बनावट रॉयल्टी; उमरखेड तालुक्यामध्ये घाटातून लाखोंचा उपसा उमरखेड महसूल प्रशासनाची माफियांपुढे 'नांगी' बनावट रॉयल्टीसाठी 'मॅजिक' पेनचा सर्रास वापर उमरखेड:- उमरखेड तालुक्यातील महसूल प्रशासन आणि सत्ता पक्षातील शिर्षस्थ 'नेते' यांच्या कुटील संगनमातून उमरखेड तालुक्यातील बोरी-चातारी, दिघडी देवसरी,कारखेड, बेलखेड,मारलेगाव, लिंबगव्हाण,हातला जनूना कोपरा (बु.) इत्यादी रेती घाटावरून नियमांना अव्हेरून उत्खनन केले जात आहे. खासकरून रॉयल्टी (वाहतूक पास) उपलब्ध नसताना बनावट पासच्या माध्यमातून रेतीची विल्हेवाट लावली जात आहे. उमरखेड तालुक्यात रेती माफियांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून मनमर्जीने अवैध वाहतुकीतून प्रचंड प्रमाणात पैनगंगेच्या खोऱ्यात रेतीचा उपसा सुरू आहे. रात्रंदिवस नियमांना झुगारून कथित राजकीय पक्षांचे 'म्होरके' असल्याच्या अविर्भावात या तस्करांचा जणू रेतीघाटांवर वावर आहे. विशेष म्हणजे या तस्करांच्या टोळक्याला 'माध्यम' वर्तुळात मिरविणाऱ्या परंतु अवैध व्यवसायात गुंतलेल्या एका जोडगोळीचे जुगार, 'पाठबळ' आहे. मटका, पत्तेजुगार पाठोपाठ आता थेट रेती तस्करीत हात 'ओले' करून ही जोडगोळी आपले 'दिव्य' प्रताप पार पाडत आहेत. शिवाय या जोडगोळीला पुरक असलेले आणि पोलीस दप्तरी शिरावर गंभीर गुन्ह्यांची नोंद राहिलेल्या तस्करांची यामध्ये थेट भागिदारी आहे. वास्तविक उमरखेड तालुक्यात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परंतु हे प्रकार नित्याचेच झाले असतानाच बोरी-चातारी दिघडी,देवसरी,कारखेड, लिंबगव्हाण,हातला जनुना,कोपरा (बु.)या रेतीघाटावर सुरू असलेली माफियांची गुंडागर्दी स्थानिक प्रशासनाला आव्हान देणारी ठरते आहे. मागील वर्षी याच माफियांच्या टोळक्यातील काही सदस्यांकडून अग्निशस्त्रांचा खुलेआम वापर झाला होता. जणू कायदा आपल्या खिशात असल्यागत या माफियांचा पंचक्रोषित वावर असतो. आताही हाच प्रकार बोरी, चातारी, कारखेड, देवसरी, दिघडी, लिंबगव्हाण, मारलेगाव, हातला, -जनुना, यासह विविध भागात सुरू असून महसूल प्रशासन 'पायाशी' असल्यागत या माफियांचा मुक्तसंचार आहे. रेतीचा उपसा दुसऱ्या घाटावरून आणि रॉयल्टी मात्र तिसऱ्याच घाट स्थळाची असा शासनाचा महसूल बुडविणारा प्रकार खुलेआम उमरखेड तहसीलदाराच्या नाकावर टिच्चून सुरू आहे. येथील तहसीलदार स्वतः 'स्वच्छ' प्रतिमेचे असल्याचा नेहमी शासन दरबारी कांगावा करतात. परंतु या तस्करांच्या मनसुब्यात त्यांचे कांगावे पार धुळीस मिळाले आहेत. बॉक्स वादग्रस्त 'लाला'शी 'समन्वय' साधणारा नेता कोण? उमरखेड, पुसद आणि महागाव या तीनही तालुक्यात खासकरून रेती तस्करीत 'लाला'चा पत्ता चालतो. सत्ताधारी नेत्यांना 'ब्लाईड' पार्टनर करून त्याचे अवैध धंद्यांचे कारनामे सर्वश्रुत आहेत. शिवाय माध्यमातील जोडगोळी सोबत असल्याने अशांचे चांगलेच फावते. हाच प्रकार बोरी, चातारी, देवसरी, निगडी, कारखेड, लिंबगव्हाण, मारलेगाव, हातला,-जनुना या पैनगंगा नदीपात्रातील रेतीघाटावर सुरू असून बनावट रॉयल्टीतून पाठबळ देणारा हा समन्वयक 'नेता' कोण, असा सवाल पर्यावरणप्रेमीमधूनच नव्हे तर सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आह

- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- दारव्हा शहराजवळील दिग्रस रोडवरील एका शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना आज १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता घडली. मकसूत खान यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील चिरडे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते अग्निशामक दलाने वेळीच दाखल होऊन आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.घाटंजी येथील जयस्तंभ चौकात महिलांनी नृत्य विस्कारातुन बाबासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली वाहीली.1
- आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड1
- वाशीम :-तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त राजकुमार पडघान होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बंडू पडघान,के.डी जाधव होते.प्रसंगी सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नंतर कार्यक्रमांचे प्रमुख असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून आंधारात असलेल्या सर्वच समाजाला प्रकाशाकडे नेवून माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला.एवढेच काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आणून देशातील प्रत्येकांना समान हक्क,अधिकार,बहाल करून त्यांना शिक्षणांची द्वारे खुली केली.म्हणून आज आपण मोठ्या सन्मानाने जीवन जगत आहोत.त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.असे सांगून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भागवत मोहीरे यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षक गणेश जाधव तर आभार प्रदर्शन शिक्षक गजानन इढोळे यांनी केले.यावेळी शिक्षक वृंद संजय नाईकवाडे, विश्वनाथ इढोळे, गोरखनाथ ठोंबरे, दिपाली कापसे, सोनाली दिवटे,मंगला आसोले, उषा कव्हर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दिलेल्या निबंधा विषयी मार्गदर्शन करून अभिवादन केले.2
- Post by Sharad Dayedar1
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पांढरकवडा मार्गावर ट्रक आणि चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकीमधील दोंघाचा हा घटनास्थळावरच मृत्यु झाला तर एक महिला ही गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी महिलेला उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं. साखरा येथुन पांढरकवडा मार्गे आदीलाबाद येथे जात असलेली चारचाकी ट्रकवर आदळुन हा भीषण अपघात झाला.1