औंढा नागनाथला आज रथोत्सव औंढा नागनाथ: औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी (ता.१८ ) हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव होणार आहे. त्याची जय्यत तयारी झाली आहे.महाशिवरात्री यात्रेनिमित्त मंदिरात आठवडाभरापासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. बुधवार रात्री दहाला रथोत्सव होईल. मंदिर संस्थानचे कर्मचारी रथ ओढणार असून, मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या जातील. ह भ प नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने गुरुवारी (ता.१९) उत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे,विश्वस्त ॲड श्रीधर घुगे, देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी केले आहे. दरम्यान, रथोत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे, असे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी सांगितले. याशिवाय परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. कुस्ती स्पर्धाही रंगणार महाशिवरात्री यात्रेनिमित्त नगरपंचायतीतर्फे बुधवारी सकाळी अकराला कुस्ती स्पर्धा होतील. प्रथम ३२ हजार २२६ रुपये, द्वितीय २२ हजार २२६ रुपये, तृतीय १२ हजार २२६ रुपये अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसे दिली जाणार आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी रविराज दरक यांनी दिली.
औंढा नागनाथला आज रथोत्सव औंढा नागनाथ: औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी (ता.१८ ) हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव होणार आहे. त्याची जय्यत तयारी झाली आहे.महाशिवरात्री यात्रेनिमित्त मंदिरात आठवडाभरापासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. बुधवार रात्री दहाला रथोत्सव होईल. मंदिर संस्थानचे कर्मचारी रथ ओढणार असून, मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या जातील. ह भ प नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने गुरुवारी (ता.१९) उत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे,विश्वस्त ॲड श्रीधर घुगे,
देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी केले आहे. दरम्यान, रथोत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे, असे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी सांगितले. याशिवाय परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. कुस्ती स्पर्धाही रंगणार महाशिवरात्री यात्रेनिमित्त नगरपंचायतीतर्फे बुधवारी सकाळी अकराला कुस्ती स्पर्धा होतील. प्रथम ३२ हजार २२६ रुपये, द्वितीय २२ हजार २२६ रुपये, तृतीय १२ हजार २२६ रुपये अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसे दिली जाणार आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी रविराज दरक यांनी दिली.
- मुस्लिम महापौर केला तर विरोधकांचं पोट दुखतं, तुम्ही केलं तर ठीक आम्ही केलं तर बाईट - आमदार डॉ राहुल पाटील2
- Post by Today One Live1
- Post by Mohammad Rafikh1
- गोदावरी नदी पात्रामध्ये कचरा तथा नाले व गटारीचे दूषित पाणी साचल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध पसरत असून गोदावरी नदीपात्रातील जलजीव धोक्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुद्धा थोडक्यात येत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. गोदावरी नदी शुद्धीकरणा साठी करोडो निधी रुपये येऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे योग्य ती उपाययोजना स्थानिक प्रशासनाच्या वतीने होत नसताना दिसत असल्याचे सुद्धा नागरिकांच्या भावनातून व्यक्त होत आहे. शिक बांधवांचे हिंदू बांधवांचे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या ठिकाणी अनेक भाविक भक्त गुरुद्वारा इतर देवस्थानास दर्शनासाठी अनेक राज्यातून या ठिकाणी येतात . त्याच ठिकाणी अशा प्रकारे घाणीचे साम्राज्य बघून. आश्चर्यचकित होत आहेत. एवढा मोठा पवित्र स्थान आणि ऐतिहासिक स्थान असून सुद्धा कुठल्याही प्रकारे योग्य त्या सोयी सुविधा स्थानिक प्रशासनाच्या वतीने दिसत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. सध्या परिस्थितीत गोदावरी नदी पात्रात अनेक सर्व जसे की अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करण्याचे महत्त्व असून सुद्धा अंघोळ करणे कठीण झाले आहे. तरीसुद्धा कुठलीही हालचाल स्थानिक प्रशासनाच्या वतीने होत असताना दिसत नाही. याकरिता आज रोजी जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते तेजपाल सिंघ खेड व त्यांच्या सहकार्याच्या वतीने. तक्रार देखील करण्यात आली आहे. लवकरात लवकर प्रदूषित होत असलेली गोदावरी नदी त्वरित गांभीर्याने दखल घेऊन स्वच्छ करण्याच्या मार्गे शासनाने लागावे अशी मागणी केली आहे.4
- महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी श्री परमेश्वर देवाला भगवी पताका व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण 🔱 श्रद्धा, संयम आणि भक्तीचे प्रतीक भगव्या ध्वजेतून प्रकटले हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शेकडो वर्षांची परंपरा जपत पारण्याचा उपवास व जागरण सोहळा भक्तिभावात संपन्न झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांनी पारण्याचा उपवास धरून रात्रभर जागरण केले. मध्यरात्री अभिषेक, महाआरती व भव्य अलंकार सोहळ्यानंतर मंदिर परिसर पूर्णतः भक्तिमय झाला. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे भगवी पताका महादेवाला अर्पण करून श्री परमेश्वराला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर पारंपरिक विधीनुसार भाविकांनी पारण्याचा उपवास सोडला. ज्येष्ठ जाणकारांच्या मते, ही परंपरा आनंदीकालापासून सुरू असून श्रद्धा, संयम व भक्तीचे प्रतीक मानली जाते. अलंकारमय श्री परमेश्वरांचे दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. “हर हर महादेव”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. #महाशिवरात्री #श्रीपरमेश्वर #हरहरमहादेव #भगवीपताका #पुरणपोळी_नैवेद्य पारण्याचाउपवास हिमायतनगर वाढोणा धार्मिकपरंपरा भक्तीभाव Mahashivratri ShriParmeshwar SpiritualIndia TempleFestival https://www.instagram.com/reel/DU0ZTB5km77/?igsh=MXI0eWR1eDZtNGh4bg==1
- ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!1
- महाशिवरात्रीच्या पवित्र प्रभातकाळी मंठा नगरी जणू शिवतत्त्वाच्या अलौकिक स्पंदनांनी न्हाऊन निघाली होती. मंदिरांच्या घंटानादात, मंत्रोच्चारांच्या गंभीर लयीत आणि भक्तिभावाच्या ओलाव्यात अध्यात्म, सेवा आणि समाजबंध यांचा दिव्य त्रिवेणी संगम साकार झाला. या मंगल क्षणी Press Council of Maharashtra (पीसीएम) पत्रकार संघ, मंठा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमय फराळ-वाटप उपक्रमाने सेवाभावाची साक्षात मूर्तीच उभी केली. श्री लक्ष्मीनारायण मंदिर तसेच जगदंबादेवी मार्गावरील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक व सात्विक भावनेने फराळाचे वितरण करण्यात आले. पहाटे ६.४५ ते ११.०० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात प्रत्येक क्षण ‘ॐ नमः शिवाय’च्या अखंड गजराने दुमदुमत होता. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता; जणू भक्ती आणि सेवा एकरूप होऊन शिवआराधनेचे सजीव रूप धारण करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. मदने माऊली महाराज विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून पीसीएम पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार हरिराम तिवारी (बाबूजी तिवारी) तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रदीप देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर पीसीएम पत्रकार संघ मंठाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी, योगेश देशमुख, जीवन काळे, अतुल खरात, गजानन माळकर, आतिश राठोड, अंकुश देशमाने, सुभाष झरेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. मदने माऊली महाराजांनी अन्नदानाचे दैवी महात्म्य अत्यंत भावपूर्ण शब्दांत अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अन्नदान ही केवळ सामाजिक कृती नसून ती आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी साधना आहे. सेवा हीच खरी शिवपूजा असून, गरजूंना प्रेमाने अन्न देणे म्हणजे शिवतत्त्वाची प्रत्यक्ष आराधना होय. या प्रसंगी त्यांनी अभंगाच्या ओव्या सादर करत वातावरण अधिक भक्तिमय केले— “तेथे एक शीत दिधल्या अन्न! कोटी कुळांचे होय उद्धरण! कोटी याग केले पूर्ण! ऐसे महिमान ये तीर्थाचे!” प्रेमपूर्वक अर्पण केलेला अन्नाचा एक घासही कोटी कुळांच्या उद्धाराचे कारण ठरतो, असे सांगत त्यांनी या उपक्रमास ‘शिवपूजेचे साक्षात रूप’ असे संबोधले. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांप्रती अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेले फराळ-वाटप हे निस्सीम सेवाभावाचे तेजस्वी उदाहरण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. समाजात समत्व, करुणा आणि बांधिलकी जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रा. प्रदीप देशमुख यांनीही आपल्या मनोगतात सेवा आणि औदार्य हीच खरी संस्कृतीची ओळख असल्याचे प्रतिपादन केले. “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना जपली तर समाजपरिवर्तन सहज शक्य होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीसीएम पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल खरात यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश देशमुख, गणेश खराबे, आतिश राठोड, बाळासाहेब खराबे, राजकुमार कांगणे, रशीद पठाण, विजय राठोड, उस्मान पठाण, एकनाथ एंडइत, जिजाभाऊ गते, शेंडगेभाऊ आदींनी परिश्रम घेतले. फराळाची सात्विक व रुचकर तयारी आचारी कैलास पवार, हुकुमसिंग राजपुरोहित आणि प्रल्हाद नरवडे यांनी केली. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर साकारलेली ही प्रसादवाटप केवळ अन्नवितरणाचा उपक्रम न ठरता समत्व, सेवा आणि श्रद्धेचा सजीव उत्सव ठरली. शिवनामाच्या अखंड गजरात आणि सेवाभावाच्या ऊर्जेतून प्रकटलेली ही शिवआराधना मंठा नगरीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली—जिथे सेवा म्हणजेच साधना आणि दान म्हणजेच देवत्व, याची अनुभूती सर्वांना लाभली.1
- सय्यद इकबाल यांनी परभणी महापौर पदाचा पदभार स्वीकारला; परभणी स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प2