेठ गोयल यांनी या कामासाठी तातडीने पुढाकार घेत, सीएसआर निधीतून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • तुकाराम मुंढे यांनी हॉटेलच्या किचनमध्ये लागू होणाऱ्या नियमांविषयी एक मोठे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानुसार, आता हॉटेलच्या स्वयंपाकघरात काही नियम बंधनकारक असतील.
    1
    तुकाराम मुंढे यांनी हॉटेलच्या किचनमध्ये लागू होणाऱ्या नियमांविषयी एक मोठे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानुसार, आता हॉटेलच्या स्वयंपाकघरात काही नियम बंधनकारक असतील.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • समाजकल्याण विभागाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी केली.
    1
    समाजकल्याण विभागाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी केली.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील किर्ला गावात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे २० लाख रुपयांच्या सिमेंट रस्ता आणि भूमिगत नाली बांधकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या कथित गैरव्यवहाराविरोधात वसंत-विचारधारा मंच, महाराष्ट्रचे संयोजक राजेश श्रीराम चव्हाण जालनकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे सदस्य वसंत संपतराव मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री, राज्यमंत्री तसेच पंचायत राज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, संबंधित रस्ता व भूमिगत नालीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून सिमेंट, गिट्टी, वाळू आदी साहित्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. कामाचे मोजमाप, तांत्रिक तपासणी आणि बिल मंजुरी प्रक्रियेतही मोठ्या अनियमितता झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. निवेदनात, संबंधित अधिकारी, सरपंच आणि कंत्राटदार यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करून शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून या तक्रारींची प्राप्ती झाल्याची नोंद घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, आता या प्रकरणात चौकशीदरम्यान काय निष्पन्न होते आणि प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे किर्ला गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
    1
    जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील किर्ला गावात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे २० लाख रुपयांच्या सिमेंट रस्ता आणि भूमिगत नाली बांधकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या कथित गैरव्यवहाराविरोधात वसंत-विचारधारा मंच, महाराष्ट्रचे संयोजक राजेश श्रीराम चव्हाण जालनकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे सदस्य वसंत संपतराव मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री, राज्यमंत्री तसेच पंचायत राज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, संबंधित रस्ता व भूमिगत नालीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून सिमेंट, गिट्टी, वाळू आदी साहित्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. कामाचे मोजमाप, तांत्रिक तपासणी आणि बिल मंजुरी प्रक्रियेतही मोठ्या अनियमितता झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

निवेदनात, संबंधित अधिकारी, सरपंच आणि कंत्राटदार यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करून शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून या तक्रारींची प्राप्ती झाल्याची नोंद घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, आता या प्रकरणात चौकशीदरम्यान काय निष्पन्न होते आणि प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे किर्ला गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शनिवारी सकाळच्या सुमारास मंठा–जिंतूर राज्य मार्गावरील नानसी पुनर्वसन परिसरात दोन ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
    1
    शनिवारी सकाळच्या सुमारास मंठा–जिंतूर राज्य मार्गावरील नानसी पुनर्वसन परिसरात दोन ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.