येवल्यात 'शिंदे पाटील चषक'चा उत्साह; रोहित पवारांची मैदानावर हजेरी येवला: येथील स्वामी मुक्तानंद क्रीडा मैदानावर आयोजित 'शिंदे पाटील चषक २०२६' या भव्य टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधून स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक केले. शिंदे पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेने उत्तर महाराष्ट्रात मोठे आकर्षण निर्माण केले आहे. रोहित पवार यांच्या भेटीप्रसंगी शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शिंदे, उपाध्यक्ष सुनील शिंदे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे प्रामुख्याने उपस्थित होते. शनिभक्त * श्री. श्री. १००८ महामंडलेश्वर स्वामी संत सुखदेव महाराज (बाकी नेवपूर) या प्रसंगी इंजि. प्रशांत शिनकर, राजू बाकळे, दीपक गुप्ता, दीपक घिगे, सुशांत हजारे, शाहू राजे शिंदे, डॉ. संकेत शिंदे, प्रशांत शिंदे, संजय शिंदे, रवि पवार ,सुभाष गांगुर्डे , विशाल परदेशी यांसह शिंदे पाटील फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा उत्साह वाढवण्यात आला. शिस्तबद्ध नियोजन आणि भव्य बक्षिसांमुळे या स्पर्धेने क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून, मैदानावर प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला .

- ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी रोहित पवारांचे जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नुकताच येवला दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एडवोकेट माणिकराव शिंदे आणि प्रसिद्ध मका व्यापारी गोरख आबा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पवारांचे स्वागत केले. या दौऱ्यातील मुख्य कार्यक्रम माणिकराव शिंदे यांच्या ‘रायगड’ निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा केली. मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माणिकराव शिंदे आणि गोरख आबा पवार यांनी रोहित पवारांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रोहित पवारांच्या या दौऱ्यामुळे येवला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शरद पवार गटाने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- चांदवडच्या जेआरजी विद्यालयात श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान श्रीमंत कोकाटे शिव शाहु फुले आंबेडकर साहित्याचे व्याख्याते2
- Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)1
- महिला आरक्षणावर आ.फरांदे आक्रमक; १ लाख स्वाक्षऱ्या संसदेत पाठवणार नाशिक:महिला आरक्षण विधेयकावरून आमदार देवयानी फरांदे यांनी विरोधकांवर टीका करत महाराष्ट्रातून १ कोटी व नाशिक जिल्ह्यातून १ लाख महिलांच्या स्वाक्षऱ्या संसदेत पाठवणार असल्याचे जाहीर केले. २०२३ मध्ये विधेयक जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लागू करण्यास सहमती देणारे विरोधक आता भूमिका बदलत असल्याचा आरोप त्यांनी केला. वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिलांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांविरोधात जनमताचा मोठा दबाव निर्माण करू, असा इशाराही त्यांनी दिला.1
- एम आय एम पक्षांच्या नगरसेवकांची वागणूक चांगली नसल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे महापूर समाजातील तर यांनी माध्यमांची गुंतला सदरील माहिती दिली आहे एम आय एम पक्षाची नगरसेवक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची वागणूक चांगली नाही अशी माहिती त्यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे.1
- नारीशक्ति वंदन विधेयक पर घमासान,, छत्रपति संभाजीनगर में 'नारीशक्ति वंदन विधेयक' के विरोध को लेकर कांग्रेस और राहुल गांधी के खिलाफ महिलाओं का जबरदस्त आक्रोश,, महिला शक्ति प्रदर्शनकारी महिलाओं ने राहुल गांधी के पोस्टर्स जलाए और कांग्रेस की भूमिका को महिला विरोधी बताते हुए जमकर नारेबाजी की, राहुल गांधी मुर्दाबाद के लगाए नारे, #ChhatrapatiSambhajinagar #NariShaktiVandanAdhiniyam1
- येथील कोपरगाव रोडवरील 'आसरा लॉन्स' येथे मंगळवारी 'विरात हिंदू संमेलन' मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले. हिंदू समाजाची एकात्मता आणि धर्मजागृती या उद्देशाने 'हिंदू संमेलन समिती, येवला' यांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गीत रामायण, देशभक्तीपर गीते आणि पोवाड्यांनी झाली. भक्तीमय संगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी प्रमुख वक्ते श्री. सुनील दत्तात्रय काळे (धर्म जागरण प्रांत मंडळ सदस्य) यांनी हिंदू संस्कृती आणि संघटन या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच श्री. चंद्रकांतदादा अण्णासाहेब मोरे (स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणीत) यांनी उपस्थित जनसमुदायाला शुभाशीर्वाद दिले. महिलाशक्तीचे प्रतीक म्हणून ह.भ.प. सुवर्णामाई अनिल म. जमधडे आणि श्रीमती नलिनी रंगनाथ रायजादे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनात मोठ्या संख्येने नागरिक आपल्या सहपरिवारासह उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक भजनाने झाला, त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हिंदू समाजाच्या संघटनासाठी असा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.1