इथेनॉल प्रकल्पाचे विषारी पाणी ठरले 'शाप'! ब्रह्मपुरीतील ७ गावांत त्वचा रोगाचे रुग्ण आढळल्याने खळबळ; तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल सादर ब्रह्मपुरी :एकीकडे औद्योगिक विकासाचा डांगोरा पिटला जात असताना, दुसरीकडे ब्रह्मपुरी परिसरातील एका इथेनॉल प्रकल्पाने सोडलेल्या विषारी अन् दूषित पाण्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा खेळखंडोबा झाला आहे. या रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांमध्ये विष भिनले असून, त्यामुळे तब्बल सात गावांमध्ये अंगाला खाज सुटणे, शरीरावर चट्टे आणि पुरळ उठणे यांसारख्या गंभीर त्वचा रोगाचा प्रकोप झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या (DHO) आदेशानंतर तालुका आरोग्य यंत्रणेने केलेल्या तातडीच्या सर्वेक्षणात अनेक रुग्ण बाधित आढळल्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असून, या धक्कादायक निष्पन्नामुळे संपूर्ण प्रशासनात प्रचंड खडबड माजली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) १६ जुलै २०२६ रोजी पाठवलेल्या शासकीय पत्रात (जा क्र मप्रनि/उ प्रा का च / ४२९ / २०२६) इथेनॉल प्रकल्पाच्या बेजबाबदार कारभारावर बोट ठेवले होते. या रासायनिक सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाणी प्रचंड दूषित झाले असून हेच दूषित पाणी नागरिकांच्या पोटात गेल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या पत्राची तात्काळ दखल घेत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने (पत्र क्र. आरोग्य / प्रदूषण/१३५९/२०२६) ब्रह्मपुरी तालुका वैद्यकीय प्रशासनाला संबंधित बाधित गावांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश दिले होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने ब्रह्मपुरी परिसरातील उदापूर, बोरगाव, झिलबोडी, पारडगाव, परसोडी, पेठवार्ड आणि फुलेनगर या सातही प्रभावित गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष आरोग्य तपासणी व सर्वेक्षण पूर्ण केले. या सर्वेक्षणादरम्यान लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक ग्रामस्थ गंभीर त्वचा रोगाने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. दूषित पाण्यामुळेच हा आजार पसरल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपला सविस्तर तपासणी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह (CEO) जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या अहवालामुळे इथेनॉल प्रकल्पाचा निष्काळजीपणा उघड्यावर आला आहे. औद्योगिक प्रगतीचा बुरखा पांघरून स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या इथेनॉल प्रकल्पाविरुद्ध आता सातही गावांतील ग्रामस्थांचा आक्रोश अनावर झाला आहे. "दररोज लहान मुले आणि वृद्ध अंगाच्या लाहीलाहीने तडफडत आहेत. प्रशासनाने केवळ सर्वेक्षण आणि कागदी घोडे न नाचवता या प्रदूषणकारी इथेनॉल प्रकल्पावर तात्काळ कठोर कारवाई करावी किंवा हा प्रकल्प कायमचा बंद करावा," अशी संतप्त मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. आरोग्य विभागाच्या अहवालात रुग्ण आढळल्याचे स्पष्ट सिद्ध झाल्यामुळे आता चेंडू जिल्हा प्रशासनाच्या आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोर्टात आहे. संबंधित इथेनॉल प्रकल्प व्यवस्थापनावर निष्काळजीपणा आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणल्याप्रकरणी तत्काळ फौजदारी गुन्हा (FIR) दाखल होणार का? प्रभावित सातही गावांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी प्रशासन काय कायमस्वरूपी योजना आखणार? आरोग्य विभागाच्या या धक्कादायक अहवालानंतर आता वरिष्ठ पातळीवरून या प्रदूषणकारी इथेनॉल प्रकल्पाचे कुलूप ठोकले जाणार की नेहमीप्रमाणे कारवाई टाळली जाणार, याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

- दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर दरवर्षीचा तोच खेळ... पूर आला की रस्ता बंद! वडकी–पिंपळापूर पुलासाठी नागरिकांचा संताप अनावर पुलाची उंची वाढवा, नागरिकांचे जीव वाचवा; सरपंच रवींद्र चौधरींचा लोकप्रतिनिधींवर घणाघात राळेगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील वडकी गावाला लागून असलेल्या पिंपळापूर मार्गावरील नाल्याला आज आलेल्या पुरामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जात असल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांना दोन्ही बाजूंना तासन्तास अडकून पडावे लागले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासन व लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडकी, पिंपळापूर व वडगाव येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढविण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. मात्र प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे खोळंबली. शाळेतून परतणारे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि इतर नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर पिंपळापूरचे सरपंच रवींद्र चौधरी यांनी लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघात केला. "दरवर्षी हाच प्रकार घडतो. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे काहीच सोयरसुतक नाही. केवळ आश्वासनांची खैरात केली जाते; मात्र पुलाची उंची वाढविण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही," असा संताप त्यांनी व्यक्त केला. नागरिकांचे म्हणणे आहे की, पुलाची उंची वाढविल्यास दरवर्षी उद्भवणारी ही गंभीर समस्या कायमची निकाली निघू शकते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या पुलाच्या उंचीवाढीचा निर्णय घ्यावा. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.1
- ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ1
- एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.1
- गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखरावर भक्तीचा महासागर; रिमझिम पावसातही हजारो भाविकांची उपस्थिती माहूरगड प्रतिनिधी: धनंजय आराध्ये श्रीक्षेत्र माहूरगड येथील पवित्र श्री दत्तात्रेय शिखर संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी दत्तशिखरावर दर्शनासाठी अलोट गर्दी केली. पावसाकडे दुर्लक्ष करून भाविकांनी गुरुदर्शन व गुरुपूजनाचा लाभ घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तात्रेय शिखर संस्थानाचे श्री श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज (गुरु मधुसूदन भारती) यांच्या शुभहस्ते पहाटे श्री दत्तात्रेय महाराजांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परिसरातील सर्व देवतांचे पूजन, समाधीपूजन तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. या धार्मिक विधींचे पुरोहित्य विलासराव जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले. यानंतर श्री १००८ महंत धनेश्वर भारती महाराज गादीवर विराजमान झाले. पोथीवाचन, गुरुपूजन, आशीर्वचन आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित संत-महंत, महापुरुष तसेच हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले. पावसाच्या सरींनीही या पवित्र सोहळ्याची शोभा अधिक खुलविली. या सोहळ्यास वासुदेव भारती महाराज, परमेश्वर भारती, धनराज भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, चिरंजीव भारती, हरिहर भारती, वामन भारती, सुभाष भारती, शिलानंद भारती, सुजान भारती, माधवगिरी महाराज, गजराज भारती, नितेश भारती, अक्षयगिरी यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे व्यवस्थापक जी. एन. नाईक, अश्विन माने, विश्वस्त मंडळ तसेच सेवेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुपूजनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या अखेरीस "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त", "देवदत्त श्री दत्तात्रय महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण दत्तशिखर परिसर दुमदुमून गेला. भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.1
- एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने व्याघ्र संवर्धनासह इतर प्रजातींचे संरक्षण, बचाव व जागृतीसाठी1
- अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जांबुवंतराव यांनी नागपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.1
- पुरामध्ये वाहून गेलेल्या इस्मार्ट सुखरूप बाहेर काढले ठाणेदार संगीता हेंलोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील एन डी ए आर एफ टीमने पुरामध्ये वाहून गेलेल्या इसमास सुखरूप बाहेर काढले तो इसम पाच तास पर्यंत राहायला झाडावर वर्धा येथील बचाव पथक पुरातून काढण्यासाठी असमर्थ नागपूर येथील एनडीआरएफ टीमचे करावे लागले पाचारण वर्धा जिल्ह्यामध्ये कालपासून पाणी सुरू आहे अशातच नदी नाल्याला खूप जास्त प्रमाणात पुर आला होता . अल्लीपूर मार्गाने दरणे टाकळी गावावरून अक्षय माटे हा ईसम पळसगाव ला दूचाकिने जात असताना दरणे टाकळी गावालगत असलेल्या नाल्यातून त्यांनी दुचाकी टाकली पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्याचा वेग असल्यामुळे अक्षय माटे हा नाल्याच्या पुरात वाहून गेला होता . त्यानंतर तो एका झाडाला लटकून थांबला या घटनेची माहिती ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळताच त्यांनी आपल्या टीम सह घटनास्थळ गाठले त्यानंतर रोड पासून खूप लांब अंतर असल्याकारणाने ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी वर्धा येथील शोध बचाव पथक ला याबाबत माहिती दिली त्यानंतर वर्धा येथील बचाव पथक टीम आली टीम आल्यानंतर एक बोट घेऊन बचाव पथक टीम व ठाणेदार संगीता हेलोंडे गृह रक्षक दलातील शिपाई रुपेश बगवे हे व टीम बोट मध्ये बसून त्या ईसमास काढण्यासाठी गेले मात्र पाणी खूपच जास्त असल्याकारणाने व गृहरक्षक दलातील शिपाई रुपेश बगवे यांच्या हाताला बोट मध्येच असतानाच दोर कसल्याने ईजा झाल्यामुळे ते टीम परत पुराच्या पाण्यातून बचाव टीम परत आली . बचाव टीम वर्धा हे परत आल्यानंतर पुन्हा मात्र त्या इसमास काढण्यासाठी जाण्यास टीमने नकार दिला . त्यानंतर नागपूर येथील एनडीएआरएफ टीमला घटनास्थळी पाचरण करण्यात आले नागपूर येथून एनडीएआरएफ टीम येण्याकरता एक ते दीड तास लागला नागपूर येथील टीम आल्यानंतर टीम सोबत कर्तव्यावर असणाऱ्या ठाणेदार संगीता हेलोंडे स्वतः बोट मध्ये जाऊन अक्षय माटे या युवकाला सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढले .मात्र दरणे टाकळी हे गाव देवळी तहसील मध्ये येते देवळी तहसील मधला महसूल विभागाचे तहसीलदार यांना परिसरातील लोकांनी खूपदा कॉल केले परंतु कोणताही नायब तहसीलदार तहसीलदार मंडळ अधिकारी किंवा तलाठी घटनास्थळी आलाच नाही यावरून महसूल विभागाचे कर्मचारी आपल्या कर्तव्याशी किती तत्पर आहे हे उघडकीस येते मात्र अशातच घटनास्थळी हिंगणघाट येथील नायब तहलदार भलावी मंडळ अधिकारी मुरलीधर लावनकर यांच्या कार्यक्षेत्रात धरणे टाकळी गाव हे येत सुद्धा नाही मात्र ते घटनास्थळी आलेत व यांनी भेट दिली . यावेळी वेळी नागपूर येथील एनडीआरएफ चे पोलीस निरीक्षक डी जी दाते ठाणेदार संगीता हेलोंडे जमादार रवी वर्मा पोलीस शिपाई सतीश हांडे गणेश किन्नाके रवी चौवडे प्रमोद दडमल अजय घूसे गृहरक्षक दलातील शिपाई रुपेश बगवे गजानन बगवे गजानन गिरडे गावातील प्रशासक नितीन चंदनखेडे प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे माझी ग्रामपंचायत सदस्य उत्तम ढगे यांची उपस्थिती होती .2