Shuru
Apke Nagar Ki App…
परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.
जागर महाराष्ट्राचा न्यूज
परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालना शहरातील झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड (प्रमाणपत्र) मिळवून देण्याचे दिलेले आश्वासन अखेर पूर्ण झाले आहे. मुक्तेश्वर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' अभियानात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना पीआर कार्डांचे वितरण करण्यात आले. हे पीआर कार्ड वाटप शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते पार पडले. आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आहे. रविवारी दिनांक २६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, या समाधान शिबिरादरम्यान उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.1
- लातूरमध्ये 'माझं लातूर परिवार' आणि रुद्राक्ष ट्रॅव्हल्सच्या वतीने आयोजित मोफत पंढरपूर वारी उपक्रमाच्या ६ व्या वर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता शहरातील यशवंतराव चव्हाण संकुल येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३०१ भाविक वारकरी ६ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. याप्रसंगी उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते वाहनांची पूजा करून वारकऱ्यांना रवाना करण्यात आले. या मोफत पंढरपूर वारी उपक्रमात प्रामुख्याने पानगाव, भोईसमुद्रगा, जवळा, गाधवड, तांदुळजा, रांजणी, घारगाव, शिराढोण, चौसाळा या ग्रामीण भागातील आणि शहरातील भाविक वारकऱ्यांचा समावेश होता. प्रवासादरम्यान सर्व भाविकांच्या फराळाची उत्तम सोय अगदी मोफत करण्यात आली होती. या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराचे सक्रिय सदस्य तथा रुद्राक्ष ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ मेदगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.4
- तब्बल महिनाभर पायी चालून पंढरपूरची वारी पूर्ण केल्यानंतर आणि आषाढी एकादशीचा भक्ती उत्सव संपल्यानंतर लाडक्या विठूरायाला निरोप देऊन भाविकांना आपापल्या गावी परतण्याची ओढ लागते. पंढरपूरहून आपल्या गावाकडे परतणाऱ्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात मनसेच्या वतीने अन्नछत्र चालवले जात आहे.1
- नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघ, नांदेड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव आणि कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे.1
- उमरखेड खरेदी-विक्री संघाच्या कामात मनमानी कारभार चालला असून शासनाची कोणतीही रॉयल्टी न घेता हजारो ब्रास मुरुम थेट बाजारात विकला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ठेकेदाराने स्वतःच्या मर्जीने हजारो ब्रास मुरुमाची बाजारात विक्री केली आहे. शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता मनमानी पद्धतीने मुरुमाची विक्री केल्याप्रकरणी आणि खरेदी-विक्री संघाच्या या कारभारावर आता सामान्य नागरिकांमधून थेट सवाल उपस्थित केले जात आहेत.1
- अकोला राष्ट्रीय महामार्गावरील राजूर चौफुली येथील उड्डाण पुलालगतच्या सर्विस रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. अपघातांची मालिका सुरू होण्याची भीती निर्माण झाल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. या पार्श्वभूमीवर, रविवार २६ तारखेला सकाळी ११ वाजता मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उपनेते तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. आमदार खोतकर स्वतः जेसीबीसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी निष्काळजी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून फैलावर घेतले. "नागरिकांच्या जीवाशी खेळ चालणार नाही!" असा कडक इशारा देत त्यांनी प्रशासनाला तात्काळ रस्त दुरुस्तीच्या कामाला लावले.1
- नांदेड येथील शाकुंतल स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील 'शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी' या भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना संस्कृतीचा वारसा लाभावा आणि संस्कृतीची जाण व्हावी या हेतूने शाळेतर्फे सर्व सणांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या दिंडीमध्ये विविध प्रकारचे देखावे सादरीकृत करण्यात आले असून त्याद्वारे सामाजिक संदेशही देण्यात आला. अतिशय मोठ्या उत्साहात ही दिंडी पार पडली.1
- कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील ग्रामसेवक कोरे यांनी जेम (GeM) पोर्टलवरून केलेल्या सिमेंट काँक्रेटच्या बेंच खरेदीत मोठा भ्रष्टाचार आणि काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाजारभावानुसार केवळ ३,००० रुपये किंमत असणारे बेंच जेम पोर्टलवरून एकास ९,९९९ रुपये या दराने खरेदी करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण ९ बेंच तब्बल ८९,९९१ रुपयांना खरेदी करण्यात आले असून, या वस्तूंना सोन्याचे किंवा चांदीचे पॉलिश केले आहे का, असा उपरोधिक सवाल करत गटविकास अधिकारी (बीडीओ) कळंब व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी सुनावणी झाली असली तरी आजपर्यंत कोणतीही पारदर्शक कारवाई झालेली नाही. त्यामुळे बीडीओ कळंब यांनी जेम पोर्टलच्या नावाने चाललेला हा काळाबाजार बंद करून शासन व जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी, दोषींवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी आणि बाजारभावानुसारच खरेदी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.3