अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा मार्ग मोकळा; मतदार यादी प्रसिद्ध, मानोरा त मानोरा: सहकार क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निवडणूक विभागाने बँकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून, मानोरा तालुक्यातून संचालक पदासाठी चार प्रमुख नावांची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यामुळे सहकार प्राधिकरण मार्फत केव्हा ही निवडणूक जाहीर होऊ शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली पूर्ण झाल्या आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यामुळे आता लवकरच प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीवर हरकती घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. ## मानोरा तालुक्यातून चौरंगी लढतीचे संकेत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर वर्चस्व मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मानोरा तालुक्यातून यंदा कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तालुक्यातून पुढील चार नावे चर्चेत आहेत: विद्यमान संचालक उमेश ठाकरे प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि सहकार क्षेत्रातील पकड यामुळे यांचे नाव आघाडीवर आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले स्थानिक संस्थांवर असलेले वर्चस्व आणि कार्यकर्त्यांचे जाळे ही यांची जमेची बाजू मानली जात आहे. डॉ श्याम जाधव नाईक युवा नेतृत्व म्हणून समोर येत असून, नवीन मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता यांच्यात दिसते.बँक प्रतिनिधी यादीत बंजारा मतदार यांची नावे अधिक असून यापूर्वी माजी आ. अनंतकुमार पाटील यांनी पोहरादेवी येथील राष्ट्र संत डॉ रामराव महाराज यांचे काका स्व. तुकाराम महाराज हे एक वेळा संचालक म्हूणन निवडून गेले होते. त्या नंतर डॉ श्याम जाधव नाईक यांचे करिता बंजारा मतदार ही जमेची बाजू मानली जात आहे.मानोरा नगर पंचायत नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे विरोधी गटातील प्रमुख चेहरा म्हणून यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.त्यानी आपले नाव मतदार यादीत आणल्यामुळे ते यावेळी निवडणूक लढण्याची शक्यता अधिक आहे. # सहकार क्षेत्रात चुरस वाढणार अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याची 'आर्थिक नाडी' मानली जाते. या बँकेवर ताबा मिळवण्यासाठी जिल्हयातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मानोरा तालुक्यातील या चार नावांच्या चर्चेमुळे आतापासूनच निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. पुढील काही दिवसांत पक्षीय पातळीवर अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने, कोणाला संधी मिळते आणि कोण माघार घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. # तीन नेत्यांची भूमिका महत्वाची या निवडणुकीत तालुक्यातील ३४ मतदार संख्या आहे. यावेळी यातील बहुतांश मतदार माजी आ. सुभाष ठाकरे, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड यांना मानणारा वर्ग अधिक आहे. तर यातील काही मतदार सहकार नेते सुरेश गावंडे यांना मानणारा असल्याने हे नेते मंडळी आपली ताकड कोणत्या उमेदवारच्या पाठीमागे उभी करतात यावर बरेच समीकरण अवलंबून आहे. यावेळी परिवर्तन घडून नवीन चेहरा संचालक होईल असा अंदाज सहकार तज्ञ व्यक्त करीत आहे.

- Post by Nagesh Awachar1
- Gtv news marathi / सन्मान ' आई बाबांचा ' हा सोहळा आजच्या समाजासमोर एक आदर्श - आमदार मुनगंटीवार https://youtu.be/wo6sPPfjkME # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.1
- प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌1
- Post by Sharad Dayedar1
- 📍“अंजनगाव सुर्जीत चाकूहल्ल्याचा थरार | LIVE अपडेट” शहरात दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास चित्तथरारक घटना घडली असून नवीन बस स्थानकाजवळील परकाले वाइन शॉप परिसरात दोन जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचे नाव गौर असे समजले तर दुसऱ्या जखमीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी दोघांनाही तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्ल्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे. #police #PoliceInvestigation #NewsUpdate #public #viralvideochallenge #InvestigationUpdate #PublicIssue #anjangaonsurji #जागरमराठी1
- राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत किनवट प्रकल्पाची उत्तुंग भरारी... किनवट आदिवासी विकास प्रकल्पाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्य पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे किनवट प्रकल्पाचा नावलौकिक वाढला आहे1
- "सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केलं अभिवादन" https://youtu.be/9C40vuvEFKY?si=ITemcZzUadyNqU_f बुलडाणा माझा न्यूज 💥💥💥💥💥💥💥 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइनिंग व्हा व दररोजच्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचा https://chat.whatsapp.com/L0EGJ4POJ4QLiCvBVg8Lb6 बातम्या व जाहिरातीसाठी:- mazabuldhana@gmail.com1
- #चित्तथरारक अंजनगाव सुर्जीत चाकूचा थरार; दोघांवर चाकूने हल्ला...शहरात चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली असून दोन जणांवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी दोघांना तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. #murder #crime #truecrime #mystery #truecrimecommunity #serialkiller #horror #killer #truecrimeaddict #truecrimepodcast #serialkillers #murdermystery #truecrimejunkie #creepy #justice #homicide #police #thriller #truecrimefan #truecrimeobsessed #scary #halloween #criminal #unsolved #murderer #history #unsolvedmysteries #newsupdate #news #anjangaonsurji #public #जागरमराठी1